GANESHOTHAV
Hello,🙋🏻♂️
आज पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मला मानायलाच हवेत🙏🏻 मध्ये इतका मोठा ब्रेक घेऊन सुद्धा सगळ्यांनी तितक्याच तत्परतेने माझा आर्टिकल वाचला त्यावर छान छान अभिप्राय दिला😇 बरेच दिवसांनी जुना मित्र भेटल्यावर त्याला पण कसं हक्काने विचारतो,"काय रे कुठे गायब झाला होतास?" अगदी तोच सूर मला जाणवला इतका इम्पॉर्टन्ट्स माझ्यासारख्या नवख्या लेखकाला मिळायला, ऍप्रिसिएशन मिळायला, खरंच भाग्य लागतं... लेखकाला Encourage करणारा वाचक वर्ग मिळाला की त्याला अजून लिहिण्यासाठी हुरूप येतो... सो वन्स अगेन सगळ्यांचे मनापासून आभार.. असेच वाचत राहा आणि शेअर करत राहा..
अब मुद्दे की बात करते है,.. मागच्या लेखात स्पेशली आपण अन्नदान विषयी बोललो अन्नदानानंतर समोरच्याचा प्रसन्न चेहरा पाहून एक वेगळाच आनंद मिळतो नाई...बघा नं एखादा विषय आपोआपच खूप विचार करायला लावतो... खरंच मनापासून विचार केला तर प्रत्येक विषयाशी कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या अगदी छोट्या छोट्या आठवणी दडलेल्या असतात... आता हेच बघा बऱ्याच जणांना आपली पाककला दाखवण्याची भारी हौस असते... घरी पाहुणे मंडळी येणार असतील, त्यात आपण एखादा पदार्थ केला आणि नेमका तोच पदार्थ बाकीच्या पदार्थांपेक्षा अव्वल ठरला तर आतूनच लड्डू फुटायला लागतात😁 आणि आपण मात्र असे दाखवतो की, "येतो मेरे बाये हात का खेल था"😉 बरं कधी कधी उलटं सुद्धा होतं आपल्याला नेहमीच चांगला जमणारा पदार्थ नेमका बिघडतो पुन्हा आपली सारवासारव "बघ ना नेहमी नीट होतो, आजच काय झालंय काय माहिती".. या सगळ्यात आपण पटाईत असतो बरं का... फक्त एका गोष्टीची अजिबात खात्री नसते ती म्हणजे स्वयंपाक झाल्यावर आवराआवरी ची... स्वयंपाक कोणीही केलेला असो नंतरचा पसारा कोणी आवरायचा त्यात कुकिंग जर घरातल्या पुरुषाने केलं तर विषयच नाही.. बायकां पर्यंत भावना पोचल्या असतीलच😂
आता गणपतीत उकडीच्या आणि जोडीने नव्या ट्रेंडच्या चॉकलेट मोदकांची रेलचेल सगळ्यांच्या किचन मध्ये असणारे... कोणी शिकवंणार असेल तर कोणी शिकणार पहिल्याच फटक्यात छान उकड जमली तर तो आनंद वेगळाच..मोदक वळता येणं ही सुद्धा एक कला आहे... पाककौशल्यात सुबकपणाची मोदक आपली छान परीक्षा घेतो... महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात मोदक बनवतात, पण योग्य ती उकड, गोलसर पारी, कंजूसपणे कमीही नाही व मोदकाला मोडेल इतकं जास्तही नाही असं सारण, रेखीवपणे जुळत जाणाऱ्या पाकळ्या शेवटी तो कोचदार तुरा हे सगळ्यांनाच जमत नाही... काही घरांत लाडवाचा भाऊ शोभेल असा तो गोल गोळा होतो .तर काही घरात एकेक पाकळी मोजून घ्यावी इतका तो देखणा दिसतो. सणासुदीला, उत्सवाला हल्ली पुरुष मंडळी सुद्धा बायकांच्या जोडीने कामं करतात... काही ठिकाणी वेगळीच मजा बघायला मिळते.. पुरुष अगदी मास्टरशेफ असल्यासारखे बाहेर हॉलमध्ये बसून बायकांना इन्स्ट्रक्शन देत असतात.. हे घाल, ते घालू नको.. गॅस मंद आचेवर ठेव.. काहीतरी जळल्याचा वास येतोय.. मी येऊ का मदतीला?? एवढी बडबड ऐकून बायको खवळते😂 "या या तुम्हीच करा.. मी जाते बाहेर, नुसती बडबड मदतीच नाव नाही नुसतंच हे कर ते कर.. जस आम्हाला काही माहितीच नाही.. सगळं डोकं यांनाच" वगैरे वगैरे... तर सांगायचं हेच की अशी काही ना काही मजा प्रत्येक घरात होतच असते..
माझ्या मागे पडलेल्या लिखाणाचा पुन्हा श्रीगणेशा करायला गणपतीबाप्पाच धाऊन आलेत योगायोगच🙏🏻 मग आज त्यांच्या बद्दलच बोलू या..
आपल्या मराठी माणसाचा कोणताही सण, उत्सव असो एखाद्या स्पेशल खाद्यपदार्था शिवाय सण साजरा झालाय असं कधी झालंय का?? प्रत्येक सणाला माणसाने काहीना काही पदार्थ ठरवलेत... या पदार्थांच पण वैशिष्ट्य आहे बरं का! ऋतूनुसार बदलणार हवामान आणि त्या हवामानाला साजेसे असेच पदार्थ, नैवेद्य म्हणून त्या त्या सणाला देवाला दाखवले जातात.. हिरवंगार केळीचं पान, त्यावर छान डावं-उजवं करून वाढलेला नैवेद्य आणि जोडीला सुबक, पांढरेशुभ्र, रेखीव मोदक पाहताना मिळणारा आनंद वेगळाच असतो. त्यात अनामिक सात्त्विक भाव असतो... समोर गणरायाची मूर्ती, तिच्या डोळ्यातली ती ऊर्जा, तो शांत भाव या साऱ्याला अनुभवत तुपाच्या धारेत मोदकाचा आतलं सारण सांभाळत घेतलेला घास आहाहाहा!! त्याने पोटच नाही तर मन भरतं.... थोडक्यात आपले पूर्वज किती हुशार होते त्यांनी किती विचारपूर्वक पदार्थ ठरवले असतील... ह्या सगळ्याची सुरुवात कुठून, कधी, कशी, झाली असेल??
गणपती काही फक्त आपल्या इथेच असतो असं नाही अगदी थायलंड, इंडोनेशिया मध्ये सुद्धा हिंदू लोक आहेत ते काही भारतीय नाहीत.. त्यांच्याकडे काय प्रथा असतील?? मी घरी सहज विचारलं, गणपती आपल्याकडे कधीपासून बसवतात तर फार पूर्वीपासून असं उत्तर मिळालं... बाबा म्हणाले माझं वय 67 आहे म्हणजे तेवढी वर्ष नक्कीच.. थोडक्यात वर्षानुवर्षे चालत आलेला हा उत्सव... आता गणपतीला मोदक कसे बरे आवडतात?? यांच्या ही कथा आहेत, मग याची नेमकी सुरुवात कधी झाली तर इसवीसन ७५० ते १२०० दरम्यान; उकड, सारण यांचा संदर्भ गुगल काकूंकडून सापडला.. मोदकंच काय हो, दहा दिवस दहा वेगवेगळे गोड पदार्थ नैवेद्य म्हणून बनवले जातात...
गणपती उत्सव आनंद घेऊन येतोच पण सोबत जबाबदारीही घेऊन येतो... नुसता उत्साह असून चालत नाही, जितके दिवस घरी गणपती आहे तितके दिवस गणपतीचं आणि त्यासोबत घरातल्या पाहुण्यांची उठबस; घरातल्या कर्त्या बाईला सगळं बघावं लागतं... बाकीच्यांची कितीही मदत असली तरी सगळी जबाबदारी तिचीच असते, कारण आपल्यात कौतुक पटकन कोणी करत नाही.. चुका मात्र लगेच दाखवल्या जातात.. हल्ली लहान मुलांनाही भारी उत्साह असतो.. त्यांनाही त्यांच्या वाटणीचा छोटासा मोदक गणपती बाप्पा समोर ठेवायचा असतो आणि आयाही तेवढ्या गडबडीतसुद्धा त्यांना नीट शिकवतात... न कंटाळता कारण हीच मुलं मोठी होऊन घरच्या परंपरा चालीरीती पुढे घेऊन जाणार असतात ना.. आमच्या कुटुंबात हरतालिकेच्या आदल्या दिवशी "आवरणं" असतं त्यादिवशी आत्याच्या घरी, आता दादाकडे रात्रीचं जेवण असतं ही परंपरा आजी, आत्या, दादा-वहिनी आणि आता हे सगळं लहानपणापासून बघून गेल्या तीन-चार वर्षापासून आईला सुट्टी देऊन माझ्या पुतणी ने पुढे सुरू ठेवली आहे.. हे सगळं गणपती बाप्पा बघत असतो आणि सगळी विघ्न दूर करुन आपल्याला भरपूर आशीर्वाद देत असतो... आता या कोरोनानेच बघा ना सगळ्यांना कशी शिस्त लावलीये ते... गणपती मिरवणूकीतला धांगडधिंगा बंद झालाय... आता गणपती बाप्पा पुन्हा त्याच्या घरी जाताना नक्की एकदा मागे वळून पाहील त्याची ती तृप्त मूर्ती आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असेल आणि सांगत असेल पुढच्या वर्षी मोदक आणि सोबत लाडू सुद्धा तयार ठेवा... मी लवकर येणारे...😍😍😍
©Chef Aniruddha Ranade
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा