Business Startup Plan

 #BusinessStartupPlan 

नमस्कार, 

आज पुन्हा एकदा माझी स्टोरी बाजूला ठेवून एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे या विषयावर बोलण्याची प्रेरणा पण तुमच्याकडूनच मिळाली आहे बरं का! I am actually Speechless! No Words can describe the way, you all have pushed me. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.🙏🏻आज मी जे काही चार शब्द खरडवू शकतो त्यात तुमचा मीठाचा वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही. हो ना, मीठच नसेल तर कोणताही पदार्थ अपूर्णच. तसंच वाचक वर्गच नसेल तर काही लिहिण्याला काय अर्थ आहे; So हे मीठ गोड मानून घ्या हं.😉

चला आता वळूया आजच्या मूळ मुद्द्यावर 'किचन रिलेटेड व्यवसाय'. हो विषय तसा नेहमीचाच आहे. कोरोना काळात बरेच जण घरी बसून होते. शिकलेले न शिकलेले, व्यवसाय असलेले/नसलेले, नोकरदार वर्ग, मग तो सरकारी असो किंवा खाजगी, काही थोड्या मूलभूत गरजांचा व्यवसाय करणारी मंडळी सोडली तर बाकी सगळे घरी होते. आणि ह्या वेळेस घरकाम करणारी लोकही घरीच होती. त्यामुळे घरातली सगळी कामंही आपल्यालाच करायची होती. ज्यामुळे एका गृहिणीला घरात किती काम असतात हे So Called Busy म्हणवणार्या आणि तरुण पिढीला कळलं असेलच. काही दिवस त्यां गृहिणींनी केली असतीलही कामं, पण सगळेच घरात म्हटल्यावर त्यांना ही कुठेतरी वाटत असेलच की आपल्याला सुद्धा Atleast आत्ता तरी घरच्यांची मदत मिळावी. आपल्यालाही एखादी सुट्टी मिळावी, दुपारची शांत झोप मिळावी, सकाळी जरा उशिरा उठण्याची मुभा असावी. आणि त्यांच्या इच्छा पूर्णही झाल्या. सगळ्यांनी घरात कामात मदत केली. त्यावर जोक सुद्धा व्हायरल झाले😅😅😅. आणि माझ्या article's वर खूप कमेंट सुद्धा आल्या. खूप जणांना काही शिकायचं होतं, काहींना व्यवसाय करायचा होता; पण पारिवारिक कामात I mean संसारात अडकून पडल्यामुळे काही करता आलं नाही. अशा अनेक जणांनी आता आपल्याकडे खरोखरच वेळ आहे हे लक्षात घेऊन व्यवसाय सुरू केले, अगदी घरगुती! मुद्दाम 'खरोखर' म्हणतोय, नाहीतर टीव्हीवर एक भांड्याचा साबणाची advertise येते. ते साबण वापरुन त्या बयेची भांडी लवकर घासून होतात आणि त्यातला जो वेळ उरतो त्यात ती बाई स्वतःचं cake shop उघडते.. हाहाहा! आता ते एकतर केक शॉप ला कमी लेखतायेत नाही तर ही बया अख्खा दिवस भांडी घासत असावी.😂😂😂परत भरकटलो मी, केव्हातरी काहीतरी आठवत मला

हांं, तर ह्या काळात अनेक व्यवसाय सुरू झाले. त्यात भाजीपाला विक्री थोडक्यात शेतमाल शेतातून थेट ग्राहकांपर्यंत, खाद्यपदार्थ विक्री, बेकरी प्रोडक्स यांचा मुख्यतः समावेश होता. 

इथे माझ्याहून जास्त अनुभवी लोक असतील, माझ्या आईसारख्या कित्येक Executive Chef असतील, पण मी याच क्षेत्रात शिक्षण घेतलय, so माझ्याकडे जो काही 14 - 15 वर्षाचा अनुभव आहे त्यावरून किचन रिलेटेड व्यवसाय कसा असावा, करावा यावर थोड लिहितोय. झालाच तर तुम्हाला याचा फायदाच होईल. 

सगळ्यात आधी आपण एकंदर Food Bussiness (मुख्यतः Take Away Orders किंवा Home delivery )कडे वळू. मुळात तुमचा व्यवसाय नवीन असेल तर तुम्ही Take Away or Home Delivery न ठेवता Pick Up From ठेवावं असं मी सुचवेन. तुम्ही एखादं प्रॉडक्ट जेव्हा विकायला ठेवता (खाद्यपदार्थ) तेव्हा त्याचं promotion करणं खूप गरजेचे आहे. आपण एक सिम्पल उदाहरण घेऊ, ''मिसळ"! बहुतेक सगळ्यांच्या माहितीची, आवडीची. आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चवीची मिसळ मिळते. आता तुम्हाला मिसळ विकायची असेल तर तुम्हाला त्यात एखाद वेगळेपण दाखवावं लागेल. ज्याने लोक तुमच्याकडे म्हणजे तुमच्या मिसळी कडे आकर्षित होतील. म्हणजे असं बघा, मी मुंबईला आहे तर मी इथे नाशिकच्या चवीची मिसळ विकली तर त्याचा जास्त फायदा होईल. याची कमतरता मला या मागचा पुढचा विचार न करता सुरू केलेल्या Quick start Bussiness मध्ये जाणवते. दुसरी गोष्ट तुमच्या जवळपास तो पदार्थ विकला जात नसावा. So it's like, तुमचा बिझनेस Area मामलेदार, बेडेकर, काटाकीर्रर यांच्या जवळपास नसावा. नाहीतर तुमची चव कितीही छान असली तरी लोक घ्यायला तयार होणार नाहीत. तुम्ही फक्त एक option बनून राहाल. म्हणजे 'ते मिळालंच नाही तर हे' असं. मग अशा ठिकाणी काय करावं? सिम्पल आहे! दुसरं काहीतरी विकावं. Something unique! महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही जे Product निवडाल त्यासाठी लागणारे Ingredients Easily Available असावेत आणि फार महाग नसावेत. कारण तुम्ही नवीन आहात, तुम्हाला किंमत हाय ठेवून चालणार नाही. त्यामुळे तुम्हाला Ingredients Selection and Apparently Product तसंच Select करावं लागेल. तुम्हाला जास्त पैसा घालावा लागणार नाही. Selection मध्ये अजून एक Point महत्वाचा आहे, तो म्हणजे आपल्या आजूबाजूला कशा प्रकारची वस्ती आहे. आणि काही Landmark like school, college, hospital or even Bar (permit room), well-known gym, corporate office, even भाजी मार्केट, अहो एवढंच काय,घराजवळ एखादा मोक्याचा बस स्टॉप, त्यानुसार Menu ठेवावा आणि वेळही. हॉस्पिटल, कॉर्पोरेट ऑफिस साठी snacks, किंवा हलकाफुलका पण पोटभरीच, gym असेल तर salad किंवा any protein विदाऊट मसाला, भाजी मार्केट असेल तर आपल्या रोजच्या भाजीवाल्याकडेच advertise करायला द्यायचं. School/college junk foodie असतात. तसेच bar वाले रात्री जागे होणारे, fried rice, बिर्याणी, Egg Items अशा ठिकाणी जास्त सेल होतात आणि हाच LandMark तुम्ही तुमचा Food PickUp Point म्हणून सुद्धा ठेवू शकता. अशा छोट्या छोट्या गोष्टींचा तुम्हाला खूप फायदा होईल.


Now moving on to Bakery, खूप जण केक मेकिंग कडे वळलेत पण तुम्ही तेवढ्यावरच सीमित का ठेवता बेकरी? मुळात Cake making हे Confectionery work आहे Bakery work नाही. अजून किती Options आहेत. Try for Different breads, cakes मध्ये variations करा , Brownies, Muffins, Teacake बनवा , Mini Pizza would be a great option. काही Desserts like chocolate mousse, caramel custard वगैरे , cookies, nankatai pack, वेगवेगळी पीठं use करून सुद्धा तुम्ही sweet आणि salty Cookies बनवू शकता. So तुम्ही तुमचा Business केक पुरताच मर्यादित ठेवू नका 

एक एक आठवड्याला बदलत राहा तुमचा Menu. 

So, that's all about it.

तुम्हाला काही विचारायचं असेल तर नक्की विचारा मी नक्की answer करीन in my capacity.

So Mantra is : Showcase Your Product In Such A Specific and Attractive Way That, People Will Surely Hunt for it. 

Trust me, माझे मुद्दे लक्षात घ्या, नक्की तुमच्या बिझनेस मध्ये फरक पडेल. All the best to all my followers. 

Waiting to hear it from you. तुमच्या comments ची वाट बघतोय!!

P.S. This message is exclusively for my readers only so please do share with my name Thanks 

©Chef Aniruddha Ranade

Consultant Chef


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट