HouseWife होम मेकर
Hiee...
इतक्या दिवसांनी आज जरा वेळ मिळालाय लीहायला. सगळ्यांप्रमाणेच माझी गाडी सुद्धा हळूहळू रुळावर येतीये त्यामुळे सोशल मीडियावरचा रोजचा प्रवास थोडा मंदावलाय. अहो, प्रवासच की आपल्या ग्रुप वर दिवसभरात किती पोस्ट येत असतात; सोबत जुन्या असतातच त्या सगळ्या वाचायला किंवा अगदी नजरेखालून घालायला अख्खा दिवस कमी पडेल आणि त्यातल्या दहा-पंधरा जरी आवडल्या तर मग बघायलाच नको😁 पण आम्हा हॉटेलवाल्यांना सुट्टीच्या दिवशी धड जगू दिलं तर शप्पथ.. गंमत सांगतो काही लोकं तर फोन ऑफ करून टाकतात😂 माझ्या भावाचंच सांगतो सुट्टीच्या दिवशी सुद्धा उसंत म्हणून नाही. अख्खा दिवस तो फोन कोकलत असतो. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या सगळ्याच लोकांना दुसऱ्या डिपार्टमेंट च काम सोपं वाटत. असतं स्पेशली आमच्यात आणि सर्विस (वेटर्स) मध्ये तर रोजचं भांडण ठरलेलं.. एक छोट संभाषण सांगतो😉
Chef: इतक्या ऑर्डर्स बनवून Ready आहेत पिकअप करायला कोणीही नाही मग जेवण थंड झालं की आमच्याच नावाने ओरडा.. नुसतं प्लेट्स उचलून टेबलवर ठेवायलाही जमत नाही यांना😡
Waiter: हो.. तुम्हाला काय जातंय बोलायला तिकडे उभा राहून फक्त Pans तर हलवायचे आणि आरडाओरडा करायचा तिकडे बाहेर Guests ला आम्हाला फेस करावा लागत...😐
आता म्हणलं तर दोघांचही काम तितकाच अवघड पण ऐकतय कोण😂 तर अशी मजा रोजचीच आहे परत दुसऱ्या दिवशी काम सुरू🤗 असं असतं किचन ऑपरेशन... कधी एखादा गेस्ट चुकून किचनमध्ये आला तर आरडाओरडा बघून पुन्हा पाऊल सुधा टाकायचा नाही हवा तर तुम्ही Gorden Ramsey चा एखादा एपिसोड पाहू शकता..Hells Kitchen 😅अरे काय चाललंय विषय काय आणि मी बोलतोय काय. यावर्षी नाही म्हणता म्हणता सगळे सण झाले आणि त्यातही महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण कुटुंबासोबत ते साजरे झाले. हा आता परदेशात असलेल्यांचा अपवाद आहे पण तेही तिथे मजा करतातच की. ह्या वर्षी आमचं म्हणजे रेस्टॉरंट वाल्यांचं दुकान बंदच होतं त्याचं दुःख आहेच पण त्या निमित्ताने सगळे घरी जेवण बनवायला तरी शिकले किंवा घरगुती जेवणावर लोकांनी जास्त भर दिला. ह्याचं सुंदर उदाहरण म्हणजे केक उगाच फॅन्सी दुकानांमधून केक आणण्या पेक्षा केक घरी बनवणाऱ्यां कडून केक घेणं लोकांनी जास्त पसंत केलं. अहो बरोबरच आहे कितीही नाही म्हटलं तरी हायजिन चा प्रश्न आहे घरगुती हा शब्दच मला वाटत हायजेनिक असावा तर अशाप्रकारे सगळेच शेफ झाल्याने आमच्या प्रोफेशन वर गदा आलेली आहे..😅 आता ज्यांना आयतं खायचं सुख प्राप्त झालेलं नाही अशीच लोक रेस्टॉरंटमध्ये येतात बहुतेक 😅😅 नुकतीच दिवाळी झाली यावेळी घरगुती फराळ करुन देणाऱ्यांची खूप चलती होती..दिवाळी म्हटलं की फराळा सोबत कपडे, गिफ्ट,आलीच ह्यावेळी चॉकलेट बॉक्स सुद्धा दिसत होते Group वर, बरोबरच आहे काळाप्रमाणे नवीन गोष्टी ट्राय करायलाच हव्यात...
यावेळी घरगुती फराळ बऱ्याच प्रमाणात गेले अगदी परदेशातही.. I Know मी एक Professional Chef आहे आणि मला रेस्टॉरंट बद्दल किंवा तिथल्या फूडचं कौतुक करायला हवं, But that is my professional part. नाहीतर मी सुद्धा तुमच्यातलाच एक आहे की.. आम्हीही क्वचितच कधी रेस्टॉरंट मध्ये जातो.. घरचं जेवण सगळ्यात भारी असतं आणि त्याचं महत्त्व एका शेफला😇 नाहीतर कामानिमित्त घरापासून लांब राहणाऱ्यालाच कळतं. घरापासून लांब राहणारी बरीच मंडळी चांगलं रेस्टॉरंट शोधण्यापेक्षा घरगुती डबा कोण बनवून देतं का, ते आधी बघतात... ह्या लाँकडाउन काळात घरगुती जेवण बनवून देणाऱ्यांचा बऱ्याच जणांना खूप जास्त फायदा झाला आहे. फायदा दुतर्फा होता पण ते ओघाने आलंच. हे झालं Business बद्दल आणि सगळ्यांच्या हायजिन आणि सोयीच्या दृष्टीने पण होम मिनिस्टर चं काय???😶
मोदींना भारतासाठी पडला नसेल एवढा मोठा प्रश्न त्याच्यासमोर रोज असतो😂😂 " जेवायला काय करायचं"? हा!! आता दिवाळीचा चिवडा थोडा उरलाय त्यामुळे मधल्या वेळेतला प्रश्न सुटलाय. चिवड्यात कांदा टोमॅटो वगैरे घालून थोडं modify करून तो खाल्ला जातोय.. पण बाकीचं आहेच की बऱ्याच जणांचं आत्ता कुठे ह्या कोरोना काळात WORK FROM HOME सुरू झालय तेही WITH SALARY😮 पण आपली आई, बायको, सासुबाई किंवा काही घरांमध्ये वेळप्रसंगी बाबासुद्धा बिन पगारी वर्क फ्रॉम होम करतायत... आपण रेस्टॉरंटमध्ये जाऊन वेटरला आपल्या जेवणाबाबत सगळे इन्स्ट्रक्शन देतो, हे असं बनव; ते तिखट नको; यात कांदा नको... पण घरच्या शेफला हे सगळं आधीच माहीत असतं. तुमच्या आवडी-निवडी जपून तुमच्या साठी नेहमीचं सोडाच हो पण नवीन पदार्थ सुद्धा बनवतात... तुम्ही जसं लॉकडाऊन मध्ये एक हौस म्हणून COOKING ENJOY केलंत तसंच आताही एखाद दिवशी Cook करून त्यांनाही सुट्टी द्या की बघा किती खुश होतील त्या... जाऊदे जेवणाचं सोडाच हो, सकाळी नेहमी चहा-कॉफी करणाऱ्याला एखाद दिवस आयता चहा कॉफी मिळाली तरी त्याचा आनंद लपवता येत नाही आणि हो; हेच जर अगदी जमत नसेल तर रेस्टॉरंट मध्ये जेवण छान होतं हे जसं Waiter ला सांगतो अगदी तेच Etiquettes घरीसुद्धा पाळानं अगदी रोज जरी म्हणालात जेवण छान झालयं तरी कुठे बिघडतं???
AFTER ALL त्यांच्यामुळेच तर आपण आपलं काम बिनदिक्कत करू शकतो नाही का????☺
©Aniruddha Ranade
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा