Making Non Veg for the First Time

 Hello🙋


माझ्या असं लक्षात आलंय की नेहमी खाण्याबद्दल आणि डायट बद्दल लिहून तुम्हाला खूप Bore केलंय... तुम्ही म्हणत असाल सारखे काहीतरी सल्ले देत असतो.. हे करा.. ते करू नका, हे खा.. ते खाऊ नका.. आम्हाला एवढे सांगता तुम्ही तरी पाळता का हो इतकं सगळं??? हाहाहा😉😉 माझं उत्तर तुम्हाला माहितीच आहे अजिबात नाही😂😂 मी काहीही पाळत नाही सगळं खातो आणि सारखं खातो😅 शेवटी मी सुद्धा तुमच्यातलाच एक नाही का🤗 माझ्या आवडीनिवडी तरी वेगळ्या कशा असतील, पण एक्सपीरियंस शेफ या नात्याने फूड रिलेटेड जितकं जमेल तितक नॉलेज द्यायचं अस आपलं ठरलय ना😉 पण किचनमध्ये एक्सपिरिमेंट होतात, फजिती सुद्धा होते त्याबद्दल आपण कधी बोललोच नाहीये ना.. सगळ्यांचे सगळे पदार्थ थोडेच चांगले होतात आणि स्पेशली पहिल्यांदा... म्हणूनच आज जरा हसुया किचनमधले उपद्व्याप आठवूया... 

आपल्या ग्रुप वर सगळ्यांनीच लहानपणी काही ना काही कारणाने किचनमध्ये प्रयोग केलेच असतील... काही पुरुष मंडळी अजूनही करत असतील बायकोला इम्प्रेस करायला😉😆 भांडण झालं की चांगला उपाय आहे😜 बरं अजून भांडायचं असेल तर तिखट जरा जास्त घालायचं, मग लगेच सुरू होईल, 'मुद्दाम जास्त तिखट केलं त्यापेक्षा करायचं नाही ना माझे हात का मोडले नाहीयेत' वगैरे वगैरे आणि त्याउलट आवडीचा पदार्थ असला की पदार्थ फस्त होतो पण तोंडातून कौतुकाचे शब्दही निघत नाहीत... चुकून तुम्ही विचारलं तर आपल्यावरच उलटत.. त्यात काय एक दिवस केलं तर काय कौतुक करायचं.. मी रोजच करते ते नाही दिसत...🤔 झालं दोन्हीकडून आपलीच वाट हे निश्चित... 

स्वयंपाक घरात कायम एकाचीच सत्ता असते... तिकडे वाटाघाटी, युती वगैरे काही भानगड नसते... Cooking Skill मुलांना वारसाहक्काने मिळत असतात... 

आई सुगरण असेल तर मुलगा किंवा मुलगी नक्की सुगरण होते... कुकिंग ना जीन्स मध्येच असत... आता माझा भाऊ त्याला कुकिंग मध्ये इंटरेस्ट नाहीये, पण जेव्हा कधी काही बनवतो तेव्हा भारीच असतं.. कारण आमच्याकडे आई आणि बाबा दोघेही उत्तम स्वयंपाक करतात... हल्ली स्वयंपाक ही काळाची गरज झाली आहे त्यामुळे स्वयंपाक येतच नाही असे फार क्वचितच कोणी असतात.... अगदीच बऱ्याच वर्षांनी घरात लहान मुलं आणि त्यातही ते एकुलते एक असेल तर त्याचे भयंकर लाड होतात आणि त्याची किचनमधली एंट्री बंद होते... बाकी आत्ताची नाही, पण ह्या आधीची पिढी मात्र जरा लाडात वाढलेली होती म्हणजे आपल्या म्हणजे माझ्या आईबाबांची पिढी अगदी शब्दशः लाडात असं नाही पण त्या वेळेसच थिंकिंग वेगळं होतं, तेच हो जुनं.... पुरुषांनी बाहेरची काम करायची आणि बायकांनी स्वयंपाक घरातली.. हा वादाचा विषय झालेला😜 आहे हो पण त्यावेळी बायकांचे माहेर लांब असायचं आणि पुरुषांना स्वयंपाक यायचं नाही, मग काय पंचाईत.।. जेवणाच्या वेळेसच का होईना बायको आठवायचीच😉😉 हाहाहा 


बरं हे मुलींच्या बाबतीत सुद्धा होतं... नवीन लग्न झालेली मुलगी आणि स्वयंपाक याबद्दल थोडं बोलूया... लग्न होईपर्यंत काही टेन्शन नसतं खाण्यापिण्याचे सगळे लाड आपली आई पुरवत असते.... आईकडून तुम्ही शिकला असाल तर ठीक पण काहीच येत नसेल तर??😅😂मला नक्की सांगा कमेंट मध्ये लग्नानंतर कोणकोण कुकिंग शिकलय😁😁😁 बरं ह्यातही आता दोन प्रकार आहेत अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेज... अरेंज मॅरेज असलं की सासूला माहित असतं की मुलीला कुकिंग येत नाही तिची तयारी असते शिकवण्याची आणि अरेंज मॅरेज आपल्या जाती धर्मात होतात त्यामुळे काही टेन्शन नाही.. पण त्यातही एक मुद्दा आहे... कोकणातील लोक आणि देशावरची लोक... खोबरा वापरणारे आणि एक शेंगदाणे वापरणारे😂😂 हाहा 

मला हा आर्टिकल लिहिताना विचार करूनच हसायला येतेय की सगळ्यांच्या बाबतीत काही ना काही आठवणी असतील... स्वयंपाक न येणाऱ्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे डाळी ओळखणे आतातरी ठीक आहे हो इंटरनेट आलंय पटकन शोधलं की समजतं पूर्वीचं काय मसूर डाळीचे वरण लावलं गेलं असेल किंवा चणाडाळीच असुच शकतं😜


प्रत्येकाच्या आयुष्यात आठवणींचा असा एखादा कप्पा असतोच तो कप्पा कधीतरी उघडला जातो आणि सगळा भूतकाळ डोळ्यासमोर उभा राहतो, पण खूपदा काय होतं आपली गाडी धावत असते आणि वर्ष सरत जातात... 

या आठवणी आपण जपून ठेवलेल्या असतात तो कप्पाच मागे पडतो... बायकांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा कप्पा म्हणजे स्वयंपाक घरातल्या आठवणी कारण त्यांच्या दिवसातला बराचसा वेळ तिथेच जातो आणि आणि पुरुषांच्या आयुष्यातला "लग्न"😁😁😜 जरी स्वयंपाक येत असला तरी नव्या घराच्या स्वयंपाकाचे धडे इथेच गिरवलेले असतात.. हळूहळू आईने शिकवलेले सगळे पदार्थ आपण विसरत जातो सगळ्यात जास्त परीक्षा असते ती व्हेज आणि नॉनव्हेज वाल्यांची एखादी मुलगी व्हेजिटेरियन असेल आणि तिला नॉनव्हेज बनवायची वेळ आली तर कसला गोंधळ उडत असेल ना😅 ह्यावरून माझ्या कॉलेजचा किस्सा आठवला तो सगळ्यांबरोबर शेअर करतो 


आमच्या घरी काय नॉनव्हेज बनत नाही... बारावी झाल्यापासून ते हॉटेल मॅनेजमेंट च्या प्रॅक्टिकल पर्यंत नॉनव्हेज कसं बनवायचं हाच विचार... जिवंत चिकन दिलं तर कसं काय मारायचं तिला... अगदी आत्ता आत्तापर्यंत खाटीकाकडे जाण्याचा काही संबंधच आला नाही किंवा कोणाला प्रत्यक्ष नॉनव्हेज बनवतानाही पाहिलं नव्हतं त्यामुळे कसलीही कल्पना नव्हती... टीव्हीवर काय सगळी प्रोसेस दाखवायचे नाहीत आणि घरी इंटरनेट, कम्प्युटर काही नव्हतं त्यामुळे तोही मार्ग बंद होता... हॉटेल मॅनेजमेंट केलेलही कोणी ओळखीचं नव्हतं... चिकन बनवायला काहीच Problem नव्हता पण तिला मारायचं आणि कापायचं हीच मोठी परीक्षा होती... Chef तर व्हायचं होतं आणि किचन मधल्या Non Veg ह्या भागाचा काहीच पत्ता नव्हता...  कॉलेज सुरू झालं मुलांच्या ओळखी झाल्या... योगायोगाने माझ्यासारखाच एक मुलगा भेटला हाहाहा😂😂 Mr.Gore.. पहिले काही प्रॅक्टिकल Demo होते म्हणजे फ्रेंच Classics म्हणजे Sauces, Stocks, Egg Cookery ह्यात दोन-तीन आठवडे गेले... आम्ही जवळ जवळ राहणाऱ्यांचा एक ग्रुप झाला... रोज ट्रेन ने येणं जाणं वगैरे थोडक्यात मैत्री झाली... पहिला मेन्यू इंडियन होता Partner घेऊन काम करायचं असायचं... आता सगळेच नवीन त्यामुळे रोल नंबर प्रमाणे आमच्या जोड्या केल्या गेल्या...आमच्या क्लास मधली एकुलती एक मुलगी नेमकी माझी पार्टनर झाली... मुली सोबत काम करायचं म्हणजे कठीण काम अहो ऐकतच नाहीत त्या अजिबात आणि आज बघायला गेलं तर आमचं हे पहिलं प्रॅक्टिकल... कारण आज आम्ही बनवणार होतो... 

शेफ ने सगळं व्यवस्थित Brief केलं मी सवयीप्रमाणे मेन मुद्दे लिहून घेतले... मेन्यूमध्ये पी पुलाव होता रेसिपी एकदम सोपी होती... तूप, खडा गरम मसाला, बासमती, मटारचे दाणे, पाणी आणि चवीला मीठ... या महामायेने त्यात लाल तिखट घातल आणि अख्ख्या पुलावचा सत्यानाश केला😠😠 Chef ने टेस्टिंग ला बोलवलं... शेफ म्हणतो शेवटचा लाल पुलाव कधी खाल्लात हो तुम्ही😓😓 तरी नशीब Madam नं कबूल तरी केलं... 

नेक्स्ट प्रॅक्टिकल ला मात्र शेफला सांगितलं आम्ही आमचा पार्टनर निवडतो झालं रानडे आणि गोरे जोडी फिक्स झाली आणि नेमकं चिकन बनवायचं होतं😂😂😂 आम्हा दोघांना फक्त खायचं माहित होतं😅 फायनली आम्हाला चिकन बघायला मिळालं ते जिवंत नव्हतं आणि जीव भांड्यात पडला...Chef ने चिकन कसं कापायचं ते शिकवलं... आम्हा दोघांचेही त्या वासाने डोकं दुखायला लागलं पण शेवटी जमलं कापायला... आणि चिकन सुद्धा तयार झालं आहाहा काय टेस्ट होती😍 आम्हाला बनवलेले पदार्थ घरी न्यायची परमिशन होती... माझ्या घरी बाहेरून नॉनव्हेज आणून खाऊ शकत होतो, पण Mr.गोरे उड्या मारत घरी गेला अगदी आनंदाने आईला डबा उघडून दाखवला काकू किंचाळलीच एकदम😂😂😂 घराबाहेरच काढलं त्याला डब्या सकट हाहाहा😅😂 काय मग मला नाही तुला घाल कुत्र्याला म्हण खरी ठरवून हा कुत्र्याला देऊन आला...😅 अशी होती माझी नॉनव्हेज ची स्टोरी... 



आज पोट भरून हसला असाल ना... आज NO सल्ले  हेहेहे🤗 त्यासाठी पुन्हा लवकरच भेटू... पण नेहमीच विसरून कसं चालेल... 


हेल्दी खा आणि हेल्दी रहा!!!


© Chef Aniruddha Ranade

Food Stylist | Recipe Developer | Menu Engineering | Restaurant Consultant | Food Blogger

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट