FOOD FROM STATE - RAJASTHAN
Hello नमस्कार
काय मग आवडतेय का सगळ्यांना आपल्या देशाची सफर?? तुम्हीही तुमचं कॉन्ट्रीब्युशन द्या बरं का.. तुम्हाला एखादं ठिकाण, त्या जागी मिळणारा पदार्थ माहिती असेल तर कमेंट बॉक्स तुमचाच आहे त्यात तुम्ही नक्की लिहा... काय आहे मी काही सगळा भारत फिरलो नाहीये... इकडून तिकडून माहिती शोधून अभ्यास करूनच लेख लिहितोय, त्यामुळे तुम्हाला जर त्या ठिकाणाची काही माहिती असेल तर नक्की शेअर करा मला आणि बाकीच्यांनाही त्याचा फायदाच होईल... नॉलेज नेहमी शेअर करावं.. बाकीच्यांनाही मिळतं आणि आपलंही वाढतं... हो हो आता पुढचं राज्य कुठलं याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय बहुतेक... माझही डिसाईड होत नव्हतं उत्तरेकडे जाऊ का दक्षिणेकडे मग काय शेवटी एकच उपाय Toss करणे आणि त्यात उत्तर दिशेने बाजी मारली... मग काय राजस्थानला जायचं पक्कं केलं आणि मी शब्दांच्या गाडीत बसलो.. येताय ना तुम्ही सुद्धा☺ अहो चला कोरोना जायला अजून पुष्कळ वेळ आहे.. So तितक्यात आपली अजून राज्य फिरून होतीलच... आपलं नेक्स्ट स्टेट आहे "राजस्थान" Royal...
राजस्थान म्हटलं की सगळ्यात आधी मला आठवतं ते लहानपणीच आईस्क्रीम.... तुम्ही सगळ्यांनीही नक्कीच खाल्ल असेल आठवतंय ना मेवाडची गाडी😍
राजस्थान म्हणजे राजपुतांची राजवाडी जमीन, त्यामुळे तिथलं जेवणही एकदम रॉयल राजेशाही असतं... भारतातलं सगळ्यात मोठं राज्य आणि त्यात वाळवंटी प्रदेश अशी राजस्थान ची ओळख... जयपूर शहर या राज्याची राजधानी.. जयपूरला Pink City सुद्धा म्हणतात हे सगळ्यांना माहीतच असेल... जयपुर हे पूर्वीपासूनच राजधानीचं शहर आहे 1728 मध्ये दुसरे राजा जयसिंह यांनी हे स्थापन केलं... जयपूर भारतातच नव्हे तर जगभरात फेमस टुरिस्ट प्लेस आहे... 1727 मध्ये सवाई जयसिंग यांनी वाढती लोकसंख्या आणि पाण्याचा अभाव लक्षात घेऊन त्यावर मात करण्यासाठी आपली राजधानी आमेरहून जयपूर येथे आणली... आता याची पिंक सिटी कशी झाली... Prince Albert यांच्या स्वागतासाठी राजा सवाई रामसिंग दुसरे यांनी शहरातील सगळी घरं आणि एकंदरीत सगळी स्ट्रक्चर्स टेराकोटा पिंक कलर मध्ये रंगवून घेतली... भेटीनंतरही हा रंग असाच राहावा यासाठी कायदा करण्यात आला.. कोणीही घराला दुसरा रंग दिला तर त्याने कायदा मोडला असं मानावं म्हणून अगदी आजही ही सिटी Pink आहे आणि दुसरं कारण म्हणजे इथली गुलाबी थंडी...
इथले जे जुने राजवाडे आहेत ते आता ‘हेरिटेज हॉटेल’ मध्ये कन्व्हर्ट झाले आहेत.... त्यामुळे इथलं जेवणही राजेशाही पद्धतीचंच असतं.... राजस्थानातली दाल-बाटी, दाल-बाफला तर प्रसिद्ध आहेतच.... याशिवाय इथल्या मिठायाही खूपच प्रसिद्ध आहेत.... चटपटे गट्टे हा पदार्थ जयपूरला ‘चोखी ढानी’ इथे फार छान मिळतो.... तुम्ही जयपूरला गेलात तर चोखी ढानीमध्ये गेल्याशिवाय परत येऊ नका.... चोखी ढानीला गेलं की तिथे तुम्हाला राजस्थानी संस्कृतीचं संपूर्ण दर्शन घडेल.... तिकडे गेल्यावर वेळ कसा जातो कळतच नाही....आठवडी बाजार, तिथल्या लोककला यांचा आनंद घेऊन झाला की रात्री आठनंतर तिकडे जेवणाला सुरूवात होते.... जेवणात गट्टे का साग, एखादी पनीरची भाजी, बाजरीची भाकरी, राजस्थानी पद्धतीच्या इतर दोन-तीन भाज्या आणि एक Dessert सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं पंगतीमध्ये बसून जेवायचं असतं.... इथे रोज वेगवेगळा मेनू असतो...
अजमेर हे शहर पृथ्वीराज चौहानची राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे... जैसलमेर हे या प्रदेशातल्या वाळवंटानं घेरलेलं खूप जुनं आणि ऐतिहासिक टुरिस्ट प्लेस आहे... इकडे एक वेगळीच मजा असते वाळवंटातला एक कुठला तरी भाग आपण निवडायचा.. आपल्याला आवडणारा राजस्थानी मेनू ठरवायचा आणि जेवायला किती जण आहेत हे सगळं तिथल्या माणसांना सांगायचं... मग ते, दाल-बाफला, दाल-बाटी, मुगाच्या डाळीचा साजूक तुपातला शिरा असे पदार्थ तुमच्यासमोर वाळवंटात तयार करून देतात....थंडीच्या दिवसांत तर वाळवंटात हे असं जेवण्याची मजा काही औरच! चांदणी रात्र, गुलाबी थंडी, समोर पसरलेलं वाळवंट, सेवेला असणारे राजस्थानी लोक, आजूबाजूला बसलेला उंटांचा कळप, तुमच्यासाठी टाकलेल्या खाटा, पेटवलेली शेकोटी व त्याबरोबर दाल-बाफल्यांची मजा...त्यावर साजूक तूप...आहाहा! याशिवाय, राजस्थानी लोकसंगीत आणि उंटाची फेरी... असं भारी वातावरण असतं....जैसलमेरमध्ये ‘ताजिया टॉवर’जवळ मिळणारे मूर्ग कबाब खायला अजिबात विसरू नका.... नाथद्वाराला श्रीकृष्णाचं मोठं देऊळ आहे.... महाराष्ट्रात जे ‘श्रीनाथ पावभाजीवाले’ आहेत ते सगळे इकडचेच.... इथे एक वेगळ्या प्रकारचा प्रसाद मिळतो... तो घेण्यासाठी लोक अगदी रांगा लावून उभे असतात.... हे उत्तर भारतातलं सर्वांत श्रीमंत मंदिर समजलं जातं.... इकडची युनिक गोष्ट म्हणजे, हे मंदिर दहा दहा मिनिटांनी बंद केलं जातं.... या दहा मिनिटांत श्रीनाथजींचे कपडे बदलण्यात येतात.....कोलयात नावाच्या गावात सुंदर मंदिरांचा घाट आहे.... तिथले पुजारी तुम्हाला हवं तसं घरगुती जेवण तयार करून देतात... चंद्रमौळेश्वर महादेव मंदिरात मिळणारा बाटीच्या लाडवाच्या प्रसादाचा स्वाद म्हणजे एक वेगळाच अनुभव...जैसलमेरला जात असताना रस्त्याच्या कडेला ढाब्यावर कांजी वडा नक्की खायला हवा.... कांजी वडे दोन-तीन दिवस आरामात टिकून राहतात.... गंमत म्हणजे, हा जेवढा शिळा तेवढा छान लागतो... बिकानेरचे पापड तर तुम्हाला माहितीच असतील; पण इथलं फरसाणही तेवढंच फेमस आहे.... इथे तुम्हाला एखाद्या दुकानातून केशराचा मंद, गोडसर वास आला तर आश्चर्य वाटून घेऊ नका समजून जायचं की कोणीतरी घेवर तळतंय.. एक माणूस नाजूक हातानं घेवर तळताना आणि दुसरा माणूस ते घेवर अलगद हातानं केशराच्या पाकात बुडवून प्लेटमध्ये ठेवताना दिसेल.... हे घेवर खायला देताना त्याच्या खोलगट भागात भरपूर रबडी घालून, वरून बदाम-पिस्ता, केशर सिरप घालून देतात हे ‘महावीर मिठाई मंदिर’ या दुकानात फार छान मिळत.. हे दुकान बिकानेरच्या गोलबाजार परिसरात आहे... बाकी मग माउंट अबू, उदयपूर, जोधपूर या ठिकाणी खाण्याच्या बाबतीत जवळपास असाच प्रकार असतात. पंजाबी पद्धतीचं जेवणही सगळीकडे available आहे....
राजस्थानात मारवाडी संस्कृती असल्यामुळे श्रीमंत अशी एक खाद्यसंस्कृती तिथं तयार झालेली आहे. विविध प्रेक्षणीय स्थळांबरोबरच श्रीमंत खाद्यसंस्कृती ही या राज्याची खासियत...
काय मग आवडलं का राजस्थान??? नक्की कमेंट करा तुम्हाला काही वेगळे माहीत असेल तरीही सांगा सांगा तुमच्या कमेंट ची मी वाट बघतोय... पुन्हा नवीन राज्यासोबत भेटीला येईनच..
काळजी घ्या!! हेल्दी खा.. हेल्दी राहा...
Article source: Chef Vishnu Manohar
Chef Aniruddha Ranade
Head Chef, IEHPL
Food Stylist | Consultant | Food Blogger
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा