Picture abhi baki hai mere dost


*Picture Abhi Baki Hai Mere Dost*

Hello, आज शुक्रवार आणि मी तुमचा शेफ मित्र घेऊन आलोय Brand New Story. आधीची स्टोरी आवडली ना? तुमच्या आयुष्यात झालंय का असं कधी? कोणी सेलिब्रिटी अचानक तुमच्या समोर आला आणि तुम्ही अगदी स्टॅच्यू झालात?😲 नक्की कळवा.. 

काय गंमत असते पाहा एक तो दिवस होता ज्या दिवशी Banquet Manager ने मला पुढे Serve करायला सांगितलं, थोडक्यात हकलंल. आणि एक आजचा दिवस स्वतः सेलिब्रिटी येऊन भेटून सांगतात, 'The Food Was Amazing', किंवा कधी मला जावं लागतं खास Dish घेऊन त्यांच्यासाठी. अर्थात ही गोष्ट मिळवायला दहा वर्षे लागली. अहो म्हणजे Cook चा Chef व्हायला. म्हणूनच म्हणतो To be a Chef is not so Easy.... 

मला माहिती आहे तुम्हाला नव्या स्टोरीची उत्सुकता लागून राहिली असणारे.. चला मग माझ्या दुनियेत..

1st year मध्ये साधारण Idea यायला लागली होती की आपल्याला नेमकं काय करायचंय. आमचे Main 4 Department असतात. Food Production (kitchen and bakery confectionery), Food and Beverage Service (restaurant and bar), housekeeping and front office. पहिल्या वर्षात सगळ्याच बेसिक नॉलेज दिल जातं. त्यामुळे साधारण आपल्या Interest कशात आहे हे कळायला लागतं. तसा माझा Interest Bakery and Confectionery कडे वळला. माझं स्पष्ट मत आहे, हॉटेल मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला परंपरागत चालत आलेल्या गोष्टींच नॉलेज दिलं जातं. त्यामुळे दुसऱ्या वर्षात जाईपर्यंत सगळं सोप्पं वाटत असतं आणि मेन मुद्दा माझा बाबतीत हा होता की bakery confectionery मध्ये directly जाता यायचं नाही. कारण तो एक Skilled Job आहे. 



किचनच्या मनाने बेकरीमध्ये खूपच जास्त Perfection लागतं. कारण तिकडे सगळे मोजून मापूनच करावं लागतं. जरा जरी इकडचं तिकडे झालं, तरी तुमचं End Product फसतं. Kitchen मध्ये थोडफार उपर नीचे चलता है. म्हणजे असं नाहीये की वाईट जेवण😅हाहाहा!!!

पण किचनची रेसिपी मध्ये You can easily rectify things. म्हणजे जर एखादी अख्खी डिश जरी खराब झाली तरी हॉटेल रेस्टॉरंट मध्ये base recipe, preparations, म्हणजे भाज्या वगैरे कापून ठेवलेल्या असतात, ग्रेव्हीचा बेस रेडी असतो. So you can make new dish within minutes. पण Bakeryचं तसं नाही. एखादा केक किंवा ब्रेड चुकला की नवीन बनवायला कैक तास लागतात, जे Impossible आहे. So अशा difficult असणाऱ्या विषयातच माझ्या इंटरेस्ट वाढत होता. अर्थात त्याला कारणही तसंच होतं माझे बेकरी प्रॉडक्ट खूप छान बनायचे असं आमच्या प्रोफेसरचं म्हणणं होतंच, पण घरीही सगळ्यांना आवडायचं. एव्हाना घरात oven ही आला होता. त्यामुळे cake, cookies, breads, असे college मध्ये शिकलेले सगळे पदार्थ घरी करून झालेले. आता मी atleast माझ्या फॅमिली साठी तरी शेफ झालो होतो. पण आयुष्य इतक सरळ असतं तर काय! 🤐अचानक बाबांची बदलीची ऑर्डर आली. याआधी त्यांनी एकदा मुलं लहान असल्याचं कारण देऊन बदली टाळली होती. पण आता तसं काही कारणही नव्हतं. ह्या वेळेस त्यांना जावंच लागणार होतं. बरं बदली सुद्धा जवळ झाली नव्हती.आसामला झाली होती, naxalite area मध्ये. त्यामुळे अजून चिंता होती. त्यांना कमीत कमी दोन वर्षांसाठी तरी जावच लागणार होतं. आम्ही त्या वेळेस government quarters मध्ये राहत होतो. सुदैवाने गव्हर्मेंट rules अनुसार बाबा तिथे गेले तरी आम्हाला क्वार्टर्समध्ये राहता येणार होतं. त्यामुळे भावाची शाळा बदलण्याचा किंवा घर बदलण्याचा परीक्षेतून आम्ही वाचलो होतो. मी पहिल्या वर्षात असतानाच बाबांची बदली झाली. आता बाबांची तारेवरची कसरत होती. एकाच वेळेस दोन घर सांभाळायची होती. सुदैवाने माझे पहिलं वर्ष नीट पार पडलं. सगळं चांगलं होतं, फक्त ते Hotel accountancy सोडून. Huh😏गणित आणि 

माझे शेवटपर्यंत कधी पटलंच नाही. तरीही माझे केक आणि ब्रेड्स परफेक्ट होतात बरं का... हाहाहा!

©Aniruddha Ranade

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट