Thanks Giving

 Hi ALL,

मी आज एका वेगळ्याच कारणासाठी लिहितोय.. नेहमी Active असणारे सगळेच जणं मला ओळखतात. आवर्जून मला Follow करतात. माझ्या पोस्ट ची वाट पाहतात. पण या सगळ्याचे श्रेय एकट्या मलाच नाही, तर तुम्हा सगळ्यांना आहे, या प्लॅटफॉर्मला आहे... 


मला आर्टिकल लिहायला लागून काही महिनेच झालेत, हा वेळ काही फार नाही. लोकं कित्येक वर्ष लिहितात पण मी हे अचानक सुरू केलं होतं आणि आज माझे 40 आर्टिकल लिहून झालेत... पर्सनली माझी, ही एक वेगळीच अचिव्हमेंट आहे.... माझं प्रोफेशनचं अस आहे लोकांची सुट्टी म्हणजे आम्हाला डबल काम त्यामुळे या सोशल मीडियावर वेळ घालवायला किंवा आता मी म्हणेन सत्कारणी लावायला वेळच नसायचा. पण कोरोना काळात सगळं थांबलं एक महिनाभर छान वाटलं सुट्टी म्हणून, पण जसजसा लॉक डाऊन वाढत गेला तसं कंटाळा आणि टेंशन दोन्ही यायला लागलं. हॉटेल आणि टुरिझम इंडस्ट्री कोलमडली होती आणि हळूहळू मी Depression मध्ये जायच्या मार्गावर होतो. कोणताही व्यवसाय मला करायचा नव्हता कारण परत जॉब सुरू झाल्यावर त्याकडे लक्ष देता येणार नाही हे मला माहीत होतं. आता काय करावं तर मी जसं माझ्या को वर्कर्स ना ट्रेन करतो तसं मी इतरांनाही शिकवू शकतो हे माझ्या लक्षात आलं आणि ह्यात काही इन्वेस्टमेंट ही नाही पण लोकांपर्यंत कसं पोहोचायचं? खाण्यावर प्रेम करणारे लोक हवेत? माझ्या फेसबुक ची अर्ध्याच्या वर फ्रेंड लिस्ट तर Chef लोकांनी भरलीये.. पण नुसतेच क्लास घेतो म्हणून सांगून कोण येईल क्लासला... विश्वास हवा, ओळख हवी आता स्वतःला प्रेसेन्ट कसं करायचं तर स्टोरी लिहून.. कारण वय कोणतही असो आपल्याशी साधर्म्य असणारी स्टोरी वाचायला सगळ्यांनाच नक्की आवडते मग शाळेत निबंध लेखनाला मिळणारे मार्क आठवले आणि हातातली नाईफ बाजूला ठेवली आणि पेन घेऊन "एका शेफ ची स्टोरी" लिहायला सुरुवात केली काय अविश्‍वसनीय रिस्पॉन्स मिळालाय मला☺️ म्हणून तुम्हाला; सगळ्या वाचक वर्गाला धन्यवाद!!! तुमच्यामुळे माझ्यातला Confidence परत आला... आता माझ्या आर्टिकल्स ना खूप छान प्रतिसाद मिळतो... त्यासाठी तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो... 

धन्यवाद!! आपला शेफ मित्र... 


अनिरुद्ध रानडे...🙏🏻🙏🏻🙏🏻

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट