लोणचं आणि मसाले
Hello,
यावेळी जरा लवकरच आलोय हल्ली हातात पेन आणि वही घेऊन बसायची like सवयचं झालीये... आणि नवीन नवीन काहीतरी लिहायचा नादात माझी स्टोरी मागेच पडली आणि या सगळ्याला कारणही तुम्हीच आहात..😍❤
दिवसेंदिवस माझा वाचकवर्ग वाढतच चाललाय आणि यात योगदान सुद्धा तुमचंच आहे तुमच्या आशीर्वाद आणि प्रेमानेच मी पुढे पुढे लिहू शकतोय काहीजण तर अगदी Day One पासून माझे Article वाचतायत नवीन article ची वाट बघतात माझ्या प्रत्येक articles वर त्यांचा अभिप्राय देतात हे एखाद्या Guest ला आपली Dish आवडल्यावर जे समाधान मिळतं अगदी तसंच आहे आपल्या Post वर किती Likes आणि Comments आले यापेक्षा आपण किती लोकांच्या मनात आपल्या कलेनी घर करू शकलो यातच खरा आनंद आहे मग ती कला लिखाणाची असो वा जेवण बनवण्याची सगळ्या गोष्टी कशा परस्पर संबंधित असायला हव्यात Things or Ingredients should always Compliment each other. एखाद्या आर्टिकल मधून जसं आपण वेगवेगळे Emotions अनुभवू शकतो तसंच अगदी फूड चा बाबतीत आहे एखाद्या पदार्थ सोबत आपल्या खूप आठवणी जोडलेल्या असतात यात मुख्यतः आपल्या आज्जीचा वाटा जास्त असतो तिने आपल्याला खाऊ घातलेले पदार्थ आपण कधीच विसरू शकत नाही आणि आईने सुद्धा. काहींच्या नशिबात हे सुख अजूनही असत काहींच्या नाही, पण तो पदार्थ समोर आला की आठवण आल्यावाचून राहत नाही, मग ती साधी भाकरीच का असेना दुसऱ्यांना सांगताना आपण म्हणतोच "हे ना माझ्या आई आजी सारखं काही मला जमत नाही तीच फार सुंदर बनवायची" भावूक झाला असाल ना अचानक???
हसवू काय☺️☺️ काही पदार्थ emotional असतात तसेच ते मस्तीखोर सुद्धा असतात बरं का यात लहानपणी भावा बहिणींनी केलेली मस्ती किंवा गावाकडचे मित्र यांचा समावेश असतो. शहरात ती मजा जरा कमीच, तरी समवयस्क भाऊ-बहीण असले की पदार्थां वरून भांडण आलीच. त्यात बहिणीला छळणे, त्रास देणे हा सगळ्या भावांचा जणू जन्मसिद्ध हक्कच असतो त्यामुळे तिला पार रडवल्याशिवाय काही कार्टी गप्प बसत नाहीत. यात विशेषतः वाटणी होणारे पदार्थ असतात हे स्वतःच राजे असतात आलं का लक्षात फळांचा राजा आंबा, कैरी आणि सोबतीला चिंचा, जांभळं, पेरू यांचा समावेश मग ही भांडणं इतकी होतात की शेवटी आई बाबांचा एक रट्टा खाल्ल्याशिवाय काही संपुष्टात येत नाहीत आणि हे सगळ आठवून आत्तासुद्धा हसू आल्याशिवाय राहत नाही..☺️☺️☺️ बापरे मूळ विषय काय आणि मी बोलत काय बसलोय नेहमी असंच होतं बघा माझं...😅
तर आपल्या जीवनात जसे प्रसंग असतात ज्यांनी आपली Life एकदम मसालेदार होते मग आपल्या पदार्थांमध्ये मसाले नकोत म्हणूनच मसाल्यांबद्दल थोडसं काहीतरी... मसाला म्हणजे काही Rocket Science नव्हे पण त्याशिवाय पदार्थांना चवही येत नाही मसाला हा Completely Natural आहे मुख्यतः झाडांच्या वाळलेल्या बिया, फळे, मूळं, खोड, पाने आणि फुले यापासून आपल्याला मिळतो. मसाल्यांचा वापर फूडमध्ये तेवढाच Important आहे जितका आपल्या आयुष्यात Emotions चा. मसाल्यांनी पदार्थांना नुसती चव, रंग आणि सुगंध नाही तर ते As A Food Preservatives म्हणून सुद्धा उपयोगी असतात आणि हो ते रोगप्रतिकारक देखील असतात. आता या कोरोना काळात सगळ्यांना कळलं असेलच. बऱ्याच जणांनी काढे करून प्यायले असतीलच.😄😄 मसाल्यांचा आणि हवामानाचा Direct संबंध असतो जिथे हवामान उष्ण असते अशा ठिकाणी पदार्थ लवकर खराब होतात ते Control करण्यासाठी मसाल्यांचा वापर अधिक केला जातो. त्यात सुद्धा कोणत्याही Meat मध्ये As A Marinade मसाले Use होतात कारण Meat खूप Sensitive असतं. Other than Food आपले धार्मिक विधी, Beauty Products, Perfume यामध्येसुद्धा मसाले वापरले जातात तर अशी होती आपली मसाल्यांची छोटीशी कहाणी...
आता मसाल्यांविषयी बोलणं सुरूच आहे तर मसाल्यां इतकचं जसं आपल्या आयुष्यात आंबट-गोड, कधी तिखट आठवणी, तर कधी चटकदार.. तसाच आपल्या जेवणात सुद्धा एक पदार्थ आहे बरं!! ज्याला विसरून अजिबात चालायचं नाही. तुमच्या नेहमीच्या मिळमिळीत लाईफस्टाईलमध्ये मित्र-मैत्रिणींबरोबर घालवलेली संध्याकाळ असे तुम्हाला पुन्हा Refresh करते अगदी तसंच एखाद्या मिळमिळीत भाजी सोबत नाहीतर चुलीवरच्या गावातल्या आटवला सोबत ह्याचा सहवास लाभला तर कसलं भारी वाटतंय Full On Refresh अहो अजून तरी ओळखलंत का मी सगळ्यांचे प्रिय लोणच्या बद्दल बोलतोय😋. "लोणचं" न आवडणारा माणूस क्वचितच कधी असतो. मी त्यातला एक तो भाग वेगळा😁 आणि ते का??? हेही मला माहीत नाही, पण मला लोणचा ऐवजी कोणतीही चटणी जास्त आवडते नवरा-बायकोत कोणत्याही गोष्टींवरून वाद होऊ शकतो याचे धडधडीत उदाहरण म्हणजे "मला चटणी आवडते आणि तिला लोणचं"😂😂 बाकी तुम्ही समजून घ्या😅 परत गाडी दुसरीकडे गेली😄 माझी भरकटण्याची सवय काही जात नाही, तर लोणचं आपणचं नाही तर अख्ख्या भारतात लोणच्या शिवाय बऱ्याच जणांचे पान हलत नाही.. कोणी लावली ही सवय?? लोणच खाणं चांगलं की वाईट?? असं काहीसं मी आज सांगणार आहे.. आता वाचून रागावू नका बरं का माझ्यावर😁😁
So लोणचं हा प्रकार पर्शियन लोकांनी Introduce केला त्यांच्या Cuisine चा तो एक भाग होता. पूर्वीच्या काळी लोकं भाज्या, फळ किंवा अगदी Meat जास्त काळ टिकून राहावेत यासाठी Natural Preservatives चा वापर करून म्हणजेच मीठ, तेल विनेगर अशा गोष्टी वापरून स्टोअर करून ठेवायचे. कदाचित तेव्हा त्याची गरज असावी.
भारतात लोणच्याची नोंद एका कानडी पुराणात आहे जवळजवळ पन्नास एक लोणचाचे प्रकार आहेत त्यात आणि अर्थात इतकं जुनं असल्याने त्याला आयुर्वेद शास्त्राची जोड आहेच... त्यामुळे आरोग्यास होणारे फायदेही त्यात दिलेले आहेत.. पण तुम्हा सगळ्यांना एक म्हण माहित असेलच "अति तिथे माती" आज आपण लोणच्याचे फायदे आणि तोटे दोन्ही बघणार आहोत. Of course Good news comes first पण नंतर तोटे सुद्धा वाचा बरं का!!!😁😁😁लोणच खाण्याचे बरेच फायदे आहेत पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं, "लोणचं घरी आणि फक्त घरीच केलेलं असावं".. मगच त्याचा फायदा...
लोणच्यातून आपल्याला Vitamin K,A,D & C मिळत आणि Fermentation मुळे Good Bacteria आपल्या शरीराला मिळतो.. जसा आपल्याला ताकातून मिळतो ज्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हो जिभेचे चोचले सुद्धा पुरवले जातात.. तसेच (Digestive System) पचनशक्ती मजबूत होते. शरीराला उपयुक्त विटामिन्स आणि मिनरल्स मिळतातच त्यामुळे आजारपणाच्या छोट्या-मोठ्या कुरकुरी होत नाहीत कारण पचनशक्ती सुधारल्याने पोट साफ राहतं..
"और पेट हेल्दी तो आप हेल्दी"😀 चलो अब तोटे की और बढते है😅 सगळ्यात मोठा तोटा म्हणजे लोणच विकत आणणे कारण obvious आहे मिठाचे प्रमाण जास्त आणि low Quality Added Preservatives मीठ हाच एक मोठा धोका लोणच्यातला आहे. जास्त मिठाने ब्लडप्रेशरचा त्रास होतो. ओघाने हृदया संबंधित आजार आलेच. जास्त मीठ खाऊन हायपर टेन्शनचा धोका असतो. मीठातल्या Sodium Content मुळे मेंदूचे विकार होऊ शकतात. मेंदूतल्या नसांना सूज येणे, स्मरणशक्ती मंदावणे असंही होतं. लोणच्यात तेलाचं प्रमाणही जास्त असतं त्यामुळे पुन्हा हार्ट वर परिणाम. बाहेरच्या लोणच्यामध्ये Added Preservatives असल्याने अगदी कॅन्सरचा धोका सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे जेवण चटकदार बनण्यासाठी लोणचं हवचं पण ते शक्यतो घरगुती. सगळ्या गोष्टी प्रमाणात असलेलं. आई आजीच्या मायेनं बनलेलं🤗🤗 आणि हो Most Important प्रमाणात खाल्लेलं केव्हाही उत्तम नाहीतर भाजी करायचा कंटाळा आला म्हणून भरमसाठ लोणच्या सोबत पोळी खाऊ नका😅😅 हेल्दी खा हेल्दी रहा❤
काय मग चटकदार😋 स्टोरी कशी वाटली???
©Aniruddha Ranade
Food Stylist | Recipe Developer | Menu Engineering | Restaurant Consultant | Blogger
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा