दिवस दसऱ्याचा और सोने पे सुहागा

*दिवस दसऱ्याचा और सोने पे सुहागा*

Hello, कशी झाली सुरुवात तुमच्या Friday ची? का माझ्या स्टोरीनेच होणार आहे☺️☺️☺️ माझी बिर्याणी आठवतेय ना? तसं तुम्ही गणपतीत काय काय स्पेशल बनवलंत? आमच्याकडे ह्या वर्षी बटाटेवडे होते....

फोटोज बघितले मी बर्याच जणांचे... मस्त मस्त डिशेस बनवल्यात सगळ्यांनी... काय मग करायची का सुरुवात पुढच्या स्टोरी ला

माझी लाइफ थोडी बदलायला लागली होती. घरी कमी आणि कॉलेजमध्ये जास्त वेळ जात होता. त्यामुळे बराचसा वेळ मित्रांबरोबर जात होता. आम्हालाही इतर स्टुडन्ट सारखे Assignment Projects वगैरे होतेच. आता Computer सगळ्यात महत्त्वाचं Internet गरजेचं होतं. मग Cyber Cafeच्या वाऱ्या वाढायला लागल्या. पण सगळेच मला आवडत होतं. मित्रही सगळे भारी भेटले होते. फारसा वेळ नसायचाच कारण आमच्या कॉलेजमध्ये Physical Work जास्त होतं. त्यामुळे प्रेम प्रकरण किंवा प्रेमभंग यासाठी वेळच नव्हता.🙆🏻‍♂️😅 जो काही वेळ होता तो Assignment पूर्ण करण्यात, नाहीतर झोपण्यात😴 जायचा. सगळं छान चाललं होतं. घरचं किचन अर्ध माझं झालेलं. हुकुमत आईचीच होती, पण माझे प्रयोग सुरुच होते. घरी कोणी येणार असेल तर मी एखादी डिश बनवायची हे ठरलेलं! तेव्हा मलाही ते आवडायचं, पण आता जाम बोर होतं😤. साधा चहा करायचा म्हटलं ना, तरी लय कंटाळा येतो राव!🙃पण नवीन काही करायचं असेल तर तितक्याच उत्साहाने करतो मी. 😃😋

माझी रोजची धावपळ बघून आणि Future ची गरज ओळखून आई-बाबांनी Computer घ्यायचं ठरवलं. आणि मी जाम खुश! घरी Computer येणार होता आणि जोडीला Internet सुद्धा! मन में लड्डू फुट रहे थे!😁😁 पण मी अजिबात दाखवली नाही. हो, आमच्याकडे असच आहे. जास्त interest नाही दाखवला की वस्तू लवकर मिळते. झालंही तसच. बघता बघता कम्प्युटर आला पण! आणि मी सुखावलो. बाहेरचं उगाच इंटरनेट शोधत फिरणे आता बंद होणार होतं. असंच पहिल्या वर्षात आणखी एक सुखद धक्का देणारी घटना घडली आमच्या college कडून, म्हणजे एकंदरीतच सगळ्याच Hotel Management च्या colleges कडून, 5 star हॉटेलमध्ये ODC- OutDoor Catering, म्हणजे काय तर मोठ्या पार्टीज ना हेल्प साठी External Staff म्हणून H.M. Studentsना बोलवायचे. 6 hours काम करायचं, त्याचे 150₹ मिळायचे. हे का, तर आम्हाला Actual Hotel कसं काम करत ह्याची ओळख व्हावी म्हणून. माझ्या आयुष्यातलं पहिलं ODC, तेसुद्धा कुठे तर TAJ MAHAL हॉटेलमध्ये! अजून आठवतो तो दिवस,Taj Hotel पहिल्यांदाच इतक्या जवळून पाहिलं. लहान असताना दाखवलही असेल बाबांनी, पण तेव्हा कुठे काय एवढं कळतय. आणि आज तर हॉटेलच्या आत जायचं होतं, काम करायचं होतं. It was a great feeling! 😍मला चांगलंच आठवतंय दसऱ्याचा दिवस होता. कारण सकाळीच आईची 'आरडाओरड झालेली' ,"कसलं कॉलेज तुमचं, सणावाराला सुद्धा कामावर बोलवतात!!!". तर मी आणि सोबत अजून मुल असे Taj मध्ये enter झालो. तिकडचं वातावरणच वेगळं, नुसती आरडाओरड, पळापळ, भांड्यांचे आवाज आणि किचन तर विचारूच नका, मशीन काम करत असल्यासारखे तिकडचे Chef धडाधड जेवणाच्या ऑर्डर काढत होते. आम्ही सगळेच ते सगळं बघून भारावून गेलो😮😲😲 होतो. पण इच्छा असूनही आम्हाला काही त्यावेळी किचनमध्ये Entry नव्हती😤🚷🚫. आम्ही Guest ला service द्यायला आलो होतो. Banquet मॅनेजर नी briefing ला सुरुवात केली. आज कोणाची तरी बर्थडे पार्टी होती. आणि सगळे Guest VIP आहेत असं सांगितलं गेलं. आमच्या 2 Teams झाल्या. एका टीमला Starters Serve करायचे होते आणि दुसऱ्या टीमला Mocktail. माझ्याकडे Starter's आले. आम्ही सगळ्या तयारीनिशी पोहोचलो Banquet हॉल मध्ये! हल्ली लग्नकार्यात सुद्धा अशी मुलं तुम्ही पाहिली असतील. तसेच आम्ही लाखो रुपये फी देऊन हे काम करायला आलो होतो आणि नंतर त्याचे आम्हाला १५० रुपये मिळणार होते. Anyway, so birthday party होती हे कळलं होतं,पण कोणाची हे माहीत नव्हतं. लाईट बर्यापैकी डीम होते आणि धाडधाड music वाजत होतं. इतक्यात २-३ ओळखीचे चेहरे दिसले. आम्हाला आधीच warning होती, पार्टी मध्ये कोणीही दिसलं तरी काही react करायचं नाही😶.आणि ते चेहरे होते, गौतम गंभीर, श्रीशांत आणि युवराज सिंग! डोळ्यांवर विश्वासच बसेना.😳😱 आमच्यात कुजबूज सुरू झाली, "अरे तुने देखा क्या? तुने देखा क्या!!!" पण आम्ही हतबल, आनंदही व्यक्त करता येत नव्हता. माझ्याकडे असलेली chicken skewers ची platter घेऊन गर्दीतुन वाट काढत फिरत होतो. 

इतक्यात कानावर अगदी ओळखीचा आवाज पडला, "Excuse me, can I have a piece please" मी मागे वळलो आणि दोन मिनिटं सगळं जग थांबल्यागत झालं. साक्षात God of cricket, The Sachin Tendulkar, माझ्याकडे piece मागत होता. आपलं ते chicken skewer..मी बघतच राहिलो. माझ्या तोंडून हो-नाही काहीच निघेना. मी ठोकळ्यारखा उभा होतो😱😱😳😳😳. त्याने piece घेतला आणि Anjali Tendulkar सुद्धा होती सोबत, तिलाही दिला. इतक्यात banquet मॅनेजरची पाठीवर थाप पडली. त्यानी पुढे जायला सांगितलं तेव्हा कुठे मी भानावर आलो😰. किती simple, Orange shirt blue denim आणि गोरागोरा पान रंग..अगदी आताही तो माझ्या डोळ्यासमोर चिकन मागताना उभा असल्याचा feel आला. It was a great day, दसऱ्याच्या दिवशी मला खरं सोनं पाहायला मिळालं....😌😌😌😌

©Aniruddha Ranade


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट