Old utensils
Artisanal Virtual Kitchen
Hi, 🙋🏻♂️
I am back with new article... कसे आहात सगळे काही दिवसांपूर्वी Group वर post पाहिली होती पदार्थ कोणत्या भांड्यात जास्त रुचकर होईल त्यासाठी स्वयंपाकाची भांडी..... मग म्हंटलं याच विषयावर काहीतरी लिहावं.
अर्थात मला जितकी माहिती आहे माझ्या अनुभवावरून आणि थोड्या पुस्तकी ज्ञानातून तेवढे मी लिहिलंय Suggestions are always welcome आणि नेहमीप्रमाणे तुमच्या comments सुद्धा कळवा
चला आता main मुद्द्याकडे वळतो
या भांड्यात दडलंय काय? भाग- १
प्रत्येक भांड हे आपल्यासाठी स्पेशल असतं, पण ती भांडी तशा आकाराची किंवा विशिष्ट धातूची का बनलेली असतात? त्याचे फायदे काय? भांडी कशी वापरावी? त्यांची काळजी कशी घ्यायची? या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत...
आपण सगळेच सध्या वेगवान जीवन पद्धती जगत आहोत Fast Lifestyle ज्याला खरं म्हटलं तर काहीही अर्थ नाही आणि दुर्दैव म्हणजे आपल्याकडे दुसरा पर्यायही नाही. नॉनस्टिक पॅन, ऍल्युमिनियम, स्टेनलेस स्टील उष्णतेमुळे न फुटणाऱ्या काचेच्या आणि ओव्हन फ्रेंडली सिरामिक भांड्ंयामुळे स्वयंपाक करणे सोप झालय पण त्यामुळे आई आजी नी किंवा अगदी आताही कोणा जाणकारानी दिलेली तांब्या-पितळेची भांडी एकतर अडगळीत पडलीयेत नाहीतर एक Showpiece म्हणून आपल्या Living Room ची शोभा वाढवतात पण आपल्यातल्या फार कमी जणांना याची जाणीव असेल की ती काही फक्त स्वयंपाक करण्याची साधने नव्हती ती आपला इतिहास सांगायची. प्रत्येक भांड्याचे ठराविक वैशिष्ट्य होतं. पूर्वी बऱ्याचदा भांड्यांवर नाव गोंदवल जायचं; तारीख असायची जी भेट स्वरूपात कोणालातरी मिळायची. त्यावरून आपल्याला आपल्या कुटुंबियांची माहिती मिळायची भाषेची माहिती मिळायची. आता तसलं काहीही राहिलेलं नाही भांड आणलं की ते वापरलं खराब झालं की दिल फेकून, दुसर आणलं अशा Use and Throw त्या जमान्यात जगतोय आपण. मी सुद्धा त्याला अपवाद नाही, पण पूर्वी तसं होत नसे भांड्यांची खूप काळजी घेतली जायची. घरची श्रीमंती भांड्यांवरून ठरायची. एखाद्या भांड्याला कोचा वगैरे पडला तर ठोकून ते पुन्हा नीट केलं जायचं. अगदी ते जरी फुटलं तरी त्याला डाग लावून परत वापरलं जायचं. एक प्रकारची अटॅचमेंट असायची भांड्यांसोबत; कारण नुसतं अन्नातूनच नाही, तर त्या भांड्यांंमधून सुद्धा शरीराला पोषणतत्व मिळायची (Nutrition) आणि हे Scientifically Proven आहे आयुर्वेद शास्त्राने संपन्न असलेल्या आपल्या देशातल्या लोकांना आत्ता कुठे याची जाणीव व्हायला लागलीये वॉटर प्युरिफायर मध्ये Copper वगैरे बसवायला लागलेत, च्यवनप्राश मध्ये सोन चांदी घालायला लागलेत. पण आपल्या आजी आजोबा तांब्याचा वापर पाणी पिण्यासाठी किती आधीपासून करत होते त्याकडे कोणाचेही लक्ष गेलं नाही की आपण त्यासाठी कधी हट्ट केला नाही अथवा कारण जाणून घ्यायचा प्रयत्न ही केला नाही.
आता थोडं आयुर्वेद, पाकशास्त्र आणि भांडी या विषयी बोलूया. Food Science हा HOTEL MANAGEMENT चा विषय यातच Metal आणि त्यांचा Food वर होणारा परिणाम दिलेला आहे. म्हणजे मी काही आयुर्वेदाचा अभ्यासक वगैरे नाही पण आई आजी ने सांगितलेल्या गोष्टींवरुन तरी हेच वाटतं. Cooking साठी use होणारी भांडी कोणत्या metal ची आहेत यावर त्या पदार्थाची Quality आणि आपल्या Body वर होणारा परिणाम Depend असतो Food Science आणि Culinary arts चा Books नुसार सोन्याच्या भांड्यात ठेवलेले अन्न Completely hygienic, Full of Nutrition and It has all the good qualities of metals required for body. पण आपण काही एवढे श्रीमंत नाही टाटा अंबानी साठी हे ठीक आहे😁😂 हो पण बऱ्याच सणावाराला आपण चांदीची भांडी Use करतो. लोकं नुसता दिखावा म्हणून करतात पण त्यातही Qualities आहेत. चांदीच्या ताटातून जेवल्याने वात पित्त आणि कफ हे कंट्रोलमध्ये राहतं तसेच डोळे आणि Brain Power सुद्धा वाढते म्हणूनच Maybe लहान बाळांना बऱ्याच लोकांकडे चांदीचा चमचा वाटीने दूध पाजतात. तसंच तुपासाठी सुद्धा चांदीचे भांड बऱ्याच जणांकडे असत. पोलादी भांड्यात बनवलेल्या जेवणात सुद्धा वात पित्त कफ नाशक शक्ती असते तसेच त्याने तुमची बुद्धी वाढण्यास आणि Blood Purification होण्यास मदत होते पोलादाचे Usually तवे आणि खलबत्ते असायचे. हल्ली Cast Iron चा उपयोग बर्यापैकी करतात लोकं त्यामुळे शरीरात Iron जातच आणि तुमची हिमोग्लोबिनची पातळी पण वाढते.
पूर्वी स्वयंपाकात तांब्या-पितळेची भांडी वापरली जायची त्यांना काही कारणं होती तांब्याच्या भांड्यात शिजवलेला भात वात नष्ट करतो तसेच तुमची Memory सुद्धा Strong करतो म्हणून बिर्याणी वगैरे प्रकार तांब्याच्या भांड्यात बनवतात अहो हेच काय अगदी Italian Rissoto सुद्धा authentically copper Pan मध्ये बनवतात. तसंच पितळेच्या भांड्यात जेवण बनवल्याने किंवा पितळेच्या ताटात जेवण जेवल्याने अस्थमा सारखे विकार दूर होतात.
दगड, मातीलाही कमी समजू नका बरं! आपण अशी भांडी हल्ली फॅशन म्हणून वापरतो पण यातही बऱ्याच Nutritional Value आहेत ह्यात जेवण बनवल्याने Calcium, phosphorus, Iron, Magnesium, Sulfur एवढं सगळं आपल्या शरीरात जातं आणि ह्या सगळ्याच भांड्यांनी आपली Digestive System मजबूत होते आपण आजकाल जी भांडी वापरतो त्यातून आपल्याला काहीही पोषण तत्व मिळत नाहीत ITS THERE JUST TO MAKE OUR LIFE EASYAND NOT HEALTHY
SO I TAKE THIS OPPORTUNITY AND PLATFORM TO SUGGEST MYSELF AND TO YOU ALL शक्य असेल तेव्हा तरी जुनी भांडी वापरा हेल्दी खा आणि हेल्दी राहा.
*पाणी पिण्यासाठी तांब्याचे भांडे वापरा.
*रोज वापरायचं तूप ठेवण्यासाठी चांदीचे भांड वापरा. *पोळी बनवायला लोखंडी तवा वापरा.
*कोणत्याही पदार्थाला फोडणी देण्यासाठी लोखंडी भांड वापरा.
इतकं जरी आपण केलं तरी आपल्याला भरपूर पोषण मिळेल.. काय मग मिळाली का छान माहिती नक्की सांगा मी वाट बघतोय!!!
तुमचा शेफ मित्र😁
©Aniruddha Ranade
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा