Food From State - Gujrat

 Hie

नमस्कार कसा चाललाय सगळ्यांचा लॉकडाऊन आता तर काय सवयच झाली असेल या सगळ्याची??.. मला वाटतं बऱ्याच जणांना सगळ्या गोष्टी अंगवळणी पडल्यात त्यामुळे आता तरी परिस्थिती सुधारेल असं वाटतंय... केवढे जोक्स, Memes, काय नि काय... पण यावर उपायही आहेत तेही याच सोशल मीडिया वरून लक्षात आलंय... कोरोनाचं वाढतं प्रमाण बघता कित्येक फूड व्यावसायिकांनी कंबर कसली आणि घरगुती पद्धतीचं कमी तिखट, कमी मसालेदार, जेवणाचे डबे देण्याची अगदी घरपोच व्यवस्था केली... काहींनी मोफत ऑक्सीजन सिलेंडर मिळवून दिले... तर कोरोना होऊन बरे झालेले ब्लड प्लाज्मा देण्यास पुढे यावेत यासाठी आवाहन केलं... कितीही टोकाचं राजकारण झालं तरी माणुसकी अजूनही शिल्लक आहे हे या सगळ्यातून लक्षात येतं... माझ्या या आर्टिकल मधून मी त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि ज्यांना बोर होतय त्यांना सॉरी म्हणून आजच्या विषयाकडे वळतो.... 


आजपर्यंत आपण कितीतरी वेगवेगळे विषय पाहिले तेही फक्त फूड रिलेटेड... मागच्या लेखात मला एक कमेंट आली होती की तुम्ही भारतातील वेगवेगळ्या प्रदेशातील, राज्यातील खाण्याबद्दल लिहा... डोक्यात विचार आला चांगली आहे की कल्पना.. म्हणूनच "FOOD FROM STATES" अशी एक नवी SERIES सुरु करतोय... लॉकडाउन संपेपर्यंत थोडीफार राज्य तरी कव्हर होतील... पहिलं स्टेट केंद्राचं घ्यायला हवं😜So आज आपण आपले शेजारी गुज्जुभाईंच म्हणजे "गुजराती फूड" विषयी बोलूया... 


केम छो म्हंटलं की मजामा हे उत्तर आपसूकच येत... भारतीय खाद्यसंस्कृती जगभरात प्रसिद्ध आहेच पण त्यातही विशेष राज्यांनी बाजी मारलीये... गुजरात हे त्यातलंच एक.. आज गुजराती फूड जगभरात प्रचंड लोकप्रिय आहे, त्यामुळे गुजराती पदार्थ आपलेसे करून शिकण्याचा बऱ्याच जणांचा प्रयत्न असतो... नुसतंच ढोकला, ठेपला आणि फाफडा नाही तर त्या पलीकडे सुद्धा गुजराती खाद्यपदार्थ आहेत बरं का😁 याच I mean दाल ढोकली, हांडवा यासारख्या रेसिपीज् भारतातच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात... असो चला मग, आता थोडं गुजरात फिरून येऊ... फिजिकली जाता येणं तर शक्य नाही शब्दांच्या जोरावर तरी जाता येतय का पाहूया... 


पहिला स्टॉप वडोदरा इथे आपल्याकडेच मिळणारी एक गोष्ट फेमस आहे बाकरवडी... आता यात पुन्हा वाद बाकरवडी महाराष्ट्राची की गुजरातची?? पण यावर रिसर्च केला तेव्हा कळलं की वडोदर यामध्ये "जगदीश फरसाण" नावाचं दुकान आहे... 1970 मध्ये पुण्यातले चितळे तिथे गेले होते... त्यांनी जगदीश फरसाण वाल्यांकडे बाकरवडीची चव घेतली त्यांना ती खूप आवडली.. मग त्यांनी ती महाराष्ट्रातही प्रसिद्ध केली चितळेंची बाकरवडी आता जगप्रसिद्ध आहे.. पण या दोन्हींचा चवीत मात्र फरक आहे हं!! पुण्यातील बाकरवडी जरा तिखट आहे.. गुजराती लोक गोड खाणारे त्यामुळे जगदीश फरसाण वाल्यांकडची बाकरवडी जरा गोडसर असते... हल्ली यातही पुष्कळ वेरिएशन चाखायला मिळतात... वडोदरात उसळ सुद्धा छान मिळते तीसुद्धा ट्राय करा... आपल्या उसळ किंवा मिसळ पाव सोबत ही डिश रिलेट करते... अहमदाबाद मधे 'शेव खमणी' खूप पॉप्युलर आहे... हा पदार्थ तुम्हाला फक्त इथेच खायला मिळेल... चलो अब सुरत चलते है... इथे आहे बहुतेकांची आवडती, बऱ्याच घरांमध्ये बनणारी डिश 'उंधियु' आहाहा!!! ऐकूनच खावासा वाटतोय.... सुरत मधली अजून एक फेमस डिश म्हणजे 'लोचो'... ही डिश बनवण्यासाठी खूप सिम्पल आहे... काही लोचा नाही... खमण साठी लागणारं साहित्य घेऊन उकड काढायची, ती कुस्करायची, त्यात वरून टोमॅटो, कांदा, शेव, मसाला, घालायचा की 'लोचो' खायला तयार... सुरतहून पुढे राजकोट म्हणजे काठीयावाडच्या बाजूला गेलात तर तिथे वेगळाच ट्रेंड आहे... कच्ची दाबेली, गाठिया वगैरे तिथे मिळतं.. स्पेशालिटी म्हणाल तर राजकोटला मकर संक्रांतिला 'गेहूँ का खिचडा' नावाचा एक पदार्थ बनतो... गव्हाची ही खिचडी सुका मेवा वगैरे घालून एकदम श्रीमंती थाटात बनते... गुजरात मध्ये अजून एक गोष्ट अशी की हिवाळ्यात इथे तुरीचे पीक घेतलं जातं... थंडीचे हे चार महिने तूरीचे पदार्थ बनवण्यात जातात... त्यात 'हिरव्या तुरीची कचोरी' इथे किमान तीन ते चार वेळा तरी प्रत्येक घरात बनतेच... दिवाळीत 'मठिया' नावाचा पदार्थ करतात यात मटकीचं पीठ वापरतात.. त्यात थोडं उडदाच्या डाळीचे पीठ, ओवा, मीठ, काळीमिरी, हिरवी मिरची, घालून मिडीयम  Dough बनवतात... पापडासारखे छोटे पातळ लाटून ते तळतात... यासोबत 'खीचू' नावाचा तांदळाच्या पीठापासून बनणारा पदार्थ ही खूप बनतो... अगदी लग्नातल्या पदार्थांमध्ये सुद्धा याची जागा फिक्स आहे... आपल्याकडे जशी करंजी आहे तशीच same recipe गुजरात मध्येही आहे त्याला "घुगरा" म्हणतात.... गुजराती लोकं एकदम Happy Go Lucky स्वभावाची असतात.. रेसिपी विचारली की लगेच सांगतात.. आपले पदार्थ इतरांनी आवर्जून बनवावे आणि तोंड भरून कौतुक करावं इतकीच त्यांची इच्छा.. आता गुजराती थाली कडे वळू रोटी, सब्जी, दाल आणि चावल या चार मेन गोष्टी या थाळीत असतात... आपल्याकडे व्हेज-नॉनव्हेज डे असतात तसे गुजराती लोकांचे डाळींचे दिवस असतात... आज तूरडाळ, उद्या मुगडाळ, एक दिवस कढी... तिथे तुरीची डाळ थोडी गोडसर असते.. गुजराती लोक भाज्याही भरपूर खातात... पावसाळ्यात 'कांकोडा' ची भाजी इथे केली जाते.. बहुतेकांना ही भाजी माहीत नसेल किंवा माहीत असेलही सोबत मी फोटो जोडतो आहे... कृष्णजन्माच्या दुसऱ्या दिवशी "पत्राली सब्जी" केली जाते.... या भाजीत 35 पेक्षा जास्त भाज्या असतात... गुजराती खाजा सुद्धा श्रावणात येथे मिळतो... उपवासाला सुद्धा राजगिरा आणि साबुदाण्याचे खूप ऑप्शन्स गुजराती खाद्यसंस्कृती मध्ये उपलब्ध आहेत... इथे बटाट्याचा शिरा सुद्धा बनतो... गुजराती लोकही भरपूर Foodie असतात... कुकिंग च्या बाबतीत भरपूर उत्साही असतात... बाजारात एखादी नवीन भाजी दिसली की आणून त्यावर आपल्या पद्धतीने सोपस्कार करून काहीतरी इनोव्हेटिव्ह करतातच.... 


तर अशी आहे आपल्या शेजारची खाद्यसंस्कृती आणि तिथली मंडळी...चला इथेच थांबतो आता.. नाही तर बायको म्हणेल काय गुजरातींबद्दल इतकं प्रेम उतू जातंय😜😂... आज रविवार आहेच आणि सगळे घरीही असतीलच... बघा एखादा गुजराती पदार्थ ट्राय करून😀😀 

लवकरच पुन्हा भेटू एक नवं राज्य घेऊन तोपर्यंत.... 

हेल्दी खा आणि हेल्दी राहा

© Chef Aniruddha Ranade

Head Chef, Social Pune

Food Stylist | Consultant | Food Blogger

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट