Butter Chicken History

 काय सर्रकन गेलं ना हे वर्ष कळलंच नाही... मार्चपर्यंत काय केलं ते सगळ आठवतय पुढचं सगळं ब्लँक... मग एकदम ऑक्‍टोबरपासून पुन्हा सगळं सुरळीत झालं... 

अरे btw न्यू इयर सेलिब्रेशन कसं झालं 11 च्या पुढे जागला नाहीत ना??😜 नाहीतर कोरोनाचा धोका आहे हाहाहा!! अहो नियम हे मोडण्यासाठीच बनवलेले असतात😁😁 आपल्या सगळ्या खादाड मंडळींनी काय भारी भारी पदार्थ बनवलेले... देखकर तो मजा ही आगया... मराठी नवीन वर्षाचे स्वागत कोरोना नी झालं आणि इंग्लिश न्यू इयर च स्वागत कोरोना च्या लसीने काय योगायोग आहे... न्यू इयर म्हंटलं की सगळ्यात आधी आठवतं ते म्हणजे "न्यू इयर रेसोल्युशन" आणि 

न्यू इयर रेसोल्युशन म्हणलं की सगळ्यात पहिला नंबर लागतो तो म्हणजे "वजन कमी करण्याचा I Mean Gym ला जाण्याचा".. मी व्यायाम सुरू करणार, मी मॉर्निंग वॉकला जाणार... हो..पण १ जानेवारीला सकाळी लवकर उठलं तर मॉर्निंग वॉकला जाणार ना..😂😂 पळता येणार नाहीत असे संकल्प करायचेच कशाला.. त्यापेक्षा असे काहीतरी संकल्प करावेत जे पर्सनली आणि सोशली दोन्ही फायद्याचे असतील आमोद विश्वास बेडेकर   यानी सीरिज सुरु केलीये.. केटरिंग च्या गमती जमती त्यात मला समजलेली गोष्ट अशी की, अमोद खूप छान सिच्युएशन हँडल करतो त्यामुळे बरेचदा त्याचं अगदी वाया जात असलेलं अन्न वाचतं आणि मेन म्हणजे सत्कारणी लागतं... पण हेही लक्षात आलंय की कोणा तिसऱ्याच्या चुकीमुळे; वाचवलं नाही तर किती अन्न वाया जाऊ शकत आणि हे एकाच झालं असे कीती केटरिंग व्यवसायिक, हॉटेलीयर असतील त्यामुळे... हा संकल्प सगळ्यांनीच करायला काही हरकत नाही की, "मी अन्न वाया घालवणार नाही.. पोटापुरतं घेईन भूक असेल तेवढेच खाईन"... लागलं तर अजून वाढून घेता येतं हो, पण घेतलेलं पुन्हा ठेवता येत नाही.. हा संकल्प छान आहे नाही का?? नवीन वर्षात आपण एखादं झाड लाऊ शकतो... त्यादिवशी त्याची किंमत कळणार नाही पण ते जसजसं मोठं होईल; तुम्ही नक्की अभिमानाने सांगाल कि हे 2021 मधलं झाड हे 2022 मधलं... प्रत्येक वर्षात घरातल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला जरी एक एक झाड लावलं तर तुम्हीच विचार करा... काय छान संकल्प आहे, वर्षाअखेरीस ती झाडं आपल्याला नक्की काहीतरी देतील... हे झालं नवीन वर्षाच्या संकल्पा बद्दल... वर्ष नवीन असलं तरी एक प्रश्न कायमचा आहेच 

"मला भूक लागली आहे, मी काय खाऊ".. आमच्या घरात या प्रश्नावर कुठून तरी आवाज येतोच.. तूच शेफ आहेस, तूच कर काहीतरी आणि आम्हाला पण दे.. यावर्षी I mean मागच्या वर्षी कोरोनामुळे बाहेर खाणं अजिबातच झालं नाहीये आणि आम्ही घरी फक्त व्हेज बनवत असल्याने अख्खं वर्ष श्रावण महिनाच झाला... ह्या संडेला सगळे घरी होते, आज काहीही झालं तरी नॉनव्हेज खायचंच... आमच्याकडे नॉनव्हेज म्हंटलं की एकच गोष्ट डोळ्यासमोर येते ती म्हणजे "चिकन" पण बाहेरून चिकन मागवायला अजूनही नकार होता, मग मीच एक सोल्यूशन काढलं.. मी माझ्या घरी चिकन बनवून घेऊन येतो😄😄 माझ्या घरी मी बनवतो😜, नॉनव्हेज बनवायला आई-बाबांकडे अलाऊड नाहीये😁😁 आणि फायनली सगळ्यांचे फेवरेट "बटर चिकन" बनवायचं ठरलं... मग म्हणलं बटरचिकन करता-करता त्याचीच गोष्ट लिहावी.. 



बटर चिकन आवडत नाही म्हणणारे फार क्वचित सापडतील आणि ते जरी आवडत नसलं तरी त्याचं कारण ते तिखट नसतं आणि तिखट असलं तर ते बटरचिकन नसतं... हाहाहा😅 बघायला गेलं तर काही थोड्या इन्ग्रेडियंट मध्ये बनणारी ही रेसीपी आहे, पण ही आपली डिश असून सुद्धा देशाबाहेर फेमस होऊन ती आपल्याकडे पुन्हा आली... मुर्ग मखनी किंवा मख्खनवाला ही मूळची आपली डिश यातले सगळेच इन्ग्रेडियंट मुख्य आहेत म्हणजे पर्यायी किंवा वगळून चालत नाही... तंदुरी चिकन, बटर, फ्रेश क्रीम, आलं-लसूण पेस्ट, टोमॅटो, कांदा, धने, जिरे, लाल तिखट पावडर,गरम मसाला, कसुरी मेथी, चवीसाठी मीठ, साखर, गार्निश साठी कोथिंबीर झालं... फरक असतो तो ग्रेव्ही बनवण्याच्या पद्धतीत Authentically ह्या डिश चा बेस बनायला म्हणजेच मखनी ग्रेव्ही बनवायला कमीत कमी सहा तास लागतात... अगदी घरी जरी करायची असली तरी तितकाच वेळ लागतो... बघा केवढं मोठं सिक्रेट सांगितलं मी तुम्हाला... इन्ग्रेडियंट पण सांगितले आणि प्रोसेस पण, आता नक्कीच छान बनेल ग्रेव्ही मग पुढच्या संडेला कराच😁😁😁 

आता ह्या मुर्ग मखनीच बटर चिकन कसं झालं ते पाहू.. भारतात मुर्ग मखनीच म्हणतात, ती भारताबाहेर गेली आणि बटर चिकन होऊन पुन्हा भारतात आली... भारताची जगप्रसिद्ध डिश... जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात जा बटर चिकन आणि नान तुम्हाला दोनशे टक्के मिळणारच आणि तुम्ही लकी असाल तर किशोर कुमारची गाणी सुद्धा... साधारण शंभर वर्षांपूर्वी मोखा सिंग लांबा नावाच्या इसमाने पेशावरमध्ये एक छोटेखानी रेस्टॉरंट सुरू केले... तिकडच्या शेफ चे नाव कुंदनलाल गुजराल, यांनी फक्त तंदुरी रोटी बनवल्या जाणाऱ्या तंदूरमध्ये; चिकनला दह्यात आणि काही थोड्या स्पायसेस मध्ये मॅरीनेट करून तंदूर मध्ये रोस्ट केलं आणि जन्म झाला "द तंदुरी चिकनचा"... ती फारच लोकप्रिय झाली... तो मातीचा तंदूर, त्यातले कोळशाचे निखारे आणि त्यात असलेलं ते लालबुंद चिकन... तंदूर मधून बाहेर येईपर्यंत त्याचा सुगंध पसरलेला असायचा.. मस्त क्रिस्पी झालेलं असायचं.... ते पण जिथे success' असतं, तिथे अडचणी ह्या असतातच... सगळं सुरळीत सुरु असताना फाळणी झाली, त्यामुळे शेफ गुजराल यांना पेशावर सोडून दिल्लीत यावं लागलं... पण फाळणी झाली तरी त्यांच्या हातातली जादू कायमच होती... दिल्लीतच त्यांनी दर्यागंज इथे "मोतीमहल" नावाचं रेस्टॉरंट सुरू केलं... इथेही त्यांच्या तंदुरी चिकनने जादू केली... पण त्याकाळी रेफ्रिजरेशन, स्टोरेज साठी काही फार ऑप्शन नव्हते... आता उरलेल तंदुरी चिकन तसंच ठेवून serve केलं तर ते हार्ड होणार.... मग परत त्यांच्यातला शेफ गुजराल जागा झाला.... मॅरीनेशन मध्ये दही ऑलरेडी होतच.. चिकन अजून मऊसर करायला आणखी थोड्या ॲसिडिटीची गरज होती, म्हणून त्यांनी कांदा-लसूण, टोमॅटो आणि रीचनेस साठी मख्खन आणि मलई घालून डिश बनवली... 


चिकन वाया जाऊ नये म्हणून सोयीकरता बनवलेली हि डिश WORLD RECOGNIZED DISH मुर्ग मखनी म्हणजेच "बटर चिकन" या नावाने प्रसिद्ध झाली... पुढे याचंच एक वेरिएशन म्हणून याच शेफने "दाल मखनी" सुद्धा बनवली... रिसेन्टली अगदी Gordon Ramsay  ने सुद्धा मोतीमहल मध्ये जाऊन बटर चिकन खाल्लय यातच पुढे वेगवेगळे इन्ग्रेडियंट वाढवून कमी-जास्त करून चिकन लबाबदार, चिकन टिक्का मसाला, हे सगळे जन्माला आले... कधी दिल्लीत गेलात तर, मोती महल मधलं चिकन नक्की ट्राय करा... नाहीतर माझ्या घरी या हेहेहे... हा सुद्धा एक संकल्प होऊ शकतो ह्या वर्षात काहीतरी नवीन, काही वेगळं बनवायला शिकेन😁😁 

मी काय शिकू🤔 हां.... संक्रांत येतेच आहे, गुळाची पोळी शिकावी यावर्षी मातोश्रीं कडून😍😍😍😍

©Chef Aniruddha Ranade 

Food Stylist | Recipe Developer | Menu Engineering | Restaurant Consultant | Food Blogger

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट