1st Day of Hotel Management
Hello, नमस्कार कसे आहात सगळे? कोरोना च्या बातम्यांचा कंटाळा आला असेलच ना, मग किचन मध्ये शिरून नवं काही बनवून पाहिलं की नाही? मस्त पाऊस पण सुरू झालाय! काय काय बेत केला ते सांगा मलाही. तुमच्यातली एखादी रेसिपी मी पण करून बघतो आणि फोटो अपलोड करतो पुढच्या वेळेस! काय झालं? आश्चर्य वाटतंय की काय? अचानक कामाचं कुठे बोलायला लागला, आम्ही आपलं पुढची कॉलेजची स्टोरी वाचायला बसलोय.
Actually महिना झाला आपली ओळख होऊन, म्हणून म्हटलं आज तुम्हाला एक विनंती करावी. माझ यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि माझ्या पेजला सुद्धा लाईक करा👍 दोन्हीही लिंक मी इथे देतोय. एवढी छोटीशी मदत तुम्ही तुमच्या मित्राला नक्कीच कराल, म्हणून आधीच तुम्हा सगळ्यांचे खूप आभार. मी एवढं सगळं करण्याचे डेरिंग तुम्हा सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळेच केल. तुम्ही कमेंटमध्ये दिलेल्या शुभेच्छा-आशीर्वादामुळेच मला पुढे पुढे लिहावसं वाटतं. Please कराल ना तुमच्या मित्रासाठी एवढं? रेस्टॉरंट बंद असल्या कारणाने मलाही 'आत्मनिर्भर' व्हायचंय आणि ते तुमच्या साथी शिवाय ते अजिबात शक्य नाही. मी माझे Virtual क्लासेस सुद्धा सुरू केलेत😃खूप जणांनी यात भाग घेतलाय. आणि पुढचं सेशन उद्या होणारे... तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार! आता जाऊया परत कॉलेजच्या विश्वात!
तर पहिल्याच दिवशी आमच्या professor नी गुगली टाकून सगळ्यांचाच मूड ऑफ केला होता, that "you are just a cook". पण बरोबरच आहे म्हणा मेहनत सगळ्या क्षेत्रात असते इथेही असणारच होती. पण त्याच दिवशी एक सुखद अनुभव सुद्धा आला. पहिल्याच दिवशी आमचं Bakery चं सुद्धा प्रॅक्टिकल होतं. त्यात आम्हाला Bread Rolls बनवायला शिकवले.आणि आमच्या कॉलेजचा एक चांगला रूल होता, 'ऐच्छिक' अर्थात! तुम्ही बनवलेले पदार्थ तुम्हाला घरी घेऊन जाता यायचे किंवा तिथेच खाता यायचे. त्या दिवशी सगळे खूश होऊन घरी गेलो, बनवलेले ब्रेड नाचवत. आता साधा पाव तो, त्याचं काय कौतुक? अहो पण ते आम्ही बनवले होते ना..गोडच लागणार!! घरी येऊन सगळ्यांना खायला दिले. सगळ्यांनी शाबासकी दिली! वाहऽ,आता वाटलं आपण chef झालो!!! तर असच रोजचं रुटीन सुरु होतं. मग हळूहळू विषय कळले.
Food production: म्हणजे किचन,जेवण बनवणे!
Food beverage: म्हणजे Food Service! Waiter
Front office: Reception Desk
Housekeeping:जिथे आम्हाला अगदी टॉयलेट सुद्धा साफ करावे लागणार होतं! आणि
Bakery Confectionery: माझा सगळ्यात आवडता विषय 😃
Hotel Accountancy, Catering science and management principles..पहिल्या वर्षाला असे विषय होते. त्यात भर म्हणून 2 language related subjects एक French, कारण इथल्या बऱ्याच terms फ्रेंचमध्ये असतात. आणि दुसरा English, improve करण्यासाठी. यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल 'it's not at all easy'. हे सगळं इथे कॉलेजमध्ये होत होतं आणि घरी आईचं वर्चस्व असलेले किचन हळूहळू तिच्या हातून निसटून जात होतं. कारण त्यावर एका योध्याने आक्रमण केलं होतं. अहो खरच आम्हाला ज्या दिवशी युनिफॉर्म मिळाले त्या दिवशी घरी त्याच ट्रायल झालं. अर्थात पहिला नंबर chef jacket चा. जॅकेट, त्यावर माझं नाव, खाली टिपिकल checks ची पॅन्ट, apron, scarf, Chef cap आणि मला त्यावेळी कॉलेज कडून मिळालेल्या सुऱ्या हातात घेऊन, Kodak चा रोलवाल्या कॅमेरातून 3-4 फोटो काढले. खरंच लढायला सैनिक तयार होतो तसाच फील येत होता..हेहेहे😁!!! आता परत एकदा वाटलं, चला झालो आपण chef! पण दुसऱ्या सेकंदाला आईचा आवाज ओरडण्याचा सुरात, "हा ओट्यावर पसारा मांडून ठेवलाय तो आवरा आधी! अजून इकडे शेफ मीच आहे,आणि तू अजून हेल्परच आहेस''. "कॉलेजमधे प्रोफेसर आणि घरी आई, मला काही सहजासहजी Chef बनू देणार नाहीत बहुतेक', अर्थात मनात म्हटलं मी हे😅 पण आई-बाबा खूश होते.
त्यावेळेस माझा Idol होता 'Chef Gordon Ramsay'.अजूनही तोच आहे पण आता तो एकटा नाहीये, बरेच आहेत.. या लोकांनीच आमच्या प्रोफेशन ला Glamour मिळवून दिलं. सेलिब्रेटी शेफ आपल्याकडे हिंदी त्यावेळी एकच होता, 'Khana Khazana fame, Chef Sanjeev Kapoor'. मी कधीकधी पाहायचो ते, पण खरं सांगू का? मजा नाही आली. Gordon ला बघितल्यावर कळलं की Chef कडे किती Power असते. त्यावेळी आपल्या झी मराठीवर ही कुकिंग शो लागायचा. अजूनही लागतो I guess, "आम्ही सारे खवय्ये". त्यातही Chef Vishnu Manohar, Chef Nilesh Limaye, Chef Parag Bharat Kanhere यांनी आमच्यावर बराच प्रभाव टाकला. खूप काही शिकलो आम्ही यांच्याकडून, पण शेफ मधला Arrogance Chef Gordon Ramsey नेच शिकवला. आता मी पण त्याला copy करतो कधीकधी. त्यामुळे माझे co-workers जरा घाबरूनच असतात😅 तर असाच अजून एका मराठी मुलाची, म्हणजे माझी हो, स्वप्नपूर्ती कडे पावलं पडायला सुरुवात झाली. आज एवढ्यावरच थांबतो पुन्हा भेटू एका नव्या स्टोरी सोबत.
बरं ते Virtual क्लासचे लक्षात ठेवा😃 माझ्या पेजवर आणि यूट्यूब चॅनल वर पहिल्या क्लासचे Glimpses अपलोड केलेले आहेत. तुम्हाला पुढच्या क्लास मध्ये कोणती Dish शिकायला आवडेल हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. लवकरच परत भेटू तोपर्यंत खात राहा! आनंदात राहा! 😇
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा