आता पुढे काय- WHAT NEXT🤔🤔 CAREER कशात???🙄🙇🏻‍♂️🤷🏻‍♂️


Hello, नमस्कार
आतापर्यंत थोडाफार ओळखायला लागला असाल तुम्ही तरी पण पुन्हा एकदा मी तुमचा 'शेफ मित्र अनिरुद्ध रानडे'. वाह! काय नाव सुचलय!! 'शेफ मित्र'😃अगदी 'पोलीस मित्र' ची copy वाटते ना?🙆🏻‍♂️ असो, पण छान आहे. आणि एकदम लक्षात राहील असं...😉 Yes, तर मी असाच दर शुक्रवारी तुमच्या भेटीस येणारे! आता यात काय THANK GOD ITS FRIDAY ची वगैरे Copy नाहीये, 🙅🏻‍♂️पण मी 80's Born आहे. त्या वेळी दर Fridayला च MOVIES RELEASE व्हायचे तसच मी करायचे ठरवलय. आणि दुसरं CONNECTION 'FOOD' सोबतचं. दर शुक्रवारी माझ्या बाबांचा उपास असतो. त्यामुळे घरी "साबुदाण्याची खिचडी" असते, जी मला जाम आवडते🤤😋. आणि मग ती गरमागरम खिचडी खाऊन लिहायला सुचतं..बापरे!!😬किती बोलतोय मी🤭🤐Main Topic राहिलाच बाजूला😅😜...
 तर...एकीकडे आत्ता सारखं Cooking (Unlock) होत होतं आणि अभ्यास (Lockdown) होत जात होता. अहो, म्हणजे एकीकडे पोळपाटावर च्या पोळ्यांच नकाशातून गोलाकारात रूपांतर होत होतं, आणि दुसरीकडे प्रोग्रेस कार्ड वरचे गोल (zero's) वाढत चालले होते आणि माझ्या (Goals) चहा काहीही पत्ता नव्हता😐. आता कमी होत चाललेले मार्क म्हणजे आईचं ओरडणं आलंच😬. त्यातही ती अभ्यासावरून ओरडायची, पण 'किचनमध्ये यायचं नाही, काही करायचं नाही' असं कधीही म्हणाली नाही. कदाचित तो प्रांतच वेगळा होता..आहेच म्हणा! त्यामुळे त्याचं शिक्षण देणं तिने अजूनही सोडलेलं नाही..असे अजून बरेच पदार्थ तिच्याकडून शिकायचे बाकी आहेत..😇


    मीसुद्धा बाकी मुलांसारखा 'Average Category' मध्ये मोडणारा होतो. बरं Cooking काय एकच नव्हतं बाकीसुद्धा गोष्टी आई-बाबांनी शिकायला पाठवलं अर्थात मला आवडणाऱ्या Extra Curricular Activities... हो त्यातच मी Martial Arts, तबला वगैरे शिकलो. पण हे सगळे लाड ९वी पर्यंत खपवून घेतले गेले. आणि मग १०वी चं वर्ष आलं आणि तसच पटकन संपलंही. पण आता मोठा प्रश्न होता 'Career कशात करायचं?' याचा! तोपर्यंत या प्रश्नाकडे लक्षच गेलेलं नव्हतं. डॉक्टर, इंजिनिअर मला व्हायचं नव्हतं. कारण त्या वेळी सगळ्यांना तेच करायचं असायचं😏😏. आत्ता ही त्यालाच जास्त मान आहे,😅पण प्रमाण त्या वेळेपेक्षा खूप कमी झालंय.😎 Maths आणि Drawing या दोन्ही गोष्टी कधी जमल्याच नाहीत मला. Science मध्ये थोडा intrest होता.. पण त्या जोडीला maths आलंच😣. यापैकी कोणत्याही विषयात Career मला जमणारं नव्हतं. माझे बाबा व्यवसायानी Chief Cameraman होते. त्यामुळे By Blood Photography 📷 मध्ये थोडा रस होता. आणि त्यावेळी B.M.M. सुद्द्धा खूप जणं करत होती.मग मी ते न निवडलं (तूर्तास). आणि १०वी नंतर Art's ला ऍडमिशन घेतली, तिथे Psychology विषय होता. त्यातही माझा Intrest वाढायला लागला. आणि कुकिंग तर घरी सुरू होतच😉११वी ला मी N.C.C. ही  join केलं. त्यावेळी Army, पोलीस मध्ये वगैरे भरती व्हायचा विचार डोक्यात आला.. 😬 बरं! हे काय माझ्या पुरतंच मर्यादित ठेवत नव्हतो प्रत्येक वेळी मी आईला सांगायचो, आणि ती बाबांना😉😉 पण त्यांनी कधीच मला हे करू नकोस असं म्हटलं नाही. उलट त्या विषयीची अजून माहिती द्यायचे. कदाचित ते सुद्धा माझ्या पक्क्या निर्णयाची वाट पाहत असतील. पण ११ वी सरली तरी माझं काही ठरेच ना..🤔 मग मात्र आईने Initiative घेतला आणि माझ्यातल्या खऱ्या Talent ची मला ओळख करून दिली, माझे 'Cooking Skills' आणि त्यासाठी करिअर म्हणून निवडावे लागणारं 'Hotel Management' हे क्षेत्र. त्यासाठी लागणारी सगळी माहिती तिने काढून ठेवली होती. ते कसं चांगलं आहे, याचं उदाहरण दिलं कारण त्यावेळी फार मुलं या क्षेत्राकडे वळतच नव्हती आणि माझ्या डोक्यातली चक्र भरकन फिरली. ठरलं! हेच करायचं! कुछ हटके! बाबांनी सुद्धा होकार दिला😃 मग काय ''मी म्हणजेे 'Chef होणं''

ही CONCEPT डोक्यात ठेवून बारावीची परीक्षा दिली. मी आज जो काही आहे तो आई-बाबांनी घेतलेल्या Initiative मुळेच. आईला जास्त श्रेय.. कारण ? विसरलात का?😁 अहो आमची Executive Chef आहे ती😃😄 तर असा मी एक स्वप्न घेऊन H.M. करण्यास सज्ज झालो.
              काय मग कशी वाटली आजची Story? थोडीफार Relate करते का तुमच्या आयुष्याशी😉 तुमचा अभिप्राय नक्की कळवा! तुमचे अभिप्राय माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. गेल्या वेळेस मला खूप जणांनी सुचवलं की मी हे आठवड्यातून दोनदा लिहावं, पण मी काही हाडाचा लेखक नाही आणि हे माध्यम मी तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वापरलं आहे. तुम्हा सगळ्यांना आपलंसं करायला, थोडं हसवायला, थोडं तुमच्या भूतकाळातल्या आठवणी परत एकदा डोळ्यासमोर आणायला😃 माझा मूळ उद्देश तुम्हाला Cooking शिकवणे हाच आहे. नवीन नवीन रेसिपीस तुम्हाला करून दाखवणे आणि हो तुम्ही सुद्धा माझ्यासोबत Cook करणार आहात, So मी 'Virtual Cooking Classes' घ्यायचं ठरवलं आहे. तुम्हाला त्याचा अंदाज यावा यासाठी मी एका अगदी सोप्या रेसिपी चा व्हिडिओ आज तयार करणारे 😃 तुम्ही तो नक्की बघा. आपल्या एका SESSION ची फि फक्त १०० रुपये (one hundred only) इतकीच असणार आहे. या कल्पनेबद्द्ल तुम्हाला काय वाटतं हे मला Comment section मध्ये नक्की कळवा. सगळ्यांच्या सोयीसाठी सध्यातरी मी 'रविवारी' क्लास घ्यायचं ठरवलं आहे. बाकी सगळं तुमच्या प्रतिक्रियांवर DEPEND आहे. 'आत्मनिर्भर' होण्यासाठी काहीतरी करायलाच हवं ना!!!😉😁🤭 आज संध्याकाळी व्हिडिओ नक्की पहा. आणि हो आमचं Facebook आणि Instagram Page पण लाईक करा.
हेच होतं माझं Surprise😀😀 Presenting to you {Artisanal Virtual Kitchen} तुम्हाला कुकिंग क्लास बद्दल काहीही विचारायचं असेल तर तुम्ही मला व्हाट्सअप सुद्धा करू शकता.😃
 
मी तुमच्या प्रतिक्रियांची आवर्जून वाट पाहतोय. सगळे मला नक्की साथ देतील असा विश्वास आहे म्हणून आधीच तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. 🙏🏻🙏🏻
 
तुमचा शेफ मित्र,

-अनिरुद्ध रानडे(ANIRUDDHA RANADE)

WhatsApp Number: +919324137771





टिप्पण्या

  1. प्रत्युत्तरे
    1. Thank you so much बाबा तुमचे आशीर्वाद असेच पाठीशी राहूदेत...🙏🏻🙏🏻🙏🏻

      हटवा
  2. वाह सुरेख लिखाण, आणि खरंच रे आई-बाबांचा पाठींबा असेल,तरच त्यांची
    मुलं आपापली आवड जपुच शकतात.

    उत्तर द्याहटवा
  3. Superb... खरचं खुप छान आहे तुमचा experience... मस्त वाटले वाचून...

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Thank you so much shalaka ji tumhi nehmi aavarjun post vachata tyavar tumachi pratikriya deta tya baddal khup khup dhanyavad stay tuned...😇🙏🏻

      हटवा
  4. Samhita cha mhanan correct aahe.. aai vadilanchi support asel tar tyanchi mula pahije tya faculty madhe yash milau shaktat... Chhan likhan

    उत्तर द्याहटवा
  5. खूप छान अनिरुध्द. मस्त लिहिले आहे. Good Luck.......Good going.....keep it up

    उत्तर द्याहटवा
  6. Recipe share करण्याची आणि class घेण्याची कल्पना छान आहे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf5V0HEmQfp6ZUdd69y2tivT7leGrKdzFcc4Ayn7CvabhYMSA/viewform?vc=0&c=0&w=1

      Tumhi ha form bharun mala pathava mhanje mala tumcha saglya aavadi nivadi kalatil😇🙏🏻

      हटवा
  7. Superb blog as expected,Waiting for the video😃
    all d best for new venture..wish u all d success and love♥️

    उत्तर द्याहटवा
  8. मस्तच मित्रा
    मनपूर्वक शुभेछ्चा

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट