दिवाळी फराळाची वैशिष्ठ्ये

 हममम... आली माझ्या घरी ही दिवाळी!!! 

अरे आलात तुम्ही😃🙋🏻‍♂️

अहो, गाण्याने सुरुवात म्हणजे काय सणचं तसा आहे. Full on celebration चा... ते कोरोना वगैरे सगळं विसरून जायचं आणि पुन्हा एकदा फराळाचं भरलेलं ताट घेऊन छान रांगोळी काढून लक्ष्मीच्या स्वागतासाठी उभ राहायचं. तुमची कला आणि स्वागत पाहून लक्ष्मी आणि तुमच्या फराळाची चव घेऊन अन्नपूर्णा दोन्ही देव्या प्रसन्न व्हायला हव्यात. ह्या वर्षी अधिक महिन्यामुळे जरा उशीरच झाला पण ठीक आहे अधिक महिना म्हणजे नवरेमंडळींची मज्जा असते पण ते सुख फार काळ टिकत नाही अहो पाठोपाठ पाडवा सुद्धा येतो😜 समजदार को इशारा काफी है! हाहाहा!


हल्ली दिवाळी कधी हे बघायला कॅलेंडर बघावं लागत नाही. टीव्हीवर मोती साबणाची ऍड यायला लागली की समजायचं दिवाळी जवळ आली.दिवाळी म्हटलं की मला सगळ्यात आधी आठवण होते ती म्हणजे सहामाही परीक्षेची. काय होते ते दिवस! फक्त एकच काम अभ्यास करणे! तोही धड व्हायचा नाही ही वेगळी गोष्ट! पण सहामाही परीक्षेची तारीख कधी कळते असं व्हायचं. सुरू कधी होते यात काही रस नसायचा, संपते कधी त्यातच जास्त इंटरेस्ट. पहिला पेपर झाला की दिवस मोजायला सुरुवात व्हायची. शेवटचा पेपर हमखास अवघड असायचा, त्यामुळे अभ्यास करावाच लागायचा. ती रात्र कधी संपते, असं व्हायचं. मग दिवाळीची सुट्टी काही तासांवर आलेली असायची. आणि पेपर संपण्यापूर्वी चा तो अर्धा तास.. कधी एकदा घंटा वाजते आणि आम्ही घराकडे पळतोय असं झालेलं असायचं. हल्लीच्या मुलांमध्ये ती उत्सुकता नाही जाणवत मला. बहुतेक त्यांना कसली वाट पाहायची वेळ येत नाही. त्यांनी मागायच्या आधी, त्यांचे आई-बाबाच जास्त उत्साही असल्यामुळे बाराही महिने त्यांना हवं ते हवं तेव्हा मिळतं. बाकीच्यांचं मला माहित नाही, पण माझ्या घरी तरी आम्हाला सगळ्या गोष्टींची वाट पहावी लागायची. साधारण कोजागिरी झाली की आम्हा मुलांना दिवाळीचे वेध लागायचे. पहिला टप्पा कपडे खरेदी! कोजागिरी झाली की पहिला जो रविवार येईल त्या रविवारी कपडे घ्यायचे हे ठरलेलं. क्वचितच त्यात बदल झाला असावा. आतासारखे हा सेल तो सेल असले काही प्रकार नव्हते. दिवाळीतच काय तो सेल दुकानदारांसाठी पण आणि आमच्यासाठी पण. थोडक्यात काय नवीन कपडे फक्त दिवाळीतच घेतले जायचे आणि क्वचित कधी वाढदिवसाला.

कपडे मिळाल्यावर बाबांचा ठरलेला डायलॉग, 'आता अभ्यास चांगला करायचा हा! सहामाहीत चांगले मार्क मिळाले पाहिजेत', जे कधीच मिळाले नाही😅 पण नवीन कपडे मात्र दर वर्षी मिळाले.❤️Thank You बाबा..

नेक्स्ट स्टेप फटाके! जे परीक्षेच्या आधी कधीच मिळाले नाही. एका अर्थी बरंच होतं ते, नाहीतर बाहेर फटाके वाजण्याच्या ऐवजी घरीच फटके वाजले असते😜 हां.. तर ह्याचा शुभ दिवस होता परीक्षेचा शेवटचा दिवस. पेपर संपवून घरी आलो की पहिलं काम list बनवणं. आणि मग बाबा ऑफिसमधून कधी एकदा घरी येतायेत आणि कधी एकदा फटाके आणायला जातोय असं व्हायचं. एकदाचा हा समारंभ सुद्धा पार पडायचा आणि मग किती का वाजले असेना, फटाक्यांचे sorting was the first priority! कारण आम्ही दोघजण, मग विभागणी ठरलेली. तसे मी भावाला थोडे कमीच द्यायचो🤪 I hope आता तो हे वाचत नसावा🙊🙈


चला आता दिवाळीच्या main आणि माझ्या favourite मुद्द्याकडे वळूया, 'दिवाळीचा फराळ'. ह्या गोष्टीचा मला सगळ्यात जास्त राग होता. बनवायचा, पण दिवाळीपर्यंत खायचा नाही...आणि त्यात माझी आई नेमकी रात्रीच बनवायची फराळ. आता आम्हाला शिंग फुटलीयेत मग जागतो आम्ही १२ आणि १ पर्यंत, पण लहानपणी कुठे काय..१० वाजता सगळे झोपायचे. अजून राग ह्या गोष्टीचा की मोठे झाल्यावर ती दुपारी, संध्याकाळी पण करायला लागली. मग ते जुनं आठवलं की अजून राग येतो. Hotel Management ला addmission घेतल्यावर तर मला बोलवून बोलवून सांगायची सगळं. म्हणजे त्या आधीही सांगायची पण मीच फारसं कधी लक्ष दिलं नाही. म्हटलं आई असताना आपल्याला कुठे काय करावे लागणारे? आता तेव्हा बायकोचं लक्षात नाही आलं माझ्या😉

मी छोटी छोटी मदत करायचो. करंज्या तयार झाल्या की मांडून ठेवणे, चकल्या थंड झाल्या की मोजून डब्यात ठेवणे, मोजून एवढ्या करता की साधारण अंदाज येतो की इतक्या भाजणीत इतक्या चकल्या झाल्या. शंकरपाळे भरुन ठेवणे. कारण सगळं गरम तेलाचं तळणीचे काम आणि आई जाम sensetive, म्हणून बनवण्यात नो एन्ट्री. एक पदार्थ बनवायला मिळायचा, 'लाडू' आणि चुकून आईपेक्षा चांगला वळला गेला की त्याला दोन च्या ऐवजी चार ‌काजू लावून तो बाजूला ठेवायचा 'हा माझा लाडू म्हणून' हाहाहा! म्हणता म्हणता फराळाचे सगळे पदार्थ तयार व्हायचे आणि दिवाळी पहाटेची हुरहूर लागायची. सकाळी लवकर उठून फटाके उडवायचे या कल्पनेने झोप लागायची नाही. कधी एकदा पक्षी ओरडायला लागतायेत असं व्हायचं. मग सकाळचे सोपस्कार, अभ्यंग स्नान वगैरे आटपून एखाद्या हिरो सारखे कपडे घालून, वाटणी केलेले फटाके घेऊन, कोणत्यातरी मोठ्या कामगिरीवर निघाल्याच्या थाटात आईचे सगळे instructions ऐकून घराबाहेर पडायचं. इतके instructions देऊन सुद्धा घरी आल्यावर तो फटाक्याच्या दारुने बरबटलेला हात आपोआपच चकली नाहीतर लाडवा कडे ओढला जायचा. आणि पाठोपाठ आईचा रट्टा ठरलेला, 'आधी हात धुवून या, पळा! काही कुठे पळून जात नाहीयेत ते चकली लाडू.'


चला बास, main मुद्द्याकडे वळु या. सगळ्यांमुळे मी एक chef आहे विसरत चाललोय, नुसत्या गोष्टी सांगत असतो तुम्हाला.

आता फराळावर थोडं बोलूया, वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे पदार्थ फराळ म्हणून बनवले जातात. आजकाल फराळात modern म्हणून chocolate, cookies, dry cakes ची पण भर पडली आहे. तो आपला वैयक्तिक प्रश्न आहे की कोणी हा सण कसा साजरा करावा. मी आपलं आपल्या authentic फराळाचे दोन चार प्रकार आहेत त्याविषयी बोलणारे. आता फराळच का? तर दिवाळीपासून थंडीची चाहूल लागते. आणि या थंडीत शरीर आतून गरम राहावं यासाठी भरपूर कॅलरीजची गरज असते. आणि ती गरज पूर्ण होते आपल्या फराळामुळे.

 दिवाळी म्हणजे बेसनाचे लाडू आलेच. यातही रव्याचे लाडू, गव्हाचे लाडू, सगळेच पौष्टिक असतात. साधारण ४०० कॅलरीज एका लाडवातून मिळतात. बेसनात कणके पेक्षा कमी carbs, दुप्पट protein आणि iron mineral असतात. शिवाय लाडू म्हटलं की तूप dry fruits, साखर हे आलंच. तुपामध्ये vitamin A,D,C,E असतात. त्यात घरी बनवलेल तूप असेल तर आणखीनच उत्तम. गोड लाडू खाल्ल्यावर खमंग चकली ची आठवण तर आलीच असेल. मिश्र धान्य आणि डाळींपासून बनवलेली भाजणीची चकली चवीला छान असतेच शिवाय हेल्दी सुद्धा असते. चकली तळतात त्यामुळे obviously fat content जास्त असतं. २ medium साईज चकलीत अंदाजे 12 ते 15 gram fat असतं. चकली पासून आवश्यक proteins जास्त मिळतात, carbs कमी पण vitamins and minerals व्यवस्थित असतात. बाहेरच्या चकली पेक्षा घरगुती चकली तेलाच्या दृष्टीने केव्हाही चांगली. शंकरपाळे मैद्या पासून बनवले जातात. मैदा म्हटला की बरेच जण नाकं मुरडतात. शंकरपाळे बनवण्यासाठी आपण कणिक, रवा, साजूक तूप आणि दुधाचा वापर केला तर, शंकरपाळ्या मधले nutritions like protein, fibre, vitamin D, A, आणि minerals यांची मात्रा वाढते आणि त्यात तुम्ही ते bake केले तर मग अजूनच Healthy. करंजी सुद्धा मैद्यापासून बनते. यातही आपण variations करून half मैदा half गव्हाचे पीठ वापरू शकतो त्याचबरोबर आपण हेल्दी सारण केलं आणि करंज्या तळण्याऐवजी त्या bake केल्या तर शरीराला अजून चांगल्या. तेवढ्याच calories कमी. So करंजीचे सारण तुमच्या हातात आहे. तसंही आपण नवीन काही ना काही करत असतो एकदा सारण बदलून पहा! आता राहिला चिवडा! झटपट बनणारा आणि सगळ्यांच्या आवडीचा कुरकुरीत पदार्थ म्हणजे 'चिवडा'. यात बरेच पौष्टिक पदार्थ add केले जातात. तसेच पचनास उपयुक्त असे मसाले घातले जातात. त्यामुळे चिवड्याची nutrition value वाढतेच, त्याचबरोबर fiber चं प्रमाण सुद्धा वाढतं.

असं फराळाचं ताट समोर आलं की तीन-चार हात समोर आल्याशिवाय राहत नाहीत. 

तर अशी होती माझी दिवाळी ची कहाणी?? 

माझ्या सगळ्या वाचक मित्र-मैत्रिणींना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.... 

आजचा विषय कसा वाटला नक्की सांगा. 

नेहमीप्रमाणेच वाट बघतोय!

©Aniruddha Ranade

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट