जगभ्रमंती विनातिकीट प्रवास- SFO
#KKVinaTicketPravas
Hello...
Bags Pack झाल्या का?? फोन चार्ज केलायत ना?? अहो का काय... जगभ्रमंती ला जायचय ना😊😊 2013 साली The Obaroi, Nariman Point मधला जॉब टांगणीला लावून मी डिसेंबर महिन्यात शिप वर जायला रेझ्युमे ड्रॉप केलं.. त्यावेळी काही वेकेन्सी वगैरे नव्हती, मी आपलं सहज म्हणून ट्राय करावं अशा विचारात गेलो होतो... आठ-दहा दिवस मी वाट बघितली नंतर नाद सोडून दिला.. म्हणलं आपल्या काही नशिबात नाही.. एक महिना लोटला आणि अचानक रेझ्युमे शॉर्टलिस्ट झाल्याचा कॉल आला.. मी तर एकदम हवेत तरंगायला लागलो... सगळ्यात पहिला दिसत होता तो पगार जवळपास चौपट वाढणारा...
आता इंटरव्यू प्रोसेसचा फार खोलात शिरत नाही पण व्यवस्थित झाला... जॉब मिळाला... पुढची पायरी अमेरिकन विसा.. कारण आमची कंपनी अमेरिकन, नुसतं जॉब मिळून चालत नव्हतं विसा मिळाला तर खरं... यावेळी नशीब खरच एकदम जोरदार होतं.. चांगला पाच वर्षाचा अमेरिकन विसा मिळाला... ही सगळी प्रोसेस व्हायला सहा महिने लागले आणि फायनली जायचा दिवस आला.. 12 जून 2013, आता थोडं टेन्शन आलेलं... पोटात गोळा यायला लागला कारण पुढे काय होणारे याची जराही आयडीया नव्हती.. त्यात एकटं फॅमिली पासून लांब, थोडे नाही चांगले नऊ महिने म्हणजे परीक्षाच होती.. विमानात मी त्याआधी सुद्धा बसलेलो त्यामुळे त्याची एक भीती नव्हती, बट इंटरनॅशनल ट्रॅव्हल मी फर्स्ट टाइम करणार होतो त्यात एकट्याने हे महत्त्वाचं.. सगळेच थोडे Sad होते पण एक Proud फील सुद्धा होता एअरपोर्टवर सी ऑफ करताना बाबांना मिठी मारायची माझी पहिलीच वेळ याआधी असं कधी केल्याचं माझ्या तरी आठवणीत नव्हतं...😅 मी बोर्डिंग पास घेईपर्यंत सगळे बाहेर थांबले कारण नंतर नऊ महिन्यांसाठी दृष्टीआड होणार होते सगळे...
माझ्या पोटातला गोळा शीपवर जाईपर्यंत तसाच होता... काय मी माझी घाबरगुंडी सांगतोय तुम्हाला😅 तर माझी फ्लाईट फायनली Land झाली आणि मी अमेरिकेला पोहोचलो..
"San Francisco" आता हे मला नंतर कळलं की शिप च्या राउंड ट्रिप असतात त्यामुळे आम्ही सान फ्रान्सिस्को ला वरचेवर येणार होतो... मी तर पहिल्याच नजरेत या शहराच्या प्रेमात पडलो... जून महिन्यात बर्यापैकी ऊन होतं पण थंडी सुद्धा वाजत होती काही तरी विचित्रच होतं.. मी साधारण दुपारी दोनच्या सुमारास पोचलो होतो.. तसं सगळं मुंबई सारखच होतं, पण रस्ते हे भलेमोठे आणि स्वच्छ... सगळ्यात आधी भीती वाटली ती पोलिसांना बघून हे उंच धिप्पाड आणि बॅटमॅन च्या कमरेला असतो तसा बेल्ट आणि त्यावर ढीगभर आयुध.. बहुदा पोलिसांना बघून घाबरण्याची माझी पहिलीच वेळ..😜 इथून मी हॉटेलवर जाणार होतो आणि नेक्स्ट डे मॉर्निंग, शिप वर जॉईन होणार होतो.. So एक रात्र फिरायला होती.. मी नवीन त्यामुळे बाहेर तर पडलो पण फार लांब काही गेलो नाही... नंतर नऊ महिन्यात मात्र भरपूर फिरलो...
आधी थोडं सिटी बद्दल सांगतो इंडियन लोकांनी खचाखच भरलय सान फ्रान्सिस्को... प्रत्येक दुसरा माणूस तरी इंडियन वंशाचा दिसतोच, त्यामुळे बाहेर वावरताना परकेपणा कधी जाणवलाच नाही... कॅलिफोर्नियातील चौथं मोठं शहर त्यात समुद्रकिनारा लाभलेलं Superb Artisan City... खाद्यपदार्थ, प्येय आणि आयकॉनिक गोल्डन गेट ब्रिज अशा सगळ्यासाठी सान फ्रान्सिस्को फेमस आहे... भारतात आपल्याला सगळं बाहेरच्या देशातलं खायचं असतं पण बाहेर गेल्यावर घरचं जेवण आठवायला लागतं... Land वर राहणाऱ्यांचे ठीक आहे हो.. पण शिप वर जवळपास 50 55 नॅशनॅलिटीचे लोकं काम करतात.. सगळ्यांनाच घरचं जेवण प्रिय पण ते बनवणं मात्र शक्य नाही, त्यामुळे जे असेल ते खावं लागतं... अगदीच काही नसेल तर आहेच आपला चहा पाव हाहाहा!! त्यामुळे Ship थांबली की आधी इंडियन रेस्टोरंट शोधून काढायचं आणि ताव मारायचा... फक्त बिल किती झालं ते पाहायचं नाही आणि घरी तर अजिबात सांगायचं नाही कारण कन्व्हर्ट करण्याची टेंडन्सी 20$ बिल झालं तरी, बापरे चौदाशे रुपयांच जेवलास एकटा😓😓 इकडे आपण सगळे जेवलो असतो तेवढ्यात.. असं काहीसं ऐकायला लागू शकतं..San Francisco मधल्या स्ट्रीट फुडची एक मजा सांगतो अगदी आपल्या इथे असते तशी कार्ट आणि चक्क पंजाबी माणुस डोसा बनवत होता... पाहून नवलच वाटलं.. लोकंही अगदी कुठेही बसून किंवा चालत चालत सुद्धा खात होती..
No formalities, No etiquette at all मजा आली पाहून..
San Francisco मध्ये स्ट्रीट फूड पासून अगदी मिशेलिन स्टार रेस्टॉरंट पर्यंत सगळं अव्हेलेबल आहे.. तुम्हाला इथे DimSum पण मिळेल आणि Burritos सुद्धा, Chocolates सुद्धा मिळतील आणि Neapolitan style pizza सुद्धा.. आपलं म्हणाल तर दम बिर्याणी पासून वडापाव पर्यंत सगळं मिळतं... कोस्टल एरिया जवळ असल्याने इथे सी फूड सगळ्यात भारी मिळतं.. इकडे चायनाटाउन पण आहे आणि लिटल इटली सुद्धा... अशा Versatile Cuisine and Culture असणाऱ्या City मध्ये आपण असलो की एक Comfort Zone आपोआपच Create होतो... Shopping म्हणाल तर Apple iPhone पासून कपड्यांपर्यंत सगळं काही अगदी reasonable rate मध्ये इथे available आहे... Golden Gate पासून अगदी whale watching at Pier39 पर्यंत सगळं तुम्ही इथे पाहू शकता... अशी आहे ही
San Francisco एक जिंदादिल सिटी...
कशी वाटली नक्की सांगा आणि थंडीचे कपडे भरायला घ्या...
Next Stop Alaska....
©Chef Aniruddha Ranade
Food Stylist | Recipe Developer | Menu Engineering | Restaurant Consultant | Food Blogger
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा