शेफ आणि सहचारिणी

 शेफ आणि सहचारिणी


Hello, अहो काय धमाकेदार रिस्पॉन्स दिला तुम्ही माझ्या last article ला. Unexpected movie हीट झाला की त्यात काम केलेल्यांना कसा आनंद होत असेल अगदी तसेच काहीस माझं झालंय. Thank you so very much. तुमच्या constant support मुळे माझ्यातला कॉन्फिडन्स खूप improve झालाय. एखादा फुड बिझनेस सुरू करायचा म्हटला ना की बहुतेकांना वाटतं हे काय खूप सोप्प आहे, मला काहीही फार इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये आणि तो चालेल पण.. कारण खाण्याला मरण नाही वगैरे वगैरे.. मागचा पुढचा विचार न करता उघडलेला बिजनेस हमखास फसतो. कारण वेळप्रसंगी तोट्यात जाऊन सुद्धा बिझनेस करावा लागतो हे आपल्याला मान्य नसतं. अमुक वडापाव वाला दिवसाला पाच सहा हजार कमवतो मग मी वडापाव सुरू केला की तेवढाच चालणार हा भ्रम आहे. म्हणूनच संपूर्ण अभ्यास करून मगच कोणताही व्यवसाय सुरू करावा. काही मार्गदर्शन हवे असेल तर मी आहेच की always available. तुमच्याबद्दल अजून एक गोष्ट मला अफाट आवडते, म्हणजे तसं ते शब्दात व्यक्त करणं कठीणच आहे तो म्हणजे तुमचा माझ्यावरचा विश्वास आणि त्यासाठी मी नेहमीच कृतज्ञ राहीन. अजून एक माझा नावडता विषय group वरचा तो म्हणजे food photos! भारी भारी फोटो टाकतात त्या सगळ्या गोष्टी फोन मधून बाहेर आल्या तर काय मज्जा येईल ना! खायला या म्हणणार्यांना कधीच काही खायला मिळणार नाही😜 आता आजच्या विषयाकडे वळू...

जवळ जवळ सगळ्यांचीच food journey आईच्या देखरेखी खाली सुरू होते. आईने सांगितलेलं सर्वात महत्वाच काम म्हणजे कूकरच्या शिट्ट्या मोजणे. त्यासाठी तो कधी एकदाचा फुसफुसायला लागतोय याच कडे आपल लक्ष असत. कारण तेच लवकर होत नाही. त्यामुळे कुकर फुसफुसे पर्यंत बारीक लक्ष ठेवावं लागतं. म्हणूनच आई आपल्याला हे काम देत असावी बहुतेक concentration वाढण्यासाठी! कारण नंतर शिट्ट्या पटापट होतात आणि काहीतरी मोठं achieve केल्यासारख ऐटीत आपण गॅस बंद करतो. किचन मधली मला न आवडणारी २ कामं आहेत. एक म्हणजे 'धुतलेली भांडी जागेवर लावणे ' आणि दुसरं अगदीच नावडत काम म्हणजे ' लसूण सोलण', सगळ्यात किचकट आणि time consuming काम. आता हे मी नुसतं पोस्ट केलं असतं तर मला वाटतं १०० suggestions आले असते. पण अशी ना तशी लसूण सोलावीच लागते की. आता एक बरंय, restaurent मध्ये ही सोलासोली ची भानगड नसते. Direct सोललेली लसूणच येते. ह्यासाठी घरी एखादं equipment असेल तर काय मजा येईल. तर, लहानपणी आईसोबत सगळी छोटी कामं करायला मिळायची. स्वयंपाक घर म्हणजे आईच्या हक्काची जागा, तिथे आपली मनमानी चालत नाही, आणि लहानपणी तर नाहीच नाही. आता तरी जरा कमी ओरडते पण ओरडते हो कारण माझे पहिले पाढे ५५.  घेतलेली गोष्ट जागेवर जात नाही, तिथेच ओट्यावर पडून राहते. आणि काहीतरी करून बसणार इतक्यात आईचा आवाज येतो ," अनिरुद्ध....(मग समजून जायचं..😅) तू इथून पुढे काहीही करत जाऊ नको, एवढा ढीगभर पसारा करुन ठेवायचा आणि आम्ही तो आवरायचा, आणि म्हणे chef" वगैरे वगैरे.... हाहाहा! पूर्वी काही poket money वगैरे प्रकार नव्हता. लहानपणी आई काहीतरी छोटी छोटी कामं सांगायची आणि त्याबदल्यात रुपया दोन रुपये द्यायची. मग तेच जमवून अरबट चरबट खायचं, वडापाव, ice candy, गोळा 😍

किचन म्हणलं की आई आलीच, तिच्या शिवाय किचन पूर्णच होत नाही. जसं कीचन आणि आई हे समीकरण आहे तसेच chef पण एका गोष्टी शिवाय अपूर्ण आहे आणि ती म्हणजे 'knief' आज मी ह्याच विषयावर बोलणार आहे.


 

नाईफ चे प्रकार काय आहेत, कोण कोणत्या नाईफ घरी असायला हव्यात, नाईफ कशी असावी, वगैरे वगैरे मी आज तुम्हाला सांगणार आहे. Cooking चे धडे मी लहानपणापासूनच घेत होतो. ७ वी -८ वी पर्यंत मला बऱ्यापैकी basic cooking येत होतं. पण चिरायला मात्र काही येत नव्हतं. कारण लहापणापासून आईने नेहमीच विळी पासून लांब ठेवलं होतं. बोट कापेल या भितीनं. त्यामूळे कापायला कधी काही मिळालं नाही, उलट विळी ची भीती मनात बसली जी आजतागायत गेलेली नाही. आणि मी HM ला addmission घेईपर्यंत घरात एकमेव लहान सुरी होती. Emergency म्हणून. ज्याने काहीच कापलं जायचं नाही😅 bread ला Butter लावायला आणि सँडविच केलं तर ते कापायला तिचा उपयोग व्हायचा. आश्चर्य म्हणजे आजही ती सुरी घरात आहे. हाहाहा! आई आता तिचा वापर लिंबू कापायला करते. सगळ्यात आधी मी तुम्हाला माझी आवडती knief सांगतो. ही बहुतेकांनी हमखास बघितली असेल कोणत्याही भैय्या कडे असते. पत्र्याची knief आणि मागे लाकडाच हँडल असत. खूप धार असते तिला, त्यासारखी दुसरी knief नाही. एका cut मध्ये सगळं व्यवस्थित कापलं जातं आणि ते ही एकदम fine. त्या भैया लोकांचं फार अप्रूप वाटतं मला, कसल्याही प्रकारच training नसताना काय फटाफट आणि व्यवस्थित एकसारखं कापलं जातं. मी एकदा आणली होती, पण मला काही झेपली नाही, चक्क कापलं! कारण त्याच पात फार लवचिक असत.ती जे कोणी वापरत असतील त्यांची खरच कमाल आहे राव.. Moving back to professional Knifes at Present मला आवडलेली नाइफ GLOBAL कंपनीची Chef's Knife.. PERFECT TO HANDLE, SHARPNESS JUST AWESOME अजिबात वजनदार नाही किंमत जरा जास्त आहे अं..... Actually खूप जास्त आहे.. दर Birthday ला माझी हीच मागणी असते आणि आईचा दर वर्षी हाच डायलॉग असतो घरात एवढ्या Knife आहेत त्याचीच एक माळ करून आपण गळ्यात घालायची का तुझ्या यावर्षी... जाऊदे ती काय मिळायची नाही बहुतेक पण माझ्याकडून तुम्हाला काही तरी नक्की मिळेल... Important Tips about Knife...

सगळ्यात भारी नाईफ ही जापनीज knife असते जी Sushi बनवण्यासाठी म्हणजेच फिश कट करण्यासाठी युज होते.. Sashimi Knife असं तिचं नाव.. तिची किंमतही जवळपास एक ते दीड लाखाच्या घरात असते.. घरासाठी म्हणाल तर दोन बेसिक Knife घरात असणं गरजेचं आहे एक म्हणजे Chef Knife आणि दुसरी Pairing Knife.. घरासाठी तुम्ही Glare किंवा Cartini कंपनीची Knife घेऊ शकता अगदी त्याहूनही छान म्हणजे Professional, Good Quality आणि Budget मध्ये हवी असेल तर Fiskars किंवा Victorinox खूप छान Option आहेत.. तिची धार लवकर जात नाही ही एक Swiss Company ची Knife आहे.. मला Knife बद्दल माहिती मराठीत सांगणं खरंच खूप कठीण आहे तरी मी प्रयत्न केला आहे कोणाला काही कळलं नाही तर प्लीज विचारा... आपल्या घरी जी Regular Knife असते त्याला Utility Knife म्हणतात जी सरसकट सगळ्याला आपण युज करतो... ते ठीक आहे पण अगदीच बरोबर नाही.. जर तुम्ही नवीन Knife घेणार असाल तर मी सांगितलेल्या दोन Knife नक्की घ्या ह्यातच अजून एक Pattern येतो त्याला "सांतोकू Knife" म्हणतात.. ही तुम्ही Chef's Knife च्या ऐवजी वापरू शकता.. तुमची नाईफ कमीतकमी आठ इंच तरी हवी आणि Pairing Knife साधारण अडीच ते साडेचार इंच इतकी असायला हवी.. अजून एक गोष्ट अशी Meat कापण्यासाठी Hard Knife हवी ज्याने Meat व्यवस्थित कट होईल पण तेच Fish कापण्यासाठी लांब Sharp आणि लवती Knife हवी.. जसे आपल्या शरीराचे अवयव असतात तसेच Knife चे सुद्धा अवयव असतात... सॉरी आता याचा मराठी अनुवाद खरंच शक्य नाही तरीही साधारण मराठीत त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो... 

Bloster हा पात आणि हँडल चा मधला भाग असतो याने हाताला छान ग्रीप मिळते..

Butt म्हणजे Knife चा शेवटचा भाग..

Edge नाईफ चा धार काढलेला भाग हा उजव्या आणि डाव्या लोकांसाठी वेगवेगळा असतो हे लक्षात ठेवा.. मी कोणत्या पक्षाबद्दल बोलत नाहीये हं हाताबद्दल बोलतोय😅

Handle जिथे तुम्ही नाईफ पकडता.

Heel नाईफ चा साधारण मधला भाग जो, टणक पदार्थ कापण्यासाठी वापरतात म्हणजे Meat किंवा कडक भाज्या..

Point टोका कडचा भाग जो बरेचदा भोकं पाडण्यासाठी वापरतात.

Spine हा Knife चा वरचा भाग असतो जो Sharp नसतो.

Tang हा सगळ्यात महत्त्वाचा भाग तुमची नाईफ मागच्या बाजूला किती मोठी आहे यावरून नाईफ चा टिकाऊपणा निश्चित होतो एकसंध Knife जास्त टिकते पण महाग असते.. आणि शेवटचा पार्ट म्हणजे 

Tip हा पात्याचा पुढचा भाग असतो जो 1/4 curved असतो तिथे सगळ्यात जास्त धार असावी लागते शार्प कटिंग त्याच भागाकडून होतं तर अशी असते एका "Chef ची सहचारिणी" Wife  नाही हं... Knife😄😄😄 


आता काही टिप्स😊😊😊

*नेहमी शार्प नाईफ यूज करा धार नसलेल्या नाईफ ने  कापण्याची शक्यता जास्त असते.

*काहीही कापताना सगळं लक्ष त्यावरच असू द्या इकडे तिकडे लक्ष द्यायची वेळ सिरीयल मध्ये महत्त्वाचा सीन असेल तर कापणे थांबवा कारण कधी कधी नाईफ ने कापलेलं कळतही नाही.

*Lefty आणि Righty हा सुद्धा फरक आहे नॉर्मली Knife चा पात्याच्या डाव्या बाजूला धार असायला हवी कारण आपण नकळतच Knife थोडी तिरकी करून पदार्थ कापतो तसंच लेफ्टी लोकांना उलट्या म्हणजेच Knife च्या उजव्या बाजूला धार हवी.

*Knife ची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे स्वच्छ धुऊन पुसून ठेवावी Knife नेहमी.

*शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे  कापण्यासाठी Chopping Board चा वापर करा दुसरं काही वापरलात तर Knife ची धार जाऊन ती लवकर खराब होते.

मग कशी वाटली माहिती नक्की सांगा.. Happy and Safe Cooking...❤ 

Healthy खा आणि Healthy रहा...😀😀

©Chef Aniruddha Ranade

Food Stylist | Recipe Developer | Menu Engineering | Restaurant Consultant | Blogger

टिप्पण्या

  1. खूप अप्रतिम लिखाण, माहिती तर खूपच संग्राही ठेवावी अशीच आहे. मी माझ्या सर्व मित्रांना ही पोस्ट शेअर करत आहे, तुम्ही जी निखळती भाषा शैली वापरलीआहे, ती वाचताना मज्जा येते, आणि ती स्टार्ट to एन्ड वाचकला खिळवून ठेवते. मी तुमचा फॅन झालो एकच पोस्ट वापरून, कारण तुम्हांला येणारा किचन मधला कंटाळा आणि माझा एकच आहे. धुतलेली भांडी लावणे आणि लसूण सोलणे. लसूण सोलायला मी कोणतरी बकरा किंवा बकरी शोधात असतो. अजून खूप लिहा सर.....
    कुणाल आयरे.
    दादर मुंबई

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट