IT WAS NOT SO EASY AS I EXPECTED - वाटलं तेवढं सोपं नव्हतं!!!

# Blog : 4

Hieee,🙋🏻‍♂️😀 
श्रावण सुरू झालाय आणि त्यात आज पहिला श्रावणी शुक्रवार मी नेहमीप्रमाणे खिचडी खाऊन तयार आहे😎😁 तुमचा शेफ मित्र अनिरुद्ध रानडे, आलोय तुमच्या भेटीला एक नवी Story घेऊन😃काय मग तयार आहात ना सगळे पुढची गोष्ट ऐकायला?😁😉
तर मी बारावीची परीक्षा दिली आणि Hotel Management ची माहिती गोळा करायला सुरुवात केली. आमच्या Family मध्ये ह्या क्षेत्रात कोणी नव्हतं त्यामुळे तिकडून काही मदत मिळेल याचा काही Chance नव्हता. बरं प्रोत्साहन म्हणावं तर ते सुद्धा नाही, कारण कुणाला कशाची माहितीच नव्हती.🤷🏻‍♂️ पण टक्के टोमणे मात्र ऐकायला लगेच मिळाले. 😡😠"Hotel Management? काय मग वडापावची गाडी टाकणार का?" , "हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे वेटर चं काम का रे?", या आणि अशा बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळाल्या. त्यावेळी राग यायचा असं सगळं ऐकून, पण तितकीच जिद्द सुद्धा वाढायची. कारण एकच, आई-बाबांचा पूर्ण पाठिंबा होता.😇 मग माहिती काढण्यासाठी मी परीक्षा संपल्याचा दुसऱ्याच दिवशी Cyber cafe च्या दारात पोहोचलो🏃🏻‍♂️.💻 त्यावेळी ना Touchscreen phone होता, ना कम्प्युटर📵. 3G,4G लांब साधं 2G सुद्धा नव्हतं. पेपरमध्ये Advertise यायच्या पण त्या फक्त कॉलेजच्या असायच्या, बाकी काही माहिती आलीच नाही. Cyber cafe मध्ये जाऊन मी Search सुरू केलं 👨🏻‍💻आणि Google aunty ने जे काही दाखवलं 😳ते पाहून समजलं, "boss, it's not at all easy as I expected", हे प्रकरण सुद्धा वाटलं तेवढं सोपं नव्हतं . 'All India entrance exam' होती😐 आणि Doctor's आणि Engineer ना असते तशी 'JEE for Hotel Management'. आणि विषय काय तर Math's, Science, Language अर्थात English, Logic आणि General Knowledge. 300 marks exam, Negetive Marking म्हणजे उत्तर चुकलं तर मिळालेल्या मार्क्स मधून मार्क वजा होणार. प्रत्येक राज्यात एक College. तुम्हाला मार्क जसे मिळतील तशी Admission, म्हणजे राहत्या शहरात Admission मिळेलच असे नाही. हे सगळं वाचून मी आवंढा गिळला.😲😨 आणि ज्या चहा-कॉफी, एक-दोन भाज्या, आमटी-भात आणि नुकत्याच गोलाकार होऊ लागलेल्या पोळ्यांच्या जोरावर मी जो उडत होतो, ते सगळे एकत्र येऊन माझ्यावर हसत असल्याचा भास मला झाला. 🤕😱पण मनातली आवड खरंच खूप तीव्र होती.
😬 मी सगळी माहिती नीट लिहून घेतली त्यासंबंधी Classes शोधले. सुदैवाने ते माझ्याच शाळेत चालायचे.😃घरी येऊन सगळी माहिती आई-बाबांना सांगितली. पण यावेळी मात्र त्यांनी मला विचारलं "जमेल ना तुला,का दुसरं काही करायचंय?" मी अगदी ठामपणे सांगितलं की "मला हेच करायचंय". JEE साठीचे सगळे सोपस्कार पूर्ण केले. Form भरणे, Fee भरणे आणि लगेच क्लासही लावला. खरंतर मला उशीर झाला होता सगळं करण्यात म्हणजे 11 वीला असतानाच करायला होतं सगळं. पण तेव्हा मी नुसताच बोंबलत फिरत होतो H.M. करणारे म्हणून😜 पण सगळं वेळेत पार पडलं आणि मी Class Join केला. 11वी -12वी नंतर पुन्हा एकदा मला माझ्या शाळेत जाता येणार होतं त्याचा एक वेगळाच आनंद! 😇
बघता बघता परीक्षेचा दिवस उजाडला.😟 खरंच खुप अवघड गेलं सगळं😓😤! कारण तेच जुनं Math's-Science तेसुद्धा English मध्ये तेसुद्धा 11वी-12वीचं. मी मराठी माध्यमात शिकलेलो 10वीपर्यंत आणि 11वी-12वी Art's. त्यामुळे खूप पंचाईत झाली. पेपर अर्थात अवघडच गेला.पण Hopes होते. मी रिझल्टची वाट बघत थांबलो. दरम्यान घरात सुरीचा वापर चालू झाला सुट्टीत आणि थोड्या भाज्या शिकलो.खीर, पोहे, शिरा, उपमा यांची सुद्धा भर पडली.🕺🏻🕺
खूप मस्त वाटत होतं😇 Social Media अस्तित्वात नसताना सुद्धा! आणि रिझल्ट लागला..माझा नंबर काहीतरी 8400 च्या आसपास आल्याचं आठवतंय, म्हणजे निराशा! IHM (Institute of Hotel Management) मध्ये Admission चा chance हुकला पण त्यावेळी बाबांनी आधार दिला. तसं नेहेमी तेच असतात संकट आलं की, आणि तेंव्हाही होते. म्हणाले, "तुझी हीच नक्की इच्छा आहे ना, मग हेच कर". आणि आम्ही private college च्या शोधात बाहेर पडलो. Rizvi was one of the best, at that time. पण Fee खूप जास्त होती, बाबांनी मागचा-पुढचा विचार न करता फक्त माझं Passion बघून Fee भरून टाकली! आणि त्या वेळी मला खरंच भरून आलं😢😢😢.आई-बाबांचा Support असणं किती महत्वाचं असतं हे तेव्हा कळलं!!!🤗🤗🤗🙏🏻🙏🏻🙏🏻 असाच सपोर्ट त्यांनी आत्ता सुद्धा केला आहे पण आता फक्त ते दोघच नाहीत तर त्यात भाऊ आणि बायको सुद्धा शामिल आहेत... 

आमचं फेसबुक पेज नक्की लाईक करा🙏🏻🙏🏻

टिप्पण्या

  1. Very well written Aniruddha, absolutely,, parents blessings are more imp.than others.
    अथक प्रयत्नांनी, घोडदौड अशीच चालू राहू दे, आणि दिलेल्या पाठिंब्याचं आई-बाबांना सार्थक वाटेल ईतकं यश तुला मिळुदे, हीच ईश्वराचरणी प्रार्थना!

    उत्तर द्याहटवा
  2. खरचं आहे आपण अडचण आली की लगेचच देवाचा धावा करतो.आणि देव आपल्या समोर आई बाबांच्या रूपाने उभा रहातो आपले आई वडील हे साक्षात देवच आहे म्हणून आपण आईला सुध्दा देवाच्या जागीच मानतो. आणि हे तू बरोबर जाणलं आहेस तुला नक्कीच काही कमी पडणार नाही तू नक्की ह्या व्यवसायात पुढे जाशील आणि आई वडीलांच नाव काढशील

    उत्तर द्याहटवा
  3. फार छान बेटा, साध्य निश्चित असेल तर अडचणी आणि आव्हाने यांना जो घाबरत नाही तोच यशस्वी होतो. लगे रहो, हम सब तुम्हारे साथ है।

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Thank you so much ह्या सगळ्या तुमचा सुद्धा खारीचा वाटा आहे बाबा तुम्हा दोघांचे आशीर्वाद असेच पाठीशी राहू देत🙏🏻

      हटवा
  4. खूपच छान😃लिखाण संपू नये अस वाटतं😇 पुढच्या लिखाणाच्या प्रतीक्षेत 😃

    उत्तर द्याहटवा
  5. खूपच छान😃लिखाण संपू नये अस वाटतं😇 पुढच्या लिखाणाच्या प्रतीक्षेत 😃

    उत्तर द्याहटवा
  6. खूप छान.. मराठी माध्यमात शिकून ही जी जिद्द तू दाखवली ती खरंच कौतुकास्पद आहे. आणि जे बोलतात त्यांना आपल्या कृतीतून गप्प करणे हे महत्त्वाचे आहे.. कुठलेच शिक्षण सोपे नसते. पण तू ठाम राहिलास. तुझी अशीच प्रगती होवो...

    उत्तर द्याहटवा
  7. खूप छान .. आई वडिलांचा आधार खूप महत्त्वाचा .. 🙏🙏🙌🙌

    उत्तर द्याहटवा
  8. Kharach ajun vachavasa watat. . Thoda jast lihi na. .. (˵ ͡° ͜ʖ ͡°˵)

    उत्तर द्याहटवा
  9. Made me emotional, yes one should be not forget parents next to God, they always with you, go ahead with lots of blessings.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट