26/11/2008
Hello, काय म्हणताय सगळे? कसा चाललाय weekend तुमचा... नेहमीचे ओळखतच मला पण आपल्या नवीन Joiners साठी मी माझी ओळख करून देतो
मी तुमचा शेफ मित्र अनिरुद्ध रानडे आजची स्टोरी थोडी वेगळी ,थोडी घाबरवणारी ,थोडं Emotional करणारी अशी आहे... चलो चलते है मेरी दुनिया में
आता मी दुसऱ्या वर्षात गेलो होतो वेगळा अभ्यासक्रम नवीन विषय यावेळेस किचन मध्ये आम्हाला Bulk Cooking शिकवलं जाणार होतं. दुसऱ्या वर्षात नवं म्हणजे Internship करायची होती ६ महिने, त्यासाठी Interview असणार होते. So college सहाचं महिने होतं. आणि पुढचे सहा महिने 5*स्टार हॉटेलमध्ये ट्रेनिंग(Internship). आमच्या कॉलेजमध्ये दुपारचं जेवण Free होतं आणि Compulsory पण, हे हे हे! अजून एक नियम 😉 2nd year ची मुलं अख्ख्या College साठी जेवण बनवायची. आणि जसं बनलं असेल तसं सगळ्यांना Compulsory खावं लागायचं😂 हा हा हा!
Lunch hours मध्ये Canteen मध्ये जाणं Allowed नव्हतं. Canteen च्या Entrance वर 2nd year ची मुलं उभी असायची ती सगळ्यांना Mess मध्ये हकलवायची.Solid धमाल असायची... ह्या वेळेस आमचा नंबर होता. जवळपास ६०० मुलांसाठी आम्ही जेवण बनवायचो, ३० जण मिळून 5 Course Meal!!! पण कधीही थकवा जाणवलाच नाही. बघता बघता ६ महिने निघून गेले आणि माझ्या आयुष्यातला पहिल्या इंटरव्यू चा दिवस उगवला तोही गणपतीतच. पहिलाच इंटरव्यू आणि मी पास झालो. माझं सिलेक्शन झालं. आता मला महिन्याला पगार stipend मिळणार होता. किती असेल? Any Guesses? 800Rs/month!!! हा हा हा😂
17 November,2008 ला Internship ला सुरूवात झाली.
मला पुन्हा माझं पहिलं 5 Star मधलं पाऊल आठवलं, तेच Taj Mahal Hotel मधलं. मला सगळ्यात आधी
In Room Dining डिपार्टमेंट मिळालं. तिथे माझं काम किचन मधून Orders PickUp करणे, coffee बनवणे, cutlery आणि glasses धुवून wipe करणे असं होतं. सकाळी 7 ते संध्याकाळी 7-8 पर्यंत! खुप थकायला व्हायचं. घरी जाईपर्यंत अंगात जीवच नसायचा.
जेवलो की झोपलं हेच Routine.
एक दिवस असाच मी रोजच्या सारखा तयार होऊन हॉटेलमध्ये जायला निघालो. मी वडाळ्याला राहायचो, हॉटेल चर्चगेटला. ट्रेन बदलून जावं लागायचं. सकाळी ५.१५ ची बस पकडायचो स्टेशन वर जायला. त्या दिवशीही पकडली. घरूनच uniform घालून जायचो, black-pant आणि white shirt. बस वेळेवर आली, पण नेहमीसारखी गर्दी नव्हती. कंडक्टरची तोंड ओळख होती. मी विचारलं, "का हो काका, आज गर्दी नाही फार?" तर त्यांनीच मला उलट प्रश्न केला, "तू कुठे चाललायस?".
मी पण अगदी उत्सुकतेनं कुठे, काय काम करतो ते सांगितलं. बस अगदी स्टेशनवर पोहोचत होती की ते काका ओरडलेच माझ्या अंगावर, "वेड लागलंय का तुला? आधी उतर आणि घरी जा!!" मला कळेच ना, परत काका, "अरे हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट झालेत!". मी हवेतच उडालो, "काय??!!!" होय ती तारीख होती २७/११/२००८...
त्यांनी स्वतः बस थांबवली आणि आधीच्याच स्टॉप वर मला त्यांनी उतरवलं. मी सुद्धा दोन मिनिटं गांगरुन गेलो. त्यावेळी मोबाईलही नव्हता. मी PCO शोधून घरी फोन लावला. ते सुद्धा नशीबच एका पेपरवाल्या च्या दुकानात होता PCO म्हणून इतक्या सकाळी उघडं तरी होतं. मी आईला झाला प्रकार सांगितला. तिने न्यूज लावून Confirm केलं आणि ताबडतोब घरी बोलावलं. माझा तर विश्वासच बसेना. अहो 26/11 ला सुमारे ८ पर्यंत मी हॉटेलमध्येच होतो. आणि सकाळी हे असं!!! कितीतरी लोकांनी प्राण गमावले, त्यात शेफ ही होते☹️ एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सुद्धा असं काही घडू शकतं, म्हणजे आपली काम करण्याची जागा सुद्धा आता जोखमीची झाली आहे हे तेव्हा लक्षात आलं.....
घरी आल्यावर मनात विचार आला,
काल माझं Shift Timing वेगळं असतं तर? दुपारची किंवा रात्रीची Shift असती तर? चर्चगेट ऐवजी मी व्हीटी वरून वडाळ्यासाठी Direct ट्रेन पकडण्याचा विचार आला असता तर?
मी घरी सुखरूप आलो असतो???
शेवटी नशिबाचा भाग...🙏🏻🙏🏻🙏🏻
©Aniruddha Ranade
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा