आईच्या स्वयंपाक घरात एन्ट्री- MY COOKING JOURNEY👨🏼‍🍳😜🗡️🚫💪

#Blog:2

Hello,again! मी अनिरुद्ध रानडे, सगळ्यात आधी तुम्ही दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल मी तुमचे आभार मानतो.🙏🏻 माझ्यासारख्या एका कॉमन मॅन 👨🏻‍🍳 (Common Chef) ची Story आवर्जून वाचायला तूम्ही सगळे उत्सुक आहात ह्यातच मला सगळं मिळालं.😌🙏🏻 पण मी इथवरच थांबणार नाहीये, Blog सोबतच अजून काहीतरी वेगळं करायचं मी ठरवलंय. जे आपणा सगळ्यांना परवडण्यासारखही असेल आणि आवडीने शिकण्यासारखही🍪🍩🥘🍕🍜🍝🍔🌮🍮.   ते काय🙄🤔 याची झलक तुम्हाला माझ्या पुढचा आठवड्यातल्या Blog मध्ये पाहायला मिळेल😃 आणि नक्कीच तुम्हाला आवडेल ही.😇


चला, आता जास्त वेळ न घालवता मी माझी छोटीशी स्टोरी सुरू करतो.अजून Bore🤭 😁नाही करत तुम्हाला.🤐😃

 तर, लहानपणापासूनच मला cooking ची जाम हौस. आणि माझ्या आईला शिकवण्याची भारी हौस, कारण ती व्यवसायाने Teacher, पण सगळ्यात अव्वल Cooking मध्ये. त्यामुळे 'सोने पे सुहागा'😀. हल्ली जरा मी कधी कधी माझ्या टिप्स देतो तिला, आणि ती सुद्धा, "हो हो, माहितेय मोठा शेफ आहेस ते, पण घरात मीच अजून  Executive Chef आहे", असं म्हणून हळूच माझ्या टिप्स Follow करते आणि मी सुद्धा काही माहीत नसल्यासारखं दाखवतो😉. तर असा लहानपणीच सुरू झाला होता आमचा Cook आणि  Executive Chef चा प्रवास! सुरूवातीला दूध तपावण, मग चहा-कॉफी, यावरून माझी झेप थेट कुकर लावण्यापर्यंत कधी गेली कळलंच नाही. त्यात आईला Helping Hand🤝 म्हणून मी कायम हजर😎 मग गॅसकडे लक्ष ठेवणं, मिक्सरमधून काही वाटून देण असं सगळ असायचं. घरातलं फंक्शन, कोणी पाहुणे मंडळी येणार असतील तर आईचा स्पेशल बेत असायचा. मग माझी चंगळ😁, छोटी छोटी कामं मिळायची करायला. आईने कोणताही पदार्थ करायला कोणतस माप वगैरे वापरल्याचं मी तरी कधीच पाहिलं नाही, Except दिवाळीचा फराळ आणि Cake! या दोनच गोष्टी ती मोजून-मापून करायची. आता तस ह्यात काही फार नवल वाटण्यासारखं नाही तुमच्याही आयांनी कधी मोजून-मापून गोष्टी बनवल्या नसतीलच, पण हे त्या वयात तुम्ही किती जणांनी Observe केलं असेल ह्यात शंका आहे.,🤔😉
       किचन मधला सगळ्यात ☝️पहिला नियम अर्थात आमच्या Executive Chef चा😏! सगळ्या वस्तू ज्या जागेवरून काढल्या त्याच जागी परत ठेवायच्या. याचे दोन फायदे आहेत.🤘 एक म्हणजे एकदा हातात काम घेतल्यावर वस्तू शोधायला लागू नयेत. आणि दुसरा, पुढच्या वेळेस काम करताना ती वस्तू त्याच जागी सापडली पाहिजे. Next नियम ✌️सगळ्या पदार्थांचे वास आणि चव लक्षात ठेवणे. ही Taste Development तेव्हापासूनची बरं का!😇
तेव्हा म्हणजे, जेव्हा मी स्वतःला Chef काय Kitchen Steward (हॉटेलमध्ये किचन ची भांडी धुणारा) म्हणण्याचा कुवतीचा पण नव्हतो. कारण मला आजपर्यंत एकही पदार्थ कापायला मिळालेला नव्हता. आणि ते यापुढेही मला मिळणार नव्हतं  कारण, सगळेच आई-बाबा मुलांच्या बाबतीत sensetive असतात. एकच भीती - बोट कापेल.... 😱😲😳 आणि खरं सांगायचं झालं तर मी आजपर्यंत कधीही कापायचा साधा प्रयत्न सुद्धा केलेला नाही🙅🏻‍♂️🙆🏻‍♂️. आश्चर्य वाटलं असेलच! अहो त्याचं काय आहे,आमची आई कापाकापी साठी विळी वापरते. जी मला कधीच जमली नाही😰 Or मी कधी Try पण केल नाही.😷 कदाचित लहानपणापासून ची भीती असेल. पण मी खरंच अजूनही एकदा सुद्धा विळी वापरली नाहीये😅. आणि गंमत म्हणजे आईला सुरीची भीती👻. अहो भीतीचं कारण same... बोट कापलं तर😰??....😂😂😂 तरी आता आई लिंबू वगैरे कापायला लागलीये सुरीने.😬😜 काय करणार, आता आमच्या घरात सुऱ्यांची संख्या वाढत चाललीये, कारण आम्ही दोन भाऊ आणि दोघांनीही हॉटेल मॅनेजमेंट केलेलं😁. तर मी जरा वयात येईपर्यंत तरी सुरी काही माझ्या हातात आली नाही. But That Doesn't Mean की माझं Cooking थांबलं. फक्त मला कापायला मिळायचं नाही cook करायला....Bindasss😎!! साधारण ७वी-८वी पर्यंत मला कुकर आमटी आणि बटाटा भाजी यायला लागली होती सोबत चहा-कॉफी येतच होती. पोळी शिकायला थोडा वेळ लागला, पण तो तर सगळ्यांनाच लागतो, जगातल्या सगळ्या देशांचे नकाशे सगळेचजणं बनवतात...😉😁😜 
So, That's How My Cooking Journey Had Began.👨🏻‍🍳😎😇
🙏🏻🙏🏻🙏🏻... पुढच्या शुक्रवारी परत भेटू एक नवीन Story आणि नवीन Surprise घेऊन... धन्यवाद...🙏🏻😇

टिप्पण्या

  1. मस्त जमलयं.मनःपूर्वक शुभेच्छा🤗💐

    उत्तर द्याहटवा
  2. Excellent.
    Mom is most &Must in each step ..like your true example .
    Keep it up dear👌

    उत्तर द्याहटवा
  3. खूप च छान, पण friday to fridya म्हणजे जरा उशीर वाटतो, असं आत्ता वाचतांना जाणवलं.. weekly 2 days blog, हवा,, मधे अंगरखा आठवडा गेल्यामुळे कनेक्शन थांबलेल्या सारखं वाटतंय....

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मला माहितीये तुम्हा सगळ्यांची उत्सुकता खूप वाढतीये आणि मला त्याचा खरच खूप आनंद आहे पण माझी ही consept फक्त ब्लॉग एवढीच सिमित नाहीये अजून बरंच काही ठरवून ठेवलंय हळूहळू कळेलच. आठवड्यातून दोनदा मी नक्कीच येईन पण ब्लॉग नाही वेगळं काहीतरी घेऊन. तुमचे खूप खूप आभार. Stay tuned..🙏🏻🙏🏻😇😇

      हटवा
  4. छान वाटल. असेच लिहित रहा. पुढिल ब्लॉगकरता शुभेच्छा 😉😉

    उत्तर द्याहटवा
  5. खूप छान अनिरुध्द ..... मस्त......Good going

    उत्तर द्याहटवा
  6. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  7. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  8. आईच्या स्वयंपाक घरातून थेट प्रथितयश शेफ, छान प्रवास आणि खूप छान संवाद, मनःपूर्वक शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. तुमचे खूप खूप आभार पुढच्या आठवड्यात नक्की वाचा धन्यवाद🙏🏻😇

      हटवा
  9. Hii Aniruddha Khup chhan lihile aahes n mukhya mhanje tu n aai che lihile aahes pan aamhi mothe aslo tari he sagle aamchya aaibarobar aamche cooking relate kartoy junta smrutina ujala milala. Khup chhan

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अगदी बरोबर बोललात तुम्ही, ही गोष्ट तुमची माझी सगळ्यांचीच आहे आयुष्यात कुठे ना कुठे मेळ खाणारी ती वाचून तुमच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या याचा मला खूप आनंद आहे. धन्यवाद!!! पुढच्या आठवड्यात नक्की वाचा🙏🏻😇

      हटवा
  10. खूप छान लिहिले आहे अनिरुद्ध chef 👌👌👏👏 ..

    उत्तर द्याहटवा
  11. खूप छान अनिरुध्द फक्त शुक्रवार 2 शुक्रवार खूप गॅप वाटतो निदान आठवड्यातून 2 वेळा तरी पाहिजे आणि तुझी आई तर gr8 आहे आणि तिच्या तालमीत तू बेसिक गोष्टी शिकलास त्यामुळे तू 1 उत्तम शेफ आहेस यात शंकाच नाही keep it up👌👌👍👍

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मला माहितीये तुम्हा सगळ्यांची उत्सुकता खूप वाढतीये आणि मला त्याचा खरच खूप आनंद आहे पण माझी ही consept फक्त ब्लॉग एवढीच सिमित नाहीये अजून बरंच काही ठरवून ठेवलंय हळूहळू कळेलच. आठवड्यातून दोनदा मी नक्कीच येईन पण ब्लॉग नाही वेगळं काहीतरी घेऊन. तुमचे खूप खूप आभार. Stay tuned..🙏🏻🙏🏻😇😇

      हटवा
  12. मस्त jiju .... आता Friday कधी अतोय या कडे लक्ष लागलंय.......keep writing..👍👍👍👌👌👆👆

    उत्तर द्याहटवा
  13. खूप छान लिखाण. पुढच्या वाटचलीसाठी शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  14. Hie..after long time we have got in touch.hope u r doing well.so thanks for sharing this n very beautifully written 👌🏻👌🏻 act..saglyancha stories asach astat na like start from mommy's kitchen..memories tajya zhalya, so very nice blog & keep writing👍🏻👍🏻 all d very best 👍🏻👍🏻 gbu😊

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Thank you so much Kirtu😃.. yesss m all well..yes you are right hi mazi ektyachi nahi saglyanchi story aahe life madhe kuthetari relate karnari... Please stay tuned for new story.🙏🏻😇

      हटवा
  15. नियम खूपच छान.एक suggestion आहे...तुम्ही qualified chef आहात तर प्रत्येक blogच्या शेवटी टीप म्हणून जमल्यास cooking मधले काही सोपे नुस्के किंवा hacks वाचकांसाठी post करा...गृहिणींंना आणि cookingची आवड असणाऱ्या(मुख्यत: पुरुषांना)त्याचा उपयोग होऊ शकेल.😊
    बाकी उत्तम...Keep posting & blogging🤘

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Thank you Mr. KD तुम्ही दिलेलं सजेशन खूप आवडलं. मी नक्की पुढच्या वेळे पासून काही टिप्स देत जाईन. पुढच्या आठवड्यात नक्की वाचा.

      हटवा
  16. खूप च सुंदर ...माला घरची आणि आई आज्जी ची आठवण झाली ....माझे देखील विळी शी जमत नाही ... कापेल या कारणाने दोघींनी कधी हात च लावू दिला नाही ... आणि काही ही चिरणे हा आज्जी ्चा प्रांत नो एंट्री .....

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. बघ तुझ्याशी पण रिलेट झाली स्टोरी काय गंमत आहे ना काही जुन्या गोड आठवणी मी ताज्या करू शकलो याचा मला खूप आनंद आहे धन्यवाद पुढच्या आठवड्यात माझी नवीन स्टोरी नक्की वाच.

      हटवा
  17. Tujhe blog vachun junya sagalya aathavani jangya jhalya.. kharach mJhya hi Aai ne mapane jevan banval nahi.. aani ti ajunahi bhaji kapayala ,,विळी ch.vaparate🤣🤣🤣🤣🤣🤣

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट