शिप वरचा बाप्पा


Artisanal Virtual Kitchen


Cruise Ship वरचा बाप्पा!!!


Hello, खवय्ये मित्रमंडळी 

कसे आहात सगळे? गणपती बाप्पा काय म्हणतायत? यावेळी Chocolate मोदकांची खूप चलती होती आणि उकडीच्या मोदकांचे तर विचारूच नका. स्वप्नात सुद्धा एखाद्या काकू उकडीचे मोदक वळतना दिसायला लागल्या होत्या😅😅 Jokes Apart पण उकडीचे मोदक करायला खरंच खूप अवघड असतात आणि खायला तितकेच सोपे आणि चवीला अप्रतिम! मला तर वाटतं बाप्पाच्या आड माणूस स्वतःच्याच जिभेचे चोचले जास्त पुरवून घेतो. अहो दहा दिवस दहा वेगवेगळे पदार्थ आपण सगळेच अगदी श्रद्धेने आणि प्रेमाने बनवतो. पण इतक्या वर्षात ते सगळे पदार्थ गणपतीसाठी म्हणता-म्हणता आपल्याही आवडीचे झालेले असतात.

गणपती म्हटलं की फक्त महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या भारतातच एक उत्साह, एक Positive Vibe असते. अहो भारतातच काय, जगभरात गणपतीची देवळं आहेत मी पाहिलेली Thailand, USA, UK आणि Singapore मध्ये तर आहेतच. सगळीकडे भारतीय या १० दिवसांची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. माझीही गणपतीसोबत ची वेगळी Story आहे. तीच सांगायला मी आज तुमच्या भेटीला आलोय. 

माझी नेहमीच Story जरा फास्ट फॉरवर्ड करून पुढे घेऊन जातोय. 2013 साली मी पहिल्यांदा Cruise Ship वर गेलो अर्थात As a Chef. Ship वरची दुनियाच निराळी. ९ महिने एखाद्या मशीन सारखं काम करायचं, आणि ३ महिने घरी आराम करायचा. पण ते ९ महिने सरता सरत नाहीत. आणि माझं आडनिडं कॉन्ट्रॅक्ट होतं. मला फक्त होळी आणि गुढीपाडवा हे दोनच सण घरी साजरे करायला मिळायचे. बाकी सगळे सण Ship वरचं. त्यात गणेशोत्सव म्हणजे १० दिवस नुसता गोंधळ. आम्हाला Ship वर ७ बाय ७ ची एक रूम मिळायची. त्यात दोघेजण राहणार. Ship सारखी हलायची. त्याची सवय होती म्हणा. सुरुवातीला जरा Problem झाला वाटलं, सगळं सोडून घरी जावं पण नंतर हलायला सुद्धा वेळ नसायचा. अगदी साचेबद्ध आयुष्य असतं ship वर. 


सकाळी ७ वाजता शिफ्ट सुरू व्हायची. मी as Assistant Pastry Chef म्हणून Join झालेलो. Ship Join करण्याची दोन कारणं, एक तर बक्कळ पगार तोही US dollars मध्ये आणि फुकटात जग भ्रमंती. पण मघाशी म्हणालो तसं मशीन सारखं काम! सकाळी ७ ते रात्री ११-१२ पर्यंत शिफ्ट. मध्ये ३ तास ब्रेक! आठवड्यात एकही सुट्टी नाही. पण Ship Life एक गोष्ट शिकवते. जिकडे काही नसतं तिकडे सुद्धा आपली माणसं(Indian) जवळ असली की Celebration हे होतंच, मग ते समुद्राच्या मध्यभागी का होईना! तर असाचं आम्ही जोरदार गणेशोत्सव Ship वरही साजरा केला होता अगदी साग्रसंगीत आणि सागराच्या संगतीत😜. गणपतीची मूर्ती, आरास, आरत्या, प्रसाद सगळं दणक्यात! दहा दिवस Non Veg खायचं नाही, ते इथे किंवा Land वर सहज शक्य आहे हो, पण Ship वर खायचं नाही म्हणजे कधीकधी तर उपवासच करावा लागायचा पण त्या दहा दिवसात अंगात इतकी ऊर्जा यायची कुठून काय माहित

साधारण११.३० ला सगळं आटपायचं. मग किचनचं Cleaning करायचं. ते होईपर्यंत १२-१२.१५ व्हायचे. त्यानंतर महाप्रसादाची तयारी पहिल्या दिवशी ठरलेले उकडीचे मोदक.Ship वर Available Ingredients मध्ये उकडीचे मोदक बनवायचे म्हणजे एक दिव्यच! पण बाप्पाचा हात डोक्यावर असायचा त्यामुळे मोदक चांगलेच व्हायचे. असं दर दिवशी वेगळं काहीतरी त्यात गुलाबजाम, शिरा, Spaghetti Pastaची खीर, श्रीखंड, गाजर हलवा, Rice Pudding, Fruit Salad असं सगळ असायचं. रोज दोन जणांनी प्रसाद आणि दोन जणांनी Indian Veg जेवण बनवायचं हे ठरलं होत. एकाची Cabin गणपतीसाठी ठरलेली असायची तिथे सजावट केली जायची. मग गणोबाला मस्त गरम पाण्याने अंघोळ घालून स्वच्छ पुसून त्याची स्थापना करायची. गणपती हा Ship वर दणक्यात साजरा होणारा उत्सव होता. अर्थात त्याला मान्यता नव्हती, पण कधी कोणी Complaint केल्याचं आठवत नाही. आमच्या Ship वर साधारण 53 Nationalities ची लोकं काम करायचे. पण कधीच कोणाला आमच्या आरतीचा, भजनाचा आणि त्यानंतर प्रसादासाठी चाललेल्या आनंददायी भांडणाचा त्रास झाल्याचे आठवत नाही. याउलट सगळेच आम्हाला मदत करायचे प्रसाद म्हटलं की आवडीने खायचे. कधी कधी तर बनवायला सुद्धा पुढे असायचे. त्यामुळे अख्ख्या Ship वरच एक आनंददायी, मंगलमय वातावरण असायचं. आरतीनंतर जेवणाची पंगत बसायची. कारण, व्हेज खायला न मिळाल्याने बऱ्याच जणांचा उपवास झालेला असायचा. मग एकीकडे प्रसाद आणि एकीकडे साधंच काही पण Indian जेवण असायचं. अर्थात ते आम्हीच बनवलेले असायचं पण त्याची मजा काही औरच. By The Way, हे सगळे रात्री २ वाजता बर का! पण कधीही सकाळपासूनच्या कामाचा थकवा नाही जाणवला किंवा परत दुसऱ्या दिवशी ७ वाजता कामावर हजर व्हायचं कधी टेन्शन नाही आलं. ते १० दिवस एक वेगळीच एनर्जी असायची. उत्सवाची सांगता बाप्पाच्या विसर्जनाने व्हायची. टाळ-घंटेच्या गजरात, "गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!" म्हणत बाप्पाचे विसर्जन व्हायचं! असा असायचा आमचा Ship वरचा गणेशोत्सव! 

मला सांगा, तुमची एखादी खास आठवण आहे का हो गणपती बाप्पाशी जोडलेली? मला नक्की वाचायला आवडेल. चला तर मग पुन्हा भेटूयाच😀 

मंगलमूर्ती मोरया!!

©Aniruddha Ranade

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट