Importance of Breakfast
नमस्कार सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा...
वर्ष तर नवं सुरू झालय, पण पुन्हा 2020 मध्ये गेल्यासारख वाटतय... तेच ते घरी बसणं, त्याच त्या बातम्या आणि आपले खाण्याचे तेच ते प्रयोग... पुन्हा सगळं सुरू झालय... वर्षभरात बरीच मंडळी स्वयंपाक शिकली.. इतरही काही शिकली असतील पण स्वयंपाकाचं शोकेसिंग सगळ्यात जास्त... स्वयंपाक करून दुसऱ्याला खायला घातलं आणि त्याची तारीफ झाली तर एक वेगळंच सुख मिळतं नाई... म्हणजे वरून आपण दाखवत नाही पण, मन मे बहुत लड्डू फुटते है आणि जरा जरी चूक कोणी काढली तर लगेच आपण हताश होतो... कधीतरी असही होतं आपल्या कडूनच काहीतरी गडबड होते आपण ती रेक्टिफाय सुद्धा करतो पण पुन्हा त्यातही आपल्या कानांना आवडतील अशाच शब्दांची अपेक्षा असते😜 का नसावी पदार्थ चुकला तरी मेहनत तेवढीच लागते ना😉पुष्कळदा हे बेकिंग च्या बाबतीत घडतं तुमचं एन्ड प्रोडक्ट रेफरन्स फोटो सारखंच दिसेल असं नाही, कारण इथे तुम्हाला ॲक्युरॅसी लागते... एक दोन ग्रॅम कॅन मेक अ ह्यूज डिफरन्स आणि राईस च्या बाबतीत सुद्धा ऐनवेळी फजिती होऊ शकते... पाण्याचा अंदाज किंवा तांदूळ नवीन जुना असला की गडबड होतेच...
मला बरेच वेळा वाटतं परदेशी जेवण किती सोपं असतं ना.. कोणते मसाले नाहीत की वाटंण नाही... फक्त प्रोटीन परफेक्ट शिजलं की झालं...
आज पुन्हा पण थोडं हेल्थ वर बोलूया... संपूर्ण देशाआधी आपण आपलं पाहूया म्हणजे महाराष्ट्राचं हो... महाराष्ट्रावर दोन्ही बाजूंचा प्रभाव पडलाय... दक्षिणेकडचा आणि उत्तरेकडचा... जितके पोळी खाणारे लोकं आहेत तितकीच भात खाणारी सुद्धा आहेत, म्हणूनच महाराष्ट्रात चौरस आहारावर जास्त भर दिला जातो... कारण इथलं हवामान आणि त्यानुसार शरीराला लागणारे पोषक घटक या चौरस आहारातूनच मिळतात... आज आपण संपूर्ण जेवणावर नाही तर दिवसातल्या एका ठराविक आहाराविषयी बोलणार आहोत... सकाळची न्याहारी "ब्रेकफास्ट"...
संपूर्ण दिवसाच्या आहारामध्ये ब्रेकफास्टला खूप जास्त महत्त्व आहे आणि त्याला कारणंही तशीच आहेत... ती कोणती आणि त्याचे फायदे आहेत का ते आपण बघू... कोरोनामुळे आपली लाईफ जरा स्लो झाली असली तरी एकंदरीत धावत्या जगात अगदी घड्याळ्याच्या काट्यावर आपण जगत असतो... सगळ्याच्या वेळा अगदी ठरलेल्या.. फक्त एकाच वेळेची गडबड होते ते म्हणजे सकाळी उठायची.. अहो सहाजिकच आहे इतकं थकून-भागून सकाळी उठायचा कंटाळा येतोच... तुम्हाला सांगतो रात्रभर हवतर झोप येणार नाही पण गजर वाजल्यानंतरच्या पाच मिनिटात जी झोप येते त्याला काही तोड नाही आणि मग कधीतरी असा डोळा लागतो की पाच मिनिटाचा अर्धा तास कधी होतो कळतही नाही.... नेमकी हीच ती वेळ जेव्हा आपण ब्रेकफास्ट स्किप करतो.. कारण ट्रेन-बस गेली की ऑफिस, कॉलेजला लेट होणार... घरी दुसरं कोण उठवणारं असलं तर असं कमी वेळा होतं, पण हल्ली कॉलेज आणि नोकरीनिमित्त बरीच जण एकटी राहतात आणि सकाळच्या नाश्त्याची टाळाटाळ करतात... इतक्या सकाळी उठून नाश्ता बनवून कामावर जायचं😣 छ्या😏 नकोच त्यापेक्षा बाहेर खाल्लेलं बरं... पण बाहेर रोज घरगुती नाष्टा जरी मिळत असला तरी पुन्हा तो परवडायला हवा... समजा परवडतही असेल पण ती काय आपली आई किंवा बायको नव्हे रोज नवीन नवीन पदार्थ मिळायला... म्हणून बाहेर जरी नाष्टा करायचं म्हटलं तरी काही दिवसांनी त्याचाही कंटाळा येऊन तेही बंद होतं... काही जणांची तर भलतीच मतं असतात... उपवास केला की बारीक व्हायला होतं म्हणे... नॉनसेन्स म्हणून ते ब्रेकफास्ट स्किप करतात, हा फक्त एक मूर्खपणा आहे....
रोजच्या धावपळीत सुद्धा तुम्हाला तुमच्या हेल्थ ला कम्फर्टेबल असेल असा नाश्ता निवडून दिवसाच्या महत्त्वाच्या खाण्याची सुरुवात करायला हवी... नाश्ता हा अख्खा दिवस लागणाऱ्या एनर्जीचा महत्त्वाचा सोर्स आहे.. So Please तो टाळू किंवा चुकवू नका... BreakFast मध्ये सगळे पौष्टिक घटक असणं खूप गरजेचं आहे...
घरातली कामं आणि रात्रीचं जेवण वगैरे उरकून आपली झोपण्याची वेळ साडे दहा अकरा असते असं मानून चालू... खाल्लेलं अन्न पचायला साधारण तीन ते चार तास लागतात आणि आपली झोप सात ते आठ तासांची, त्यानंतर तासाभराने आपण खाणार म्हणून अन्न पचल्यानंतर सकाळी परत काहीतरी खाईपर्यंत आपण फास्टिंग करत असतो हा फास्ट ब्रेक करायचा म्हणून याला ब्रेकफास्ट असं म्हंटलंय...
बराच वेळ काही न खाल्ल्याने आपल्यात ऊर्जा शिल्लक नसते.. त्यातच आपण कामाला सुरुवात केली तर लवकर थकवा जाणवतो कारण कामाच्या आणि ट्रॅव्हलिंगच्या नादात आपल्याला भूक लागलीये हे आपण कम्प्लीटली विसरून गेलेलो असतो... सकाळचा नाष्टा नीट घेतला नाही तर आपली मेमरी हळूहळू कमी व्हायला लागते कारण झोपेनंतर मेंदूत ग्लुकोजचे प्रमाण कमी होतं... सकाळचा नाष्टा हा आपल्या मेंदूला पर्यायी ग्लुकोज पुरवत असतो... व्यवस्थित ब्रेकफास्ट केला तर तुम्ही फिजिकली तर फिट राहाताच शिवाय तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहातं... तुम्ही मेंटली सुद्धा स्ट्रॉंग राहाता... म्हणून Fats, फायबर, प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, युक्त नाश्ता रोज सकाळी न चुकता करा....
हेल्दी खा आणि हेल्दी राहा
© Chef Aniruddha Ranade
Head Chef, Social Pune
Food Stylist | Consultant | Food Blogger
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा