घर की दालच मुर्गी बराबर

 घर की मुर्गी दाल बराबर


Finally!! Day Off आला अख्खा आठवडा या सुट्टीची वाट बघावी लागते.. कोरोनामुळे आमचा सारख्या कधीही सुट्टी न मिळणाऱ्याना एवढी भली मोठी सुट्टी मिळाली आणि मग काय आळशीपणा आला... आम्हाला सगळ्यांनाच वाटलं होतं की कोरोनाला घाबरतील लोक, गेली आता आपली इंडस्ट्री डबघाईला.. पण असं अजिबात नाही टुरिझमचे माहित नाही पण लोकांची खादाडी अजिबात कमी झालेली नाही... पाणीपुरी कितीही घरी बनवली तरी भैया कडच्या हात बुचकळून पाणीपुरी भरून दिलेल्याची मजा काही औरच... एका फुकट सुखापुरी वर आपलं भागत नाही "और एक देदो ना भैय्या" हे असतंच आमचा नेहमीचा भैया तर आधीच दोन देऊन टाकतो पुऱ्या😄 आम्ही शाळा-कॉलेजमध्ये असताना शनिवार रविवार आईचा स्पेशल बेत असायचा.. एक आठवडा माझ्या आवडीचं, एक आठवडा भावाच्या आवडीचं.. आई उत्तम सुगरण त्यामुळे वाढदिवस सोडले तर ऊठसूट उगाचच बाहेर जेवायला गेल्याचं माझ्यातरी आठवणीत नाही.. नवरे लोकांना काही आवडीनिवडी नसतात मुलांना आवडतं ते त्यांना आवडलंच पाहिजे😏😏 भाऊ हॉटेल मॅनेजमेंट साठी गोव्याला गेला आणि ही प्रथा मोडली, पण आईचा स्पेशल मेन्यू आजही असतो फक्त आता तो आमच्या ऑफ डे ला असतो... आम्ही दोघेही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये असल्याने खाण्याच्या बाबतीत आम्हाला फार अशा काही चॉइस नाहीयेत काहीही चालतं... बहुदा बाहेर खाण्याचाच कंटाळा येतो पण कधीकधी लहर येते स्पेशली नॉनव्हेज; कारण आम्ही घरी नॉनव्हेज बनवत नाही पण खाण्याला परवानगी आहे त्यामुळे पार्सल ऑर्डर करू शकतो... मी काही नॉनव्हेज प्रेमी वगैरे नाही कधीतरी खायला आवडतं... कोरोना मुळे तेही बंद झालंय... 

आईने परत डबा द्यायला सुरुवात केली आहे बाहेरचं खाणं बंद म्हणजे बंद... मी आईला म्हटलं पण, अगं.. तू Chef ची आई आहेस तूच अस म्हणालीस तर कोण येईल रेस्टॉरंटमध्ये😐 


त्यावर आमच्या मातोश्री तुझ्या जॉब प्रोफाईल मध्ये लिहिलंय का तसं; घरून डबा आणून खायचा नाही??? 


मी: अगं पण मला सगळं फुड टेस्ट करावाच लागतो मग खाल्लं तर कुठे बिघडलं?? आता यावर आईचा सिक्सर तु शेफ तुझ्या रेस्टॉरंटमध्ये इथे नाही... मी डबा देणारे तू गुपचूप खायचा आल्यावर डबा रिकामा दिसला पाहिजे.. दोन मिनिटं मला पुन्हा शाळेत गेल्यासारखं वाटलं आणि आगीत तेल म्हणून बायको मागे उभी राहून हसत होती.. माझ्या लक्षात आलं आपलं काहीही चालणार नाही मग काय गुपचुप डबा घेऊन जातो आम्ही तीघं. हां तर कुठे होतो मी??.. तर, माझा ऑफ होता आणि नेमकी आईची तब्येत जरा ठीक नव्हती.. तसा आईला कधी कंटाळा आला तर ती आपणहून मला सांगते काहीतरी करायला... नाहीतर ऑफ डे ला कधीकधी माझे प्रयोग चालूच असतात कधी चांगलं होतं.. कधी फसतं.. मग परफेक्शन साठी परत करून बघायचं... पण आईला बरं नसताना कसं करायचं🤔 आता बाहेरून काहीतरी ऑर्डर करायची चांगली संधी चालून आलेली😎 मी आणि भावाचं चिकन ऑर्डर करायचं ठरलं सुद्धा😁 आईला म्हटलं आराम कर आम्ही चिकन मागवतोय😋😋 झाल टुणकन उठून बसली ना आई...😅😐 कशाला काय सांगितलय दोघांना बाहेरचं खायचं नाही म्हणून... मी मस्त वरण-भात लावते पापड आणि सांडगी मिरची तळते.. आली का आता पंचाईत हा तर माझा वीक पॉईंट... 

वरण-भात, तूप, लिंबू आणि सोबत पापड, मिरची यापुढे मी काहीही नाकारायला तयार आहे.. आईला हे माहितीये त्यामुळे मी पुढे काही बोलू शकलो नाही.. फिर एक बार मुर्गी घर आयी ही नही आणि मला हा आर्टिकल लिहायचं सुचलं आजचा आपला विषय "घरचं जेवण"... 

ह्या कोरूना मुळे सगळेच खूप सुधारलेत एकंदरीत सगळ्याच गोष्टींची व्हॅल्यू लोकांना कळली आहे मुख्यतः रिलेशन्स, फूड आणि नेचर.... लॉकडाऊन दरम्यान सगळ्यांनाच बाहेर जाण्याची आणि बाहेरच खाण्याची धास्ती होतीच त्यामुळे खवय्यांची जाम पंचाईत झालेली हॉटेल रेस्टॉरंट बंद होती.. डिलिव्हरी किचन जरी सुरू असली तरी बाहेर खायचा धोका कोणालाही पत्करायचा नव्हता... आता करावं तरी काय मग स्वतःच सगळ्या खवय्यांनी Kitchen मध्ये एन्ट्री घेतली आणि आपल्या जिभेचे चोचले सगळे आवडीचे पदार्थ घरी बनवूनच पुरवले... और इस कि चर्चा कश्मीर से कन्याकुमारी तक पोहच गयी...I mean सोशल मीडियावर सगळेच अॅपियर होतं होते... अगदी Unexpected लोकांनी सुद्धा घरी स्वयंपाक बनवला आणि स्वतःला शेफ म्हणवून घेतलं... पण हळूहळू हेही मागे पडत गेलं कारण आयुष्याची गाडी मूळ पदावर यायला लागली आणि सगळे शेफच्या ड्रीम प्रोफेशन मधून बाहेर आले, त्यामुळे आमची ही रेस्टॉरंट्स चालायला लागली.. पण तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे मी शेफ जरी असलो तरी मी काही माझं रेस्टॉरंट प्रमोट करत नाही... लोकांनी चांगलं हेल्दी खावं छान माहिती मिळावी ह्याच हेतूने मी आर्टिकल लिहितो घरी आपल्यावर कसे संस्कार होतात त्यावर तुमचा स्वभाव घडत असतो.. So, जरी मी रेस्टॉरंट मध्ये काम करत असलो तरी सत्य कसं बदलेल... 


बाहेर खाणं केव्हाही वाईटच... कधीतरी सेलिब्रेशन म्हणून ठीक आहे पण Frequently खात असाल तर शरीरात होणारे बदल तुमचे तुम्हालाच जाणवतील... स्पेशली बायकांनी  "अरे ऐक ना, मी जाड झालेय का रे"?? असा प्रश्न विचारून नवर्‍यांना बुचकळ्यात पाडू नये😯😓 घरचे जेवण का चांगलं?? त्याचे फायदे काय आहेत?? ते आपण पाहूया सगळ्यात पहिला मुद्दा आहे विश्वासाचा घरातला कोणताही पदार्थ तुम्ही डोळे झाकून खाऊ शकता कारण ते आपल्या माणसाने बनवलेलं असतं Lets take a look at Few Important Points

"Freshness"जो फक्त आपल्याला घरी आणि घरीच मिळू शकतो घरी रोजच्यारोज आई बायको ताज जेवण बनवते काही जणांकडे तर सकाळी आणि रात्री दोन्ही वेळेस ताजं जेवण बनत आता तुम्ही म्हणाल शेफ मग Restaurant मध्ये काय शिळ जेवण देता का ह्याचे उत्तर मी हो असंच देईन. कारण तुम्ही order देऊन नंतर सगळं बनवणं म्हणजे Impossible आहे. जरी आम्ही गरमागरम Serve करत असलो, तरी आम्हाला basic preperation आधीच करावे लागतं. त्यामुळे कितीही fresh म्हटलं तरी ते शिळच. माझ्या किचनच म्हणाल तर आमचं restaurant based on handmade things. पण तेही advance बनवावे लागतात. माझ्या किचन मध्ये microwave ला स्थान नाही. त्यामुळे सगळे nutrition घालवून टाकतो आपण, म्हणून स्टाफ साठी पण आम्ही घरगुती जेवण मागवतो.

  दुसरा मुद्दा घरातल्या कोणत्याही जेवणात added preservatives नसतात. याचा मी सुध्दा ह्या Added Preservatives चा विरोधात आहे. आमच्या Restaurant मध्ये सगळ्या गोष्टी In-house बनतात. त्यामुळे added preservative आणि frozen food ला जागा नाही. नाईलाजाने मला french fries stocks मात्र frozen मागवावे लागतात. पण घरचं जेवण सगळ्याच दृष्टीने safe असतं. सगळे ingredients उत्तम दर्जाचे असतात. Next is शुद्धतेची gurantee. घरी स्वयंपाक आपल्या समोर बनत असतो. व्यवस्थित अंघोळ वगैरे करून आई स्वयंपाक बनवते. भाज्या स्वच्छ धुतलेल्या असतात. कारण एकच, तिच्या मनात आपण आपल्या लोकांसाठी स्वयंपाक करतोय ही भावना असते.पण Commercial Kitchen मध्ये आपल्या मागे काय घडतं ते कसं सांगणार. आता नुसत शिकून किंवा पुस्तकं वाचून चांगल Chef बनता येत नाही किंवा चांगल्या सवयी जोपासल्या जात नाहीत. त्यासाठी लहानपणापासून चांगले संस्कार केलेले असावे लागतात. वेळोवेळी आपल्या चुका दाखवून देणारी, वेळप्रसंगी ओरडणारी आई असावी लागते, तरच तुमचं Professional Life सुद्धा घरासारख होतं. माझ्या किचन मध्ये मी शुद्धतेची Gurantee देऊ शकतो. पण बाकी ठिकाणचं काय, अगदी एखाद्या पदार्थावर Garnish म्हणून न धुतलेली कोथिंबीर घातलेली असेल तरी त्याचा त्रास होऊ शकतो. हाच माझा पुढचा मुद्दा आहे.घरचं जेवण कधीच तुम्हाला आजारी पडू देत नाही. घरी जेवून आजारी माणूस पडला अशी घटना क्वचितच असेल. पण बाहेरच खाऊन आजारी पडलाय, Food Poisoning झालंय असं तर रोजचं असेल तेंव्हा उलट Doctor घरचं जेवण जेवण्याची सक्तीच करतात. म्हणजे हे शुद्धतेच प्रमाणच नाही का. आपली आई बायको नेहमीच आपल्याला सगळया गोष्टी व्यवस्थित प्रमाणात कशा मिळतील ह्याकडे व्यवस्थित लक्ष देतात. उगाचच आपल्यावर भरमसाठ तेल मसाले यांचा मारा करत नाहीत.रोज आपल्याला वेळेवर सगळ्या गोष्टी कशा मिळतील हे पाहतात. पोळी, भाजी, आमटी, भात, salad किंवा कोशिंबीर असं balance diet! सगळ्यांचाच घरी क्वचितच कधी मसालेदार किंवा spicy जेवण बनत. ह्यानेच acidity सारखे आजार होतात. त्यामूळे जास्त मसालेदार, तिखट पदार्थ टाळा. ह्यासारख्या गोष्टी छोट्या छोट्या restaurent मध्ये पाळल्या जातातच असं नाही. कधी तुम्ही five star मधला मेनू बघा, छान सुटसुटीत असतो, मोजकेच पदार्थ असतात.नाहीतर कोपऱ्यावरच्या Restaurant चा menu १३ pages- pizza, Chinese, pasta, indian, continental, biryani.......

काय नी काय... एवढा मोठा menu. सगळ्या safety measures without knowledge कश्या follow होतील. तिथे काय माझ्यासारखे ' chef' काम करत नाहीत. ज्यांना cooking खूप चांगलं करता येतं पण किचन रिलेटेड बाकी काहीच knowledge  नसतं अशी (non professional?) लोकं काम करतात.


सध्या तरी "घर की मुर्गी दाल बराबर " असली तरी तीच खा कारण it's safe & hygienic! 

बरं माझ्या restaurant मध्ये या बरं का..😉 

Healthy खा आणि Healthy रहा!!!

©Chef Aniruddha Ranade 

Food Stylist | Recipe Developer | Menu Engineering | Restaurant Consultant | Blogger

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट