कॉलेज है या जेल - AND IT'S NOT A CHEF, IT'S COOK...

           

#BLOG: 5

      Hello, कसे आहात सगळे? मी तुमचा शेफ मित्र, पुन्हा एकदा आलोय तुम्हा सगळ्यांच्या जुन्या आठवणी जाग्या करायला.. या लेखाच्या नावावरून तुम्हाला ते कळलं असेलच! पण त्या आधी मी माझ्या सगळ्या वाचक मित्रमैत्रिणींचे आभार मानतो. तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळेच आज-काल knief पकडण्याच्या मोहा ऐवजी पेन हातात घ्यावासं वाटतय.. चलो फिर..चलते है अपने-अपने Past में!!! तुम्ही तुमचा आठवा, मी माझा share करतो. BTW जास्त खोलात जाऊ नका.फक्त Academic's चा विचार करा, नाहीतर "ती सध्या काय करते?" वर पोहोचाल😉
         तर इतर वेळी साध्या फुगे, चॉकलेट साठी काचकूच करणारे माझे बाबा college ची फी भरताना मात्र त्यांनी जराही विचार केला नाही. आम्ही काही फार श्रीमंत नाही, मध्यमवर्गीयच...आणि त्यात OPEN Category 🙆🏻‍♂️!! म्हणजे सवलतीचा काही प्रश्नच नाही. बाबा घरात एकटेच कमावणारे त्यात Government servant. त्यामुळे बदली होण्याची टांगती तलवार कायम डोक्यावर.. बरं अजून एका मुलाचं अख्ख शिक्षण बाकी होतं. एवढं सगळं असून सुद्धा त्यांनी मागचा पुढचा विचार न करता, जवळपास लाखाच्या घरात असलेली माझी एका वर्षाची फी बेधडक भरून टाकली. त्या Fee ची रिसीट पाहून चॉकलेट आणि Pizza खाण्यासाठी केलेली रड-रड सर्रकन डोळ्यासमोरून गेली आणि डोळे पाणावल्याशिवाय राहिले नाहीत.😢😢
          कॉलेज म्हणजे काय! एकदम भारीच ना राव! मोठं-मोठी Kitchen, मोठाल्या Classrooms, त्याही AC!  मोठी library आणि त्याच्या दुप्पट मोठं Canteen😉 असं भलंमोठं 8 मजली कॉलेज- 'Rizvi College of Hotel Management'.  पहिल्या दिवशी 'मुंबई दर्शन' सारखं सगळ्यांच college दर्शन करून आणलं गेलं. मग सगळ्या Uniforms साठी माप घेतली. आणि सगळ्यात important, kitchen tool kit मिळालं. त्यात मस्त भारी वाल्या kniefs, cutters, cake बनवायचं सामान, असं बरंच काही होतं. ते खांद्यावर लटकवलं आणि मनात म्हटलं, "चला! आता आपण Chef झालो 😇! हा खरंतर कॉलेजचा First Day नव्हता,पण First Day ला तुम्ही कस यायचं ते सांगण्यासाठी चा दिवस होता. Rules & Regulations सांगण्याचा दिवस होता.
   आमचं कॉलेज दिसायला जेवढं भारी होतं तितकेच कडक त्याचे Rules होते. अर्थात ते आमच्या भल्यासाठीच होते पण तेव्हा कुठे एवढी Maturity! तर Rules असे की तुम्ही एकदा कॉलेजच्या आत आलात की कॉलेज सुटेपर्यंत तुम्हाला बाहेर जाता येत नसे. First Lecture ला तुम्ही हजर असाल, तर तुम्हाला कोणतही लेक्चर bunk करता यायचं नाही. दोन दिवसांपेक्षा जास्त तुम्ही absent राहिलात तर घरी फोन जायचा. कॉलेजला तुम्ही कोणत्याही वेळेस येऊन चालत नसे. सिक्युरिटी कडे तुमचं Timetable असे, जर तुमचं Lecture चालू झालं असेल तर No Entry For Entire Day. Last लेक्चर संपलं की त्या Lecturer ने सिक्युरिटी ला फोन करून सांगायचं तेव्हाच सिक्युरिटी अख्खा वर्ग सोडायचे. त्यामुळे No mass bunking possible! सुट्टीसाठी एक Leave Card होतं किमान ३ दिवस आधी councelor (वर्गशिक्षक) कडून leave sanction करुन घ्यावी लागे. अचानक नाही आलो तर same - घरी phone! Grooming standards होते clean shave, short hair! याची एक मज्जाच, मला नुकतंच मिसरूड फुटलेलं. आणि आईची ताकीद😠, अजिबात कापायची नाही मिशी.😧 पण कॉलेजच्या नियमापुढे काय चालतंय? त्यामुळे First Year ला पहिल्यांदा मला माझं Shaving kit मिळालं. अरे, अजून नियम राहिलेच की! Jeans,t-shirt Not Allowed, Fromal कपडे compulsory. नंतर त्यांचं परिवर्तन कळकटं घाणेरड्या Purple shade shirt आणि Black Trousers च्या रूपात झालं ती वेगळी गोष्ट. आणि ह्यातले नियम मोडले की १ रिमार्क मिळायचा. ८ रिमार्क झाले की १ मेमो. आणि ३मेमो झाले तर Rusticate!!! हूश्श!!! संपले. 😅आता तुम्हीच ठरवा कॉलेज? का जेल? का आर्मी स्कूल?? काय हवं ते म्हणा.. 
          तर असे आम्ही हॉटेल मॅनेजमेंट चे जवान कॉलेजच्या पहिल्या दिवशी शहाण्या बाळासारखे वेळेत हजर झालो. आणि पहिल्याच दिवशी kitchenचं practical. सरांनी आम्हाला welcome केलं. परत एकदा rules ची उजळणी झाली. आणि ते शब्द बाहेर पडले, "Welcome to Rizvi, My Dear Cook's!" आम्ही दोन मिनिटं ऐकतच राहिलो.याच साठी केला होता अट्टाहास? सरांनी explain करत सांगितलं, "Don't be Amazed, मला माहितीये तुम्ही सगळे इथे Chef  बनायला आलेले आहात. पण end of 3 years तुमचे choices नक्की बदलतील. तुम्हाला जेवण येतही असेल, पण Hotel Industry is Completely Different! तिथलं Atmosphere, Equipments, काम करण्याची पद्धत सगळंच वेगळं असतं. आणि हे सगळं शिकून तुम्ही जोपर्यंत Final Decision घेत नाही, की मला CHEF चं बनायचंय तोपर्यंत You are just an 'Amateur Cook' That's all ! ह्या cook चा chef बनण्याची तयारी फक्त आम्ही करून घेणार. Future is in your hand, तुम्ही कसे पुढे जाता यावर सगळ अवलंबून आहे. जोपर्यंत तुमचे co-workers तुम्हाला 'Chef' म्हणत नाहीत तो पर्यंत तुम्ही सगळे फक्त एक 'Cook' आहात.

          आणि इतक्या वर्षांनीही मी म्हणेन की हेच सत्य आहे!!😊

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट