अर्धाच कप चहा

Artisanal Virtual Kitchen


सगळ्यांकडे नुसती घाई गडबड चाललेली असणारे, 

हे करू आधी का ते करू, चिवडा की करंजी, अनारसे की चकली.. थोडी अजून साफसफाई ही बाकी आहे😢 रांगोळी आणि त्याचे रंग आणायचे राहिलेत😑 सगळच राहिलंय😣 असंच काहीसं सगळ्यांकडे चालू आहे सध्या. हो ...पण थोडं थांबा एक छोटासा ब्रेक घ्या हे थोडं वाचा जे हे आत्ता सांगितलं ते नव्हे माझ्या ब्लॉग मधलं वाचा आणि कृती करा म्हणजे कशी तरतरी येते बघा...😁😁😁


#अर्धाचकप


Hieee..😇🤗🙋🏻‍♂️


पुन्हा एकदा आलोय तुमच्या भेटीला तुमचा आमचा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय घेऊन Food ही एक अशी Journey आहे ज्याला विराम नाही आणि त्यात भारतीय Food इतकं complex आहे की जेवढं शिकवं तेवढं कमीच पडतं, मला सगळं येतं म्हणणाऱ्याला साक्षात अन्नपूर्णाच म्हणायला हवं. काय, किती आणि कोणत्या विषयावर बोलायचं तेच कळत नाही. 

आपण रोज एक नवीन दिवस जगत असतो त्यातही खाण्याबाबत किती गोष्टी असतात आपलं लक्ष जातं पण लिहावं कसं, बोलावं कसं? कळतच नाही आपल्या मनात असलेल्या गोष्टी दुसऱ्या कोणी मांडल्या आणि त्या चुकून जुळल्या तर त्यातला आनंद काही औरच. अशीच आहे ही आजची तुमची माझी सगळ्यांची अगदी सर्वसाधारण माणसापासून ते अगदी टाटा अंबानी पर्यंत... ही गोष्ट आहे अमृततुल्याची आपल्या चहाची☕


चहा आणि त्या सोबत असणाऱ्या आपल्या आठवणी जरी वेगळ्या असल्या तरी प्रसंग साधारण सारखेच असतील. ज्याच्या नुसत्या नावानेच अंगात एक तरतरी येते असा चहा नाकारणं जरा अवघडच जातं. मी काही चहाप्रेमी वगैरे नाही पण सकाळी चहा लागतोच म्हणजे तुम्ही समजताय तशी काही भानगड नाही हं!🤣😝

पण चहा घेतला नाही तर चुकल्या चुकल्यासारखं वाटतं दिवस सुरू झाला असं वाटतच नाही.. तुमचं होतं का हो असं???

असो तर आमच्याकडे दोन पक्ष आहेत एक चहा पक्ष (बाबा) आणि एक कॉफी पक्ष (आई ) असं कॉम्बिनेशन क्वचित असतं आईला चहाचा वास सुद्धा आवडत नाही आणि बाबांना चहातून फुरसत मिळाली तर कॉफी कडे बघणार😆😅 मी भाऊ आणि बायको न्यूट्रल आहोत दोन्ही पक्षांना समर्थन करतो😁 

चहा बनवण्याची पद्धत सुद्धा सगळ्यांकडे वेगळी असते पाणी जास्त दूध कमी किंवा फक्त दुधाचा आलं वेलची घातलेला काय आणि काय सोपस्कार करून कडकडीत उकळून एकदाचा तो कपात ओतला जातो आणि घोटभर घेतल्याशिवाय काय आपण त्याची पाठ सोडत नाही. पाण्यानंतर जगभरात पेय कॅटेगिरी मध्ये काही फेमस असेल तर ते म्हणजे 'छा'... हा चायनीज शब्द आहे आता चायनीज सोडायचं म्हणजे आधी चहा सोडायला हवा🤔🙄 झेपणारे का ते आपल्याला🤣 बरं यावर न बोललेलेच उत्तम नेहमी असंच होतं विषय काय असतो आणि माझ आपलं भलतंच सुरू होतं. तर नावात काय असं म्हणत आपल्या जीवश्चकंठश्च मित्राची किती ती नावं TEA, चहा, चाय, चा, छा, राज कपूरच्या एका चित्रपटात त्याने 'चाह' असा शब्द प्रयोग केला होता तोही फार प्रसिद्ध झालेला आणि असतीलच तमिळ, तेलगू, कन्नड,मध्ये संस्कृत मधलं तर सगळ्यात औरच कषायपेय. 

चहाचं मूळ चीन मधलं चिनी भाषेत कडू वनस्पतींसाठी "ते" किंवा "टे" असा शब्द आहे त्याचाच अपभ्रंश होऊन English Accent मध्ये त्याचं Tea झालं असावं असा आपला माझा अंदाज आहे आणि हिंदी चीनी भाई भाई या {Before Corona} संकल्पनेतून "चा" किंवा "छा" चं चहा, चाय वगैरे झालं असावं असं वाटतं.

मन उदास असो वा प्रसन्न 'एक कप चाय हो जाये'? या प्रश्नाला क्वचितच कोणी नाही म्हणतं. 

हे झालं चहाच्या नामकरणाविषयी. आता हे दिव्य शोधून काढणाऱ्या विषयी जाणून घेऊ इतक्या लाखो-करोडो पानांमधून ही पानं कशी शोधून काढली असतील? ह्या पठ्ठ्या चा जन्म (चहाचा) फार वर्षांपूर्वी झाला चीनमध्ये अनेक वर्षांपूर्वी शेनाँग नावाचा राजा राज्य करत होता या राजाला आयुर्वेदात रुची होती म्हणे... त्यांचा Interest औषधी वनस्पतींमध्ये जास्त. एक दिवस असेच गार्डन मध्ये बसून गरम पाणी पीत होते. का? ते माहीत नाही...🙄 वाऱ्याच्या एका मंद झुळकीने काही पाने उडून त्यांच्या गरम पाण्याच्या तबकात पडली. बघता बघता पाण्याचा रंग बदलला. आता काय राजाला आयतं संशोधन मिळालं. मागचा पुढचा काहीही विचार न करता साहेबांनी पाणी प्यायलं ना राव!🤦🏻‍♂️ सुदैवाने त्यांना काही झालं नाही त्याउलट जरा तरतरी जाणवली Fresh वाटलं आणि अशाप्रकारे या 'अमृततुल्य चहा' चा शोध लागला. आता आजकाल जसे आपण उठसूट चहा पितो तसा तो तेव्हा प्यायला जात नव्हता. एक औषध म्हणूनच तो प्यायला जायचा. शेनाँग राजा औषधी वनस्पतींचा अभ्यास करत असल्याने त्याला दिसतील ती फुलं, मूळं, पानं खायची घाणेरडी सवय त्यातुन कधीकधी विषबाधा (Food Poisoning) सुद्धा व्हायचं त्याचा प्रभाव कमी करायला मग तो ही चहाची पान खायचा ह्याने विषाची मात्रा कमी व्हायची म्हणे. 

आज जगभरात हजारो प्रकारचे चहा उपलब्ध आहेत आणि फक्त भारतातच नाही तर जगभर चहा तितक्याच आवडीने प्यायला जातो. मी तर म्हणेन जेवढे Coffee Lovers नाहीत तेवढे Tea Lovers आहेत, पण चहा चा जन्म जिथे झाला म्हणजेच आपली चिनी मंडळी त्यांचे भलतच काहीतरी. चहा कोणता यात काही नसतं म्हणे तुम्ही पाणी कोणतं वापरता यावर चहाची चव ठरते. त्यांच्या इथे विशिष्ठ नद्या, तलाव आहेत म्हणे चहासाठी. मनात म्हटलं कप्पाळ माझं, आमच्याइथे टपरीवाला कोणतं पाणी वापरतो ते येऊन बघ एकदा. पण चहाची चव एकच नंबर ना!!! नाहीतर आमच्या फाइव स्टार वाल्या किटलीतला चहा, सेपरेट साखर, सेपरेट दूध, सेपरेट चकाचक कप काय नि काय... त्यापेक्षा त्या दोन पाण्यात बुचकळून काढलेला तो टिपिकल काचेचा ग्लास आणि त्यातला कटिंग चहा आहाहा ते सुख शब्दात सांगणे अवघडच... तुम्ही चहाचा एक घोट घ्याच आता.😁😬

चहा कसा जन्मापासूनच सगळ्यांसाठी खुला आहे त्याला या तामझाम Five star तयारी Sofesticated atmosphere अशी कधी गरजच भासली नाही ते डिपार्टमेंट Coffee चं. 

गप्पांची मैफल जमावी मग ती कॅंटीन पासून घरापर्यंत गच्ची पासून कट्ट्यावरच्या टपरी पर्यंत कुठेही असो, गप्पा रंगात आलेल्या, पत्त्यांचा डाव रंगलाय, कॅरम वर क्वीन बाकी आहे, रात्रीचा Group Studies काय आणि किती कारण... हे सगळं सुरू असताना तुटक्या कानाच्या कप पासून ते काचेच्या टिपिकल ग्लास पर्यंत कशातही हे वाफाळणारं कशायपेय समोर यावं त्याचा तो स्वाद पोटा एवजी आधी हृदयात भिनतो आणि त्या वातावरणात काही वेगळाच रंग फुलवून जातो... सगळ्यांना त्यात सामावून घेतो. 

माणसाच्या सुखदुःखात, आनंदात, आजारपणात, एकटेपणात आणि एखाद्या पावसाळी संध्याकाळी किंवा गुलाबी थंडीत with Someone Special चहा तुमची साथ कधीच सोडत नाही आणि तुम्ही ठरवलंत तरी सोडवत नाही.. आता इतकं वाचल्यावर सगळ्यांच्या मनात हा विचार आलाच असेल 

चहा अहो मगाशीच घेतला घोटभर पण....🤔 

परत चालेल अगदी "अर्धाच कप"😁😁😁


©Aniruddha Ranade

Food Stylist | Recipe Developer | Menu Engineering | Restaurant Consultant | Blogger

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट