IMMUNITY SYSTEM
Hello...
काय म्हणताय कसे आहात सगळे लाईफ मे और खाने मे तडका कसा असला पाहिजे कळना सगळ्यांनाच तडक्या शिवाय काय मजा नाही... हल्ली खूप लोक भारीच हेल्थ कॉन्शस झालेत.. म्हणजे चोरून कधीतरी अनहेल्दी फूड खात असतील.. पण सगळ्यांना हेल्दी फूड बद्दल बोलायला वाचायला फार आवडतं... ह्या कोरोनामुळे इम्मुनिटी बूस्टर हा एक नवीन पॉईंट आलाय तुम्ही टीव्हीवरच्या ऍडव्हर्टाईस बघितल्यात का??? सॉरी जरा स्पष्ट जुन्या मराठीत बोलायचं झालं तर, एक हात खाण्याचा.. एक हात धुण्याचा.. तसंच अगदी ऍडव्हर्टाईसच झालंय... खाण्याच्या सगळ्या गोष्टीत इम्मुनिटी बूस्टर आणि धुण्याच्या सगळ्या गोष्टीत कोरोनाव्हायरस चे किटाणू 99.9% मरतात... हे सगळं बघून वाटायला लागलाय इतकं सगळं 0.1% कोरोनाव्हायरस च्या किटाणू मुळे होतंय का??? कारण बाकी 99.9% किटाणू तर रोज मरतायत😅😂
अन्न आणि आपला आहार हे मुद्दे काही नवीन नाहीत पण फार महत्त्वाचे नक्कीच आहेत... म्हणूनच हेल्दी राहण्यासाठी काय खावं.. किती खावं... कधी खावं आणि कोणी किती खावं... या सगळ्यांची उजळणी होण्याची खूप गरज आहे म्हणूनच पुन्हा पुन्हा या गोष्टींबद्दल लिहावसं वाटतं... Food Is Like A Weapon...तुम्ही याने मारु ही शकता किंवा संरक्षणही करू शकता... म्हणूनच या पूर्णब्रम्हाचा उपयोग कसा करायचा हे ठरवण्याचा आणि त्याप्रमाणे त्याचा वापर करण्याचा निर्णय देवाने आपल्यावर सोपवलाय.. कारण आपली इम्युनिटी पावर याच जेवणामुळे वाढत असते... तुम्ही कोणता आहार घेता त्यावर तुमची पर्सनालिटी डिपेंड असते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहितीये का तुम्ही काय खाता याला आयुष्यात काही महत्त्व नाही... "मी हे अजिबात खात नाही" असं तुम्ही कोण कोणत्या पदार्थांबद्दल सांगू शकता ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं... म्हणजे व्हेजिटेरियन सांगतात की मी नॉनव्हेज खात नाही ते एकदम ठाम असतात... पण हेच डायबिटीस असलेली मंडळी ठामपणे सांगत नाहीत की मी गोड खातंच नाही... फक्त प्रसाद असेल तर खातो अशा पळवाटा आहेत त्यात... त्यामुळे इम्युनिटी सिस्टीम वाढवायची असेल तर मी हे खात नाही या प्रश्नाचं ठाम उत्तर यायला हवं...
आईच्या पोटात असलेल्या बेबीला आईच्या अन्नातून पोषण मिळत असतं. आईच्या जेवणात काही कमी-जास्त झालं तर लवकर डिलिव्हरी होणे, बेबी च वजन कमी असणे, त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी असणे, आणि व्यंगत्व ह्या सगळ्या गोष्टींचा विचारच खूप त्रासदायक आहे...आपण का जेवतो पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला ते आवडतं... पदार्थ खावेसे वाटतात म्हणून दुसरं म्हणजे एनर्जी मिळण्यासाठी शरीराच्या वाढीसाठी आणि काम करून झालेली झीज भरून काढण्यासाठी यासाठी शरीराच्या आपल्याकडून फार काही अपेक्षा नसतात... सगळ्या पेशींची भूक भागावी, तहान भागण्या पुरतं पाणी मिळावं, आणि हो सगळ्यात महत्वाचं व्यवस्थित झोप मिळावी, कारण या वेळेतच शरीराला त्याची झीज भरून काढण्यासाठी वेळ मिळतो हल्ली ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे काय होतंय ह्याची सगळ्यांनाच कल्पना आहे त्यामुळे व्यवस्थित ऑक्सीजनही आपल्याला मिळायला हवा थोडक्यात शुद्ध हवा नुसतं हेल्थी Food, आणि Gym ने ही गरज भागत नाही यासाठी ठराविक अन्न ठराविक प्रमाणात खावं लागतं...
आजच्या धावपळीच्या stressful आणि polluted जगात टिकून राहायचं असेल तर शरीर निरोगी ठेवावंच लागेल.... आहार संतुलित हवा. मसाले वगैरे सगळं पकडून कमीत कमी ४० इन्ग्रेडियंट आपल्या रोजच्या आहारात असायला हवेत आणि ते धान्य, डाळी, भाज्या, फळे, दूध, दही, ताक, तेल तुपा यातूनच मिळणार आहेत. जेवण फक्त पोट भरणारं असू नये तर शरीर, मन, बुद्धी या सगळ्यालाच न्यूट्रिशनल व्हॅल्यू पुरवणार असावं... आज-काल Hospitals किती बदललीयेत आता नवी ऑपरेशन पद्धती, नवी मशिन्स, नवी औषधे आलीयेत, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स बांधलीयेत, पण या सगळ्यात सामान्यांना रोग होऊच नये म्हणून काय खबरदारी घ्यावी, याचे नॉलेज देणारी एकही जागा नाही. मुळात शरीराची रोग प्रतिकारशक्ती उत्तम असली आणि ती तशीच कायम ठेवली तरच हेल्थचे अनेक प्रश्न सुटू शकतात... रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी न्यूट्रिशनसची गरज असते.... भरपूर भाज्या, फळे, मोड आलेली कडधान्य, दूध, दही, ताक यातून ती पूर्ण होऊ शकते... प्रदूषणामुळे साथीचे तसेच अस्थमा, डायबिटीस सारखे अनेक रोग होऊ शकतात.... हे प्रदूषण हवा, आणि पाण्यामुळे सगळ्यात जास्त होतं... याने होणाऱ्या रोगांमुळे न्यूट्रिशनसची जी कमतरता होते ती बॅलन्स डाएटनेच भरून काढायला हवी.... म्हणजेच नंतर रोगप्रतिकारशक्ती पुन्हा वाढते... कोणत्याही आजाराची सुरुवात होते त्याआधी बराच काळ लोटलेला असतो... कोणताही आजार काय असा एका रात्रीत होत नाही.... या आजारांचे मेन कारण म्हणजे lack of Nutrition's.. Proper Nutritional food मध्ये धान्ये, डाळी, भाज्या, फळे, दूध, दही, ताक, तेल, तूप या सगळ्या गोष्टी अगदी रोज खायला हव्यात. पण एकाच वेळी भरमसाठ खाऊनही चालायचं नाही... थोड्या थोड्या वेळाने थोडंथोडं खावं.... दुपारी व रात्री चौरस आहार तर सकाळी, संध्याकाळी हलका नाश्ता, दूध असण महत्त्वाचं... बरं इतकं सगळं करूनही व्यवस्थित न्यूट्रिशन मिळत नाहीत, कारण प्रत्येकाची शरीराची रचना वेगवेगळी असते त्यात पुन्हा, मानसिक ताणतणाव, नोकरीमुळे होणारे त्रास, तसंच ताजं अन्न न मिळणे, ताजा भाज्या, फळं, दूध न मिळण, processed food जास्त खाल्लं जाणं या सगळ्यामुळे होऊ शकत...
आपल्या Immunity Power ची यंत्रणा एका वेगळ्या पद्धतीने काम करते.... हा प्रतिकार केवळ germs बद्दल नसतो... आपलं शरीर व्यवस्थित काम करावं छोट्या-मोठ्या आजारांच्या कुरकुरी आपली इम्युनिटी सिस्टीम व्यवस्थित सांभाळून घेते....या प्रतिकारशक्तीसाठी काम करणाऱ्या पेशी आपआपली कामं करत असतात.... काही पेशी आक्रमक घटकांना हाणून पाडतात तर काही जीवाणू, विषाणूंना नष्ट करतात.... काही रोगप्रसारक पेशींना दाबून ठेवतात तर जुन्या आणि काम न करणाऱ्या पेशी शरीरातून काढून टाकण्याचे कामही काही पेशी करतात.... निरोगी शरीरात या कामांमध्ये व्यवस्थित ट्युनिंग असतं.... मेलेल्या पेशींच्या जागी नव्या पेशींची नेमकी वाढही शरीरत होत असते....या पेशींना विविष्ट अन्नघटकांची आवश्यकता असते... चांगल्या क्वालिटीचे प्रोटिन्स, कॅल्शियम, जीवनसत्व अ, जोडीला इतर क्षार आणि जीवनसत्वे महत्त्वाची आहेत... यामधील फॅटी अॅसिड त्यांच्या Natural form मधे असणं महत्त्वाचं आहे.... हे केवळ तेलबिया आणि घाणीच्या तेलातूनच मिळू शकतं. प्रोसेस फुड फायबर नसलेले पदार्थ इम्यून सिस्टीमला, रोगप्रतिकारशक्तीला weak करु शकतात...
ही होती आपल्या इम्युनिटी सिस्टिम ची कहाणी कशी वाटली comment box मधे नक्की सांगा आणि हो माझं पेज नक्की फॉलो करा..
https://www.facebook.com/Chef-Aniruddha-Ranade-103807794923528/
©Chef Aniruddha Ranade
Head Chef, Social Pune
Food Stylist | Consultant | Food Blogger
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा