Welcome to the Industry


Hi🙋🏻‍♂️

नमस्कार Welcome back काय शिजतय आज कोणा कोणाकडे? Anything Interesting? सगळ्यांची लाइफ येतेय ना Back to Normal. तुम्हाला नेहमीप्रमाणेच पुढची स्टोरी वाचायची असणारे. कधी कधी मला लिहिताना Start करतेवेळी कानात कुजबुज ऐकू येते, "सुरुवातीला जास्त पकवू नकोस, लवकर Story सुरू कर." हा हा हा!

तर मी आई-बाबांना सांगितलं Interview बाबत. आईला फारसं पटलं नाही. पण बाबा म्हणाले घरीच आहेस तर Interview द्यायला काय हरकत आहे. मलाही पटलं, मीसुद्धा Interview द्यायला गेलो. आणि आश्चर्य म्हणजे Select ही झालो. एक Week नंतर Joining, 6000/महिना पगार. मला जॉब मिळाल्याचा आनंद झाला होता, पण मनाला पटत नव्हतं.Bsc.HM. करून CCD?!! नाही, यासाठी मन तयार होत नव्हतं. बाबांच्या बहुदा लक्षात आलं असावं. त्यांनी त्यांचे काही कॉन्टॅक्टस वापरून मला एका ठिकाणी इंटरव्यू ला जायला सांगितलं.

 'THE AMBASSADOR SKYCHEF'. ते एक Flight Kitchen होतं. मी गेलो तिथे Proper Interview झाला. नंतर TRADE TEST (पदार्थ बनवून दाखवणे) झाली, ती सुद्धा Bakery ची! मी खूपच खुश होतो. मला जे काही येत होतं सगळं मनापासून बनवलं. तिथल्या शेफला सुद्धा आवडलं आणि माझं Selection झालं. मी जाम खुश. As a मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून माझं selection झालं. 6500/महिना, पगार कमी होता पण, Bakery मध्ये जॉब मिळालेला! I was happy!!! रिझल्ट लागण्याआधी जॉब हातात होता, तोही मनासारखा! ती मला मिळालेली शेवटची सुट्टी. जॉब सुरू झाला. पहिला दिवस Bakery Chef ला भेटलो, पहिलं वाक्य "बेटा, तुम्हारे आने का टाइम फिक्स है, घर जाने का नही, First 15 days No off." Huh...

माझं Shift timing 10 AM to 11PM... वडाळ्याहून International Airport ला जायला सकाळी 8.30 ची Train पकडायला लागायची. ना धड सकाळी वेळ मिळायचा, ना रात्री! जवळपास 3 महिने मी हीच शिफ्ट करत होतो.Off च्यादिवशी काही करावं असं वाटायचं नाही. नुसतं झोपायचो मी. आणि कामाचं तर विचारूच नका, रोज सकाळी गेलो की जवळपास 170 Baking  trays clean करायचे, scrapper ने घासून, तोपर्यंत दुसरे प्रोडक्शन तयार असायचं, ते परत बॉक्समध्ये arrange करून त्याला प्लास्टिक‌ cover करायचं, lable(datetag) लावायचा. परत tray clean करून पुढच्या प्रोडक्शन ला द्यायचं. मग store pickup करायचं.आणि परत तेच काम रिपीट...असंच तीन महिने चालू होतं. तर असा मिळाला मला माझा आवडता first job.🤐😣 सुरुवातीला खूप Tough वाटलं पण नंतर फार गमतीजमती झाल्या. या सगळ्या धकाधकीत एकच गोष्ट सुखद होती, ती म्हणजे मला मिळालेली माझी पहिली स्वकष्टाने कमावलेली सॅलरी😇

पहिला जॉब मिळाला खरा, पण पहिले तीन महिने खूपच वाईट होते. पण आज लक्षात येतय की तेच तीन महिने खूप काही शिकवून गेले. 'Management trainee program' हा आमच्या industry मधला अजून एक महत्त्वाचा भाग, ज्यात दोन वर्षाचा training period असतो. आणि मग डायरेक्ट management level ची post मिळते. Taj, Oberoi, ITC यासारख्या मोठ्या hotels मध्ये हे programs असतात. 'AMBASSADOR SKYCHEF' हे फार जुनं, मुंबईतलं पहिलं flight kitchen, त्यामुळे इथेही हा प्रोग्राम होता. त्यामुळे दीड वर्षातच मी माझ्या शेफच्या खालच्या पोस्टवर येणार होतो. जिथे promotion मिळवत पोहोचायला किमान 6 वर्ष तरी लागतात. त्यामुळे दीड वर्षांनी मी सगळ्यांपेक्षा अचानक, senior होणार होतो पण सध्याच्या परिस्थितीत मला कॉलेजने दिलेल्या शिक्षणाशिवाय काहीही येत नव्हतं. आणि इकडे employees च मत होतं, ह्याला काहीही येत नसताना दीड वर्षांनी हा आपल्यावर अधिकार गाजवणार! म्हणून तीन महिन्यात मला साधं प्रोडक्शन टेबल जवळ फिरकूही दिलं नव्हतं. मी रोज सकाळी 10 ते रात्री 11 ठरलेलं तेच काम करत होतो. शेवटी माझा स्वभावच कामी आला. मनाने सगळे जण चांगले होते, पण ह्या mentality मुळे ते असं वागत होते. त्यामुळे मी सगळ्यांशी गोड बोलायचं आणि कोणत्याही कामाला नाही म्हणायचं नाही, हे धोरण ठेवलं and it worked really well! 3 महिन्यांनी दोन नवीन management trainee आले. आता मी त्यांचा senior होतो. आता माझं काम त्यांना करायचं होतं. मी आता प्रोडक्शन टेबलवर हळूहळू जायला लागलो. आधी सगळे थोडे नाराजच होते, पण माझ्या गोड बोलण्याच्या स्वभावामुळे मी सगळ्यांचा लाडका झालो.

To be Continued....😁😁😬

©Aniruddha Ranade

Food Stylist | Recipe Developer | Menu Engineering | Restaurant Consultant

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट