Food Waste Part 1

 Hello🙋


कसे आहात सगळे खूप दिवस नुसता विचारच चाललेला लिहायचं, लिहायचं शेवटी पुन्हा एकदा कोरोना महाराज अवतरले आणि रेस्टॉरंट ला टाळं लावून हातात लेखणी देऊन गेले... बहुतेकांना मी पुण्यात आहे हे माहितीच आहे... आता एक मुंबईकर पुण्यात आल्यावर त्याची काही फजिती होते का?? तर अजिबातच नाही.... मुंबई सारखच इथेही मिक्स वातावरण I mean लोकं आणि त्यांचे स्वभाव आहेत... काही खूप प्रेमळ पण काही एकदमच फटकळ... इथे येऊन मला वाटलं होतं की एक ते तीन आराम असेल काहीही काम नसेल.. सगळ्यांची वामकुक्षी ची वेळ वगैरे असेल, पण असं काहीही घडलं नाही.. व्यवस्थित गर्दी असायची या वेळेत... तसं बाकी कुठे फिरायचा Chance  मिळाला नाही पण पुणेरी मंडळी हाडाची खवय्ये आहेत राव आणि खाण्याच तोंडभरून कौतुक करणारी आहेत.... बाकी पुढच्या लेखांमध्ये पुण्याबद्दल, कारण मलाच काही माहिती नाहीये 😅😅

पुन्हा एकदा आम्हा सगळ्यांच्या कामावर गदा आली आहे त्यात नवीन शहर... अडचणी सगळ्यांच्याच आयुष्यात येतात पण हॉटेलच्या वाट्याला जरा जास्तच आल्यात... आत्ता कुठे जरा सगळं स्थिरस्थावर व्हायला लागलं होतं तर पुन्हा एकदा Lockdown च्या जाळ्यात अडकलो आणि यातून मार्ग काढणं केवळ अशक्य... फक्त वाट बघणं इतकच आपल्या हातात... आपल्या रेस्टॉरंट मध्ये येणारे गेस्ट सोडले तर आपल्याला कोणीही वाली नाही, त्यामुळे त्यांची सेफ्टी आणि त्यांना बेस्ट देऊन पुन्हा त्यांची मनं जिंकण इतकंच काय ते आपल्या हातात...मी हे फक्त माझ्याबद्दल नाही तर फूड रिलेटेड व्यवसाय असणाऱ्या माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना बद्दल बोलतोय... So Stay Strong and Keep The Heat Up...

आता आजच्या मूळ मुद्द्याकडे वळूया... आजचा माझा विषय अगदी रोजचाच... याचा सगळ्यांनाच राग येतो पण, तरीही फारसं कुणी त्याकडे लक्ष देत नाही... कदाचित मी मांडल्यावर तरी तुम्ही थोडा यावर विचार कराल... So आपला विषय आहे "फूड वेस्ट" Food Waste...

आता दोन मुद्दे आहेत... एक जाणुन बुजुन केलेल फूड वेस्ट आणि दुसरं नाईलाजाने झालेलं फूड वेस्ट.... 

पहिला मुद्दा आधी घेऊ नाही का?? खरं तर या सगळ्याची सुरुवात लहानपणापासूनच होते... आपल्याला एकंदरीतच चांगल्या सवयी आई-बाबा आजी-आजोबा शिकवत असतात... लहानपणीच, छान एका जागी बसून चिऊ-काऊच्या गोष्टी ऐकत अगदी शेवटचे दोन घास चट्टामट्टा करून भरवलेले असतील तर पुढेही ती सवय तशीच राहते... हल्ली 'बच्चो की पसंत का खाना' वगैरे भानगडी आल्यात.. आपल्या घरातल्या मोठ्या बायकांना बरोबर माहिती असतं की कोणत्या महिन्यात कोणत्या वयात मुलांना काय काय पौष्टिक अन्न खायला द्यायचं... मी काही फार मोठा नाही पण आमची फॅमिली खूप मोठी त्यामुळे फॅमिली मध्येच मुलांना खाण्याची शिस्त कशी लावायची हे मी प्रत्यक्ष पाहिलय... स्वतःही अनुभवलंय, त्यामुळे आमच्या घरी तरी एखाद दोन भाज्या सोडल्या तर काहीच आवडीनिवडी नाहीत... त्यामुळे फूड वेस्ट हा प्रश्नच नाही... आता मला एक कच्चा टोमॅटो आणि मुळा अजिबात आवडत नाही... तसंच माझ्या भावाची लहानपणीची गंमत आहे शाळेच्या डब्यात कोबीची भाजी असली की त्या डब्याचा एक्सीडेंट व्हायचा😁😂 म्हणजे तो पडायचा, सांडायचा काहीतरी व्हायचं हाहाहा!!! पण पोळी मात्र संपलेली असायची सध्या आमच्या मातोश्रींच्या धाकामुळे तसं काही होत नाही हाहाहा!!!


माझं स्पष्ट मत आहे हल्ली जाणून-बुजून केलेलं फूड वेस्ट हे एक तर अति लाडामुळे आणि सॉरी टू से पण, आधाशी किंवा अगदी कधी न मिळाल्या सारखं पानात वाढून घेतल्याने होतं... याचा अनुभव लग्नसमारंभात तुम्हाला नक्की येईल... काही नातवंडांचे किंवा एकंदरीत लहान मुलांचे लाड होतात... यात प्रामुख्याने आई-बाबांकडे आपल्या मुलांना देता येत नसलेला वेळ हे मुख्य कारण आहे... वेळ देता येत नाहीये ना मग खाण्यापिण्यात, कपड्यालत्यात किंवा इतर गोष्टीत ते म्हणतील तसं करू असं बर्‍याच घरांमध्ये दिसत... या खाण्या-पिण्याच्या लाडा मुळेच जेवण टाकायला सुरुवात होते आणि हळूहळू त्याचे प्रमाण वाढतच जातं... Generally बटाटा बऱ्याच मुलांना आवडतो इतका की बाकी काही खातच नाहीत हा खूप सिरीयस इशू आहे....


भूक आणि माणसाचं जगणं, त्याची आर्थिक स्थिती, त्याची कमाई, सुशिक्षितपणा यावर अवलंबून असतं... यावरूनच कम्प्लीट फॅमिली हेल्दी आहे की नाही हे सुद्धा ठरतं.. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती कितीही उत्तम असली तरी अन्न टाकायची चूक कधीही करू नका...हल्ली आपण काय खातो हा ही एक प्रेस्टिज चा भाग झालेला आहे... पिझ्झा किंवा बर्गर खाण्यासाठी पैसे आहेत म्हणून घरचं पौष्टिक जेवण नाकारणं हा मूर्खपणा आहे... आपल्या आजूबाजूला अजूनही अशी बरीच लोक आहेत ज्यांना दोन वेळचं अन्न नशिबात नाही.... कोणत्याही दाना पेक्षा अन्नदान सगळ्यात श्रेष्ठदान आहे... तुम्ही हेल्दी राहायचं का नाही हा तुमचा प्रश्न आहे, पण तुम्ही नाकारलेल्या अन्नामुळे एकाला जरी जेवण मिळत असेल तर खूप पुण्य कमावलंत... आपल्या इथे बऱ्याच संस्था आहेत अनाथाश्रम आहेत ज्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे करू शकता... स्पेशली लग्न किंवा तत्सम समारंभात उरलेलं अन्न तुम्ही दान केलंत तर हजारपट जास्त आशीर्वाद मिळतील... भरमसाठ ताटात घेऊन फेकून देणं हे सुविचारी, सुशिक्षित माणसाच लक्षण नव्हे... हो!! तुम्हाला हे नक्कीच पटेल... बाकी मी फार आकडेवारी मध्ये शिरत नाही इतकं जरी पटलं तरी खूप बदल होऊ शकतो...


आता दुसरा पार्ट कडे वळू ज्यावर आपला काहीच कंट्रोल नसतो... आपण खूप ठरवतो की जेवढ्यास तेवढं बनवावं फारसं अन्न उरता कामा नये, पण तरीही अन्न वाया जातच.. आता एखादी भाजी वरून फार सुंदर दिसते पण आतून किडकी निघाली तर?? घरी जेवण तर बनवलं पण काही कामानिमित्त घरी जेवायलाच कोणी नसेल तर?? अशावेळी खरच आपला नाईलाज असतो... यावर पर्याय म्हणजे जुन्यातून काहीतरी नवं करावं जरा आपले कुकिंग स्किल्स दाखवावेत ह्याने थोडफार तरी अन्न वाचवू शकतो... अगदीच खराब झालेलं Food अजिबात खाऊ नये... भाज्यांपासून मिळणार waste हे झाडांना खत म्हणून वापरायला सगळ्यात बेस्ट आहे... अजून काही थोड्या गोष्टी आपण Follow करू शकतो To Cut Down Food Waste बघा करून, झालाच तर फायदाच होईल...


*Smartly खरेदी करा - खूपदा आपण किराणा भाजी खरेदी ला जातो पण घरी काय आहे तेच बघत नाही सो नेक्स्ट टाईम घरात काय आहे ते सगळं चेक करून लिस्ट बनवून बाहेर पडा...

*विकत घेतलेले पदार्थ नीट स्टोअर करा - बरेच वेळा आपण सामान तर घेऊन येतो पण ते नीट स्टोअर करत नाही आणि खराब होतं So एकंदरितच भाज्या, धान्य किंवा अगदी उरलेलं जेवण नीट स्टोर करा...

*सगळ्यात महत्त्वाचं आणि तेवढंच कंटाळवाणं काम फ्रिज आवरणे - फ्रिज एक गरज म्हणून आला पण एखाद्या डम्पिंग ग्राउंड सारखं सामान आपण त्यात डम्प करत असतो ऍटलिस्ट आठवड्यातून एकदा तरी चेक करायला हवा फ्रिज...

भाज्या फळं जा सालासकट खाता येतात तेवढ्या खा यातून फायबर तर पोटात जाईलच शिवाय सालांमुळे होणारं वेस्टही वाचेल....

कोणताही पदार्थ विकत घेताना एक्सपायरी किंवा युज बिफोर बघून घ्या - खराब होण्याआधी ते पदार्थ संपवा किंवा नीट स्टोर करा...

कुरमुरे, पोहे, मका फ्लेक्स अशांचे चिवडा बनवून...बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू... चटणी, लोणचं अशा सगळ्या गोष्टी बनवून ठेवा जे टिकतील आणि वेस्टेज कमी होईल...

आणि शेवटचं बफे मध्ये जेवण हवं तेवढंच वाढून घ्या लागलं तर पुन्हा घ्या...

वेस्ट कमी करणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे हो ना?? या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी काही नवीन नाहीत सगळ्या माहितीतल्याच आहेत, पण बरेचदा याचा आपल्याला विसर पडतो or कंटाळा करतो किंवा काहीही कारण असेल पण आपल्याला थांबवायला हवं हे मात्र नक्की...

पुन्हा लॉकडाऊन होतय त्यामुळे लवकरच भेटू.. Safe रहा Healthy खा आणि मजेत रहा...

© Chef Aniruddha Ranade

Food Stylist | Consultant | Food Blogger

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट