Local Food Facts
#VinaTicketPravas
नमस्कार🙏🏻
मागच्या लेखात आपण घरचं जेवण कसं चांगलं असतं ते पाहिलं. आणि माझी आई मला कशी ओरडते ते सुद्धा लक्षात असेलच तुमच्या, नाही का?
आता आपण एक नवी सिरीज सुरू करूया "WORLD CUISINE". मला आयुष्यात बऱ्याच चांगल्या संधी मिळाल्या, त्यातलीच ही एक. मागे एकदा मी ह्या बद्दल लिहिलं होतं. शिप लाइफ! मी चार वर्ष पॅसेंजर क्रूज वर होतो. त्यामुळे माझी विनातिकीट अख्खी जगभ्रमंती झाली. जवळपास 84 देश मी फिरलोय. त्यामुळे जे जे पदार्थ ज्या ठिकाणी बनतात किंवा belong करतात, त्या ठिकाणी जाऊन ते प्रत्यक्ष खाण्याचा अनुभव मला घेता आला. जगाच्या नकाशावर एखाद्या ठिपक्या गत दिसणार्या देशाचं सुद्धा स्वतःचं असं एक Cuisine असतं. असे कितीतरी देश आहेत. सगळ्यांची स्वतःची ओळख आहे आणि तेच आपण बघणार आहोत. काय मग येताय ना माझ्यासोबत जगभ्रमंती ला? बघू आता कुठपर्यंत जाते ही जर्नी! पण त्याआधी आपण आपलं बघूया नाही का आपण खाण्यापिण्याच्या बाबतीत कुठे चुकतो का हो? "An Apple A Day, Keeps The Doctor Away" अशा म्हणी खरच आपल्यासाठी आहेत का? आपण नक्की काय खावं? आणि काय खाऊ नये? बरेच प्रश्न आहेत. निसर्गाने आपल्याला काही नियम घालून दिलेले असतात. आणि वेळोवेळी ते नियम तोडणं हीच काळाची गरज आहे, अशा अविर्भावात आपण ते तोडत असतो. याचे परिणाम वाईटच होतात, हे माहीत असूनही त्याची फिकीर आपल्याला नसते. निसर्गाचं ऐकलं नाही की त्याचा धीर सुटतो आणि मग आपणच बनवलेल्या देवांच्या मूर्ती समोर आपण डोकं धरुन बसतो. ह्या ऐवजी निसर्गाने जे नियम घालून दिले आहेत ते पाळले तर किती बरं होईल! तुम्ही म्हणालं शेफ कुठे फिलॉसॉफी मध्ये घुसताय, मुद्दा काय आहे? मुद्दा असा की, ठराविक ठिकाणच हवामान, तिथली माती-पाण्याची मुबलकता यावरून तिथली शेती किंवा शेती रिलेटेड व्यवसाय ठरत असतात. एखाद्या शेफला मिळालेलं Unprocessed raw material completely निसर्गाकडून मिळालेलं असतं. त्याचीच पुढे जाऊन एखादी lavish डिश बनते. एखाद्या शेफला मनापासून काय आवडतं माहितीये??? Local Grown Ingredients! लोकल भाज्या, फळे, हर्ब! पण हल्ली सगळ्यांना आपलं सोडून दुसऱ्याच अन्न जास्त आवडायला लागलय. इथे सगळ्यात मोठा इशू आहे तो म्हणजे प्रेस्टिज चा. घरी बनवलेले पोहे, इडली आपल्याला डब्यात भरून घेऊन जाणं कमीपणाचं वाटतं. पण तेच पोहे आणि इडली एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलच्या बुफे मध्ये असतील तर ते आपण भरभरून खातो. आता तो शेफ काय वेगळं बनवणारे का ते? अजून एक उदाहरण देतो. आज आमच्याकडे लाल माठाची परतलेली भाजी आहे असं ऐकलं तर बर्याच जणांची तोंड वाकडी होतील. पण हेच मी तुम्हाला शेफ स्टाईल मध्ये सांगितलं Today we have 'Stirfry Amaranth In Olive Oil and Garlic garnished with grated fresh coconut and green chilies for heat'.. बघितलं त्या साध्या भाजीला किती महत्त्व आलं अचानक! आणि लोकसुद्धा खातात.😁ट्रस्ट मी.. तुम्हाला खोटं वाटेल, पण मी लाल माठाचा पिझ्झा 🍕 सुद्धा बनवलेला आणि Guest ला तो प्रचंड आवडलेला. तर World Cuisine कडे वळण्याआधी आपण भारतीय आणि मी महाराष्ट्रात राहतो त्यामुळे महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती आणि लोकली ग्रोन फूड, जे आपण खरं तर प्रिफर करायला हवं, ते कसं चांगलं हे बघू.
Brand चा नावाखाली आपल्याला कंपन्या भुलवतात आणि आपणही भुलत चाललोय, का? कारण फक्त एकच advertising चा परिणाम आणि प्रतिष्ठेचा प्रश्न! काही लोकांना गिरणीतून गहू दळून आणून ते वापरणं कमीपणाचं वाटतं. "आम्ही ना अमुक कंपनीचाच आटा वापरतो, किंवा सूटा बासमती तांदूळ चालत नाही, आम्ही की नाही तमुक कंपनीचाच बासमती वापरतो ". अहो पण आपल्या जवळपासच्या शेतकऱ्यांचं काय? आता ह्याच ग्रुप वर किती तरी शेतकरी मित्र असतील ज्यांना त्यांचा माल थेट विकायचा आहे. त्यांना प्रोत्साहन द्यायला काय हरकत आहे? आपला आणि त्यांचा दोघांचाही यात फायदा आहे. नाहीतर इथे आपण Branded म्हणून लोकल फुड टाळतोय आणि तिथे शेतकरी मरतायत. Branded कंपन्या मात्र बक्कळ पैसा कमावतायत. आपलं शरीर हे सभोवतालच्या वातावरणाशी जोडलेलं असतं, म्हणूनच दुसऱ्या अनोळखी वेगळ्या वातावरणात गेलो की आपल्याला सर्दी खोकला वगैरे होतं. Same Way Food च पण आहे. आपल्या जवळपास पिकणाऱ्या गोष्टीच आपण खायला हव्यात आणि पूर्वापार चालत आलेल्या परंपरा पाळायला हव्यात. उत्तर पूर्व भारतात मोहरीचे तेल खूप वापरल जातं, कारण तिथे त्याचे उत्पन्न जास्त आहे, आणि गरजही. पण तेच महाराष्ट्रात लागू होत नाही ना? राई का तेल म्हंटलं कीच आपली नाकं मुरडतात🥴. कारण ते महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीत मोडतच नाही, म्हणूनच आपल्या इथे विकतही नाही. तसा भारत कृषिप्रधान देश आहे. पण त्यातही महाराष्ट्र जास्त Versatile आहे. कारण आपल्याकडे दक्षिण भारत आणि उत्तर भारत या दोन्हींचा प्रभाव आहे, आणि हवामानही बहुदा. म्हणूनच आपल्याकडे चौरस आहार खाल्ला जातो. म्हणजे गहू, तांदूळ,/ पोळी आणि भात समप्रमाणात खाल्ला जातो. स्थानिक शेती आणि खाद्यसंस्कृती आपणच जपली पाहिजे. पुढच्या पिढीला Pass On करायला पाहिजे. Food Is Happiness... त्यामुळे खाण्यात तडजोड अजिबातच नाही. Local Grown आणि त्यापासून तयार होणारे वेगवेगळे पदार्थ आरोग्यासाठी सगळ्यात चांगले. Branded आणि Packet Food खाणं जितकं वाढेल तितकच वजन आणि पोटही वाढेल. ओघाने आजारही पाठीशी लागतील ते वेगळेच. हल्ली डायटिंगच प्रमाण किती वाढलय..Nutrition,Fats, Protein, Carbohydrates सगळ्यांचा विचार करून जेवण जेवल जात, पण तरीही आजार वाढतात. पॅकेट मधले Oats आणि कॉर्नफ्लेक्स खाऊन काय डायटिंग करतात देव जाणे😅 आपल्या पूर्वजांना नाही कधी असं मोजून-मापून खायची सवय. उलट पैजा लावून खायची लोक, कारण आजूबाजूला पिकणार, स्वतःच्या शेतात पिकवलेले अन्न खायची ती लोक.. काहीतरी पॅकेट फूड पेक्षा घरी बनवलेलं थालीपीठ😍 त्यावर मस्त लोण्याचा गोळा आहाहा बेस्ट😋 आधी पॅकेट फुड आणि नंतर आजारांवर पैसा खर्च करण्यापेक्षा, लोकल शेतकऱ्यांकडून फळ भाज्या घेऊन तो पैसा तिथे खर्च केला आणि आपल्या मुलांनाही हीच शिकवण दिली तर किती बरं होईल! आता Apple, थंड प्रदेशात खाणे चांगलं म्हणून ते काश्मीरमध्ये उगवतं.. डॉक्टरांच्या अभ्यासक्रमात Apple लिहिलंय म्हणून ते Apple खा अस सांगतात. पण फक्त Apple नाही, कोणतही सीजनल फ्रूट तुम्ही खाल्लं तर ते आरोग्यासाठी कधीही चांगलंच अगदी डायबेटीस असला तरीही... ऑलिव्ह हे काही भारतीय नाही, उगाच आपण ऑलिव्ह ऑइल च्या मागे लागतो आणि पैसे वाया घालवतो. त्यापेक्षा कोशिंबीर लोणचे चटणी असं सगळं खाल्लं, तर त्याचा जास्त फायदा होईल. आपल्या शेतकऱ्यांना आपण सपोर्ट करायला हवा. तरच काही तरी शक्य आहे हो. नुसता एवढच नाही, सोबत व्यायाम सुद्धा करा. आणि माझे आर्टिकल वाचा म्हणजे अशीच वेगवेगळी माहिती मिळत राहील.
Healthy Local Food खा! Healthy रहा! जगभ्रमंती साठी लवकरच भेटू!
©Chef Aniruddha Ranade
Food Stylist | Recipe Developer | Menu Engineering | Restaurant Consultant | Blogger
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा