Valentine's Day
नमस्कार,🙏🏻🙋🏻♂️
आज आपण जरा वेगळ्याच विषयाने सुरुवात करूया... एखाद्या गोष्टीचा आपण कधी कधी एकाच दृष्टिकोनातून विचार करत असतो आणि मत बनवून मोकळे होतो... फेरविचार किंवा कधीकधी समोरचा काय म्हणतोय याकडेही लक्ष देत नाही.. माझा विषय नेहमीप्रमाणे फूड रिलेटेडच आहे, पण म्हटलं याही विषयावर आपलं मत या प्लॅटफॉर्मवरून तुमच्यासमोर मांडवं..
Western Culture आपण स्वतःहून आपलंसं केलय किंवा कराव लागलय कारण काहीही असो तो आपल्या जीवनाचा आता एक भाग झालेला आहे... यातलाच एक भाग म्हणजे त्यांचे सण आणि आत्ताच जवळ येत असलेला व्हॅलेन्टाईन्स डे... बऱ्याच जणांना म्हणजे ऍटलिस्ट तरुण पिढीला हा दिवस पटतो, पण त्याहून जास्त जणांना पटत नाही... पटत का नाही, याच्या उपहासाने केलेल्या पोस्ट, मेसेजेस बरेच फिरत असतात.. पण त्यातही पुन्हा as A Chef म्हणून किंवा तुमच्यापैकी कोणीही जे वेस्टन फुड or कल्चर रिलेटेड काम करतात त्यांना आणि बहुदा सगळ्यांनाच माझी ही बाजू नक्कीच पटेल...
Valentine's Day आणि त्या आधीचे काही वेगवेगळे दिवस आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यासाठी सेलिब्रेट करतात... आता यात वादाचे बरेच मुद्दे आहेत पण आपण याची दुसरी बाजू पाहूया... मी जे काही लिहितोय त्याचा तुम्ही एक बिझनेस या दृष्टीने विचार करावा असा माझा हेतू आहे... प्रत्येक सणाला काहीतरी खास पदार्थ ठरलेला असतो आणि जरी नसला तरी आपण काही ना काही स्पेशल करतोच... बरं आपण आपल्या सणांना बाहेर जेवायला जातो का हो??? तर अजिबात नाही.. घरीच आपला राजेशाही थाट असतो.. मग रेस्टोरेंट कधी चालतात हो?? तुम्हीच सांगा... अहो इतर सणांना😊 बर्थडे, एनिवर्सरी हे काही आता सणा पेक्षा वेगळे राहिलेले नाहीत.. या दिवशी किंवा ख्रिसमस, न्यू इयर, ईस्टर संडे, व्हॅलेंटाईन्स डे, आशा दिवशी आपण काही घरी नैवेद्याचा स्वयंपाक नाही ना करत.... जस दिवाळीचा फराळ, उकडीचे मोदक, तिळगुळ यावर कोणाचे तरी व्यवसाय अवलंबून असतात तसेच Western सणांवरही लोकांचे व्यवसाय अवलंबून आहेत... ख्रिसमस, बर्थडे, एनिवर्सरी ला केक... न्यू इयर ला स्पेशल बफे... ईस्टर ला चॉकलेट्स... व्हॅलेन्टाईन्स डे दरम्यान गुलाबाच्या फुलांचे गुच्छ, चॉकलेट्स आणि गिफ्ट्स अशा सगळ्या गोष्टींचा व्यवसाय करणारे कित्येक लोक आहेत; आपलीच... माझ्यासारखे Chefs आहेत जे रेस्टॉरंटमध्ये गर्दी व्हावी यासाठी थांबलेले असतात... त्यांच्या बाजूने कधी कोणी विचार केलाय का??
निगेटिव्ह विचार करण्यामागे थोडा पॉझिटिव्ह विचारही करा पटतय का मी म्हणतोय ते??? आपण जसे आपल्या सणांना पदार्थ करून विकतो तसंच या सणांना... गणपतीला चॉकलेट मोदक यावर कोणीही ऑब्जेक्शन घेतलेलं नाही मग व्हॅलेन्टाईन्स डे ला लोकांनी आपल्या आवडणाऱ्या व्यक्ती साठी गिफ्ट्स, केक, चॉकलेट, रोजेस दिले तर बिघडतंय कुठे... बाकी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात जोडीदार कसा आहे हा ज्याचा त्याचा किंवा फार तर त्यांच्या फॅमिलीचा प्रश्न आहे त्यावर कमेंट करणारे आपण कोण... म्हणून मला असं वाटतं की ह्या दिवसांचा आपण "बिझनेस साठी चांगला दिवस" म्हणून विचार करावा आणि जोरदार सेल करावा😁😁😁
आता आज थोडं खाण्याबाबत नाही तर, न खाण्याबाबत बोलूया😅 म्हणजे उपवासा बद्दल..
आपण "उपवास" या शब्दाची संकल्पना, त्याचा मेन हेतूच बदलून टाकलाय...😂 मी आपलं सर्वसाधारण जे दिसतं त्यावर बोलतोय... बरं! अशी ही लोकं आहेत जी अगदी निर्जल उपवास करतात... तर काही जणं एका वेगळ्याच थाटात "उपास" करतात.. Chef ला उपवास करणं कठीणच So, मी त्या भानगडीत पडतच नाही.... गंमत म्हणजे आपण चुकतोय हे आपल्याला माहिती असतं पण तरीही आपण चुकतो अगदी ठरवून... हाहाहा!!!
हल्ली उपवास म्हणजे रोजच्या जेवणात जरा बदल म्हणून वेगळ्या पदार्थांचा घरात बफेच असतो... उपवास याची फोड केली तर उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे सानिध्य किंवा वास्तव्य अर्थात देवासाठी... आपल्या रोजच्या धावत्या आयुष्यात देवासाठी एक दिवस द्यावा, त्याची थोडी प्रार्थना करावी, पोटाला शरीराला फार कष्ट न देता सात्विक आहार करावा आणि शरीराने मनाने देवाजवळ रहावं हा यामागचा उद्देश बहूदा असावा नाही का..?? पण आपल्या उपासाची व्याख्याच वेगळी सर्वसामान्य माणसाला कुठे एवढं शक्य होतय🤔😜 त्याचा उपास म्हणजे सकाळी साबुदाण्याची खिचडी, मग ऑफिसला जाताना पोट शांत राहावं म्हणून ताक पिऊन निघायचं.. दुपारच्या जेवणात बटाट्याची भाजी राजगिऱ्याची भाकरी किंवा भगर आणि शेंगदाण्याची आमटी.. चहा सोबत वेफर्स, चिक्की वगैरे.. संध्याकाळी घरी गेल्यावर शुद्ध तुपात तळलेले साबुदाण्याचे वडे आणि रात्री उपास सोडायचा म्हणून सात्विक आणि चौरस आहार... बरं या सगळ्यात देवाचं नाव घ्यायला वेळच मिळत नाही ऑफिसमध्ये इतकं काम असतं.. ट्रॅव्हलिंग मध्ये प्रचंड ट्राफिक त्यामुळे देवाचं नाव घेणार कधी.. पण ह्या सगळ्यात आपला उपास आहे हे बाकी लक्षात असतं... नेमकं त्याच दिवशी हॉटेलमध्ये जावसं वाटतं... मग आठवतं अरेच्चा!! आपला तर उपास आहे मग लिंबूपाणी नाहीतर फ्रूट ज्यूस पिऊन बाहेर पडावं लागतं.. कोणी या दिवशी पार्टी वगैरे तर ठेवत नाहीये ना हीच सारखी धाकधूक... डोक्यात आज उपास आहे हे चालूच असतं, त्यामुळे यातही आणखी एक मधली वेळ काढून बॅग मध्ये असणारं उपासाच्या चिवड्याच पॅकेट उघडून संपवल जातं...
पूर्वी रोजच काम असायचं पुरुषांनाही आणि बायकांनाही. मग दोघांनाही कामातून आराम, शरीराला आराम देऊन देवाच्या सानिध्यात एक दिवस घालवावा म्हणून कदाचित उपवास ही संकल्पना होती कंद, फलाहार, दूध, यावरच पोटाची क्षुधा भागवायची... त्यामुळे घरातल्या अन्नपूर्णेला सुद्धा आराम मिळायचा... पण यातलं हल्ली काहीच होत नाही... सॉरी मी नेहमीच तुम्हाला विचार करायला लावतो पण तथ्य वाटतय की नाही..? आपण कुठेतरी चुकतोय.. एकदम नाही थोडा थोडा तरी यात बदल व्हायला हवा.. बाकी तुम्हाला काय वाटतं दोन्ही विषयांबद्दल त्यासाठी मी आणि कमेंट बॉक्स नेहमीच अवेलेबल आहोत आजचा लेख कसा वाटला नक्की सांगा आणि हो विचारही करा...
माझ्या सगळ्या मित्र-मैत्रिणींना हॅप्पी व्हॅलेंटाईन्स वीक❤❤🤗😇😇🙏🙏
©Chef Aniruddha Ranade
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा