Food From State - Goa
Hello..hieee
माझ्या नवीन कल्पनेला आणि सिरीज ला काय अमेझिंग रिस्पॉन्स दिलायंत तुम्ही... किचन मध्ये एकाच मेन इन्ग्रेडियंट वर प्रयोग करून त्याचच वेगवेगळ्या पदार्थांमध्ये रुपांतर करतो तसंच काहीसं माझं सध्या आर्टिकल्स च्या बाबतीत झालंय... रोज काहीतरी नवीन विचार डोक्यात येतात आणि वहीच्या पानावर प्रकट होतात... या कठीण काळात सुद्धा लिहायचं सुचतय नशीबच म्हणायचं... गुजरातची सैर झाली आता पुढच्या शेजार्यांकडे जायचं का??? चला मग जाऊ कर्नाटक ला😊 अं.... नाही नाही काही तरी चुकतंय म्हणजे आपण त्याला महाराष्ट्राचा भागच मानत आलोय पण तरीही वेगळे ते ही वेगळं स्टेट आहे काय करणार... लक्षात आलंय का?? Brother From Another Mother... सारखं हे स्टेट एकदम जिंदादिल Always Happening मी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या "गोव्या" बद्दल बोलतोय...
लहान-मोठे सगळ्यांचं फेवरेट स्टेट... त्यातल्या त्यात यंगस्टर्स, बॅचलर्सच आवडतं डेस्टिनेशन एकदा तरी सगळ्यांनी मिळून गोव्याला जायचा यांचा प्लान असतोच... भरपूर फिरायचं आणि मनसोक्त खायचं प्यायचं मजा करायची... माझा भाऊ गोव्याला शिकायला होता त्यामुळे त्याला भेटायचं कारण काढून तीन-चार वेळा तरी मी एकट्यानेच गोवा एक्सप्लोर केलंय... तिकडचं वातावरणच वेगळं असतं... एकदम शांत निवांत आणि मोस्ट इम्पॉर्टन्ट स्वच्छ.... आजूबाजूला विदेशी पर्यटकांची रेलचेल असते त्यामुळे एक वेगळाच फिल येतो... तो असा शब्दात सांगणं कठीणच आहे प्रत्यक्ष अनुभवायला हवा... जाऊदे जास्त स्वप्न रंगवायला नकोत कोरोना चा काळ आहे नाहीतर लेख वाचून तुम्हाला जावंसं वाटायचं हाहाहा😜
Let's get back to Goan Cuisine गोव्याची खाद्य संस्कृती पोर्तुगीज आणि लोकल हिंदू अशा दोन कल्चरचं एक वेगळंच कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे ख्रिश्चन आणि हिंदू अशा दोन वेगवेगळ्या खाद्यसंस्कृती इथे आहेत... ह्या जरी वेगळ्या असल्या तरी दोघांमध्ये बरंच साम्य आहे... त्या कुठे ना कुठे एकत्र येतातच आणि त्यांचं हेच कॉम्बिनेशन गोवन फूडला स्पेशल बनवतं...
गोवा म्हटलं की सगळ्यात आधी आठवंत ते म्हणजे Beach तो अथांग समुद्र... गोव्याला जातोय म्हटलं की येताना काजू घेऊन ये रे हे ऐकायला येणार असं समजून जायचं... पोर्तुगीजांनी गोव्यावर बरीच वर्ष राज्य केलं.. त्यामुळे त्याचा इन्फ्ल्यून्स तिथे अजूनही आहे.... पोर्तुगीज आपल्यासोबत येताना Business साठी म्हणा किंवा खाण्यासाठी म्हणा टोमॅटो, बटाटा, काजू, अननस, पपई, मिरची, सारखे भरपूर पदार्थ गोव्यात घेऊन आले... सुरवातीला हे पदार्थ स्वीकारणं जरा अवघड गेलं पण हळु हळु हे पदार्थ इथल्या लोकांच्या स्वयंपाकघरात दिसू लागले आणि काळानुसार ते त्यांच्याच खाद्यसंस्कृतीचा भाग बनले... पोर्तुगीजांनी गोव्यात आणलेला महत्वाचा बदल म्हणजे ओव्हन मध्ये बेक केलेला पाव अर्थात ब्रेड... विशेष म्हणजे इथे गव्हाचा ब्रेड बनतो Yeast ऐवजी नीरेचा (Toddy) चा वापरही पोर्तुगीजांनी पहिल्यांदा केला... आजही ख्रिस्ती गोवेकर Toddy Vinegar चा वापर मांस, मासे/भाज्या, लोणची Preserve करण्यासाठी किंवा आंबट चवीसाठी करतात Toddy विनेगर हेसुद्धा नीरेपासूनच बनतं...
मी जसा जसा लिहितोय तशी गोव्यात केलेली मजा आठवतेय... मी गोव्याच्या बीचवर पोहोचलो सुद्धा😅😁 कोरोना नाही आणि काही नाही... मी आणि समोर अथांग समुद्र.. संध्याकाळची वेळ.. सूर्य मावळतीला आलाय... आहाहा!! What a feeling..😌😌😌 चला पुन्हा येऊया नाही का😝 गोव्यात गेल्यावर ठरलेला ब्रेकफास्ट म्हणजे बटाट्याची पातळ भाजी पुरी आणि मिरची भजं एका तरी नाष्ट्याला हे ठरलेलं असायचं... ब्रेकफास्ट मेन ना नंतर आपण फिरायला मोकळे....
गोवेकर वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळे पदार्थ बनवतात.. म्हणजे रोजच्या जेवणासाठी वेगळे.. सणावाराला, धार्मिक कार्यक्रमांना वेगळे.. देवाचा नैवेद्य वेगळा.. म्हणजे थोडक्यात सगळं आपल्या सारखंच... शेवटी आपले जिवाभावाचे शेजारी ते; वेगळे कसे असतील नाही का...
रोजच्या जेवणात भात, करी, मासे /भाजी आणि लोणचं जेवणाच्या शेवटी सोलकढी ही हवीच... कधी नारळाचं दूध घालून केलेली किंवा कधी नुसतीच... गोवेकरांच मुख्य अन्न म्हणजे भात, नारळ आणि मासे जे इथे पिकतं सुद्धा आणि विकतं सुद्धा... मासे खाण्यात ही मंडळी अव्वल... बरं मासे, करी किंवा फ्राय करून नाही.. तर माशाचं लोणचं आणि सलाडही इथे घरी बनवलं जातं... हिंदू लोकं सणावाराला मासे खात नाहीत पण इतर वेळी मात्र ते हवेच... गोव्यात तांदळाचं वर्चस्व जास्त त्यामुळे गव्हाचा वापर फार कमी इथे गव्हाचा ब्रेड बनतो...
ख्रिश्चन लोकांमध्ये मांसाहार जास्त सोरपोटेल, सॉसेजेस काफ्रीएल बालचाव असे मटण, Pork, Beef असलेले पदार्थ खातात... हिंदूंच्या मांसाहारात मुख्यतः चिकन आणि अंडी असतात.. मासे भरपूर असतातंच त्यामुळे मटण फार कमी प्रमाणात खाल्लं जातं...
मासे स्वर्गप्राप्ती वगैरे करून देतात म्हणे.. हाहाहा😁😁 Fish Curry, तळलेला माशाचा तुकडा, भाताचा ढीग आणि शेवटी सोलकढी बासं... इतकं मिळालं की गोवेकर सुखी😌 त्याला ते भाजी, कोशिंबिरीची अडगळ ताटात मुळीच आवडत नाही... यातच तो खुश असतो.. सोमवार आणि गुरुवार हिंदूंमधे शाकाहारी जेवायची पद्धत आहे.. तोंड वाकडं करून नाईलाजाने पोटात ढकलाव्या लागणाऱ्या शाकाहारी पदार्थांमध्ये कडधान्य, भाज्या, तसेच कापां म्हणजे तांदुळाचा रवा लावून तळलेले भाज्यांचे तुकडे Slices लोणचं आणि भात असतोच.. हवाच.. बऱ्याच भाज्या घालून केलेलं खतखतं, बांबूच्या कोंबाची भाजी, मशरूम आणि ओल्या काजूची भाजी हे पदार्थ गोवेकरांच्या पानात हमखास दिसतात... स्वयंपाकात मसालेही फारसे वापरले जात नाहीत... फक्त चिकन आणि मटण यालाच काय तो मसाला घालायची पद्धत... पोर्तुगीजांचे राज्य असताना व्यापारावरच्या निर्बंधांमुळे सामान्यांना मसाल्याचे पदार्थ खूप महागात पडायचे, पण पोर्तुगीज हे विसरले की ते भारतात आहेत.. इथल्या बायका हाडाच्या सुगरण असतात.. 'पाण्याला फोडणी दिली तरी उत्तम चव लागते'... मग मसाल्यांच काय टेन्शन... पण आजही इथे तेल आणि मसाले कमीच वापरले जातात.. बरेचसे पदार्थ नारळ, कांदा, मिरची, धने, मिरी, आणि आमसूल इतकंच वापरून केले जातात... इथे दुधाचा वापरही फार कमी होतो... सणासुदीला जे गोड पदार्थ करतात त्यातही नारळाचं दूध वापरलं जातं... मणगणे, पातोळ्या आणि रस वगैरे तसंच साखरेपेक्षा इथे गुळाचा वापर जास्त होतो...
ख्रिश्चन सणासुदीला बेबींका नावाचं चविष्ट Dessert बनवतात तेही नारळ गूळ वापरूनच केलं जातं... तसेच हिंदू लोकं पातोळ्या, मणगणे आणि नेवऱ्या, शंकरपाळी, कल कल, दोदोल,असे गोड पदार्थ करतात... वाफवलेले सांदण मुगाचं कढंण, तांदूळ मुगाची गोड खिचडी, गोड पोहे, हेही पदार्थ फेमस आहेत... गावठी ब्राऊन ब्रेड, उंडे, हे ब्रेकफास्ट आइटम सुद्धा बरेच खाल्ले जातात..
तुम्हाला सांगतो Bebinca With आईस्क्रीम एक नंबर लागतं.... दिवाळीत इथे वेगवेगळ्या प्रकारचे पोहे बनतात... देवाला नैवेद्य दाखवून एकमेकांकडे हे पोहे खायला जाण्याची इथली जुनी रीत आहे... आणि हो इथली काजूची फेणी विसरून कसं चालेल यात बरेच औषधी गुणधर्म असतात...
काय मग आवडली का गोव्याची सफर??वाटतंय का जावंसं?? घरी बसूनच मस्त फिरल्याचा Feel आला असेल तर नक्की सांगा...
काळजी घ्या आणि healthy खा आणि healthy राहा...
© Chef Aniruddha Ranade
Food Stylist | Consultant | Food Blogger
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा