Fermented Food {वाळवंण - एक परंपरा}
Hello🙋🤗
आज पुन्हा एकदा थोड्या वेगळ्या विषयावर बोलणारे... पण आज काही विचार वगैरे करायला लावणार नाहीये फक्त माहितीवजा बोलणारे....
पुन्हा आपण एकदा पूर्वीचे दिवस आठवूया आणि मग विषयाकडे वळूया... उन्हाळ्याची शाळेची सुट्टी म्हणलं, कि आधी आठवण होते ती म्हणजे गावाची आणि दुसरी आठवण आंब्याची... अगदी उष्णता अंगावर दिसेपर्यंत आंबे खायचे मग आंबा कोणत्याही स्वरूपामध्ये असो आमरस, अख्खा किंवा कैरी काहीही चालतं.. बाकी इतर सटरफटर काही ना काही खादाडी चालूच असते... यातच अजून एक Main काम सगळ्या घरातल्या बायका मिळून करतात आणि स्पेशली मुलांचाही या कामात वाटा असतो, ते म्हणजे वाळवण घालणे... गावांमध्ये अजूनही हे चालतं आता तर ह्याला व्यवसायाच स्वरूप आलंय... मुंबईसारख्या शहरांमध्ये ती मजा नाही अनुभवता येत... पावसाळ्यात भाज्या आणि मासे फार कमी मिळायचे... आता काय बारा महिने सगळं अवेलेबल असतं पण ते वाळवंण म्हणजे एखादा आनंद, आठवणी साठवून ठेवल्या सारख आहे.. ह्याच्या पूर्वतयारीत मुलांचा वाटा असतो बरं का.. पहिली स्टेप म्हणजे जुन्या चादरी, साड्या आणि दगड गोळा करणे ते प्रत्येक कोपऱ्यावर ठेवायला लागतात ना उडू नये म्हणून... आता बाबा त्या जुन्या लोकांच्या रेसिपी वगैरे काही माहीत नाही... प्रमाणाचं तर विचारूच नका, पण हा घाट बराच मोठा असायचा... साबुदाण्याच्या पापड्या, साबुदाणा बटाटा चकली, कुरडया, सांडगे, कुटाच्या मिरच्या, बटाट्याचा कीस, उडदाचे पापड, कैरीचा छुंदा, लोणच्यासाठी मसाला लावून ठेवलेल्या कैऱ्या ह्या सगळ्यांनी घर भरलेलं असायचं... लिहिण्यासाठी शब्द अपुरे पडतील, इतक्या आठवणी तुम्हीही जगल्या असाल..
वाळवणावर सध्या रेडिमेड ची सावली पडली आहे... त्यातला खटाटोप सोपा अजिबात नाही... पण ते वातावरण, ते एकत्र येणं, खाण्याची मजा वेगळीच बायकांची सुखदुःख सुद्धा सोबत वाटली जायची घरातल्या डब्यांपासून ते लग्नातला रुखवत आतापर्यंत रंग भरलेत या वाळवणानी... वाळवण काय विकत मिळतील भाऊ पण त्यातल्या गोड-धोड आठवणींच काय ते कुठे कुठे विकत मिळणार... असो फार विचार नको करायला....😅😅😅 जुन्या छान छान आठवणी आठवल्या ना कि दिवस कसा छान जातो.... ते सकाळी व्हाट्सअप वर येणाऱ्या संत विचारांच्या मेसेजेस पेक्षा, आपल्याच पूर्वीच्या आठवणी चांगल्या कमीतकमी आपण त्या अनुभवलेल्या तरी असतात... नाहीतर उगाच लोका सांगे ब्रह्मज्ञान, याला काय अर्थ आहे... असो तर
आपला आजचा विषय आहे "Fermented Food" अगदीच मराठीत सांगायचं झालं तर "आंबवलेले पदार्थ" आणि कुठला शब्द आठवत नाहीये😅 काही मराठी शब्द जरा घाबरवणारे असतात😂 म्हणून आपण फर्मेंटेड फुड असंच म्हणू.... सध्या मी यावर अभ्यास करतोय मग म्हंटलं मला जी माहिती मिळाली ती तुम्हालाही सांगावी... मी काही अगदी Scientifically सांगणार नाहीये.. सगळ्यांना कळेल असं सांगणारे... मी तुम्हाला जुन्या आठवणींमध्ये यासाठी घेऊन गेलो कारण, मी ज्या काही पदार्थांबद्दल बोललो ते सगळे पदार्थ फर्मेंटेड फुड कॅटेगरीमध्ये मोडतात...
आपल्याला नवीन गोष्टी तर शिकायच्या आहेत पण त्यासोबत जुन्या परंपरा खास करून फूड रिलेटेड आपणच जपायला हव्यात... जसा काळ पुढे सरकतोय तसा स्वयंपाकघरातही तुफान बदल झालाय.. आता स्वयंपाकघराचं मॉड्यूलर किचन झालंय.. काहींना आमच्यासारख्या Chefs नी सांगितलेलं पटकन पटतं म्हणून Lavish दिसणाऱ्या किचन मध्ये दगडी पाटा वरवंटा सुद्धा स्वयंपाक घराची शान वाढवतो... कारण ग्राइंडर मध्ये केलेले वाटण आणि पाटा-वरवंटा वापरून केलेलं वाटण याची कम्पेअर होऊच शकत नाही.... आपल्या देशात अन्नावर प्रक्रिया करण्याचे प्रमाण Comparatively परदेशापेक्षा कमी आहे... कारण जसं फुड कल्चर डेव्हलप होत जातं त्यात खाण्याच्या सवयींचा आणि जुन्या प्रथांचा मोठा हात असतो त्यामुळे फूडवर प्रक्रिया करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असू शकतात... लोणची, मुरांबे, साखरआंबे, कुरडया, पापड्या, शेवया, चटण्या, सांडगे, वाळवलेल्या भरल्या मिरच्या, भाजणी, गूळ, काकवी, साखर, हे सगळे आणि असे बरेच पदार्थ अन्न प्रक्रियेतूनच आलेले आहेत... याची न्यूट्रिशन व्हॅल्यू जपली जाते आणि ते साठवून ठेवून आपण खूप दिवस खाऊ ही शकतो...
पुर्वापार चालत आलेल्या स्वयंपाकात फर्मेंटेशन केलेल्या अनेक रेसिपीज आहेत... गहू फरमेंट करून त्याचं सत्व काढून केलेली खीर अशा काही Remarkable रेसिपीज आहेत... अगदी रोजच्या जेवणात दुधाचे दही, तांदळापासून इडली डोसे, कणीक भिजवून काहीवेळ तशीच ठेवून नंतर केलेल्या पोळ्या किंवा भाकरी ह्या सगळ्या पदार्थांमध्ये फर्मेंटेशन चा मोठा सहभाग आहे..... याने वेगळी चव तर येतेच आणि न्यूट्रिशन पण वाढतात... आपल्या महाराष्ट्रात बाजरी, ज्वारी, नाचणी यांचे महत्त्व मला वेगळ्याने सांगण्याची गरज नाही पण पॉप्युलेशन च्या मानाने या सगळ्याचं प्रोडक्शन मात्र कमी आहे... या धान्यांच्या भाकरी तर सगळ्यांनाच माहिती आहेत, पण या सगळ्याचे आणि वेगळे, जास्त काळ टिकणारे पदार्थ बाजारात आले तर एक वेगळाच हेल्दी ट्रेंड होईल.... मी मगाशी सांगितलेले सगळे पदार्थ आपण हळूहळू मोठ्या प्रमाणावर बनवायला लागलो आहे.. नाहीतर या आधी ते काही घरं मिळून बनायचे पण आता फूड टेक्नॉलॉजीमध्ये खूप बदल होत आहेत.. हे बदल अजून वेगाने व्हायला हवे... ह्या सगळ्याने पारंपरिक प्रथा जपणाऱ्या बायकांना रोजगार मिळू शकतो किंवा पाठिंबा असेल तर त्याला बिझनेसच स्वरूपही मिळू शकतं... हे सगळे पदार्थ आता छोट्या दुकानांमधून मॉल पर्यंत पोहोचलेत हीच Popularity आपल्याला वाढवायची आहे... यात आपल्या संस्कृतीचाच फायदा आहे शिवाय ते जगभरात पसरेल ते वेगळेच.... हे काही आता म्हाताऱ्यांच काम नाही.. त्यांनी त्यांच्याकडे असलेलं ज्ञान आपल्याला दिलं आता, आपण ते पुढच्या पिढीला Pass On करायला हवं... त्यांना या सगळ्याचं महत्त्व, या कामात येणारी मजा सांगून त्यांना यातही व्यवसाय होऊ शकतो यासाठी Encourage करायला हवं... राधिका मसाले कुठे च्या कुठे गेले पाहताय ना😂😜😜
Jokes Apart पण खरंच आज आपला लिज्जत पापड जगभरात नाव कमावतोय आणि हे मला शिप वर असताना प्रकर्षाने जाणवलं... त्या समुद्रात सुद्धा लिज्जत पापड Serve होत होता... आपला कृषिप्रधान देश आहे हे आपलं नशीब पण फक्त त्याच्या जोरावर आपले प्रश्न सुटणार नाहीत... फूड टेक्नॉलॉजी, फुड प्रोसेसिंग यासाठी आपल्या सगळ्यांनाच प्रयत्न करायला हवेत... "नव ते हवं" म्हणताना "जुनं ते सोनं" हेही लक्षात ठेवून आपल्याला माहित असलेल्या पारंपारिक प्रक्रिया आणि त्याला थोडी विज्ञानाची साथ देऊन ते नव्या पिढीला फॉरवर्ड करायला हव तरच जगात आपण आपली वेगळी ओळख कायम ठेवू शकू....
आता थोडंसं सायन्स आणि याचे हेल्दी फायदे सांगतो मी... माझ्या लोणच्या वरच्या आर्टिकल मध्ये सांगितलं होतं पण पुन्हा एकदा... फर्मेंटेशन ही नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यात चांगले बॅक्टेरिया आणि ईस्ट कार्बोहायड्रेट आणि शुगर ला अल्कोहोल किंवा ऍसिड मध्ये कन्व्हर्ट करतात आणि हेच अल्कोहोल आणि ऍसिड नॅचरल प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतात.... यात बिअर आणि वाइन सुद्धा येते... प्रक्रिया जरी नैसर्गिक असली तरी शेवटी सायन्स आहे, त्यामुळे फार खोलात न जाता आपण फायदे पाहू..
*या पदार्थांमुळे तुमची पचनशक्ती सुधारते...
*तुमची Immunity सिस्टीम काही प्रमाणात Boost होते त्यामुळे छोटे आजार तुमच्याजवळ फिरकत नाहीत...
*Heavy जेवण जेवल्यावर पचायला हलकं जावं म्हणून सोबत ताक, दही खातात...
*Fermented पदार्थांमुळे तुमची मेंटल हेल्थ सुधारते *Weight loss होण्यास काही प्रमाणात मदत होते....
*हार्ट आणि कॅन्सर रिलेटेड धोका थोडा कमी होतो.... हे आणि असे बरेच फायदे आहेत...
पण सगळं केव्हाही प्रमाणातच चांगलं.. फायदे आहेत म्हणून भरभरून खाऊ नका... लेख आवडला तर तुम्ही सांगालच.. जुन्या आठवणी परंपरा जपा आणि पुढच्या पिढीला पास ऑन करा...
नेहमीप्रमाणे हेल्दी खा आणि हेल्दी राहा🤗❤
©Chef Aniruddha Ranade
Food Stylist | Recipe Developer | Menu Engineering | Restaurant Consultant | Food Blogger
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा