Dramatic change in Food Menu (Wedding)

 लेख थोडा मोठा आहे पण आवर्जून वाचावा ही विनंती..


Hello🙋


नवीन वर्ष सुरू होऊन महिना लोटला पटापटा दिवस जातयत नुसते... लस आल्याने लोकं अगदी निर्धास्त झाली आहेत... बऱ्याच जणांच्या संकल्पाचा दरवर्षीप्रमाणे बट्ट्याबोळ झाला आहे.... कोरोनामुळे सगळ्यात जास्त नुकसान आमच्या इंडस्ट्रीचं झालय... अजूनही गाडी पुन्हा मूळ पदावर येत नाहीये, त्यातच हा बर्ड फ्लू आला अजूनच प्रॉब्लेम... महागाई वाढत चाललीय आणि सॅलरी वाढायच्या ऐवजी कमी मिळत चाललीये... बऱ्याच जणांची तर नोकरी गेलीये.... आता सगळं सुरू तर झालय, पण नवीन लोकांना घ्यायला बिजनेस तर हवा ना; पगार कुठून देणार त्यांना म्हणून अजूनही नोकऱ्या मिळत नाहीयेत... बरं दुसरं काही करावा म्हंटलं तर एक्सपिरीयन्स नाहीये.. बिजनेस करावा म्हणलं तर अनुभव नाहीये, अनुभव आहे तर पैसे नाहीयेत वाटलं होतं खाण्याला मरण नाही पण काही लोकांवर काय खायचं असा प्रश्न उभा राहिलाय...


एकीकडे ही परिस्थिती आहे तर दुसरीकडे सटासट रेस्टॉरंट ओपन होतायत... गाठीशी काहीही अनुभव नसताना केवळ आपल्या हाताच्या छान चवी वरून लोकांनी व्यवसाय सुरु केलेत... अशी दोन टोकं पाहायला मिळतायत... यात काही चूक आहे असं नाही... पूर्वी असं कुठे होतं हाताच्या चवी वरच रेस्टॉरंट चालायची... पुन्हा त्याचीच उजळणी होतेय हाताच्या चवीच्या जोरावर बिजनेस उभा राहतोय But  या सगळ्यात सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे मग तो आई-बाबांचा असुदे, ताई दादाचा आणि सगळ्यात महत्त्वाचं  बायको किंवा नवऱ्याचा... 

आता सगळ्याच नवर्‍यांना बायको बद्दल चांगलं बोलणं ह्या वेळेला लिहिणं जरा कठीणच असतं😜 का ते नाही सांगता येणार😅 म्हणजे आपण आपल्या आईबद्दल जितक्या पटकन लिहू शकतो तेवढच पटकन बायकोबद्दल लिहिता येतं का हो??? माझा हा पहिलाच प्रयत्न आहे😁😁 

बायकोला समजणं कठीण पण ती जर आपली छान मैत्रीण झाली तर सगळं किती easy होईल नवर्‍यापेक्षा छान आणि जवळचा मित्र तिच्यासाठी कोण असेल... सगळ्यांना वाटतं बायको साठी खूप काही करावं लागतं पण, तिला तुमच्याकडून काय अपेक्षित असतं... तुमची साथ, एक Strong Support, तू हो पुढे मी आहे सोबत हा विश्वास, तिला काय वाटतं हे तुम्हाला कळायला हवं... तुम्ही तिला इतकं समजून घ्यावं की माहेरचं कोणीतरी असायला हवं होतं हा विचारच डोक्यात यायला नको... एवढेच काय एका वेगळ्या मैत्रिणी ची सुद्धा गरज वाटणार नाही असं मन मोकळं तुमच्या सगळा इगो बाजूला ठेवून तुम्ही वागावं आणि तिला ज्या क्षेत्रात करिअर करायचं असेल त्यात तिला बिनविरोध साथ द्यावी, मदत करावी आणि लास्ट बट नॉट लिस्ट😂😂 चांगले खाऊ घालावं, शॉपिंग करावं त्यात ती कितीही वेळ लावू दे आणि काहीही न घेता परत येऊ दे तरीही... मध्ये मध्ये सरप्राइजेस द्यावीत वगैरे वगैरे😜😜😜 हा हा हा... 

आठवतंय ना ही तिची मुलगी आहे जिच्याशी तुम्ही लव्ह मॅरेज किंवा नुसता फोटो पाहून भेटायला गेला होतात... लग्न जमावं म्हणून आवडी-निवडी जुळून घेतल्या होत्या.. लग्न जमल्यानंतर सतरा वेळा भेटायला गेला होतात... तेव्हा ही तीला राग येत होता की, तेव्हा मात्र तुम्ही एवढा मस्का लावला असेल... तुमच्या कपड्यांवरून काही बोलली असेल तर लगेच ऐकलं असेल... लग्नासाठी तिच्या आवडीप्रमाणे  खरेदी केली असेल... तिच्या आवडीप्रमाणे घरात, खोलीत बदल करून घेतले असतील... आता ज्या मित्रांकडे तक्रारी सुरू असतात त्यांच्याकडे त्यावेळी मुलगी किती चांगली आहे हे रंगवून रंगवून सांगितल असेल ना...😂😜 हा हा हा 

अहो ही तीच मुलगी आहे फक्त आता बायको झाली आहे... बसं यापेक्षा जास्त नाही हा बोलू शकत😅😂 नाही तर नवरे कम्युनिटी बहिष्कार घालतील माझ्या आर्टिकल वर😜😜 


आता बायकोविषयी इतक बोलतोच आहोत तर सगळ्यांना लग्नात भरवलेला तो पहिला घास आठवत असेलच आणि जेवण.. तेही आठवत असेल मग त्याबद्दलच पुढे बोलूया का??


कोणत्याही जाती धर्माचा लग्न समारंभ असू दे, तिकडे विधी काय चाललेत त्याकडे कोणाचही लक्ष नसतं... जेवणाचा मेनू काय असणारे याचीच सगळ्यांना चिंता आणि हे काय नवीन नाहीये वर्षानुवर्ष यात काही बदल नाही, पण एक गोष्ट मात्र बदलली "जेवणाचा मेनू" त्यावरच आपण बोलूया... 


मला जी साधारण माहिती आहे तीच मी लिहिली आहे आमच्याकडे काही कोणी केटरिंग व्यवसायात नाही... माझ्याच ज्या थोड्याफार ओळखी आणि Experience आहे त्यातून मिळालेली ही माहिती... 

हा प्रवास आचाऱ्या पासून सुरू झाला आणि आता मोनोपॉली वर येऊन पोहोचलाय.. 


फार वर्षापूर्वीच नाही म्हणजे अगदी माझ्या जन्मापासूनच कसं आठवेल ना मला😜😂😂 पण साधारण पंचवीस वर्षांपूर्वीच तरी नक्की आठवतय.।। लग्नाचं टिपिकल ब्राह्मणी पद्धतीचा मेनू जेवलेलं अगदी पंगतीत बसून... माझ्या मुंजीतही असंच टिपिकल ब्राह्मणी पद्धतीच जेवण होतं... So, जो काही बदल झाला आहे तो गेल्या पंचवीस तीस वर्षांत झाला म्हणायला हरकत नाही... मेन्यू मध्ये अफाट बदल झालेलाच आहे आणि हा बदल अगदी डोळ्यासमोर घडलेला आणि अनुभवलेला आहे याचं आपल्यालाच आश्चर्य वाटेल... 

काही वर्षापूर्वी लग्न घरामध्ये राबायला माणसं असायची मुंबईची चाळ असो किंवा पुण्याचा वाडा एखाद्याच्या घरी लग्नकार्य असलं की जेवण बनवण्यासाठी अख्खा वाडा किंवा चाळ राबायची अगदी धान्य निवडण्यापासून त्यादिवशी पक्वान्न करण्यापर्यंत घरातल्या सगळ्या मोठ्या वयाच्या बायका असायच्या... हळूहळू त्यांची जागा आचाऱ्यानी घेतली त्यांनी घरातल्यां कडून इन्ग्रेडियंट लिस्ट घ्यायची आणि  त्याचा स्वयंपाक करायचा... साधारण सगळ्या कामाचा मोबदला ठरलेला असायचा..... पाच-पन्नास पानं वाढणारच हे गृहीतच धरलेलं असायचं... आता हळूहळू बदलाला सुरुवात झाली पंचवीस-तीस वर्षांपूर्वी कमिशन घ्यायला सुरुवात झाली... म्हणजे मेन्यू साठी जो काही खर्च येणार असेल त्याच्या काही पर्सेंट पैसे आचारी घेऊ लागला... त्यावेळी लग्नात पंगत असायची आग्रहाने वाढणारी घरचीच किंवा शेजारची मंडळी असायची.... ते चेंज होऊन Per Day basis वर वाढपी आले... ते म्हणजे राजधानी एक्सप्रेस सारखे वाढणारे असायचे.... लग्न मुंजीच्या जेवणाचा मेन्यू सुद्धा एकदम पारंपारिक असायचा... वरण-भात, मसालेभात, जिलबी, श्रीखंड पुरी, आणि कार्यालयातून निघताना बुंदीचा लाडू आणि पोह्याच्या चिवड्याची पुडी हे फिक्स... 

मग हळु हळु यातही बदल होत गेले कार्यालयांनी जेवणाच्या कॉन्ट्रॅक्ट ची पद्धत आणली... कुटुंब सुद्धा लहान होत गेली Flat सिस्टीम आली.. शेजारधर्म त्यामानाने कमी झाला... त्यामुळे काम करणारे हात सुद्धा कमी पडायला लागले.. नवरा-बायको दोघेही नोकरी करायला लागले त्यामुळे घरी कार्य असलं तरी पुरेशी सुट्टी मिळेनाशी झाली आणि सुट्टी मिळेल त्यात ही काम कुठे करायच.. त्यामुळे आचारी ठरवणं, सामान वगैरे वेगळ्याने आणणं, शक्य होईनासं झालं... हाती पैसा होताच मग काय थोडे पैसे जास्त गेले तरी चालतील ती वेगळी कटकट नको... असेच हळूहळू बदल होत, लग्नाचे जेवणाचे दर प्रत्येक पानामागे ठरू लागले... हे कमी म्हणून नवीन कॉन्सेप्ट जन्माला आली "इव्हेंट मॅनेजमेंट" भाडे पासून ते घरी जायच्या गाडी पर्यंत सगळच यांच्यावर सोपवण्यात येत होतं... याच काळात जेवणानंतर आईस्क्रीमची पद्धत रूढ झाली... पूर्वी लग्नाच्या जेवणात सहसा कांदा लसूण वापरला जात नव्हता, पण आता मराठी लग्नांना पंजाबी चायनीज आणि North इंडियन Food च लागतं... आता आचाऱ्याना कुठे इतकं येतय... त्यांनाही वेगवेगळे पदार्थ बनवणाऱ्यांची गरज लागायला लागली.... नाश्त्याला इडली चटणी, जेवणात छोले पुरी, पुलाव, बिर्याणी, पंजाब्यांच पनीर मराठी लग्नाच्या जेवणात नाक खुपसू लागलं.. यातच बफे पद्धत आली आणि सगळी कडे पसरत गेली आणि मग आमची एंट्री झाली... Catering College कडून Trained Steward यायला लागले Etiquette, युनिफॉर्म आले...caterer नी हळूहळू स्वतःची टीम तयार केली... कारण गेल्या काही वर्षात Sophisticated वाढपी ही एक गरजच झाली आहे... 



मागच्या काही वर्षात तर वेगळेच बदल झालेत.. श्रीखंड, बुंदीचे लाडू, जिलेबी, हे तर क्वचितच दिसतात त्याच्या जागी आता अंगूरी /सीताफळ बासुंदी आणि पंजाब्यांच्या पनीर प्रमाणेच बंगाली लोकांच्या मिठाईने बफे मध्ये जागा मिळवली... 

कशाचं कशाला भान - मान दोन्हीही राहिलेलं नाही... कोणताही पदार्थ लग्नाच्या मेनूत दिसतो... पुरणपोळी, गुळपोळी, उकडीचे मोदक, गाजर हलवा, एका डेझर्ट वर हल्ली भागातच नाही... गेल्या दहा वर्षांमध्ये महाराष्ट्रीय लग्नात मराठी जेवणापेक्षा पंजाबी, गुजराती, राजस्थानी, नोर्थ इंडियन, चायनीज, असलेले पदार्थ जास्त दिसतात.... पूर्वी जेवणासाठी लोक खोळंबलेली असायची... आता तसं नाही... चाट काऊंटर आता हवाच.. स्टार्टर, सॉफ्ट ड्रिंक्स हेसुद्धा हवच... आता पुरी प्रकार जाऊन तंदुरी रोटी, रुमाली रोटी, अगदी भाकरी सुद्धा असते... आपल्या ऑथेंटिक भाज्या सुद्धा त्याच चवीच्या बनत नाहीत... त्या असल्या तरी जोडीला, तवा भाजी आणि पनीर हवंच... या सगळ्यामुळे केटरिंग बिझनेसच रूपच पालटलय... 


फार पूर्वी अगदी थोडक्या इक्विपमेंट मध्ये आचारी आणि मदतीला तीन चार जण मिळून पाचशे हजार माणसांचा स्वयंपाक आरामात करायचे... पण आता प्रत्येक पदार्थासाठी वेगळा एक्सपर्ट लागतो, त्याला हेल्पर्स लागतात, बफे सेट अप ला वेगळी माणसं, काऊंटरवर Serve करायला वेगळी... Host च्या पंगतीला वेगळी... काय नी काय फाईव्हस्टार मध्ये तर परदेशी Steward सुद्धा असतात.. 


शेवटी काय सगळा दिखावा पैसा आहे, मग करा खर्च याने पाच लाख केला मी दहा लाख करीन... नसती फालतू कॉम्पिटिशन ह्या सगळ्यात आपले युएसपी असणारे पदार्थ, पद्धती कालबाह्य होत चालल्या आहेत याचं कोणाला भानच राहिलेलं नाही या गोष्टीचं वाईट वाटतं... आपल्या इथे केटरिंग व्यवसाय करणारे बरेच असतील त्यांना येत्या वर्षांमध्ये अजून काय काय बदल पाहावे लागणार आहेत देवच जाणे!!!😓🙏🙏🙏


©Chef Aniruddha Ranade 

Food Stylist | Recipe Developer | Menu Engineering | Restaurant Consultant | Food Blogger

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट