पाककला - Art Of Cooking
माणसाला अवगत असलेली हि सगळ्यात जुनी कला असावी... लहानपणी सगळ्यांनीच वाचलय.. जसा आगीचा शोध लागलाय तेव्हापासून माणसाने कुकिंग ला सुरुवात केलीये त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की तेव्हापासून ही कला लोकं शिकतायत किंवा शिकवतायत.. आणि गंमत म्हणजे आज पर्यंत यात कोणीही पूर्णपणे पारंगत झालेलं नाही... आजच्या काळात सगळ्या बायकांना स्वयंपाक करायचा मक्ता वर्षानुवर्ष आपण सांभाळतोय असं वाटतं, पण इतिहास पाहिला तर या क्षेत्रात पुरुषही पुढे होते... महाभारतात भीम, रामायणात लक्ष्मण हे त्यावेळचे जणू मास्टरशेफ.. यांच्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत... पूर्वीच्या राजांकडे आणि मोठ्या मोठ्या देवस्थानात एक्सपर्ट Chef's होते... आपल्या इथे त्यांना 'आचारी' म्हणायचे पण, उत्तर भारतात त्यांना खूप आदर सन्मान होता त्यांना "महाराज" ही पदवी होती.... त्यांची जागा आता मोठमोठ्या Chefs नी घेतलीये.. संजीव कपूर, हेमंत ओबेराय, निलेश लिमये, ही या क्षेत्रातली काही जुनी नावं... नवीन आता बरीच आहेत...
घरच्या स्वयंपाक घरात मात्र अजूनही घरातल्या बाईचीच सत्ता असते... तिकडे पुरुषांना जागा नाही... त्यासाठी बरीच कारण सुद्धा असतात बरं का! पुरुष मंडळी व्यवस्थित नीटनेटकं काम करत नाहीत, पसारा घालून ठेवतात, इन्ग्रेडियंट पुरवून वापरत नाहीत.. वगैरे वगैरे.. हे जरी खरं असलं तरी काही पदार्थ, हेच नवरे आपल्या बायको पेक्षाही सुंदर बनवतात.... Btw माहिती आहे ना आपण पाणीपुरी आणि पावभाजी खातो ते भय्या कीती स्वच्छ असतात..😜
पाककला आणि पाकशास्त्र यामध्ये मेन फरक हा आहे की, पाककला एखादी रेसिपी कशी करावी ते सांगतं... तर ते तसं का करावं 🤔हे विचारायचं नाही😑 कारण शास्त्र असत ते😂
भारतीय स्वयंपाक हा पूर्णपणे शास्त्रावर आधारित आहे... आजकालची मुलं आई, आजी, ताई, मित्र-मैत्रिणी, टीव्ही, इंटरनेट वरून रेसिपी बनवायला शिकतात... पण यापैकी कोणीही त्यांना त्यामागचं शास्त्र शिकवत नाहीत... एखादा पदार्थ फार छान झालाय अस आपण म्हणतो तेव्हा नेमकं काय होतं??? मी बर्याचशा Show Kitchen मध्ये काम केलय... म्हणजे ओपन किचन, तुम्ही तुमचा पदार्थ बनताना पाहू शकता... पण तुमच्या हे लक्षात येत का नाही?? की आम्हीही तुम्हाला पाहू शकतो... आम्ही Executive Chefs म्हणजे फूड आणि गेस्ट च्या मधलं माध्यम असतो डिश मध्ये काही कमी पडलं नाहीये ना हे बघणं... ती आकर्षकरीत्या प्लेट करणं आमचं काम... आमच्या अप्रूवल नंतरच डिश तुमच्या टेबलवर येते आणि मग आमचं पुढचं काम सुरू होतं ते एका क्षणाचं असतं, पण खूप महत्त्वाचं... आम्ही ती डिश तुम्ही चाखल्यानंतरचे तुमचे एक्सप्रेशन्स Observe करतो... तुम्ही प्रसन्न दिसलात हीच आमची शाबासकी असते... बाकी नंतर काहीही न टाकता क्लीन प्लेट जेव्हा परत येते ते समाधान शब्दात नाही सांगता यायचं.... ती आमची दुसरी शाबासकी.. कारण फार क्वचित लोकं शेफला भेटतात म्हणून तुम्ही खुश आहात की नाही याची काळजी आम्हालाच घ्यावी लागते.... शो किचन नसेल तर हेच काम तुमचा वेटर करत असतो... बघा काय सीक्रेट सांगितलं मी... आता रेस्टॉरंटमध्ये जाऊन प्रयोग करू नका😅😅 मनसोक्त खाण्याचा आनंद घ्या...
हे सगळं सांगण्यामागे कारण काय तर माणूस डोळ्यांनी जेवतो, नाकाने पितो, कानाने आनंद घेतो आणि जिभेने त्याला टच करतो.... हे सगळं झाल्यावर तृप्त होऊन ढेकर देतो... जो पदार्थ या सगळ्या इंद्रियांना आनंद देतो तो पदार्थ जगात भारी असतो...😁 निदान आपल्यासाठी तरी😅
आता डोळ्यांनी जेवतो म्हणजे नेमकं काय; तर पदार्थ पाहिल्या क्षणीच भूक चाळवणे, तोंडाला पाणी सुटणे, वगैरे आहो समारंभात बफे ची संकल्पना याच आधाशीपणामुळे आली आहे बफे बघूनच जेवणाची वेळ कधी होतीये असं होतं कोणाला राग येईल पण हेच खरं आहे... अगदी कधी न मिळाल्यागत आपण भरमसाठ पानात वाढून घेतो, पण सत्य परिस्थिती ही असते की त्या सगळ्या पदार्थांकडे पाहून आपलं अर्ध पोट भरलेलं असतं... अहो समारंभाची वाट कशाला पाहायची पूर्वी किंवा अगदी आत्ताही बर्याच छोट्या हॉटेलच्या बाहेर समोसे, भजी, वडे, पुर्या, जिलबी वगैरे तळत माणूस बसलेला असतो... आपलं परिचयाचं हॉटेल असेल तर काहीतरी जादू केल्यागत आपोआप आपली पावलं त्या दिशेने वळतात.... आमच्या रेस्टॉरंट मध्ये सुद्धा आपला पिझ्झा बनवत असताना किंवा रुमाली रोटी सुदर्शन चक्र सारखी फिरताना, बघायला लोक उत्सुक असतात... त्यांचा पिझ्झा कसा बनतो ते पाहायचं असतं त्यांना...
चला डोळ्यांचे कौतुक पुरे झालं.. पुढे वळू, नाहीतर तुम्ही डोळे वटाराल😁
आता आपल्या सजलेल्या प्लेट बघून डोळे तृप्त होतात, तसेच ते काही क्षणांसाठी बंदही होतात... त्याचा Aroma Feel करण्यासाठी.... याचा अनुभव दर रविवारी दुपारच्या वेळेस तुम्हाला नक्की येत असेल शेजारच्यांकडे शिजणाऱ्या पदार्थांचे वास तुमची भूक चाळवत असतील... युद्धच चालू असेल😂 फिश करी का मटन बिर्याणी.. भरली वांगी का छोले पुरी..😂😂 हाहा.... छ्या आपल्या घरातून असे वास का येत नाहीत... आपल्या शेजारचे सगळे किती चांगले आहेत हे आपल्याला हमखास वाटतं... हे कमी म्हणून शेजारचे वाटीभर पदार्थ आणूनही देतात आणि पुन्हा भेट झाली की मुद्दामून बायकोसमोर विचारतात 'काय, कसा झाला होता पदार्थ??? मग नंतर आहे घरी महाभारत😅 कोणत्याही प्रकारचं ड्रिंक असो चहा-कॉफी, सरबत किंवा अगदी बियर, वाईन असो "वास" हा कोणत्याही ड्रिंक्स चा प्राण असतो... ग्लास किंवा कप तोंडाला लावताना त्याचा वास आपल्या नाकात आधी जातो.. नाक खूष झालं तरच आपण ते पीतो.... पदार्थांचे वास शोधतच असतात कोणाच्या नाकात शिरायला मिळतय??? मुंबईच्या लोकांना विलेपार्ले स्टेशन गेलं हे सांगावं लागत नाही पार्ले जी चा तो खमंग वासच ते काम करतो... पुरे झालं नाही का कौतुक आता पुढे वळूया...
पदार्थ तयार करताना, वाढताना, देताना, होणारा "आवाज"... पूर्वी थिएटरमध्ये पिक्चर बघताना कोल्डड्रिंकच्या बाटल्यांचा आवाज यायला लागला की समजायचं आता इंटरवल होणार... बहुतेकांना गोटि सोडा माहीत असेलच... तो फाट्ट्.. असं जोरात आवाज करत बाटलीत गोटि जायची.. मी तर फक्त त्यासाठीच तो सोडा प्यायचो...
आता हे, मुंबईत फार अनुभवायला मिळेल... रात्री थकून भागून आपण घरी येत असतो आणि रस्त्यातला पावभाजी वाला उलतनं तव्यावर घासत जोरात तव्यावर आपटत असतो नाहीतर चायनीज वाल्याच्या कढई चा आवाज, जणू काही आपल्याला चला या खायला म्हणून बोलावतच असतात... हल्ली रेस्टॉरंट मध्ये सुद्धा एक आवाज फेमस झालाय... सिझलर्सचा... एखाद्याने ऑर्डर केलं असेल तर दुसरा हमखास ऑर्डर करतो.... High-end पार्टीजमध्ये Champagne उघडल्याचा आवाज आणि... गावातल्या घराच्या जात्यावर पीठ दळतानाचा, रवी ने ताक घुसळतानाचा, पाट्यावर मसाला वाटतानाचा, हाताने भाकरी थापतानाचा आवाज🤗 आता या मशीनच्या जगात हळूहळू नाहीसा होत चाललाय🙁
हल्ली सगळंच बदलत चाललय... जमिनीवर मांडी घालून तांब्या भांड घेऊन जेवायचे दिवस आता नाही राहिले.... काय तर Sophisticated झालोय आपण, नॉनसेन्स... पूर्वी पदार्थ संपला की बरा... पुन्हा घेऊन खाल्ला की छान.. आणि ओरपून खाल्ला की बेस्ट... हल्ली काय डाएटच्या नावाखाली मोजून-मापून खाताना दिसतात लोकं... अहो आपलं जेवण कसं आडवा हात मारून जेवलं पाहिजे कशाला नसते एटिकेट्स बाहेरच्या देशात गेल्यावर पाळा की... तिकडे खा सूरी आणि काट्याने....बिचाऱ्या मुलांना, म्हातार्यांना तर जमतही नाही ते... अहो उडप्या कडच्या मसाला डोसा खायला कशाला लागतो काटा चमचा तिकडे कसले डोंबलाचे एटिकेट्स... हाताने खाण्यातच मजा आहे.. खरा आनंद आहे..
आम्ही CHEF'S का आहोत कारण स्वयंपाकाला एका वेगळ्या लेव्हलला पोहोचवण्याचं काम आम्ही करतो... पाकशास्त्र चा अभ्यास, अनुभव, पदार्थांचे गुणधर्म, अन्न शिजवण्याच्या आणि सजवण्याच्या पद्धती,World Menu, त्यातील शब्दांचे अर्थ, प्रमाण.. याची शास्त्रशुद्ध माहिती आम्हाला असते... हल्ली आपल्या जिभेचे नखरेही खूप वाढलेत, त्यामुळे नेहमीच नवीन काहीतरी बनवावं लागतं... आज पाकशास्त्राला एक प्रतिष्ठा मिळाली आहे...
जिभेसारख्या शरीराच्या एका छोट्या भागाने कलेला व शास्त्राला इन शॉर्ट आमच्यासारख्यांना एक मानाचे स्थान मिळवून दिलय❤😇😇
चला आज इथेच थांबतो....नक्की कळवा लेख कसा वाटला...Share सुद्धा करा🙏🙏
© Chef Aniruddha Ranade
Food Stylist | Recipe Developer | Consultant | Food Blogger
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा