Cooking आणि स्वयंपाक घर
मी माझी Food Journey लहानपणीच आईच्या हाताखाली सुरू केली आणि हळूहळू पुढे जात राहिलो; मी आणि आई आम्ही दोघेही.. मधे बरेच अडथळे आले, ते तर Common आहे. सगळ्यांच्याच आयुष्यात येतात सगळ्याच प्रोफेशन मधे, पण मी निवडलेलं क्षेत्र त्यावेळी निराळच होतं त्यामुळे वेळ प्रसंगी लोकांचे टोमणे सुद्धा ऐकावे लागले. शेवटी सगळ्यांनाच कष्टाचं फळ हे मिळतच. आता लोकं जेव्हा आईबाबांना विचारतात काय करतो हो तुमचा मुलगा "तो Chef आहे" असं जेव्हा आई सांगते तेव्हा समोरून, अरे वा!! Wow!! Reply आल्याशिवाय राहत नाही. पण मुंबईची ट्रेन आणि माझी धावणारी प्रगती अचानक थांबली.. आता करावं तरी काय विचारात तीन-चार महिने गेले दरम्यान Practical तर पक्क होतच पण किचन बद्दल थोडी Theory पुस्तक वाचली अगदी बरीच वाचली आणि जेवढं जमेल तेवढं ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न केला.. हेही झालं पण लॉकडाऊन काही संपेना. आता काय घरीही मदत करून झाली पण त्याच त्या रोजचा बोरिंग भाज्यांमध्ये काय इनोव्हेटिव्ह करणार... व्यवसाय मला करायचा नव्हता, मग विचार केला आपण जे शिकलोय जे अनुभवलंय ते लोकांना दिलं तर!! तेव्हा हातात पेन घेतलं आणि लिखाणाला सुरुवात केली.. माझ्यासाठी खूपच कठीण होतं कारण सवयच नाही, पण पहिल्याच लेखाला जो काही प्रचंड प्रतिसाद मिळाला ते पाहून प्रचंड आनंद आणि आश्चर्य दोन्ही वाटलं मनात म्हटलं जमलं की आपल्याला मग पुढे लिहीत राहिलो.. मग म्हटलं आपणही WORK FROM HOME करावं आणि Virtual Cooking Classes घ्यायला सुरुवात केली. आता पुन्हा मुंबईची ट्रेन हळूहळू सुरू झाली आहे तसंच माझी गाडी सुद्धा सुरू झाली आहे. Classes घेणे आता शक्य होत नाहीये, पण लिखाण बंद करणेही शक्य नाही त्याची फारच सवय लागली आहे.
कधी काही विचार करून लिहिल्याचे आठवत नाही पण आता करावा लागतो.. नेहमी वाटतं काहीतरी वेगळे लिहावं जे तुम्हाला आवडेल आणि ज्यावर फारसं काही बोललं जात नसेल.. त्यासंबंधी एक सामान्य माणूस काय आणि कसा विचार करत असेल तोच मीही करतो आणि तेच पानावर अवतरीत होतं.. आता तुम्ही म्हणाल Informative लेख असतात त्याचं काय?? मी जे काही Informative लिहितो त्याचा सारासार अभ्यास करून त्याची सगळी माहिती गोळा करून मगच लिहितो. मुळात तो माझ्या अभ्यासाचा भाग आहे.. त्यामुळे मला Food and Related topics बद्दल माहिती आहे Food Preparation हा किचन मधला एक छोटासा भाग झाला पण किचन SetUp पासून ते अगदी Diet आणि Nutrition पर्यंत सगळच आम्हा Senior Chef ला शिकावं आणि पहावं लागतं... त्यामुळे अशा टॉपिक्स वर मी लिहू शकतो..आता आजच बघा कशावर लिहू तेच कळत नाहीये...
Food म्हटलं की किती गोष्टी Connectedअसतात त्यातली एक शोधून त्यावर लिहायचा माझा प्रयत्न असतो.. एक Chef म्हणून लोकांना मी रेसिपी देणे अपेक्षित आहे आणि माझ्याकडे हजारो रेसिपीज आहेतही, पण ते तर मी तुम्हाला कधीही देऊ शकतो.. मला तुमच्याशी बोलायचं असत.. तस आपण रेस्टॉरंटमध्ये बरेचदा जेवायला जातो पण ज्यासाठी आपण तिथे जातो अर्थात जेवण्यासाठी ते जो बनवतो, जे तुम्हाला आवडतं, कदाचित तुम्ही त्यासाठी पुन्हा येता सुद्धा but जेवण बनवणाऱ्याला म्हणजेच Chef ला कधीच भेटत नाही.. यात तुमचं काही चुकतंय असं अजिबातच नाही पण तुम्हाला हे कदाचित माहित नसेल कि Chef तुम्हाला ओळखत असतो.. तुम्ही गेल्या वेळी आलेलात तेव्हा काय खाल्लं होतं हेही त्याच्या लक्षात असतं.. कदाचित त्याच्याकडे बोलण्याची कला नसते म्हणून तो तुम्हाला भेटत नाही आणि ती एक खंत म्हणा हवी तर की त्याला त्याचा कामाचं ॲप्रिसिएशन फार क्वचित मिळत. तुमच्या माझ्या इंटरॅक्शन मुळे तुम्हाला एका Chef बद्दल किती आपलेपणा वाटतो हे मला कळलंय म्हणूनच तुमच्याशी बोलावं, जमेल तेवढ्या शंकांचं निरसन करावं, एखाद्या पदार्थाचा किंवा व्यवसायाच्या अडचणीत मदत करावी असं वाटतं.. त्यासाठीच लेखनाचा हा प्रपंच.. आता मी रेस्टॉरंटमध्ये मोठ्या पोस्ट ला असल्याने अर्धाअधिक वेळ Paper Work आणि गेस्ट शी बोलण्यात जातो... पूर्वी असं नव्हतं मी नेहमी Back of The House असायचो.. "पडद्यामागचे कलाकार आम्ही"
बापरे बरीच बडबड झाली माझी काही तरी मुद्द्याचं बोलायला हवं नाही का😅
आजचा विषय पुन्हा एकदा नेहमीचाच आहे
"स्वयंपाक आणि स्वयंपाक घर". माझं स्पष्ट मत आहे की मॅच्युअर झालेल्या सगळ्यांनाच स्वयंपाक करता येणं खूप गरजेचं आहे कारण आजच्या काळात कोणाला, कधी घरापासून लांब जावं लागेल नोकरी, शिक्षणानिमित्त.. आणि बाहेर खाणं केव्हाही वाईटच त्यामुळे मोठ्यांचं आहेच पण लहानांनीही थोडी थोडी स्वयंपाक घरात आईसोबत लुडबुड करावी म्हणजे मोठं होईपर्यंत पोटापुरतं काही तरी करता येईलच.. स्वयंपाक हा शब्दच मुळात एक पाक किंवा शुद्ध शब्द आहे.. याचा शब्दशः अर्थ घेतला तर स्वतःला शुद्ध करण्याच शिक्षण किंवा कला म्हणून आपण.. आपल्या सगळ्यांचाच आनंद कुठे ना कुठे Food शी Connected, अर्थात पोटाशी.. आणि घरातल्या सगळ्यांचा आनंद स्वयंपाक घराशी जोडलेला असतो.. इतकचं नव्हे, इथूनच आपलं शरीर सुदृढ, बळकट बनत.. त्यामुळे किचनला एक Gym म्हणायलाही हरकत नाही.. Gym मध्ये जाऊन आपण काय करतो तर फॅट्स कमी करतो किंवा फिटनेस साठी जातो... मी म्हणतो एक दिवस घरातली सगळी काम करा कचरा काढा, लादी पुसा आणि अख्खा स्वयंपाक करा जिम वगैरे करायची काही गरज उरणार नाही.. आपली आई काय उगाच फिट नसते.. स्वयंपाक घरात पाऊल टाकलं की आपली सगळी इंद्रिये और सेंसेस ॲक्टिव होतात.. रूप, रस, रंग, गंध, चव, स्पर्श, आवाज असं सगळं फक्त किचनमध्येच अनुभवायला मिळतं. त्याचप्रमाणे आपले जवळ-जवळ सगळेच अवयव कामाला लागतात.. इकडून तिकडे नाचायला पाय, हात, नाक, डोळे, कान आणि तोंड सगळ्यात Important चव बघायला आणि स्वयंपाक करताना गाणी गुणगुणायला..म्हणजे बर्याच जणांना असते ही सवय.. मलाही गाणी ऐकत किंवा म्हणत स्वयंपाक करायला आवडतो.. घरातल्या देवघरापेक्षा खरं तर स्वयंपाक घराला मान मिळायला हवा.. स्वयंपाक घरात अग्नी देवतेचा वास सतत असतो तसंच घरातली आई किंवा बायको म्हणजे साक्षात अन्नपूर्णाच की हो.. कोबीची भाजी कालच झाली, कारलं मुलांना आवडत नाही, दुधी नवऱ्याला आवडत नाही, खिचडीच काय सारखी करायची... एक ना दोन शंभर गोष्टी असतात..
रोज स्वयंपाक काय करायचा हा मोठा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर असतो.. तरीही वर्षानुवर्ष रोज वेगवेगळे पदार्थ करून खायला घालणं म्हणजे फक्त अन्नपूर्णा देवीच करू शकते... म्हणूनच आईला देवाचा दर्जा दिलाय बहुतेक.. जितका वेळ ती घरात असते त्यातला किमान 70 टक्के वेळ तरी ती स्वयंपाक घरात घालवते.. किंबहुना आपण सगळेच दिवसातून एकदा तरी स्वयंपाक घरात हजेरी लावतोच.. अग्नि प्रमाणेच पाणीही सदा किचनमध्ये Available असतं नळातून येणारे पाणी म्हणजे जणू खळखळणारा झराच... अन्न थंडगार ठेवणारा फ्रिज दिवसातून कमीत कमी चार पाच वेळा तरी उघडला जातोच.. सगळ्या पदार्थांना एकजीव करणारा आपल्या जिभेचे, चटणी आणि वेगवेगळ्या करीज खाऊ घालून लाड पुरवणारा मिक्सर दिवसातून एकदा तरी गरागरा फिरतोच. मॅगी दोन मिनिटात कधीच बनत नाही पण ह्यात ठेवलेलं अन्न मात्र दोन मिनिटात नक्की गरम होतं.. असा ओव्हन थाटात स्वयंपाक घरात विराजमान असतो.. पूर्वीसारखी मांडणी प्रकार आता राहिलेला नाही त्याची जागा आता किचन ट्रॉली ने घेतली आहे भांड्यांनाही त्यात प्रशस्त वाटतं उगाच उन्हात बसून राहावे लागत नाही ताट वाट्या, कप बशा, कढई झारा, सगळे मित्र वेगवेगळे झालेत पण स्वयंपाक करताना किंवा जेवताना, खाताना त्यांची जोडी पुन्हा एकत्र येते.. बागेत जशी वेगवेगळ्या रंगाची फुलं असतात तसचं स्वयंपाक घरात धान्य- कडधान्याचे निरनिराळ्या रंगाचे डबे सजलेले असतात आणि हो या सगळ्यात खाऊचा डबा विसरून कसं चालेल.. असा एखादा डबा सगळ्यांकडेच असतो आणि त्याकडे सगळ्यांचं सगळ्यात जास्त लक्ष असतं तो डबा कधीच रिकामा होत नाही.. प्रत्येक घरात काहीतरी रीती असतात; प्रथा असतात ह्या सगळ्या स्वयंपाक घरात सुद्धा पाळल्या जातात.. जसं पाय धुतल्याशिवाय स्वयंपाक घरात यायचं नाही.. दही, हळद, तेल आणि मीठ या गोष्टी कायम घरात असायला हव्यात त्या संपू द्यायच्या नाहीत हा एक आमच्या घरातला नियम आहे.. घरातल्या स्त्रीचं कलाकौशल्य दाखवायचे ठिकाण म्हणजे किचन.. शिजवलेलं अन्न पोटभरून खाऊन कौतुकाचे दोन शब्द बाहेर पडले की गृहलक्ष्मी, अन्नपूर्णा आणि स्वयंपाक घरातील काम फत्ते झालेलं असतं.
कधीकधी कंटाळा आला म्हणून रेस्टॉरंट मध्ये किंवा सण समारंभाला दुसऱ्यांकडे जातो तेव्हा स्वयंपाक घर कसं हिरमुसल्या सारखं होतं.. पण "एक क्षणभर विश्रांती" ही हवीच.. दुसऱ्या दिवशी पुन्हा जोमाने स्वयंपाक घर कामाला सज्ज झालेल असत...
माझ्या सारखे किंवा कुणाही मोठ्या Chef चा पहिला धडा इथेच गिरवला गेलेला असतो...
आमच्यासाठी "स्वयंपाक घर हेच विद्येचे माहेर घर"..
©Chef Aniruddha Ranade
Food Stylist | Recipe Developer | Menu Engineering | Restaurant Consultant | Blogger
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा