सबको दिखाओ अपना हुनर

 सबको दिखाओ अपना हूनर 

    

     आलोय, आलोय. वेळेवर आलोय! माहित आहे मला, तुम्ही सगळे पुढची गोष्ट ऐकायला थांबले आहात. पण त्याआधी तुम्ही दिलेल्या कंमेंट्स पाहिल्या. सगळ्यांचे आभार! आई आणि बायको सारख्या ओरडत असतात पण माझी किचनमधली लुडबुड अजूनही थांबलेली नाही.काहीतरी नवीन वेगळं बनवावंस वाटतं आणि पसारा करतोस म्हणून आई आणि बायको ओरडत असतात. पण त्यांना डिश सुद्धा आवडते, मग काय राग पटकन पळून जातो. अशीच श्रावणात fish ची आठवण आली म्हणून मी केलेली 'Veg Fish Curry'. आश्चर्य वाटलं ना नाव वाचून पण फोटो पाहून तुम्हाला कळेलच तुम्ही काय बनवलं की नाही श्रावण स्पेशल?  का सगळे उकडीचे मोदक बनवण्यात Busy आहात??

          बाकी सगळे Healthy आहात ना? मस्त Healthy खा आणि Healthy राहा. त्याआधी माझी राहिलेली गोष्ट पूर्ण करूया, कारण मला माहिती आहे त्यात तुमचा इंटरेस्ट वाढतोय,आता पुढे काय होणार?🤔😉

       माझं कॉलेज लाईफ रेग्युलर सुरू झालं. अख्खा दिवस कॉलेजमध्ये जात होता. पण एक चांगलं, कॉलेजची वेळ जास्त असल्याने '5 days week' होता. Sat-Sun सुट्टी. मग एक दिवस मित्र, Theory, अभ्यास यात आणि एक दिवस घरातल्या लोकांवर माझ्या नवीन डिश चे प्रयोग करण्यात जायला लागला. आता मात्र आईचं किचन हळूहळू ताब्यात येऊ लागलं😉 आईच्याही ते लक्षात आलं होतं. मग एक दिवस आमच्यात वाटाघाटी झाली😁. आईने नियम घालून दिले. नॉर्मल आहे, वाटाघाटी अटी-शर्तीं सहच होते!😜 तिने सांगितलं, 'मी cook करत असताना मध्ये मध्ये लुडबुड करायची नाही, माझं काम झालं की तू काय हवा तो गोंधळ घाल आणि सगळा पसारा आणि काय आठ-दहा भांडी होतील ती परत घासून ठेवायची, ओटा मला साफ दिसला पाहिजे' आणि जुना नियम 'जी गोष्ट जिथून काढशील तिथेच परत गेली पाहिजे'. मी पण अगदी शहाण्या बाळासारखं सगळ्याला हो म्हटलं. सुरुवातीला केलं मी सगळं तिने सांगितल्याप्रमाणे, पण जशा माझ्या डिशेस तिला आणि बाकीच्यांनाही आवडायला लागल्या तशी ती थोडी निवळली. मग मला मदत करायला लागली. आता उलट झालं होतं मी तिला सांगत, शिकवत होतो. मग चिडायची लगेच, "हो माहितीये, खूप मोठा शेफ आहेस ते" आणि एकदम स्टाईल मध्ये, "बच्चे तु तो अभी अंडे से बाहर निकला है, मी गेली बत्तीस वर्षे हेच करतेय", असा कडक डायलॉग मारायची हेहेहे!!!. असं अगदी तुमच्या घरी असेल, तसंच वातावरण आमच्याकडेही होतं.  

    

     आमच्या फॅमिली मध्ये कला सादर करण्याचं लोकेशन म्हणजे गणपती उत्सव आणि गणपती म्हटलं की माझा वाढदिवस कॉलेजच्या पहिल्या वर्षाला मी Birthday गिफ्टसाठी हट्ट केला😩😭😉😜 आणि बाबांनी सुद्धा तो मान्य केला हे विशेष... कारण त्यांना Specifically Birthday त्या दिवशीच फक्त gift घ्यायचं ही Concept मान्य नाहीये. पण त्या वर्षी बाबा जरा मूडमध्ये होते आणि पहिल्यांदाच मी मॉलमधून काहीतरी विकत घेतलं होतं आणि चक्क बाबांसोबत जाऊन हे मला वाढदिवसाला आजतागायत मिळालेला दुसरं गिफ्ट याआधी मी सहावीला असताना त्यांनी मला इंग्लिश टू मराठी डिक्शनरी गिफ्ट म्हणून दिली होती आणि हे दुसरं गिफ्ट. तर गणपती विसर्जनाच्या रात्री आमच्याकडे स्पेशल बेत असतो आणि ज्या कोणाचं त्या वर्षी काही चांगलं घडलं असेल म्हणजे रिजल्ट, जॉब किंवा प्रमोशन वगैरे त्यांच्याकडून आईस्क्रीम पार्टी असते. या वेळचा बेत मी करणार होतो सगळे Excited होते कारण इतक्या Young age मध्ये कोणी इतक्या प्रमाणात cook केलं नव्हतं. फॅमिली म्हणजे आम्ही चौघं नव्हे तर रानडे परिवार तरी किमान पंचवीस ते तीस जण असतील, मी मस्त व्हेज दम बिर्याणी आणि रायता, पापड असा बेत बनवायचं ठरवलं. माझीही इतक्या प्रमाणात करायची पहिलीच वेळ त्यामुळे तांदूळ किती घ्यायचे याचा अंदाज नव्हता मग काय होती की आमची एक्झिक्युटिव्ह शेफ{ आई } तिने बरोबर अंदाज सांगितला आणि मी कामाला लागलो माझा नवीन नाईफ सेटचं उद्घाटन सुद्धा त्याच दिवशी झालं. भाज्या चिरल्या, कांदा तळून घेतला भाजा hung curd मध्ये मॅरीनेट करून मस्त बिर्याणी मसाला तयार केला बासमती राइस cook केला सगळीकडे बिर्याणीचा घमघमाट... गणपतीकडे एकदा पाहिलं त्यालाही आज प्रसादात बिर्याणीच हवी असल्याचा भास झाला...😁 सगळी तयारी झाली बाप्पा त्यांच्या गावाला परत गेला अर्थात बिर्यानी मिळालीच नाही त्याला... जाता जाता मला कानात सांगून गेला पुढच्या वर्षी मोदक नकोत असंच काहीतरी चमचमीत बनव आणि मला भरपूर आशीर्वाद देऊन गेला... इकडे सगळे घरी परतले आणि पोटात कावळे ओरडायला सुरुवात... त्यांचा आवाज मला ऐकू येत होता माझी बिर्याणी रेडी होती मी मस्त charcoal चा दम दिला होता... 



हा हा म्हणता सगळी बिर्याणी संपली... सगळ्यांनी वाहवा😃😃😃 केली खूप मज्जा आली मी आई बाबांकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात proud फील होता ते पाहूनच माझे पोट तुडुंब भरलं....

    तर मंडळी अशी होती माझी बिर्याणी ची कहाणी! 

 तुम्हा सगळ्यांना तर माहितीच आहे, मी online क्लासेस सुरू केलेत. आत्ता पर्यंत त्याला तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्याच सहभागाने खूप छान प्रतिसाद मिळाला. आता पुढचं  सेशन उद्या आहे. स्वातंत्र्य दिन स्पेशल थीम. Middle east मधल dessert MUHALABIA आणि Veg Thai Curry. Menu Indian  नाहीये, पण अपना अंदाज इंडियनच असणार 😎 मग भेटू उद्या.. बाकी पुढच्या ब्लॉगसठी  आपली भेट ठरलेलीच आहे 😇 See you all!


© Copyrights by Aniruddha Ranade

Artisanal Virtual Kitchen

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट