Healthy Eating Habbits

 *Healthy Eating Habbits*


Hello Hiiee🙋😄


आता हळूहळू मला वाटायला लागलय ब्लॉग लिहिणं तितकसं सोपं नाहीये... लिखाणासाठी सगळ्यात आधी आपल्याकडे तेवढ नॉलेज असायला हवं.. कोणी काही प्रश्न विचारले तर त्यांची उत्तर देता यायला हवी.. म्हणजे एकंदरीत दोन कामं या कॅटेगरीमध्ये कुकिंग जास्त बेटर आहे..😅😅 हाहाहा!! माझी मीच कम्पेअर करतोय.. मागे एकदा मीच लिहिलं होतं, आपल्याला आपल्या कामापेक्षा समोरच्याचं काम नेहमीच सोपं वाटतं... आता मीच माझ्या दोन कामांमध्ये कन्फ्युज आहे😁 मला लिहिण्याचा कंटाळा येत नाही, पण काय लिहावं तेच कळत नाही.. म्हणजे टॉपिक काय सिलेक्ट करावा यातच वेळ जातो.. टॉपिक सापडला की मग गाडी सुसाट सुटते.. बरं कोणताही टॉपिक घेऊन चालत नाही.. फुड रिलेटेड हवा, काहीतरी ज्ञानात थोडीफार भर पडावी किंवा जुन्या आठवणी, विसरत चाललेल्या गोष्टींची पुन्हा उजळणी व्हावी असा टॉपिक निवडावा यावर विशेष लक्ष असतं... तुम्हीही मला यात हेल्प केलीत तरी चालेल😍 मला या सिरीयल लिहिणाऱ्यांची कमाल वाटते चार-पाच वर्ष कसं काय लिहितात कमालच आहे... नकोच ते आपलं किचनच बरं आणि आपण बरे... हल्ली तुम्हाला सांगतो लहान लहान मुलांना पण शेफ वगैरे कॉन्सेप्ट माहितीये... एकतर एवढी चिल्लीपिल्ली इंग्लिश मध्ये बोलतात आणि शेफ अंकल म्हणतात कसलं कॉमेडी वाटतं ते... 


लहान मुलं पण खूप ऍडव्हान्स झालीयेत बाबा... आमच्या इथल्या रेस्टॉरंट मधली तर आहेतच... आमच्याकडे सेलिब्रिटीजची रेलचेल सारखी सुरूच असते... त्यांची मुलं तर हे गट्टू असतात... यावरच आज थोडं बोलायचंय आजकाल लहान वयातच मुलांची वजनं वाढलेली दिसतात... अनेकांना चष्मे असतात... सारखा टीव्ही बघून वगैरे असा चष्मा लागत नसतो.. लागतही असेल पण इतक्या लवकर लागत नसावा🤔 मग सगळ्याला जबाबदार कोण नक्कीच आई बाबा अजून कोण😓 जन्माला आल्यानंतरच बाळाची काळजी घ्यायला सुरुवात करायची नसते तर गूडन्यूज कळल्यापासून सुरुवात करायची असते... मी डॉक्टर नाही पण, एका शेफला असे अनुभव खूपदा येतात की त्याला एखाद्या प्रेग्नेंट लेडी ला Serve करायचं असतं... त्यावेळी कितीही इम्पॉर्टंट गेस्ट तुमच्या रेस्टॉरंट मध्ये असुदे प्रेग्नेंट लेडी is on हाय प्रायोरिटी... तिची जी काही ऑर्डर असेल ती वेळेत आणि सगळे प्रिकॉशन पाळून आणि तिने दिलेल्या स्पेशल इन्स्ट्रक्शन प्रमाणेच बनवायची असते... Usually आम्ही किचन मध्ये Cook करत नाही... पण अशा स्पेशल ऑर्डर्स, व्हीआयपी ऑर्डर्स, आम्हालाच बनवाव्या लागतात... कारण यात रिस्क फॅक्टर असतो, त्यामुळे रेस्पोंसिबल Person नेच ऑर्डर बनवायची... 


आता एवढी सगळी स्टोरी मी तुम्हाला का सांगतोय कारण कुठेही गेलात तरी ठराविक नियम तुम्हाला पाळावेच लागतात... मग फूडच्या बाबतीतले नियम नको का पाळायला आणि ते आपण पाळले, तरच आपली मुलं पाळणार नाही का??? 


आजचा आपला विषय आहे "हेल्दी फूड हॅबिट्स"... 

खाद्य पदार्थ हा खाण्यासाठीच असतो मान्य, पण तो खायचे ही काही नियम आहेत ना... ते कुठे पाळतो आपण.. म्हणूनच मी Habit लिहिलंय... सवय एकदा लागली की लवकर सुटत नाही... आजकाल वेळच कोणाकडे आहे सगळं कसं फास्ट, इन्स्टंट लागतं... सकाळच्या इन्स्टंट कॉफी पासून.. रात्री टाळी वाजवून लाईट्स ऑफ करण्यापर्यंत जगात सगळं अवेलेबल आहे... हा लेख जे मनापासून वाचतायत त्यांनी माझ्यासाठी नाही तर, तुमच्या स्वतःसाठी वेळ काढलाय त्याबद्दल तुमचे आभार...🙏 हल्ली लोकांना 24तास पूर्ण पडेनासे झालेत... भारताचे पंतप्रधानच इतकं काम करतात तिथे आपण कोण नाही का??? 

बाकी कशात कॉम्प्रमाईज चालू शकत हो पण जेवण आणि नीट झोप खरंच खूप गरजेच्या गोष्टी आहेत... त्यांना तुम्ही नीट व्यवस्थित आणि कामाव्यतिरिक्त वेळ द्यायला हवा... वेळेवर न जेवल्यास खूप वाईट परिणाम होतात हे मी स्वतः अनुभवलंय... पुन्हा माझं प्रोफेशन... लोकांच्या जेवणाच्या वेळेलाच आम्हाला जास्त काम असतं.. बरं आधी जेवाव म्हंटलं तर मग परत विचित्र वेळेला भूक लागते.. तेव्हा खाल्लं की मग रात्री भूक लागत नाही.. असं सगळं विचित्र होतं..। हीच आहे आपली पहिली सवय आधी आपल्या मोठ्यांना लावून घ्यायचीये तरच ती लहानांना लागेल New Born Baby ना तर काही माहित नसतं... भूक लागली की रडतात... मग आवडीनिवडी येतात कुठून??? कारण आपण त्या पुरवत जातो... रिझन काहीही असोत पण लावलेल्या सवयी सोडवायला तर हव्यातच ना... म्हणूनच 


आपली पुढची सवय "आहारावर नियंत्रण ठेवा" स्वतःच्या आणि घरातल्या सगळ्यांच्या.... दिवसातून चार वेळा खाणं आणि ते पचवण्यासाठी काम करणं गरजेचं आहे ज्यांचे फिजिकल work जास्त असतं... त्यांच्या आरोग्याच्या फार कूरकूरी नसतात, पण बसून काम करणाऱ्यांना मात्र वेगळ्याने व्यायाम करायला हवा... त्यासोबत ह्या चार वेळा व्यतिरिक्त खाणं टाळावं रादर खाऊच नये... हे मध्येमध्ये मंच केलेल्या गोष्टी वजन वाढवतात... जेवण झाल्यावर काहीतरी मध्येच वेफर खा, नाहीतर दाणे तोंडात टाक, चॉकलेट खा, फ्रीजमध्ये काय सापडलं तर ते खा, सारखं तोंड सुरू ठेवायचं मग वजन, वाढता वाढता वाढे भेदिले 100😂😂 हाहाहा!!

तुम्हाला एखादा पदार्थ खायची इच्छा झाली तरी खाण्याच्या वेळेपर्यंत थांबा... पडलं हातावर की टाकलं तोंडात असं करू नका, म्हणजे जेवण आटोपल्यावर कोणी काही खायला दिलं तर संध्याकाळी चहाच्या वेळेस खा किंवा ऑफिसात गेल्या-गेल्या कोणी हातावर मिठाई टेकवली तर ती दुपारच्या जेवणात खा असं।।। 



पुढची सवय "आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा" हिरव्या पालेभाज्यांमध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि फायबर खूप जास्त असतं... त्या बनवायला आणि पचनाला दोन्हीला सोप्या असतात... मेंन म्हणजे तुमच्या रोजच्या जेवणात सहाच्या सहा चवींचा समावेश किमान एक वेळच्या जेवणात तरी असायला हवा... म्हणजेच गोड, तिखट, आंबट, खारट, तुरट, कडू आणि चार रंगांचे पदार्थ तेही विसरू नका ज्यात पोळी, भात, आमटी, भाजी आणि लोणचं.... ह्या सवयी आधी स्वतःला लावायच्या तरच ते आपण मुलांना लावू शकतो... 


पुढची सवय म्हणजे "भरपूर पाणी प्या" आपला मेंदू जेव्हा कधी आपल्याला सांगेल तेव्हा पाणी पीत जा... आता मी वेगळ्याने पाण्याबद्दल काही बोलत नाही त्याचे फायदे सगळ्यांनाच माहिती आहेत, पण एक सांगतो गरज नसताना उगाच ढसाढसा पाणी प्यायलेल सुद्धा चांगलं नाही... 


"तुमच्या आहारात प्रोटीन्सचा समावेश नक्की असावा" कमीत कमी 25 टक्के प्रथिनं तुम्ही रोज खायला हवीत आणि प्रोटीन म्हणजे नॉनव्हेज असं नाही बरं... ब्रोकली, सोयबीन, डाळी, अस्परागस, पालक, लो फॅट डेरी प्रॉडक्ट हे सुद्धा प्रोटीन रीच फुड आहे.... तुम्ही जर नियमित व्यायाम करत असाल तर हे प्रमाण तुम्ही तीस टक्के सुद्धा करू शकता... 


पुढची सवय आपली वर्षानुवर्ष जुनी "जेवण बत्तीस वेळा चावून खाणे" आता हे जर तुम्हाला आठवत नसेल तर मग झालंच😅 याचे उत्तम उदाहरण म्हणजे सकाळी उठायला उशीर आणि खाल्ल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाही असा आदेश तेव्हा नक्की आठवा की आपल्याला 32 वेळा चावायचं😜😜 हाहाहा... पण ही खरी गोष्ट आहे सुट्टीच्या दिवशी आपण घरी असतो तेव्हाच काय ते, त्या एकेका घासाची चव चाखत तोंडात घोळवुन घोळवून घास खाता येतो... मजा-मस्ती, हसत-खेळत, जेवलेले जेवण छान पचतं उलट दोन घास जास्त खाल्ले जातात.... हीच आहे आपली पुढची सवय 

"खाण्याकडे प्रत्येक घासाकडे नीट लक्ष द्या" हो, हा कडक नियमच प्रत्येक घरामध्ये असायला हवा... जेवताना, खाताना खूप जणांचे लक्ष फोन मध्ये असतं नाहीतर टीव्ही मध्ये... लहान मुलं तर जेवतच नाहीत फोन दिल्याशिवाय... तो दिला नाही की रडतात म्हणे... अहो मग रडू देत की, आपल्याला नाही आईनी कसलं आमिष दाखवलं जेवणासाठी... हो मी घरभर फिरायला मात्र लावायचो लहानपणी😂😅 ह्या बाबतीत खूपच स्ट्रिक्ट व्हायला हवं जेवणाच्या वेळेस फक्त जेवण बाकी काही नाही... छान विषयावर बोला, हसत-हसत जेवल्याने जेवण आपोआपच हळू जेवलं जातं.. जेवताना वादाचे विषय, कामाचे विषय, मार्क कमी का पडले, फोन आणि टीव्ही सगळं बाजूला ठेवा... 


नेक्स्ट थिंग "फास्ट फूड खाण्याचे शक्यतो टाळाच" या वरचा लेख सगळ्यांनी वाचलाय So, या दोन सवयी एक म्हणजे फास्ट फूड टाळा आणि दुसरी जेवण घरी बनवलेलं जेवा... घरी बनवलेलं नेहमीचं जेवण हे पौष्टिकच असत... त्यामुळे वेगळ्याने काही करण्याची गरज नाही आणि 


लास्ट बट नॉट लिस्ट "अन्नपचनासाठी आवश्यक ते सगळं करा" तुम्हाला डायबेटीस किंवा ब्लडप्रेशरचा वगैरे त्रास असेल तर तुम्ही या सवयी लावून घ्याच... जेवताना मध्ये मध्ये पाणी प्या म्हणजे डायजेशन ला हेल्प होईल... हाय फायबर असलेले पदार्थ खाल्ले तर पचनास त्रास होणार नाही... ताजी फळे, भाज्या, डाळी, कडधान्य, अंजीर, मनुका, बेदाणे.. या गोष्टींमध्ये फायबर जास्त असतं... खाण्यात दही-ताक, तूप ह्या गोष्टी सुद्धा असू द्या... वरचेवर पुदिन्याचा सुद्धा वापर करा पचनास चांगला असतो... कोरोना मुळे, आलं वापरण्याचे प्रमाण वाढलेलच आहे.. चांगलीच गोष्ट आहे आलं तर, पाचकच आहे... काही फळही आहेत ज्याने पचनाला मदत होते.. पपई यामध्ये पपेन असतं तर हल्ली अननसाचा सीझन सुरू आहे त्यात ब्रोमेलीन असतं तेही पचनाला खूप मदत करतात आणि पोट साफ होण्यासही त्याने मदत होते... 

तर असं आहे सगळं... जमेल ना तुम्हाला😜 म्हणजे काय नक्की जमेल😄😄 तुम्हाला जमलं की मुलांना जमेल❤❤ आणि हो प्रेग्नेंसी च्या सुरुवातीपासूनच ह्या सवयी लागल्या तर बेबीला पण आपोआपच त्या सगळ्या सवयी लागतील... बाळ येणार म्हटल्यावर आपण आपल्यात खूप काही बदल करतो... आपले लाइफस्टाइल बदलतो मग या छोट्या-छोट्या सवयी लावून घ्यायला काहीच हरकत नाही ना?? पटतंय ना?? हो फक्त पपई खाऊ नका हेहेहे...😜


मग आवडला लेख तर नक्की शेअर करा आणि हो 


हेल्दीच खा आणि नेहमी हेल्दीच रहा😇😇🙏🙏


© *Chef Aniruddha Ranade*

Food Stylist | Recipe Developer | Menu Engineering | Restaurant Consultant | Food Blogger

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट