Mental Health And Food

 Hello🙋🤗


कसे आहात सगळे??? आता हळूहळू सण सुरू होतील.. गेल्या वर्षीचे सण कसे आले, कधी गेले काही कळलं सुद्धा नाही... तरी बरं दिवाळीपर्यंत परिस्थिती नीट झालेली किमान ती तरी नीट साजरी झाली.. अधिक महिन्याचा Advantage मिळाला त्यामुळे थोडी उशिरा आली दिवाळी, नाही तर तिचं सुद्धा काही खरं नव्हतं... आता ह्या परीक्षा जरा लांबल्यात ना.. काय मुलांचं पण कसं चाललंय काय माहित..😓 गेल्या वर्षात सगळे खूष तर होते कारण घरचे सगळे एकत्र होते सगळ्यांना सुट्टी होती... पण सगळ्यांकडेच अशी परिस्थिती नव्हती... काहीजण वेगवेगळ्या ठिकाणी अडकूनही पडले होते.. एकमेकांना भेटताही येत नाही अशी परिस्थिती होती.. त्यामुळे सगळेच कुठे ना कुठे डिस्टर्ब होते... श्रीमंत-गरीब लहान-मोठे सगळ्यांनाच कसली ना कसली चिंता.. सगळेच एकमेकांवर Blame करत होते... पण सत्य परिस्थिती ही होती की कुणालाच काय करावं हे कळत नव्हतं... बहुतेक जणांचा इन्कम सोर्स पूर्णपणे बंद झाला होता.. पण खर्च मात्र वाढतच चालले होते... एखाद दोन महिने समजू शकतो हो... आठ महिने तर काहीच नव्हतं... करायचं काय हो अशा वेळेस... वर्क फ्रॉम होम वाल्यांचा बरं होतं... नाही, त्यांनाही अडचणी असतीलच पण काम तरी सुरू होतं... थोडं का होईना इनकम होतं..  हातावर पोट होतं त्यांचं काय??? यावेळी एकच गोष्ट चांगली होती ती म्हणजे घरच्यांचा सपोर्ट त्यांचं सोबत असणं.... 

भूक माणसाकडून काहीही करून घेऊ शकते... असं बऱ्याचदा ऐकलंय मी.. गुन्ह्यांचे प्रमाण वाढले नाही हे नशीब... अचानक माणसाच्या आयुष्यात कोरोना सारखा प्रसंग आला की धक्का बसतो... वरून माणूस कितीही हसतमुख दिसला तरी मेंटली तो कम्प्लीटली कोसळलेला असतो आणि अशा वेळेस ना काम..ना बाहेर कुठे फिरण्याची परवानगी.... अशातच कोणाला व्यसन लागतं किंवा शेवटचा पर्याय सुसाईड... व्यसन फक्त दारू किंवा Tobacco च असायला हवं असं अजिबात नाही बरं... जास्त जेवण जेवणे याच सुद्धा व्यसन असू शकतं किंवा मोबाईल फोनचा वापर हेसुद्धा एक व्यसनच की हो.. मध्ये पब्जी गेम बद्दल काय काय घडलं होतं माहितीये ना.. तर आपला आजचा विषय हाच आहे "मेंटल हेल्थ आणि फूड"


आता सगळं सुरळीत होतय पण त्यावेळी असा तसा नाही तर धोका जिवाचा होता.. प्रश्न होता नक्की करावं काय?? नोकरी वाचवावी का मुलांचे शिक्षण का म्हाताऱ्या आई-बाबांसाठीची जबाबदारी काही कळेनासं झालं होतं.. अगदी रोज हसतमुख असणारे चेहरे सुद्धा एका दडपणाखाली, टेन्शन खाली जगत होते.. सहाजिकच मग फ्रस्ट्रेशन, राग ओघाने आलाच.. आता गेलेले दिवस तर पुन्हा आणता येणार नाहीत, पण देव न करो परिस्थिती पुन्हा हाताबाहेर गेली तर.. कारण पुन्हा थोडे पेशंट वाढतायत... सरकार काय निर्णय घेईल सांगता येत नाही.. त्यामुळे पुन्हा सगळी शक्ती एकवटुन सुरू केलेला बिजनेस बंद पडला तर, त्याने आधी पेक्षा जास्त फ्रस्ट्रेशन येऊ शकतं.. मग अशावेळी ते कसं Handle करावं आहारात काही बदल करावेत का यावर थोडं बोलूया..


आपल्या भारताकडे असलेलं समृद्ध ज्ञान बाकीच्या देशांनी researchers नी आत्मसात केलं... त्याचा ते रोजच्या आयुष्यात वापरही करू लागले.. पण आपल्याला त्याची व्हॅल्यू अजूनही कळत नाहीये.. हेल्थ म्हंटलं की फक्त फूड कडे लक्ष देऊन चालत नाही.. बऱ्याच गोष्टी कनेक्टेड असतात... मन शांत ठेवायचा सगळ्यात महत्वाचा सोर्स म्हणजे "योगविद्या" मेडिटेशन... 

आपण कितीही नाकारायचा प्रयत्न केला तरी हाच एक सोर्स आहे आणि रामबाण उपाय सुद्धा... परदेशी लोकं भारतात येऊन येऊन योगविद्या शिकतात पण भारतीय काही शिकत नाहीत... बरं राहिलं योग करू नका, पण विदाऊट एनी इन्व्हेस्टमेंट व्यायाम तरी करा... जोर-बैठका, रनिंग, तेही नाही... जिम मध्येच जायचं असतं सगळ्यांना एसीमध्ये व्यायाम करायला... काहीजण खरच सीरियसली करतात.. त्या एसी मध्ये सुद्धा त्यांना घाम येतो.. पण काहींचा नुसताच शो ऑफ... ॲडमिशन घेतल्यावर मुष्किलीने आठवडाभर जायचं.. मग अचानक वेळ मिळायचा बंद होतो ह्याना.. झालं बोंबलला व्यायाम... मग एकदम मेंबरशिप संपताना आठवतं, आपण जिमला पैसे भरलेत आणि गेलोच नाही मग पुन्हा शेवटचे चार दिवस हजेरी लावायची...असा असतो बहुतेकांचा व्यायाम... त्यामुळे आपल्याला मेंटल हेल्थ स्ट्रॉंग ठेवायची असेल तर व्यायाम किंवा योग किंवा अगदी चालायचा व्यायाम करायलाच हवा... तोही नियमित.. काही कामं आपण नियमित करतोच ना; तसंच हे सुद्धा अंगवळणी पडायला हवं... दुसरी महत्वाची गोष्ट जी आपल्या शरीरासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे.. 

ते म्हणजे "पाणी" मेंटल हेल्थ चांगली ठेवायची असेल तर शरीराला आवश्यक तेवढं पाणी प्यायलाच हवं... डिहायड्रेशन मुळे डोकं दुखतंय, थकवा आलाय, असं होत राहतं... म्हणून दिवसातून कमीत कमी चार ते पाच लिटर पाणी प्यायलाच हवं... गरम, थंड काही भानगडी नकोत साधं पाणी प्या सगळ्यात बेस्ट... पाण्यासोबत काही पाणी जास्त असणारे पदार्थ सुद्धा खा म्हणजेच फळं ,भाज्या like कलिंगड, खरबूज, संत्र, अननस, काकडी, दूध, ताक, सूप, दही, टोमॅटो, सिमला मिरची, कोबी, द्राक्ष, नारळपाणी, उसाचा रस, पालक, सफरचंद, मशरूम, ब्रोकली, लिंबू आणि हो अंड सुद्धा... अंड्यात सुद्धा पाण्याचं प्रमाण जास्त असतं... बरं यामध्ये मी चहा, कॉफी आणि ड्रिंक्स लिहिलेले नाही त्याचे तोटे तुम्हाला माहितीच आहे so त्याप्रमाणे तुम्हीच ठरवा... 


फूड कडे आपण वळणारच आहोत पण त्यासोबतच कितीतरी गोष्टी तुमचे मेंटल हेल्थ स्ट्रॉंग रहावी यासाठी कनेक्टेड असतात... कोरोना मध्ये सगळ बंद होतं.. त्यानंतर बऱ्याच लोकांनी व्यवसाय सुरू केले.. पण गडबड अशी झाली की बहुतेकांचे व्यवसाय सारखेच होते सगळेच म्हणत होते आमचं प्रॉडक्ट बेस्ट.. आमचं जेवण घरगुती, हायजेनिक वगैरे आणि ते खरं असलं तरी मग पुन्हा प्रश्न आलाच नाही का, की घ्यायचं कुणाकडून?? त्यामुळे कॉम्पिटिशन वाढली आणि ह्या सगळ्यात जास्त त्रास जे आधीपासूनच घरगुती व्यवसाय करत होते आणि तो व्यवस्थित सुरूही होता अशा लोकांना झाला... कारण अचानक आजूबाजूला चार विक्रेते वाढले मग काय टेन्शन वाढलं आणि टेन्शन वाढलं की सगळ्यात आधी परिणाम होतो तो आपल्या झोपेवर स्ट्रॉंग मेंटल हेल्थ साठी "झोप" हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे 


आपली झोप डिस्टर्ब झाली की सगळ्यात आधी आपली रेगुलर लाइफ डिस्टर्ब होते... आपल्याला स्ट्रेस हँडल करण्यासाठी झोपेची गरज असते... ज्यांना झोप अपुरी पडते किंवा व्यवस्थित नसते ते Depressed असतात किंवा त्यांच्यात खुपं Anxiety असते... आपल्या भुकेचे नियंत्रण सुद्धा झोपेमुळे होतं.. ज्यांची झोप नीट नसते त्यांना लठ्ठपणा येऊ शकतो.. अपुऱ्या झोपेमुळे इम्युनिटी कमी होते आणि आजारपणं वाढतात... दिवसभरात आपण जी एनर्जी युज करतो ती झोपेत रिचार्ज होते, त्यामुळे सकाळी तुम्हाला प्रसन्न वाटतं आणि थकवा सुद्धा जाणवत नाही... दिवसभर आपला मेंदू काम करत असतो.... स्वयंपाक करताना कसं फूड वेस्ट हे होतच, तसंच मेंदूत सुद्धा वेस्ट जमा होत असतं आणि झोपेमुळे ते बाहेर टाकलं जातं.... पण झोप नसेल तर ते साचत जातं मग डोकेदुखी... अपुऱ्या झोपे मुळेच मायग्रेन सारखे आजार पाठीशी लागतात... म्हणून डोक्यातले सगळे विचार बाजूला ठेवून.. फोन, टीव्ही बंद करून सात ते आठ तास तरी शांत झोप घेतली की मेंटल हेल्थ एकदम स्ट्राँग होते.. 


चला आता फायनली जेवणाकडे वळूया...Mental Health छान राहण्यासाठी काहीही रॉकेट सायन्स नाहीये... फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे, मी या आधी खूपदा सांगितलय.. "समतोल आहार" बॅलन्स डाएट... 


माणसं स्ट्रेस मध्ये असली की कधीकधी एकच पदार्थ आधाशा सारखी खातात... तेवढं त्यांचं Appetite सुद्धा नसतं.... म्हणजे दरवेळी ते इतकं खात नाहीत पण अचानक किलोभर बिर्याणी सुद्धा संपवतील किंवा नुसती चॉकलेट्स खातील... चहा कॉफी पितील... काहीही त्यामुळे कोणाला कसला स्ट्रेस असेल तर ऍटलिस्ट घरातल्या मंडळींनी तरी त्यांच्या आहारावर नियंत्रण ठेवायला हवं... आजच्या या धावपळीच्या जीवनात आणि कोरोना सारख्या आजारांशी फाईट करण्यासाठी नुसतं Sanitizer, मास्क वापरून नाही चालायचं... "पौष्टिक आणि संतुलित आहार" खूप गरजेचा आहे... बरेचदा तुम्ही Observe केलं असेल.. डॉक्टर, तुम्ही आजारी पडलात की काही पथ्य पाळायला सांगतात... ते असं कधीही सांगत नाहीत की तुम्ही जे जेवता ते बंद करा आणि तिसरच काहीतरी खा... तुमच्या रोजच्या जेवणात ते थोडा बदल करतात ज्याने तुम्हाला योग्य ते पोषण मिळेल.. तुमची इम्युनिटी वाढेल आणि तुम्ही फार औषधं न खाता नॅचरली ठणठणीत व्हाल... जर तुम्ही मेंटली स्ट्रॉंग नसाल तर अशा वेळेस साधं-सोपं जेवण आपण जेवायला हवं... त्यातून शरीराला आवश्यक Carbs, Protein, Fats, Vitamin, Minerals मिळतील... स्पाईसी आणि मसालेदार तसेच जास्त गोड पदार्थ टाळायला हवेत... तळलेले पदार्थ सुद्धा क्वचितच ठीक असतात त्यापेक्षा भाजलेले, उकडलेले पदार्थ खावेत आणि मुख्य म्हणजे आपल्या शरीराला काय सूट होतं तेच खावं... म्हणजे कसं दुकानात शर्ट किंवा ड्रेस बरेच मिळतात पण टेलरने शिवलेले कपडेच आपल्याला व्यवस्थित बसतात... अर्थात त्यासाठी टेलर सुद्धा चांगला हवा हाहाहा😜 पण सेम फूड च सुद्धा आहे आपल्या शरीराला सूट होईल असाच आहार घ्या वेळ पडली तर डॉक्टरचा सल्ला घ्या...


आजकालच्या फास्ट लाईफ मध्ये आपण फास्ट फूड आणि जाहिरातींचा मारा असलेलं फूड नकळत खातोय त्यावर आपलं नियंत्रण राहिलेले नाही त्याचा परिणाम आपल्या शरीरावर मनावर सतत होत असतो... म्हणून सांगतो मेंटल हेल्थ आणि शरीर स्ट्रॉंग ठेवायचं असेल तर उत्तम संतुलित आहार, छान झोप आणि नियमित व्यायाम खूप गरजेचा आहे 


आज इथेच थांबतो ऑल रेडी खूप मोठा झाला आर्टिकल... जाता जाता सांगतो 

शरीर तंदुरुस्त असेल तर मन खंबीर आपोआप होईल... काळजी घ्या🤗❤😇😇

©Chef Aniruddha Ranade 

Food Stylist | Recipe Developer | Consultant | Food Blogger

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट