Food From State - Uttar Pradesh

 Hello...

राजस्थानची सफर मस्त रंगली बरेच जणं जाऊन आलेत... खूप जणांना तिथले पदार्थ माहितीयेत.. राग येऊ देऊ नका पण मला वाटतं आपण ह्या सगळ्यात कुठेतरी मागे राहिलोय.. ते रेस मे पीछे रह गया म्हणतात ना त्या Types... महाराष्ट्रात सगळीकडे सगळ्या प्रकारच जेवण उपलब्ध आहे... पण हेच महाराष्ट्राच्या बाबतीत बाहेरच्या राज्यात दिसत नाही आपलं मराठमोळे जेवण आपल्या पुरतच मर्यादित राहिलय... आपण जर वेगळ्या राज्यात किंवा अगदी वेगळ्या देशात जरी असलो तरी तिथे आपण आपलं मराठमोळे जेवण एस्टॅब्लिश करायला हवं असं मला वाटतं.. बाकीच्यांचा वेगळा काही अनुभव, मतं असतील तर नक्की सांगा.. मला वाटतं आपण जर दुसऱ्या राज्यात, देशात गेलो तर तिथल्या लोकांमध्ये आपल्या पदार्थांची चव डेव्हलप करायला हवी नाई का??? विचार करत करतच पुढे जाऊ.. अहो कुठे काय आपल्या पुढच्या राज्यात.. अगदी विना पास.. विना लस😜 निवांत फिरू आणि खाऊन पिऊन जाडजूड होऊन येऊ हाहाहा😁😁


आपल पुढचं राज्य आहे "उत्तर प्रदेश" खरंतर आजकाल सगळंच अगदी काही क्लिक्स वर अवेलेबल आहे... अहो आपल्या एलेक्सा काकू काहीही सांगितलं तरी त्या करतात... पण ही बया फक्त माहिती देऊ शकते त्या माहितीत ते फीलिंग्स नाही घालू शकत जे माझ्या अशा आर्टिकल मधून तुम्हाला नक्की अनुभवता येतील.. मीच काय गुणगान गातोय हाहाहा😅😅 पण मला इतकंच म्हणायचं की गुगल वर इतकी माहिती अवेलेबल असून सुद्धा तुम्ही माझे आर्टिकल्स इतक्या आत्मीयतेने वाचता त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏🙏


उत्तर प्रदेश म्हंटलं की नवाबांच राज्य, आग्र्याचा ताज महाल, लखनऊ, आयोध्या नगरी, मथुरा... उत्तर प्रदेश लाच आधी "अवध" असं म्हटलं जायचं आणि अवधी Cuisine किती फेमस आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे... इथली लोकं तुम्हाला एकेरी नावाने कधीच बोलावणार नाहीत कोणाही लहान मोठ्यांना किंवा अनोळखी व्यक्तीला "आप" म्हणूनच संबोधलं जातं आणि समवयस्क लोकांना "भैया" असं म्हटलं जातं... हा शब्द एक भाऊ या नात्याने वापरला जातो, पण आपण त्या संपूर्ण समाजालाच ह्या कॅटेगरीमध्ये संबोधून त्यांचा अपमान करायला लागलोय... असो आपण डायरेक्ट जेवणावर येऊ.. चांगलं आणि चवदार जेवण भारतात मिळत नाही असे एकही राज्य नाही मग युपी तरी का मागे राहील.. इथेही प्रत्येक कानाकोपऱ्यात एकापेक्षा एक वरचढ डिश मिळतात.. पदार्थांची चव राहू द्या हो, नुसतं नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं... इथल्या प्राचीन संस्कृतीचा वारसा आजही लोकांनी जपलाय... आपलेच नाही तर परदेशी लोकही इथल्या पदार्थांची चव चाखल्याशिवाय जात नाहीत... चला तर मग फार न ताणता सुरु करूया आपली गाडी आणि पहिला स्टॉप घेऊया "लखनऊ" उत्तर प्रदेशची राजधानी आणि नवाबी थाट असलेलं हे प्रसिद्ध टूरिस्ट प्लेस आहे... अगदी आजही इथे नवाबी संस्कृती आणि खाद्यपदार्थ पाहायला मिळतात.. मुगल आर्किटेक्टचरचं उत्तम उदाहरण असलेली बांधकामं आणि तितकंच फेमस मोगलाई Cuisine... फक्त लखनऊ मधेच नाही तर अख्या भारतात प्रचलित आहे... इथे फिरायला आणि खायला तुम्हाला वेळ कमी पडेल असं हे शहर... तुम्हाला तर माहितीच असेल लखनऊ कबाब साठी किती फेमस आहे.. टुंडे के कबाब, गिलौटी कबाब, बोटी कबाब, मटन सीख कबाब, चिकन शामी कबाब, काकोरी कबाब, लिस्ट अगदी न संपणारी आहे... इथे अजून एक डीश फेमस आहे पाया की निहारी.. ही एक Slow Cook डिश आहे.. सहा ते सात तास मंद आचेवर शिजवली जाते.. याशिवाय जर्दा पुलाव हे एक डेझर्ट mostly लग्नकार्यात तुम्हाला पाहायला मिळेल... जर्द हा उर्दू शब्द आहे, जर्द म्हणजे पिवळा... ही डिश मावा, सुका मेवा, केशर वगैरे घातलेला गोड भात असतो... इथे थंडीच्या दिवसात "मक्खन मलाई" नावाची डिश भरपूर खाल्ली जाते... यात तसं बघितलं तर मक्खन चा खरंच काहीच संबंध नसतो.. दूध खूप वेळ फेटून त्याला अगदी लोण्यासारखं टेक्स्चर येतं.. दिसायला ते अगदी बर्फासारखे दिसतं, हात लावून पाहिलं तर एकदम कापसासारखा आणि तोंडात टाकलं की चटकन विरघळून जातं... मुलांची ही एकदम फेवरेट डिश आहे.. लखनवी बिर्याणी तर भारतभर खाल्ली जाते ही बनवण्याची निराळीच पद्धत आहे आणि ह्याच वेगळ्या पद्धतीने ही इकडची खासियत बनलीये.. लखनऊ बद्दल जितंक बोलावं तितंक कमीच पडेल... मी म्हंटलं ना जसं तुम्ही फिराल नवीन नवीन गोष्टी नवीन पदार्थ तुम्हाला चाखायला मिळतील.. 

यूपीमध्ये मेरठ शहरही फार फेमस आहे त्यातही तिथले घेवर फार सुंदर असतात साधारण जुलै ते सप्टेंबर या पावसाच्या काळात ते बऱ्याच प्रमाणात खाल्ले जातात... तुम्ही हे एकदा खाल्ले की पुन्हा खायला नक्की याल.. 

आता जाऊ भारतातला आजूबा बघायला.. यूपी आके ताजमहाल नही देखा तो क्या देखा... ताजमहाल आणि पेठा बनवायला एकत्रच सुरुवात झाली... पुढे १९४० च्या दशकात दोन प्रकारचे पेठे तयार केले जायचे.. आता ५० हून अधिक प्रकारचे पेठे इथे मिळतात... पेठा उन्हाळ्यात खायला चांगला.. त्याला तामझाम ची गरज लागत नाही.. पेठ्यासोबत पाणी असलं की झालं काम.. ताजमहाल बांधताना कारागीर दमले की पेठ्यासोबत पाणी पिऊन थोडी विश्रांती घेतली की त्यांचा थकवा मिटत असे... 



चला आता जाऊ पुण्यनगरीत देवांच्या गावी.. वाराणसी, काशी, बनारस काहीही म्हणा पण भाव मात्र एकच... रुद्राची म्हणजेच काशी विश्वेश्वरांची भक्ती आणि गंगेची आरती🙏🙏🙏 शहराबद्दल बोलावे ते काय.. जवळपास १६५४ मंदिरं या शहरात आहेत... वाराणसी हे जगातल्या प्राचीन शहरांपैकी एक मानलं जातं.. काशी हे हिंदूंना सर्वात पूज्य असणारं क्षेत्र आहे.. वाराणसी मधील फेमस गोष्ट म्हणजे इथली मंदिरं आणि "लस्सी" हल्ली ७५ पेक्षा जास्त फ्लेवर ची लस्सी इथे मिळते... आपल्या सोबत विदेशी पर्यटक सुद्धा लस्सीचा आस्वाद घेतातच... अशी कोणतीच गल्ली नसेल जिथे लस्सी मिळत नाही.. बरं!! तुम्हाला ते गाणं आठवतंय का हो?? हं... अरे बजाओ भैया..😆 खाई के पान बनारस वाला...😅 अहो इतक जेवण जेवल्यावर ते पचवायला सुद्धा हवं ना... बनारस मध्ये येऊन बनारसी पान विसरून चालणारच नाही... संपूर्ण वाराणसीत प्रत्येक नाक्यावर तुम्हाला बनारसी पान मिळेलच... 

पुढे उरई रेल्वे स्टेशन वर मिळणारे गुलाबजाम सुद्धा फार प्रसिद्ध आहेत... तिकडे उतरणारे बरेच जणं हा गुलाबजाम चाखल्याशिवाय इथून पुढे जातच नाहीत आणि हे दुकान आत्ताच नाही बरं का... फार पूर्वीपासूनच आहे १९३६-३७ मध्ये हलवाई शंकर ठेकेदार ने उरई रेल्वे स्टेशनवर गुलाबजाम बनवून विकायला सुरुवात केली आणि ती आजही तशीच सुरू आहे... तोंड गोड झालं असेल तर निघायचं का??? 

आपण आता जातोय भगवान श्रीकृष्णांच्या नगरीत मथुरेला... श्रीकृष्णांचे जन्मस्थान आणि त्यांचे बालपण याच मथुरेच्या गोकुळात गेले... हे सुद्धा भारतातील सगळ्यात प्राचीन आणि तितकेच प्रसिद्ध शहरांपैकी एक आहे... खाण्याबाबत बोलायचं तर मथुरेचा पेढा इतका फेमस आहे की आपलं एकावर भागतच नाही... एकावेळी दोन-तीन तरी लागतातच... आग्रा मथुरेहून घरी येताना पेठा आणि पेढा आणला नाही तर घरी No Entry शास्त्र असत ते... कानपूर मध्ये एक विचित्र नावाचे दुकान आहे "ठग्गू के लड्डू" आणि "बदनाम कुल्फी" नावातच सगळं आलं...हा स्पेशल लाडू खायलाच हवा.. शुद्ध खवा, रवा आणि काजू घालून बनवलेला हा लाडू १९६८ पासून कानपूर ची शान आहे... याशिवाय यूपीमध्ये इतरही काही पदार्थ आहेत जसे शीरमाल, लखनऊ मधली प्रकाश की कुल्फी, बास्केट चाट, खस्ता कचौडी, दही बताशे, आणि लास्ट बट नॉट द लिस्ट.. मलाई गीलोरी मिठाई... हे पदार्थ सुद्धा उत्तर प्रदेशात तुम्हाला नक्की ट्राय करायला हवेत... 


युपी ची सफर आवडली असेल तर नक्की सांगा तुम्हाला एखादं ठिकाण.. वेगळी डिश माहित असेल तर कमेंट बॉक्स तुमचाच आहे.. पुन्हा लवकरच भेटू नवीन स्टेट च्या सफरीसाठी.. तोपर्यंत... हेल्दी खा आणि हेल्दी राहा!!!

© Chef Aniruddha Ranade

Food Stylist | Consultant | Food Blogger

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट