पहिल्या नोकरीच्या शोधात

Artisanal Virtual Kitchen


Hi😃🙋🏻‍♂️

कसे आहात सगळे? सगळ्यांनी वाचला का माझा Thrilling Experience!!! घाबरला नाहीत ना? मुंबईकर तसे घाबरणारे नाहीच म्हणा! मी सुद्धा तो एकच दिवस घरी काढला. 

दुसऱ्याच दिवशी मी पुन्हा ड्युटीवर हजर.सगळी पळापळ चालू होती. कारण Oberoi Hotel आमच्या हॉटेलपासून ५ एक मिनिटांच्या अंतरावर होतं. पोलिसांचा सुद्धा कडक पहारा. आणि तिकडचे सगळे गेस्ट आमच्या हॉटेलमध्ये शिफ्ट केले होते. त्यामुळे आमचं हॉटेल फुल झालं होतं. पुढे कित्येक दिवस असंच चालू होतं. घरी रोज आई टेन्शन मध्ये, कारण एकटीच होती ती, बाबा नव्हते सोबत. दोन एक महिने असंच वातावरण राहीलं. मग सगळं सुरळीत झालं. यात एक गोष्ट चांगली घडली😉, मला बॉम्बस्फोट झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी नवा करकरीत मोबाईल मिळाला.

असंच रुटीन होतं, फक्त Shift Timing आणि Department Change होत होते. पण तिथे मला Bakery मध्ये काम करण्याचा Chance नाही मिळाला, त्याचं थोडे दुःख होतं; पण सगळ्याच गोष्टी मनासारख्या घडतात अस नाही. या सगळ्या धावपळीत ६ महिने कधी संपले कळलेच नाही. दुसरं वर्ष ही ,हा हा म्हणता संपलं सुद्धा.

आता आम्ही Senior होतो. Last Year of College, सगळे शिक्षक Friendly झाले होते. Campus Interview ला सुरुवात होणार होती. त्यासाठी मस्त Blazer वगैरे असा युनिफॉर्म होता. सगळी मोठी मोठी हॉटेल्स Campus साठी येणार होती. आश्चर्य म्हणजे अगदी Taj, Oberoi सुद्धा! हो कारण नुकतेच बॉम्बस्पोट झालेले तरीही ते आले. Internship दरम्यान सगळ्यांचं पक्क झालं होतं की कोणतं क्षेत्र निवडायचं ते Last Year ला आणि काही Subject पण वाढले. Like, Sales and Marketing, Hotel Engineering Human Resource, Inventory Management वगैरे त्यामुळे career साठी options सुद्धा वाढले. माझं मात्र पक्कं होतं की Bakery & Confectionery मधेच मला जायचं होतं. त्यासाठी तयारीही जोरात सुरू केली होती. प्रत्येक Ingredient चं Knowledge त्याची विशेषता, सगळं Practically सुद्धा, college ने जे शिकवलं ते सगळं मला perfect येत होतं. पण जसा मी आधी म्हणालो होतो, College मध्ये अगदी Authentic Method ने शिकवलं जातं. सध्या काय असतं ते मला माहित नाही पण तेव्हा तरी असंच होतं. त्यामुळे Hotels मध्ये सगळ्या कामांना Machines वापरली जायची, आणि तीच कामं आम्ही हाताने करायचो. End Product जरी Same असलं, तरी वापरण्यात येणाऱ्या Machine बद्दल आम्हाला काहीच Knowledge नव्हतं. Theory Wise माहित होतं की Dough बनवायला Dough Mixer असतात, but ते कसे असतात, Use कसे करायचे याची काहीच आयडीया नव्हती. Bakery & confectionery मध्ये selection फारच कठीण होतं कारण Plus Point काहीच नव्हता. Internship मध्ये सुद्धा काम करायला मिळालं नव्हतं मी खूप प्रयत्न केले सगळे Interviews दिले. Taj, Oberoi पासून Domino's पर्यंत पण हाती निराशाच आली. नशिबाने इथे साथ दिली नाही. So Campus मध्ये तरी Selection झालं नाही. वर्ष संपलं काहींच्या हातात Job होते, काहींकडे नव्हते. कोणी Bussiness सुरु करणार होतं, कोणी पुढे शिकणार होतं. तूर्तास माझ्याकडे तरी Job नव्हता. आणि Hotel Industry मधलं कोणी ओळखीच ही नव्हतं. मग काय माघार घेण्याशिवाय पर्याय नव्हता.

 Naukri.com वर मी Registration केलं. Kitchen साठी अप्लाय करायचं ठरवलं. महिनाभर काहीच Progress नाही. मी सुद्धा महिनाभर आरामच केला. नंतरचं Life कसं असणारे ते मी Internship दरम्यान अनुभवलं होतं, So मी Chill करत होतो. आणि एक दिवस अचानक कॉल आला. तेव्हा 'CCD Lounge' नवीन सुरू झालेलं. तिकडेे Job साठी Call आला! बाबा त्यावेळी सुट्टी घेऊन घरी आले होते. कारण माझें शिक्षण संपलं होतं, पण भावाचं दहावीचं वर्ष होतं. त्याची Classes ची admission वगैरे घेण्यासाठी बाबा आले होते. 

आता काय तो Decision मलाच घ्यायचा होता. आता कॉलेज लाइफ संपलं होतं आणि सतत धावत असणाऱ्या मुंबईच्या रेसचा मी भाग होणार होतो....🙂🙆🏻‍♂️

©Aniruddha Ranade

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट