क्विक सर्विस रेस्टॉरंट FastFood

 Hello, 😄🙏

मागचा लेख सगळ्यांना पटला, आवडला या बद्दल सगळ्यांचे मनापासून आभार... I hope आता तुम्ही थोडे स्ट्रिक्ट Parents झाले असाल.. माझ्या घरी तर सगळं माझ्यावरच उलटलं.. मी लिहिलं होतं ना आई मला ओरडते.. म्हणजे मी नेहमीच लिहितो तसं..😜 आता त्यावरून ओरडली मला, म्हणे तू तर गब्बर करून टाकलयस मला... काय म्हणतील सगळे, एवढ्या मोठ्या मुलाला सुद्धा ओरडते...  बघा आता मी काही म्हणालो नाहीये.. तीच स्वतःला गब्बर म्हणालीये..😜😜 हाहाहा😅 हा.. तर कुठे होतो मी मागच्या लेखात मी एक मुद्दा मांडलेला रादर दोन मुद्दे एक म्हणजे "बॅलन्स डाएट" आणि दुसरा म्हणजे "QSR" म्हणजेच "क्विक सर्विस रेस्टॉरंट".. आज आपण त्यातल्याच एकावर डिस्कस करूया... 

"क्विक सर्विस रेस्टॉरंट" ची छोटीशी व्याख्या द्यायची झाली तर, या रेस्टॉरंटमध्ये फूड साठी आपल्याला फार वेळ थांबावं लागत नाही आणि इथे कोणत्याही प्रकारची सर्विस दिली जात नाही... अशांना QSR म्हणजेच क्विक सर्विस रेस्टॉरंट म्हणतात... ती का आहेत, कोणती आहेत, त्याचा काही फायदा आहे, का ते आपण बघूया.. QSR किंवा आपण ज्याला फास्टफूड म्हणतो याची सुरुवात खूप आधी (भारतात) म्हणजे जेव्हा आपल्याकडे वायफळ खर्च करायला पैसे नसायचे, आपल्यासाठी तेव्हा वडापाव, मिसळ, चाट (पाणीपुरी) आणि फार फार तर सॅंडविच हेच काय ते फास्टफूड होतं आणि त्यात सगळे समाधानीही होते... पण हळूहळू लोकांकडे पैसा जमा होऊ लागला आणि ओघाने तो खर्च सुद्धा होऊ लागला... मला आठवतंय लहानपणी बर्थडे पार्टी म्हणली की मेन्यू फिक्स असायचा... एका पेपर डिश मध्ये थोडेसे बटाट्याचे वेफर, चॉकलेट, एक केक चा पीस आणि समोसा, रस्ना सरबत... हे म्हणजे फिक्स होतं आणि पार्टी सुद्धा घरीच असायची... बरं हे सुद्धा ज्यांच्याकडे बऱ्यापैकी पैसा होता... माझ्या घरी तर आईचाच भारी बेत असायचा रगडा पॅटीस, दहीवडा, बटाटेवडा, आणि घरी बनवलेला केक असं सगळं स्पेशल असायचं आणि त्याही आधी म्हणजे आई-बाबांच्या वेळेस तर गोडाचा शिरा, पोहे वगैरे वाढदिवसाच्या पार्टीचे प्रकार होते... आज वाढदिवसाला घरी काही शिजवायचंच नाही असं बऱ्याच घरांमध्ये असतं... आता आमच्याही घरी हेच आहे प्रत्येक वाढदिवसाला बाहेर जायचं, पण आम्ही इतर वेळा बाहेर खातच नाही त्यामुळे वर्षातून पाच वेळा बाहेर जाणं तितकसं अपायकारक नाही... पण माझं आणि भावाचं प्रोफेशनच वेगळं तरी भावाचं ठीक आहे तो काही शेफ नाही.. मला मात्र दर दोन मिनिटाला बाहेरच खावच लागतं... गेस्ट ला जाणारा प्रत्येक पदार्थ टेस्ट करावा लागतो... अगदी अर्धा चमचा जरी टेस्ट करायचा म्हणला तर, बारा-तेरा तासात किती खाऊन होत असेल याचा तुम्हीच अंदाज बांधा...


भारतात फास्टफूड म्हणजे आपलं नाही हा परदेशी... भारतीय फास्टफूड अं.... म्हणजे मुंबईत जे फेमस आहे आणि जगात भारी😁😁 हाहाहा "वडापाव" 1966 मध्ये अशोक वैद्य यांनी इंट्रोड्युस केला आणि अगदी रोजंदारीवर काम करणाऱ्यां पासून श्रीमंतांपर्यंत सगळ्यांचा चाहता झाला... मला जेव्हा खाऊसाठी पैसे मिळायला लागले तेव्हा मी 3 रूपयाचा वडापाव खाल्ल्याचं आठवतंय... Burger सारखीच असणारी ही गोष्ट इतकी स्वस्त उपलब्ध होती... 2000 साली JumboKing आलं आणि वडापाव थोडा एलिव्हेट झाला, पण त्यामानाने किमतीत फार तफावत नव्हती.. पण हेच आपलं परदेशी फास्टफूड सगळं साधारण एकाच सुमारास सुरू झालं MacDonald, PizzaHut, Domino's ह्या सगळ्या कंपन्या 1995- 96 मध्ये भारताच्या राजधानीत आल्या आणि बघता-बघता अख्खा भारत त्यांनी काबीज केला... 


इथलं फुड ते काय सगळ्यांना परवडण्यासारखं नव्हतं, त्यामुळे लोक आकर्षित तर झाले, पण खिशाला कुठे परवडतय... फक्त श्रीमंतांच खाणं म्हणून ते प्रसिद्ध झालं... त्यावेळी बाहेर जेवायला जायचं म्हणजे काय जवळच्या कुठल्यातरी रेस्टॉरंटमध्ये जाऊन फाईव्ह कोर्स मेन्यू खायचा सूप, स्टार्टर, दोन भाज्या, रोटी आणि राईस फार फार तर पुढे कुल्फी किंवा आईस्क्रीम वगैरे काहीतरी... म्हणजे बाहेर जाऊनही चौरस आहाराचं खाल्ला जायचा... रेस्टॉरंटही हमखास ठरलेली असायची फार चॉइसेस नव्हते आणि मुख्य म्हणजे लोकं त्यातच फारच खुश होती... 

हळूहळू इंटरनेटमुळे जग जवळ येत गेलं आणि  सगळ्यांना शिंगा फुटायला लागली... माणसाच्या आहारात बदल होत गेले... 

आता मला त्यामुळेच पगार मिळतो तो वेगळा भाग आहे😁😁😁 कारण हल्ली तुम्ही काय आणि कुठे खाता यावर तुमचं स्टेटस ठरतं... असं बर्‍याच जणांच आहे अमुक अमुक रेस्टॉरंटमध्ये चेक-इन केलं, अमुक-अमुक फुड ऑर्डर केलं, त्याचे फोटो म्हणजे थोडक्यात सगळा दिखावा बाकी काही नाही... मेमरीज कॅप्चर नक्की कराव्यात, पण त्या आपल्या पुरत्याच लोकं मर्यादित नाही ठेवत... बरं हीच मंडळी लॉंग ड्राईव्ह च्या नावाखाली शहराबाहेर जाऊन अगदी ढाब्यावरही खातात... म्हणजे नक्की काय सांगायचं असतं यांना ते मला अजूनही कळलेलं नाही... मी काही संत वगैरे नाही मीही दुर्दैवाने यातलाच एक.. पण असं नाही केलं तर लोक अक्षरशः वाळीत टाकल्यागत बाजूला करतात... खरे मित्र, भावना, वगैरे असल्याची आमची बहुदा शेवटची पिढी... हल्ली ब्रँड लागतो सगळ्यांना... ह्या सगळ्याला कारणीभूत एकच इंटरनेट... एखाद्या भाजीपेक्षा इंटरनेटचे पॅक स्वस्त झालेत.. 

जाऊ दे आपण फक्त जेवणाबद्दल बोलू... आता आमच्या वयाच्या मुलांचे बघा ना, वेफर्स, समोसा आणि केकचा तुकडा यावर भागणारी आमची बर्थडे पार्टी आज कुठल्यातरी High-end रेस्टॉरंट मध्ये सेलिब्रेट होते... आमचं आत्ताच पैसे बचत करणं म्हणजे हॅप्पी अवर्स किंवा झोमॅटो गोल्ड एकावर एक फ्री किंवा जिकडे डिस्काउंट असेल ते रेस्टॉरंट निवडणे... खरंच कधी कधी वाटतं आपण भावच दिला नसता तर परदेशातली एक तरी फ्रॅंचाईजी उघडली असती का हो?? अजिबातच नाही आणि जरी उघडल्या असत्या तरी फक्त नावालाच... आपले मराठी सेलिब्रिटी शेफ बघा.. शेफ Vishnu Manohar  यांचं विष्णुजीकी रसोई.. शेफ Nilesh Limaye  यांचं अन्नपूर्णा.. शेफ Parag Bharat Kanhere  यांचं द बिग वडापाव.. सगळ्यांनी भारतीय जेवणालाच प्राधान्य दिलय.. 

आपण; नेहमी तेच काय खायचं या हेतूने रेस्टॉरंट मध्ये जातो आणि चायनीज, जापनीज, थाय, इटालियन, अमेरिकन Cuisine वर ताव मारून येतो... याला कुठेतरी अगदी पूर्णविराम नाही हो पण एक अर्धविराम तरी हवाच... पूर्वीच्या लोकांना हे परदेशी फॅड अजूनही पटत नाही त्यांना चौरस आहाराचीच सवय आहे, त्यामुळे ते आपल्यासोबत येण्याचे टाळतात आणि जरी आले तरी फार आनंदाने काही खात नाहीत... माझ्या तर असंही ऐकिवात आहे; आई-वडिलांना टेबल मॅनर्स जमत नाहीत म्हणून आपल्यासोबत न्यायची मुलांना लाज वाटते...😠😠 परदेशात गरीब लोकांना, अर्न अँड लर्न करणाऱ्या स्टुडन्टना रोजगार मिळावा, खिशाला परवडेल आणि पोटभरीचं सुद्धा होईल असे काहीतरी खाद्यपदार्थ असावेत म्हणून फास्टफूड कॉन्सेप्ट सुरू झालेली.... भारतात त्याचे कम्प्लीटली उलट परिणाम झाले आणि आपल्या हातातला चौरस आहार निसटत गेला.. आपण फास्टफूड ला तर रोजगार उपलब्ध करून दिलाच शिवाय जिमला सुद्धा दिला... त्याच्याही फ्रॅंचाईजी ओपन झाल्या.. ह्या मुद्द्यावर खरंच विचार करण्याची गरज आहे तरच आपली पुढची पिढी सुदृढ होईल... आपल्याला आपल्याच बाबतीत थोडं स्ट्रिक्ट व्हावं लागेल...

Vocal For Local हे फूडचा बाबतीत सुद्धा अमलात आणायला हवं... 


आज इथेच थांबतो तुम्हाला विचार करायला थोडा वेळ लागेलच नक्की यावर विचार करा... कधीकधी गोष्टी आपल्याला पटतात पण आपण त्या विसरून जातो म्हणूनच पुन्हा आठवण करून देतो... 



हेल्दी खा आणि हेल्दी रहा🙏🙏


©Chef Aniruddha Ranade

Food Stylist | Recipe Developer | Menu Engineering | Restaurant Consultant | Food Blogger

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट