A Dream

 Hi नमस्कार, 

फास्टफूड बद्दलची माझी मतं सगळ्यांना पटली, आवडली आणि त्यावर तुम्ही सगळ्यांनी सारासार विचारही केलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार... मी आर्टिकल पोस्ट केला की बरीच लोकं माझ्याशी संवाद साधतात... मला आपणहून मेसेज करतात, काहीजण अभिनंदन करतात, काहीना आणखी प्रश्न असतात, काहींना मदत हवी असते, तर काही चक्क मला मित्र म्हणूनच स्वीकारतात... आर्टिकल लिहिण्याचा सगळ्यात मोठा फायदा झालाय मला... वेगवेगळ्या क्षेत्रातले पण तरीही जेवणाबद्दल किंवा खाण्याबद्दल मग ते बनवणारे असूदेत किंवा नुसतेच Foodie असूदेत.. त्याबद्दल प्रेम असलेले आणि अर्थात माझे आर्टिकल आवडीने वाचणारे खूप नवीन मित्र मैत्रिणी मला मिळाले... Culinary World मधला एक वेगळाच अनुभव मला इथे अनुभवायला मिळाला... म्हणजे Chef हे Profession सुद्धा मैत्री करण्यालायक आहे हे मला तुम्हा सगळ्यांमुळे कळलं... तसं हॉटेल, रेस्टॉरंट मध्ये विचारपूस होते आमची पण ती तेवढ्या पुरतीच असते... गेस्ट एकदा रेस्टॉरंटच्या बाहेर गेला की आमची ड्युटी संपली... हो आम्हाला अस जास्त क्लोज रिलेशन ठेवायला अलाऊड नाहीये.... अहो नाही तर सगळ्यांनाच आपला मित्र म्हणून डिस्काउंट देत बसावं लागेल...😜😜😂 हाहाहा Jokes apart पण तसा अलिखित नियमच आहे...  हॉटेलमध्ये म्हणजे जिथे राहण्याची व्यवस्था असते तिथे हा नियम लिखित स्वरूपातही आहे.... असो आपण आजच्या विषयाकडे वळू नाही का... 


आजचा माझा विषय अगदी सगळ्या कुकिंग येत असणाऱ्या मित्र-मैत्रिणींसाठी आहे "स्वप्न" Dream तुम्ही म्हणाल स्वप्न ही काय आर्टिकल लिहिण्याची गोष्ट नाहीये आणि तोही फूड रिलेटेड.... Dream ते तर प्रत्येकाचं वेगळ असत... तुम्हाला काय माहीत आम्हाला काय स्वप्न पडतात... 


पण हे जागेपणीच स्वप्न आहे.. ज्यांना ज्यांना फूड बद्दल आपुलकी वाटते त्यांनी हे स्वप्न नक्की पाहिल असणारे... चला तर मग बघूया या स्वप्नाची वाटचाल आणि झालेली स्वप्नपूर्ती.. 


हल्ली कुकिंग ही एक कला नसून काळाची गरज झालेली आहे; भारतात!! कारण फक्त आपल्याच देशात मुलांना इतक्या लाडाकोडात वाढवल जातं... आपण भारताची एकच प्रगत बाजू नेहमी बघतो पण अशी कितीतरी गावं, प्रदेश आहेत जिथे जुने विचारच पाळले जातात... घरात बायका -मुली असताना पुरुषांनी, मुलांनी स्वयंपाक घरात पाऊल सुद्धा टाकायचं नाही..  जेवण बनवणं तर लांबची गोष्ट झाली... आपल्या शहरी भागात ते एक बरं आहे असली काही भानगड नाही... तरीही एका Certain Age पर्यंत सुरीने कापाकापी किंवा गॅस जवळ काम करायला देत नाहीत... काळजी, दुसरं काय... 


पण काहीजण आपल्या मुलांना सर्वतोपरी सपोर्ट करतात आधीच सांगतो ही गोष्ट माझी नाही.... ही गोष्ट त्या सगळ्यांची आहे ज्यांना आपलं कुकिंग स्किल पाहून एकदा तरी वाटतं की आपणही शेफ असायला हवं होतं... आजकाल लोकांना असं वाटणं हिच मुळात मोठी गोष्ट आहे... बरं यात मार्क कुठे आड येत नाहीत... अगदी 90 टक्के वाल्या मुलाला, मुलीला सुद्धा CHEF व्हावसं वाटतं... नाही तर आधी 90% चा स्कोर झाला की डॉक्टर, इंजिनियर फिक्स... एका Successful Chef च्या मागे त्याची अख्खी फॅमिली असते आणि प्रामुख्याने आई.... यातही आई गृहिणी असणं खूप गरजेच आहे तुम्ही हे नक्कीच मान्य कराल की जेवढ लक्ष किंवा वेळ गृहिणी आपल्या मुलांना देते, तेवढा एखादी वर्किंग वुमन नाही देऊ शकत... बाबा मात्र तटस्थ असतात त्यांचा कलेला विरोध नसतो पण प्रोग्रेस कार्ड वरचे मार्क कमी झाले की मग काही खैर नसते...😁😁 आपल्या आजचा महाशयांच पण काही असंच आहे लहानपणापासूनच त्याला स्वयंपाक घरात लुडबुडायची सवय... सारखं आई काय करतीये इथेच त्याचं लक्ष... आई सुद्धा उत्साही त्यामुळे प्रश्न नव्हता, हा सुद्धा एक मोठा मुद्दा आहे... स्वयंपाक एक साधना वगैरे पुढच्या गोष्टी मुळात स्वयंपाक करण्याची आणि आपल्याला येत नसलेले पदार्थ शिकण्याची आणि येत असणाऱ्या पदार्थांमध्ये परफेक्शन आणण्याची ज्यांना इच्छा असते आवड असते त्यांनाच स्वयंपाक चांगला जमतो... रोजचा आपला भात एकाच कन्सिस्टन्सी मध्ये शिजवणं ही सुद्धा एक कला आहे आणि शिकायचं म्हणाल तर दुसऱ्या देशातलेच पदार्थ शिकले पाहिजे असं काही नाही हं... साधी सोपी गोष्ट, पोहे अगदी रोजचा पदार्थ.. पण तोसुद्धा महाराष्ट्रात किती वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात... 

ते सगळं शिकण्याची आवड आणि इच्छाशक्ती हवी हेच सगळं वारसाहक्काने आई कडून मुलांना मिळतं... 


काही वर्षांपूर्वी मुलांना स्वयंपाक घरात सहजासहजी एन्ट्री मिळत नव्हती... पुन्हा मेंटॅलिटी!! पण आपल्या hero च मात्र उलट होतं... सोबतीला एक ताई आणि खेळायला लहान बहीण त्यामुळे इतर खेळांपेक्षा हा भातुकलीच्या खेळात जास्त रमला... हा जसा मोठा होऊ लागला तशी हळूहळू हातातली भांडी बदलत गेली... अहो म्हणजे भातुकलीची छोटी भांडी जाऊन त्या जागी मोठी भांडी येऊ लागली... त्या चिमुकल्या हातांनी आधी नुसत्या भांड्यांची आणि मग बनवलेल्या पदार्थांची देवाणघेवाण आईकडे सुरू झाली... बरं अभ्यासात रस नव्हताच आणि खेळातही नव्हता सारखा आपल स्वयंपाकघरात जीव अडकलेला... पण घरची परिस्थिती तशी बेताची त्यामुळे इच्छा असूनही यात करियर करू शकला नाही, पण म्हणून आईच ट्रेनिंग काही थांबलं नाही ते एकीकडे सुरू होतं... कितीही इच्छा नसली तरी अभ्यास करण्याशिवाय गत्यंतर नसतं शेवटी आर्टिस्टिक वृत्तीचा मुलाने सगळ्यात कठीण साईड निवडली.... आर्ट्स.. हो माझ्या मते आर्ट्स ही सगळ्यात वेळखाऊ स्ट्रीम आहे, कारण इथे तुम्हाला भरभरून पाठांतर आणि लिखाण दोन्ही करावं लागतं... बीएची पदवी तर मिळाली पण हॉटेल क्षेत्रात काहीतरी करायची इच्छा मात्र अजूनही होती... अगदी हॉटेल मॅनेजमेंट आता जमणार नव्हतं, पण इच्छा तिथे मार्ग ही म्हण काही खोटी नाही.. 

दुसरी वाट शोधलीच... एक वर्षाचा क्राफ्ट कोर्स करून एका हॉटेलमध्ये फूड and बेवरेज सर्विस मध्ये करिअरला सुरुवात केली... आता पंचाईत होती जेवण समोर दिसत होतं पण बनवायला मात्र परवानगी नव्हती... काम करणं जवळपास असह्य होत होतं... काम तर करायचंच होतं कारण गरज होती... आवड कितीही असली तरी पैशांची कसर कशी भरून काढणार... जगण्यासाठी पैसा हवा आणि पैशांसाठी काम.. पण पठ्ठ्याने हार अजिबात मानली नाही, राहिला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये... डिपार्टमेंट मात्र बदलत गेली Front of the house रिझर्वेशन डिपार्टमेंट ला गेला... दिसायला स्मार्ट आणि बोलण्यात गोडवा त्यामुळे तिथेही बाजी मारलीच... सगळं नीट सुरू होतं पण शेफ होण्याची आस मनात होतीच... लहानपणापासून पाहिलेले स्वप्न होतं ... 



हॉटेल इंडस्ट्रीमध्ये राहून साधारण गोष्टी लक्षात आलेल्या.. टॅलेंटही होतच शिवाय एक वर्षाच्या कोर्सची जोडही होती.. फक्त एक डिसिजन घ्यायचा होता घरातल्यांचा लाडका त्यामुळे संपूर्ण पाठिंबा... झालं आता आपल आपणच शेफ व्हायचं ठरवलं... 

घरूनच श्रीगणेशा करायचं ठरलं... सुदैवाने एका I T कंपनीमध्ये ब्रेकफास्ट आणि डिनर बनवून देण्याच कॉन्ट्रॅक्ट मिळाल... सगळं सुरळित चालू होतं पण कार्यात विघ्न आले नाही तर पुढे प्रगती कशी होणार... कोरोना ने उच्छाद मांडला... लॉकडाऊन जरी झालं. जोम बसंत आलेला बिजनेस ठप्प झाला 😐 हार मानण काही स्वभावात नव्हतंच इतक सगळं होऊन तग धरून खंबीर उभा राहिलेला "तो" आता डगमगणार नव्हता😎🤗 टिफिन सर्विस सुरू केली ते सुद्धा Success झालं या सगळ्यात टॅलेंट लपून थोडच राहतय एका केटरिंग कंपनीने त्याला शोधून काढलच... मग काय जे व्हायचं तेच झालं "स्वप्नपूर्तीचा आनंद" शब्दात सांगणं कठीणच... 


ही गोष्ट जरी कोणा एकाची असली तरी बऱ्याच जणांशी रिलेट करेल असं मला वाटतं... स्वप्नं सगळेच बघतात पण त्याच्या हात धुऊन मागे लागावं लागतं नाही का???


©Chef Aniruddha Ranade 

Food Stylist | Recipe Developer | Menu Engineering | Restaurant Consultant | Food Blogger

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट