FOOD FROM STATE - MADHYA PRADESH
Hello..🙌😀😀🙏🙏
तुम्हाला सगळ्यांना सांगायला खूप भारी वाटतंय.. आज माझा हा पन्नासावा आर्टिकल आहे... हे अॅक्च्युअली तुमच्यामुळे Possible झालंय गेल्यावर्षी या काळात मी साधा विचारही केला नव्हता की कधीतरी असं काही लिहिन किंवा तुम्हा सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे लिहिण्याची कला आहे माझ्यात... तुमचेच आशीर्वाद ॲप्रिसिएशन आणि एनकरेजिंग कमेंट्स मुळेच मी इथवर पोहोचू शकलोय त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार🙏🙏🙏 आता मी एक रन काढून हाफ सेंच्युरी पूर्ण करतो हेहेहे😇😁
मागच्या लेखामुळे आपली सफर थांबली पण फिरायचा म्हणजे हॉल्ट हवाच की हो... चला आता कर्नाटकच्या फिल्टर कॉफीचा एक घोट घेत पुढे जायला निघू..आपला पुढचा स्टॉप असणारे हार्ट ऑफ द नेशन❤️ येस! बरोबर ओळखलंत, मध्य प्रदेश! देशाच्या मध्यभागी असल्याने मध्यप्रदेशला देशाच हृदय म्हंटल जातं. असल्या नैसर्गिक चमत्कारांचे वर्णन करावं तितकं कमीच आपली कला संस्कृती आणि परंपरा या राज्याने व्यवस्थित जपल्यात काय नाहीये इथे, ज्योतिर्लिंग लेण्यांपासून ते जंगल सफारी सगळं काही तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल. मध्यप्रदेश म्हंटलं की सम्राट विक्रमादित्याचे साम्राज्य, होळकर घराण्याची परंपरा, तसेच बारा ज्योतिर्लिंगांपैकी महाकालेश्वर चे मंदिर आणि नर्मदा नदीकाठचं ओमकारेश्वर, शिवाय भेडाघाट, सांचीचा स्तूप, पचमढी आणि सातपुडा, विंध्य ह्या पर्वतरांगा असला भारी प्रदेश आहे हा! मध्य प्रदेशची राजधानी म्हणजे भोपाळ. याला तलावांचे शहरही म्हणतात बरं का! भोपाळ म्हणजे राज्याची शान, ऐतिहासिक परंपरा वारसा लाभलेलं आणि जपलेलं, आपल्या इंदूर लगतचं टुरिस्ट प्लेस. आत्ता एमपी मध्ये जाणं एप्रिल आणि मे मध्ये म्हणजे कडकडीत उन्हाळा.. पण दुसरा काही ऑप्शन सुद्धा नाहीये. सगळ्यांना सुट्टी याच काळात असते. सकाळच्या रणरणत्या उन्हात नाही पण संध्याकाळी सूर्यनारायणाची तीव्रता कमी झाली की आपण फिरायला आणि खादाडीसाठी मोकळे. भोपाळ मध्ये पाहण्याचे ठिकाण म्हणजे बडा तालाब छोटा तालाब. या तलावा वरून येणारी मंद वाऱ्याची झुळूक सकाळच्या रणरणत्या उन्हाचा अगदी विसरच पाडते.... चला हातात ज्यासाठी आलोय ते काम करूया नाही का😃 खाण्यासाठी अजून काय! तर आपण मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून सुरुवात करूया....
भोपाळ मांसाहारासाठी ओळखला जातो. भोपाळच्या चटोरी गल्लीत नॉनवेजच्या एकापेक्षा एक भारी डिशेस खायला मिळतील नल्ली निहरी नाव ऐकलंच असेल.... जुन्या भोपाळमध्ये 'मटण स्टू' ची चव संपूर्ण राज्यात कुठेही मिळणार नाही.... भोपाळच्या बाजारात तुम्ही मध्य प्रदेशच्या 'मावा बाटी'चाही स्वाद घेऊ शकता.... ही अशी एक डिश आहे जी आपल्याला मध्य प्रदेशात प्रत्येक फंक्शन मध्ये दिसेल.... याशिवाय भोपाळमध्ये चहा, पोहे, दही आणि साबूदाण्याची खिचडी हे आवडते पदार्थ आहेत....
इंदूर खाण्यापिण्याच्या बाबतीत संपूर्ण देश आणि जगावर आपली ओळख सांगत आहे. येथील द्राक्षांचा वेल जगभर निर्यात केला जातो.... येथील सर्राफा मार्केट मधली दुकानं म्हणजे खाण्यापिण्या साठी फेमस आहेत. इंदूरमध्ये 'पोहा आणि जलेबी, कचोरी आणि समोसा' न्याहारीमध्ये खूप खाल्ले जातात.... उपवास स्पेशल साबुदाण्याची खिचडी म्हणजे 'फरियाली खिचडी' 12 महिने खाल्ली जाते...तुम्ही एकदा का इंदूरच्या जेवणाची चव घेतली कि बस तुम्हाला पुन्हा खावंसं वाटणारच.... तुम्हाला इथे 'कॉर्न केक'ही खायला मिळेल.... ही मध्य प्रदेशची पारंपारिक डिश आहे....
जबलपुरातही 'पोहे जलेबी'ची संस्कृती आहे, परंतु इथे अजून एक गोष्ट सगळ्यात प्रसिद्ध आहे ती म्हणजे देवा मंगोडे यांचे दुकान.... देव माणगौदाच्या दुकानात उकळत्या तेलाच्या कढईत हात घालून पकोडे, समोसे काढतो हा माणूस.... हे दुकान 100 वर्ष जुने आहे....'चारोळ्यांची बर्फी' इथे खूप फेमस आहे. या शहरात, तुम्हाला ही बर्फी खायची असेल तर तुम्हाला विजय चौकातील चौधरी स्वीट हाऊसवर जावं लागेल... समोसाबरोबर मिळणाऱ्या टोमॅटो मसालेदार चटणीची चव तुम्हाला फक्त इथेच चाखायला मिळेल...
शहडोलमध्ये खायला खूप आहे, परंतु इथल्या रेल्वे स्टेशनचे बटाटे वडे खूप लोकप्रिय आहेत. जो कोणी या रेल्वे स्थानकातून जातो तो नक्कीच बटाटे खातो. विशेष गोष्ट अशी आहे की मोठ्या बटाटा वड्यासोबत चटणी नसते त्याऐवजी तळलेल्या लाल मिरच्या दिल्या जातात..
अनूपपूर जिल्हा छत्तीसगडच्या सीमेवर आहे. इथे 'खीर, पुरी, सोहरी आणि गुलाब जामुन' प्रत्येक लग्नाच्या निमित्ताने बनवले जातात. येथे ग्रामीण भागात लोक 'महुआची दारू' बनवतात आणि पितात... अनूपपूरमध्ये मनेंद्रगड रोडवर एक शुक्ला जी का ढाबा आहे, ज्याची खीर इथे खूप प्रसिद्ध आहे... अनूपपूरला येणारे लोकं या ढाब्याची खीर खायला विसरत नाहीत.... या ढाब्यावर नाव किंवा बॅनर नाही पण चव एक नंबर आहे...
मध्य प्रदेशातील पारंपारिक खाद्यपदार्थ छिंदवाडा जिल्ह्यात बनतात... स्टेशनच्या समोरच शंकरभाऊंचे दुकान आहे जे दही वड्यांसाठी प्रसिद्ध आहे.... 'शंकरभाऊंच्या दही वड्यां'साठी संपूर्ण शहरच वेडं आहे... जर मिठाईबद्दल बोलायचे झाले तर गरबा स्वीट्स आणि अमित स्वीट्स यांची दुकाने आहेत पण इथे मिठाईपेक्षा समोसा-चटणी जास्त खाल्ली जाते...बैतूल हे ढाब्यांसाठी फेमस आहे नॅशनल हायवेवर वसलेलं शहर असल्याने इथे भरपूर ढाबे आहेत...बैतूल प्रमाणेच होशंगाबाद देखील राष्ट्रीय महामार्गावर पडणारे शहर आहे.... त्यामुळे येथे हॉटेल किंवा रेस्टॉरंटपेक्षा ढाबा संस्कृतीच जास्त आहे. या ढाब्यावर काम करणारे बहुतेक आदिवासी लोकं आहेत जे खास पद्धतीने Chicken बनवतात... हे Chicken या महामार्गावर फिरणार्या लोकांना खूप आवडतं. आदिवासींबद्दल बोलायचं तर त्यांच primary food कोडो- कुटकी आणि भाजी हे असतं.... या जिल्ह्यातील 'डाळ बाटी चूरमा' हा ही एक लोकप्रिय पदार्थ इथेच खाल्ला जातो. 'कडकनाथ कोंबडा' तर world famous आहेच... कडकनाथ कोंबडा काळा असतो आणि कोंबडीही काळी असते....याचं मांस शरीरासाठी खूप पौष्टिक असतं असं म्हणतात...ग्वाल्हेरमधे 'बहादुराच्या लाडूं'बद्दल तुम्ही ऐकलंच असेल... माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनाही हे लाडू फार आवडायचे... बहादुरच्या लाडूशिवाय, इथली मंगोडीही खूप लोकप्रिय आणि रुचकर असते.... जर तुम्ही ग्वाल्हेरला गेलात तर 'लडडू, मंगोडी,पोहे' असे बरेच ऑप्शन्स खाऊ शकता....मुरैना हा जिल्हा ग्वाल्हेरचा आहे. मुरैना आपल्या गजक आणि तीळ-गूळ चिक्कीसाठी ओळखला जाते.
बाबा महाकालचे शहर उज्जैनबद्दल बोलायचे झाले तर 'डाळ- बाफला- लाडू आणि काठी रोल' इथे खूप खाल्ल जातं... उज्जैन हा मालवा प्रांताचा जिल्हा आहे. येथे 'पोहे, दाल कचोरी'ची चव प्रत्येकाच्या जिभेवर आहे, पण जर तुम्हाला दाल-बाफला आणि लाडू यांची खरी चव पाहिजे असेल तर आपण श्री गोविंदम, जनता स्वीट्स, डमरूवाला यांच्याकडे जायलाच हवं...'नागदा पोह्यां'साठी ओळखला जातो... इथे उत्तम पोहे, बटाटा वडा आणि समोसे रेल्वे स्थानकात मिळतात..... मुंबई ते दिल्ली रेल्वे मार्गावर पडणार्या या स्टेशनवर प्रवासी इथे खायचं अजिबात सोडत नाहीत अशाप्रकारे, दाल बाफला आणि सेंग.. इंदूर आणि उज्जैनमध्ये चा खायला हवेत, पण त्यातही रतलाम हा सेंगचा बालेकिल्ला आहे.... इथला रतलामी कॅम्प प्रसिद्ध आहे. याशिवाय मालवाचे प्रसिद्ध जेवण, डाळ-बाफला आणि लाडू याची चव घ्यायला आपल्याला रतलाममध्ये जायलाच हवं....
सांगण्यात लिहिण्यात काही चुकले असेल तर क्षमस्व... मी सुद्धा माहिती गोळा करत करतच लिहितोय...
लेख आवडला तर नक्की सांगा...
©Chef Aniruddha Ranade
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा