Organic Food ऑरगॅनिक फूड

 Hello नमस्कार😀

आज आपण थोड्या वेगळ्या विषयावर बोलू पुन्हा एकदा मी Lockdown वर घसरतोय... आता मला वाटतं History च्या पुस्तकात नवीन Concept Add करावी लागणार Before लॉकडाऊन आणि After लॉकडाऊन आजचा विषय आहे "ऑरगॅनिक फूड"... पण त्याआधी मला दुसऱ्याच एका विषयावर बोलायचंय... तोही खूप महत्त्वाचा विषय आहे 


"लहान मुलं आणि आहारात झालेला बदल" आणि नकळत लागलेल्या वाईट सवयी... आता सगळ्याजणी म्हणतील त्यावर काय लेख लिहायचा.. आम्ही तर सगळं व्यवस्थित देतो मुलांना... मला अगदीच मान्य आहे की कोणतीही आई आपल्या मुलांना चांगलंच खाऊ घालेल, पण मी एक Generalised आर्टिकल लिहितो तुम्ही मुलांना चांगलं खाऊ घालता.. पण पौष्टिक खाऊ घालता का?? टीव्हीवर काही चांगल्या ऍडव्हर्टाईस सुद्धा असतात त्यातल्याच एका Advertise मध्ये दाखवलेलं एक बाबा आपल्या बेबीला काहीतरी हेल्दी चमच्याने भरवत असतो.. पण घास भरवताना तो आधी पिझ्झा चा पीस त्याच्यासमोर नेत असतो आणि त्याऐवजी त्याला दुसरच काहीतरी भरवत असतो... हे कितपत योग्य आहे.. अजिबातच नाही.. हो ना?? लॉकडाऊन दरम्यान सगळेच घरी होते आणि एन्जॉय सुद्धा करत होते... बाहेरचं खाणं बंद होतं त्यामुळे सगळं जंकफूड घरीच बनत होतं... घरचं जेवण कितीही चांगलं असलं तरी जंक फूड बाहेरचं काय किंवा घरचं काय त्याचा, होतो तोच परिणाम होणार... मी तर म्हणतो घरी खायचं म्हटलं की जरा जास्तच खाल्लं जातं... म्हणजे विकत घेऊन एक वडापाव खाल्ला तर घरी आपण तीन-चार तरी आरामात खातोच खातो... घरचं Advantage म्हणाल तर पदार्थ बनवण्याची प्रोसेस सगळी आपण करतो... त्यामुळे इन्ग्रेडियंट सगळे आपल्या माहितीचे असतात.. अहो पण त्याचा शरीरावर होणारा परिणाम सेमच नाही का??? हे कदाचित लक्षात येत नसेल... लॉकडाऊन मधले आपले प्रयोग मुलांच्याही वाट्याला आले आणि त्याची त्यांना सवयही लागली... हा आर्टिकल लिहायच्या आधी मी बर्‍याच मुलांच्या आईंशी बोललो मी जे observe केलं ते फार चांगलं नाहीये... मी, माझी ताई जी डॉक्टर आहे आणि एक आई सुद्धा श्वेता केळकर तिच्याशी सुद्धा बोललो... जेवण खाऊ घालण्यासाठी मुलांच्या खूप मागे मागे फिरावं लागतं, त्यांच्यासमोर स्क्रीन लागतो म्हणजेच मोबाईल तो असल्याशिवाय खातच नाहीत बरीच मुलं.. हे खूपच चुकीचं आहे.. मुलांचं Behaviour Change झालयं, चिडचिड करतात... आता काही पूर्वीसारखं रोज स्पेशल बनत नाही त्यामुळे रोजचं जेवण त्यांना नकोसं वाटायला लागलंय... थोडक्यात आपणच मुलांना जंक फुड घरी खायची सवय लावली आणि आता आपणच पस्तावतोय... म्हणून Balanced Diet हा हवाच... त्यासाठी पालकांना थोडं स्ट्रिक्ट व्हायला हवं... हे टीव्हीवर बरेच दुपारचे शोज असतात "बच्चो के लिए ये, बच्चो के लिए वो" पण कशाला हवेत नसते लाड... आपण सगळ्यांसाठीच बनवलेलं असतं तेच त्यांनासुद्धा कंपल्सरी खायला लावायला हवं... माझी आई तर अजून ओरडते मला टोमॅटो नाही आवडत तर ती मुद्दाम आमटीत टोमॅटो चिरून घालते😤😭 आणि जबरदस्ती खायला लावते म्हणजे रोज नाही कधीकधी😁😁 

आत्ता आपण लाड पुरवू , पण मोठं झाल्यावर सगळं किती बदललेलं असेल.. कधी कोणावर काय खायची वेळ येईल काय सांगावं... मुलं घरी थोडीच राहणारे नोकरी कामानिमित्त, शिक्षणानिमित्त बाहेर जावं लागेल त्यामुळे सगळं खायच्या सवयी आत्ताच लागलेल्या चांगल्या आणि लॉकडाऊन तर संपलं म्हणून जंकफूड सुद्धा बंद करायला हवं.. कारण सध्या शाळा बंद आहेत, बाहेर खेळणं बंद आहे त्यामुळे मुलांची वजनं वाढतयत... So, शक्यतो जंक फूड टाळा... आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया मोठ्या माणसांच्या😅😁 

"ऑरगॅनिक फूड" मागच्या काही वर्षांपासून ऑरगॅनिक फूडकडे बरीच लोकं वळलीयेत पण पुन्हा हे नवं फॅड भारताबाहेरून आलेलं मुळात भारतीयच आहे... 


आपल्याला कधी कधी आपल्यातलेच गुण नक्की कळत नाहीत माझं बघा ना इतकी वर्ष किचनमधून कधी उसंतच मिळाली नाही त्यामुळे आपल्याला लिहिताही येतं हे माहितीच नव्हतं... फेसबुक किंवा बाकी सोशल मीडियाचा वापर फक्त मैत्री पुरताच मर्यादित नसून व्यवसायासाठी एक माध्यम किंवा बऱ्याच लोकांपर्यंत आपले विचार पोहोचवू शकणारा एक प्लॅटफॉर्म म्हणून कधीच पाहिलं नाही... फेसबुक तर मी 2008 मध्ये जॉईन केलं पण खऱ्या अर्थाने वापर मात्र गेल्या वर्षातच करायला शिकलो... तसेच भारताला शेती किंवा शेती व्यवसाय हा काही नवीन नाही अगदी पिढ्यान् पिढ्या हा व्यवसाय लोक करतात.. मग या ऑरगॅनिक फुडचं महत्त्व आपल्याला बाहेरून का कळावं... अहो, पण आपण हजारो वर्ष ऑरगॅनिक फूड खात होतो.. मग आता अचानक हे कुठून पुढे आलं??? अगदी सोप्प आहे एखादी गोष्ट आपल्या हातात असली की त्याचं महत्त्व आपल्याला कळत नाही.. ती हातातून निसटून गेली कि तीचे फायदे जाणवायला लागतात... शेतीचही तसच आहे ऑरगॅनिक शेती म्हणजे काय तर निसर्गाने आपल्याला जे दिलंय त्यातच शेतीचं उत्पन्न घेण... थोडक्यात नॅचरली जे अवेलेबल आहे त्या गोष्टी वापरून औषधं, खतं तयार करणं आणि पारंपारिक बियाणांचा वापर करून रसायने न वापरता शेती करणं जी आपण पूर्वापार करत होतो.... पण "पिकतं तिथे विकत नाही" अशी, शेती बंद होण्याला जबाबदार पण आपणच आहोत... 

लोकसंख्या भारतातला सगळ्यात मोठा प्रश्न "मेरे सव्वासो करोड देशवासीयो" हे ऐकायला फनी वाटत असलं तरी, इतक्या सगळ्या तोंडांना ऑरगॅनिक शेती करून अन्न पुरवणं इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल.. म्हणूनच आपल्याकडे ग्रीन रेवोल्युशन झालं... (हरितक्रांती) तेव्हा इतिहास काही कळला नाही आणि आता कळून काही उपयोग नाही..😅 हाहाहा!!! त्यानंतर आपण रसायन आणि जैविक खत वगैरे वापरायला लागलो परिणामी पिक तर चांगलं आलं पण.. औषध म्हंणलं की साईड-इफेक्ट आलेच नाही का, पण आयुर्वेद म्हंणलं की नो साइड इफेक्ट... अगदी सेम आहे शेतीच सुद्धा, 

पुन्हा आपण करंट सिच्युएशनमध्ये येऊ ऑरगॅनिक किंवा सेंद्रिय लेबल लावण्यासाठी ते पीक कोणत्याही कृत्रिम प्रक्रिया किंवा खाद्यपदार्थांना पासून मुक्त असणं आवश्यक आहे... मगाशी सांगितलं तसं नैसर्गिकरीत्या जे Available आहे त्यातूनच शेत जमीन कसायला हवी... बरं यात फक्त शेतजमीन नाही तर पशुपालन व्यवसाय सुद्धा येतो... ऑरगॅनिक फूड हे अन् नॅचरली पिकवलेल्या पदार्थांपेक्षा जास्त पौष्टिक असू शकतं... ऑरगॅनिक फूडमध्ये भरपूर न्यूट्रिशन तर असतातच त्याच सोबत विटामिन C, झिंक, लोह, यासारखे अँटिऑक्सिडंट जरा जास्त प्रमाणातच असतात त्यामुळे रेग्युलर फळं, भाज्या, आपण खातो त्या जर आपण ऑरगॅनिक खाल्ल्या तर त्याचं प्रमाण आपण अर्ध करू शकतो... म्हणजे नॉर्मल दोन टोमॅटो मधून जे पोषण मिळतं ते आपल्याला एका ऑरगॅनिक टोमॅटो मधून मिळू शकेल... ऑरगॅनिक फूडमध्ये नाइट्रेट ची पातळी कमी असते त्यामुळे नायट्रेटचे प्रमाण वाढून होणाऱ्या कॅन्सरचा धोका थोडा कमी होतो... ऑरगॅनिक दूध आणि मिल्क प्रॉडक्ट मध्ये omega-3 फॅट ऍसिड, लोह आणि विटामिन E जास्त असतं.... ओमेगा-3 मुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो... ऑरगॅनिक फूड नेचरशी कनेक्टेड आहे.. हवा, जमीन म्हणजे माती, ऋतुचक्र, सगळ्यांचा संबंध ऑरगॅनिक फूडशी आहे... काही लोक मुळातच स्ट्रॉंग असतात त्यामुळे त्यांच्यावर ऑरगॅनिक पुढचा सेम परिणाम होतो जो रेग्युलर फूड खाऊन होतो... म्हणून नुसतं ऑरगॅनिक फूड खाऊन चालत नाही ते मॉनिटर सुद्धा करायला हवं... कोणत्याही पॅकेट फुडच्या मागे लिहिलेलं डिस्क्रिप्शन वाचायला हवं... कधीकधी ऑरगॅनिक फूड वर सुद्धा प्रक्रिया केलेली असू शकते ते पॅकेटवर मेंशन केलेलं असतं ते वाचायला हवं... आणि ऑरगॅनिक फूड हेल्दी नक्कीच आहे, पण डोळे झाकून विश्वास ठेवण्या एवढं नाही म्हणून "ऑरगॅनिक" या शब्दावर विश्वास ठेवू नका काय हेल्दी आहे आणि आपल्या शरीराला काय सूट होतं तेच खा... 


लेख आवडला तर नक्की शेअर करा...


Healthy खा आणि Healthy रहा...

©Chef Aniruddha Ranade 

Food Stylist | Recipe Developer | Menu Engineering | Restaurant Consultant | Food Blogger

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट