Be Unhealthy Sometimes

 Hello... 


तुम्ही माझ्या "Food From States" Series ला खूप छान प्रतिसाद देताय त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार.... 

या कोरोनाच्या भयावह बातम्यांपासून हे आर्टिकल्स काही अंशी का होईना माईंड डायव्हर्ट करायचं काम करत असावेत... मला लिहितानाही एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात हे आणि मलाही ते आवडायला लागलय... आज पुन्हा मी माझ्या सिरीज ला एक स्वल्पविराम देतोय... आज थोड्या वेगळ्या विषयावर लिहिणारे.... दिवसभरात व्हाट्सअप, फेसबुक वर इतक्या पोस्ट येत असतात त्यातूनच कधी कधी एखादा विषय सुचतो मग तो विसरायच्या त्यावर लिहिलेलं बरं नाही का... या कोरोनामुळे सगळेजण खूप Precautions घेतायत.. घ्यायलाच हवी गरजच आहे ती सध्याची, पण एक वर्ष आपण रिवाईंड करूया... कोरोनाचं तिकडे काम सुरूच होतं आणि सगळे घरी असल्यामुळे किचनही जोरदार सुरू होतं.... चांगलं व्यवस्थित जंक फूड आपण घरबसल्या खात होतो... आता आपला घरचा डॉक्टर म्हणजे आई नाही तर बायको... त्यांच सगळ्या गोष्टींकडे बारीक लक्ष असतं... सगळ्यांच्या पोटात सगळे पौष्टिक घटक जावेत, सगळ्या भाज्या, कडधान्य, प्रोटीन जावी यासाठी नेहमीच त्यांचे प्रयत्न सुरू असतात... पण माणसाची जीभच ती, अनहेल्दी फूड बघून चेकाळणारच की हो... म्हणूनच आज मी हा विषय घेतलाय... तर आज आपण एकंदरीत "अनहेल्दी फूड" विषयी बोलणार आहोत ज्याला सर्वसाधारणपणे आपण जंकफूड असं म्हणतो आणि त्यानंतर एका फेमस पदार्थ विषयी बोलणार आहोत 

"मॅगी" सबके भूक  का सहारा😁😁


जंक फूड म्हणजे ते शब्दशः कचरा असतं असं नाही... जंक फूड म्हणजे ज्यात पौष्टिकतेचं प्रमाण कमी आहे असे पदार्थ... या पदार्थांमध्ये Sugar, Fats, आणि Salt यांचे प्रमाण जास्त असतं या पदार्थांमुळे शरीराला उपयुक्त असं काहीच मिळत नाही पण या पदार्थांचे फ्लेवर्स आणि ॲट्रॅक्टिव्ह लूक मुळे ते पदार्थ आपल्याला खावेसे वाटतात आणि हे पदार्थ एकावेळी प्रमाणाबाहेर खाल्ले गेले तर शरीर अस्वस्थ होत... आपलं शरीर आपल्याला सांगत असतं की, बाबा रे प्रमाणात खा बरं का.... नाहीतर ऍसिडिटी, पोट दुखी, डोकेदुखी वगैरे काहीतरी होईल.. पण ऐकेल तो माणूस कसला... ओsss म्हणून खायचं आणि मग जंक फूड वाईटच असतं म्हणून बसायचं हे खरोखर चूक आहे... हि मंडळी आपलं चुकतंय नाही का मग यावर त्यांचा उपाय काय तर ते मूळ रेसिपीच बदलतात.. पण खायचं मात्र सोडत नाहीत.... हल्ली सगळ्याच वेस्टन पदार्थांचं इंडियन वर्जन झालंय.. पण आपल्याकडे जे ऑथेंटिक पदार्थ आहेत त्यात  बदल चालत नाहीत.... आता ब्रेड किंवा केक हे काही इंडियन पदार्थ नव्हेत तरी त्यांच्या रेसिपी मध्ये अल्टरेशन करून आपण खातो.... तुम्ही नीट Observe केलंत तर कोणत्याही Savoury म्हणजे जे पदार्थ डेझर्ट मध्ये मोडत नाहीत असे, त्यात खारट, तिखट, आंबट आणि गोड ह्या सगळ्या चवींचा बॅलन्स असतो हा बॅलन्स खूप महत्त्वाचा आहे.... तसंच काही पदार्थ उत्कृष्ट प्रतीचे बनवण्यासाठी त्याचे मेन इन्ग्रेडियंट रेसिपी प्रमाणे असू द्यावेत... त्याने शरीराला फक्त पोषण कमी मिळणार आहे आणि ते भरून कसं काढायचं तर healthy Accompaniment आणि healthy Topping/Stuffing ने.... पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक साहित्याचे काही गुणधर्म असतात... हे त्या-त्या प्रदेशातल्या हवामानानुसार ठरलेले असतात... So ते बदलू नयेत...  त्याऐवजी, पदार्थांसोबत काहीतरी पौष्टिक खाऊन तुम्ही हेल्थ मेंटेन ठेवू शकता... आता बरेच जण पाव खात नाहीत का कारण मैदा...  त्यासोबत तुम्ही मिसळ किंवा भाजी खाल्लीत तर नक्कीच अपाय नाही कारण पावातून न मिळणारे पोषण तुम्हाला त्या इतर पदार्थांमधून मिळेल... पिझ्झा च पण तसच आहे... थिंक ऑफ हेल्दी टॉपिंग इनस्टीड ऑफ चेंजिंग बेस रेसिपी... नुसता उकडलेला पास्ता खाल्ला तर त्रास होणार त्यासोबत पास्ता ला कॉम्प्लिमेंट करणारा सॉस, प्रोटीन/भाज्या असल्या तर ती एक हेल्दी डिश होईल...


स्टफिंग चा उत्तम उपयोग आहे सरप्राईज साठी... बाहेरचं कव्हर कशाचाही असलं पण आतलं स्टफिंग हेल्दी असेल तर ओव्हरऑल पदार्थांनी शरीराला पोषणंच मिळेल... 


विचार करा मैदा, तेल, तूप, बटर,पनीर, चीज आणि मोस्ट इम्पॉर्टन्ट साखर टाळण्यापेक्षा किंवा आहारातून वगळण्या पेक्षा ते प्रमाणात खा आणि त्यासोबतचे पदार्थ पौष्टिक असले तर अनहेल्दी फूड पण हेल्दी होतं....पटतंय का??? नसेल तर प्रश्न विचारा कमेंट बॉक्स तुमचाच आहे... आणि पटलं तर अनहेल्दी सोबत हेल्दी कॉम्बिनेशन जोडून पोषण मिळवा... उगाच रेसिपी बदलायच्या भानगडीत पडू नका... चला आता सगळ्यांच्या आवडत्या आणि जगप्रसिद्ध मॅगी विषयी बोलूया यातही हेल्दी फॅक्टर कमीच आहे पण तुम्ही यात वेगवेगळ्या भाज्या, मशरूम, अंड, चिकन, वगैरे घालून याची न्यूट्रिशन व्हॅल्यू वाढवू शकता...


स्वस्त आणि मस्त अशी आपल्या मॅगी ची ओळख लहान मुलं आणि त्यांच्या कुटुंबियांना आवडणाऱ्या मॅगीवर अनेकांचं प्रेम आहे..... प्रचंड भूक लागली आणि घरात कोणतीही भाजी शिल्लक नसेल किंवा तितका वेळ उपाशी राहणं अशक्य असेल तर थेट मॅगी बनवलं जातं.... तुम्ही मॅगीसोबत फक्त पाणी आणि सोबतचा मसाला टाकला तरी भारी लागतं त्यामुळे फक्त देशातच नाही तर जगभरात या मॅगीला प्रचंड मागणी आहे. पण हे मॅगी अस्तित्वात कस आलं??? मॅगी आतापर्यंत  लोकांची All Time फेव्हरेट आहे... 

मॅगी 1872 साली स्वीत्झर्लंडमध्ये अस्तित्वात आली.... Western Countries मध्ये हा काळ अत्यंत धावपळीचा होता. याच काळातIndustrial Revolution सुरु होतं.... पुरुषां सोबत बायकासुद्धा मिलमध्ये काम करायच्या. मिलमध्ये दिवसभर काम केल्यानंतर अंगात जीव कुठला राहतोय त्यात कामाची वेळही जास्त होती त्यामुळे बायकांना  स्वयंपाक करण्यासाठी पुरेसा वेळ मिळायचा नाही. बायकांच्या या समस्येवर Business women ज्यूलियस मॅगी यांनी तोडगा काढण्याचा निर्णय घेतला.... यासाठी त्यांनी आपल्या एका मित्रासोबत खूप प्रयत्न केले.... त्यांच्या या प्रयत्नांच यश म्हणजे मॅगीची निर्मिती.... अशाप्रकारे या Industrial Atmosphere मधे कामाच्या व्यापाच्या कारणाने मॅगीचा जन्म झाला.... विशेष म्हणजे ,"ज्यूलियस मॅगी" यांनी आपलंच आडनाव या पदार्थाला दिलं....


सगळ्यात आधी जर्मनीत 1897 साली मॅगी नूडल्स मार्केटमध्ये आणलं गेलं.... ज्यूलियस यांनी मॅगी सोबत आणि बरेच असे खाद्य पदार्थ आणि सूप बनवले होते. मात्र, दोन मिनिटात तयार होणाऱ्या मॅगीला लोकांनी जास्त पसंती दिली. 1912 साली अमेरिका आणि फ्रान्स मधे मॅगी पोहोचल. पण नेमकं याच वर्षी ज्यूलियस देवाघरी गेल्या.... याचा परिणाम मॅगीच्या व्यवसायावर पडला.... पण तरीही  व्यवसाय मात्र सुरुच राहिला.शेवटी 1947 साली नेस्टले कंपनीने मॅगीला विकत घेतलं आणि त्यानंतर मॅगी घराघरात पोहोचली.... मात्र, 1947 नंतरचा प्रवासही चढउतारचा राहिला. नेस्टलेने 80 च्या दशकात मॅगीचे नूडल्स भारतीय मार्केटमध्ये आणले. मात्र, भारतातला तो काळ खूप चॅलेंजिंग होता.... कारण गरीब लोकांना हे मॅगी फाड काही माहितीच नव्हतं फक्त शहरात राहात असणाऱ्यांनाच हा पदार्थ माहित होता.... पण, तरीही मॅगीचा प्रवास सुरुच राहिला...


हळूहळू बदलत्या लाईफस्टाईलने लोकांना मॅगीकडे आकर्षित केले. त्याला  टीव्हीवर येणाऱ्या मॅगीच्या जाहीराती जोड होती... दोन मिनिटात मॅगी तयार, अंस सांगणारी जाहिरात, त्यात भर म्हणजे भारतीय संस्कृतीनुसार दाखवलेली आई आणि मुलं. त्यामुळे लोकांना ही जाहिरात जास्त जवळची वाटली. विशेष म्हणजे 1991 च्या Globalization ने मॅगीला भरपूर यश मिळवून दिलं....सगळ्यांना माहितीच आहे काही वर्षांपूर्वी मॅगीवर ban आला होता... त्यामुळे मॅगी दिसेनाशी झाली होती. मात्र, निर्बंध मागे घेतल्यानंतर मॅगी मार्केटमध्ये पुन्हा धावायला लागली. लोकांनी मॅगीवर प्रचंड प्रेम केलंय आणि ते आजही करतायत... काय मग कशी वाटली मॅगीची स्टोरी पण एक गोष्ट विसरू नका कोणतीही गोष्ट प्रमाणात खाल्लेलीच चांगली...


हेल्दी खा.. हेल्दी राहा.. काळजी घ्या...

© Chef Aniruddha Ranade

Head Chef,IEHPL

Food Stylist | Consultant | Food Blogger

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट