या भांड्यात दडलय काय भाग २

Artisanal Virtual Kitchen


या भांड्यात दडलय काय भाग २


नमस्कार, 🙏🏻🙋🏻‍♂️

ओळखलं ना yes correct तुमचा शेफ मित्र अनिरुद्ध रानडे काय मग आज काय स्पेशल???चकल्या शंकरपाळे तेलात पोहायला लागले का??☺️☺️☺️

माझे articles नेहमी Food Related असतात कधी माहिती देणारे, कधी जुन्या आठवणींचे, कधी मजेशीर आजचा सुद्धा असाच आहे आनंद देणारा आणि Emotional करणारा सगळ्यांकडेच special occasions ला काहीतरी स्पेशल बेत बनतोच आणि स्पेशल बेत म्हंटलं की स्पेशल भांडी आलीच😄

देवा भांड्यांच तर काही विचारूच नका इतके प्रकार आलेत प्रत्येक पदार्थाला वेगळी प्लेट आता घरात माणसं चार आणि प्लेट 40 बरं काही घरांमध्ये तर रेलचेल सुद्धा नसते फक्त सोशल मीडियावर आपलं फुड कसं छान दिसेल या मागेच असतात आणि त्यात गैर ते काय आपली कला लोकांसमोर आणण्यात कशाला लाज वाटून घ्यायची रेस्टॉरंट मध्ये सुद्धा प्रत्येक पदार्थाची प्लेट ठरलेली असते डिनर प्लेट, डेझर्ट प्लेट, स्टार्टर प्लेट, पास्ता बोल, आईस्क्रीम कप and so on... तसेच घरातही असत plates जरी लिमिटेड असल्या तरी पदार्थ बनवण्याची भांडी मात्र वेगळी असतात. स्पेशली व्हेज-नॉनव्हेज वाली तर असतातच. भांड्यांमध्ये सुद्धा बऱ्याच आठवणी दडलेल्या असतात बरं का! आज आपण वाचणार आहोत अशाच एका भांड्याची कहाणी. 

फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट जरी माझी असली तरी तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी घडलेली; प्रत्यक्ष अनुभवलेली आता इथे बर्‍याच जणांनी माझ्याहून जास्त पावसाळे पाहिले असतील पण सगळ्यांनाच लिखाणात रस असतो असे नाही. काहींना वाचनात असतो तर काहींना निर्जीव गोष्टी सजीव करण्यात इंटरेस्ट असतो घाबरू नका काही जादू वगैरे करणार नाहीये.😁😁 

पण मी आज माझी गोष्ट सांगणारे "मी ताकाचं कोळगं" वय वर्ष 117 तुम्हा सगळ्यांपेक्षा मी मोठा आहे बरं आणि आजही अगदी ठणठणीत आहे😊 आता वयोमानाप्रमाणे तीन चार कोचे गेलेत पण तेवढं चालायचंच. 


माझा जन्म साधारण पुण्याजवळ कुठेतरी झाल्याचं आठवतंय. त्यानंतर मी साठे यांच्या दुकानात येऊन बसलो (काल्पनिक नाव) बरेच महिने मी नुसताच आरामात एका लाकडी कपाटात बसून होतो. माणसं यायची- जायची माझ्याकडे पाहायची माझ्या शेजारच्या ला उचलून घ्यायची पण मला कोणी हातही लावला नाही त्यामुळे मी एकदम पवित्र होतो☺️ पण आराम करण्याचे सुख फार काळ कोणाला मिळते😓 आता माझा नंबर लागला होता आप्पा भाऊ रानडे (नाव काल्पनिक) यांनी मला घरी न्यायचं निश्चित केलं. आजकाल मुलं टॅटू का काय करतात तसं माझ्याही अंगावर ठोकून ठोकून अगदी वेदना होईपर्यंत टॅटू करण्यात आलं; "आप्पा भाऊ रानडे आणि परिवार यांसकडून सप्रेम भेट दिनांक ९ मे१९०७". खूप दुखलं हो पण माझं कुठे काय चालतंय मुकाट सगळे सोपस्कार करून घ्यावे लागले आणि माझी स्वारी आप्पा भाऊंच्या घराकडे निघाली. आता मला नवीन घर मिळणार होतं मी एकदम खुश झालो होतो त्या नादात माझ्या अंगावर झालेल्या वेदना थोड्या बाजूला राहिल्या; पण आजही ते नाव माझ्या अंगावर तसंच्या तसं शाबूत आहे. पुढले काही दिवस मी एकटा पडून राहिलो. साठेंकडे सगळ्यांची वर्दळ होती आजुबाजुला पातेली, ताट, वाट्या सोबतीला तरी होते इथे मी एकटाच होतो. अचानक एक दिवस आप्पा आणि परिवार नवे कपडे घालून कुठेतरी जायला निघाले आणि मलाही सोबत घेऊन जात होते म्हणजे पुन्हा घर बदलावे लागणार होते असं वाटलं. मला एका लग्नसमारंभात नेण्यात आलं होतं. सदाशिव खरे (काल्पनिक नाव) आणि उमा खरे यांना लग्नात भेट वस्तू स्वरुपात मला देण्यात आलं. आता मात्र माझ्या आजूबाजूला बरीच मित्रमंडळी होती ताट, वाट्या, पातेली, घागर त्यात एक वेगळंच भांड होतं आमच्यापेक्षा गोरगोमट ते चांदीचं होतं म्हणे साजूक तूप ठेवण्यासाठीच. मला थोडा रागच आला मीच नसेन तर तू कुठून येणारस (ताकच नसेल तर तूप कसं मिळणार)😜 असो तर खूप दिवस आम्ही सगळी मंडळी एकत्रच होतो. मग Finally तो दिवस आलाच मला स्वच्छ पाण्याने धुऊन घेतलं गेलं माझा तो पिवळाधमक रंग (पितळी) सूर्यप्रकाशात अगदी सोन्यासारखा दिसत होता मग कोणीतरी आजीबाई ओरडल्या, 'अहो सुनबाई हे कोळगं ठेवलय साफ करून ताक करायचयं ना आणि मग माझ्या पोटातील पोकळीत दही घालून त्यात माझ्या सारख्याच पितळेच्या; जीला लाकडाचा दांडा होता अशा रवीने घुसळून ताक बनविण्यात आलं त्यावर मऊ लुसलुशीत लोण्याचा गोळा होता बरं का!! आणि अशा पद्धतीने माझं नाव मला कळलं "कोळगं" आणि माझा उल्लेख 'खरेंकडचं ताकाच कोळगं' असा होऊ लागला. नंतर माझा वापर रोजच होऊ लागला पुढे खरेंच कुटुंब सुद्धा वाढत होतं त्यांना दोन मुले झाली. जसजसे दिवस बदलत होते तसे खरेंच्या स्वयंपाक घरात नवी-नवी मित्रमंडळी मला दिसायला लागली. म्हणजे माझ्यासोबतीला आलेली पातेली ताट मोडीत सुद्धा निघाली मला सौ खरेंची नेहमीच भीती वाटायची मला सुद्धा हे कधीही मोडीत काढतील पण त्यांनी माझी नेहमीच काळजी घेतली. माझा रंग आजही जसाच्या तसा होता पण आता सौ खरे म्हाताऱ्या झाल्या होत्या. दरम्यान घरात दोन नवीन सौ खरे आल्या त्यातल्या एकीचा माझ्यावर फार जीव अगदी मोठ्या खरें सारखाच. त्या मला त्यांच्यासोबत मुंबईला घेऊन गेल्या. आता पुन्हा माझं नवीन घर नवीन मंडळी माझे नवे मित्र पण सगळ्यात सीनियर इथे मीच होतो सॉरी ते गोरगोमट सुद्धा होतच तुपाचं भांडं. तूप संपेपर्यंत अगदी काळा झालेला असायचा हा तूप्या. त्याची साग्रसंगीत आंघोळ महिन्यातून एकदाच व्हायची. आता याही घरी दोन नवीन खरे मंडळी आली त्यांना भेटायला आजी यायची म्हणजे मोठ्या सौ खरे. अशी कित्येक वर्ष लोटली. आता घरातली चिल्लीपिल्ली सुद्धा मोठी झाली होती.

आता तर आमच्यासाठी सेपरेट जागा वगैरे सुद्धा होती ते Modular Kitchen का असच काहीस ऐकलं होतं मी. आता नवीन नवीन कितीतरी भांडी आमच्या सोबतीला होती. ताकासाठी सुद्धा नवीन भांड आल होतो पण त्या बिचाऱ्याचं नशीबच वाईट कधी त्यात ताक बनलचं नाही माझ्या सोन्यासारख्या रंगा पुढे त्याचा तो स्टीलचा रंग तग धरू शकला नाही😎

एक दिवस असेच खरे आजी आल्या होत्या. घरातही खूप घाई होती. ह्या चिल्यापिल्यांन पैकी एक अमेरिका कुठेतरी चाललेलं त्यासाठी खरे आजी आल्या होत्या बॅग भरणं सुरू होतं इतक्यात खरे आजींचा आवाज ऐकू आला "अग ते ताकाचं कोळगं आणि तूपाच भांड सुद्धा दे बॅगेत भरायला" 

म्हणजे माझं सुद्धा तिकीट काढलं होतं. 

आजी हीच गोष्ट अमेरिकेला जाणाऱ्या मन्याला सांगत होत्या आणि तीच मी तुम्हाला सांगितली शेवटी खरे आजी म्हणाल्या ही माझी आठवण म्हणून तुला देतेय ही दोन भांडी कधी मोडीत काढू नकोस कितीही नवीन गोष्टी आल्या तरी... "जुनं तेच खरं सोनं असत बाळा." मन्या ने पण पाणावलेल्या डोळ्याने मला आणि तूप्याला बॅगेत भरलं आणि आम्ही आता अमेरिकेला जायला तयार झालो. 

तर अशी होती खरेंकडच्या ताकाच्या कोळग्याची कहाणी


आवडली का मला Comments मध्ये नक्की सांगा मी वाट पाहतोय...

©Aniruddha Ranade

Food Stylist | Recipe Developer | Menu Engineering | Restaurant Consultant |Blogger

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट