बाहेर खाण्याचे वाढलेले प्रमाण

 Hello नमस्कार 


कसे आहात सगळे??? आज Finally लिहिण्यासाठी हातात पेन घेतलंय... थोडा मोकळा वेळ होता म्हटलं आज लिहायला बसावं.. तसे बरेच महिने झाले शेवटचं लिहून.. काय करणार कोणत्या विषयावर लिहायचं तेच कळत नाही हो.. खरंतर तुम्हा सगळ्यांना मी लिहिलेलं वाचायला आवडतं म्हणून मला लिहावंसं वाटतं, नाहीतर मी काही हाडाचा लेखक नाही.. तोडकं मोडकं जमेल तसं आणि लोकांना कनेक्ट होईल असं लिहिण्याचा प्रयत्न करतो.. 

आपण रोज आजूबाजूला किती गोष्टी पाहतो, ऐकतो, वाचतो.. कधी त्याकडे लक्ष देतो तर कधी सरळ दुर्लक्ष करतो.. बरं दुर्लक्ष का करतो कारण, एक तर गोष्टी आपल्या अवाक्या बाहेरच्या असतात किंवा त्या आपल्याला पटत नाहीत.. नाहीतर फक्त आपण समाजात राहतो म्हणून त्याकडे लक्ष देत नाही, पण समाजात राहून नेहमीच आपण माणसासारखे वागतो का हो??? कधीकधी माणसाची वागणूक जनावराला लाजवेल अशी असते.. हे रेप वगैरे अमानवीय प्रकारच तर आहेत.. जनावर सुद्धा असलं काही करत नाही आणि आपण हे सगळं चुकीचं आहे हे माहीत असून सुद्धा त्याकडे फक्त दुर्लक्ष करतो... असो आपण मेन मुद्द्याकडे वळूया अहो तोच आपला खादाडीचा.. तर... 

आजचा आपला विषय आहे "बाहेर खाण्याचे वाढलेले प्रमाण" हे अगदी शंभर टक्के खरंय की माणसांच्या बाहेर खाण्यानेच मला किंवा माझ्यासारख्या अनेकांना जे हॉटेल रेस्टॉरंट इंडस्ट्री मध्ये काम करतात त्यांना सॅलरी मिळते... तरीही मी हे सांगतोय म्हणजे तुम्हाला खरंच विचार करायला हवा आणि त्याचं गांभीर्य समजून घ्यायला हवं.. आपण बाहेर का खातो यात मी सुद्धा येतो बरं का, एक तर आपल्याला घरी बनवण्याचा कंटाळा आलेला असतो आणि दुसरं म्हणजे बाहेरची चव आपल्याला घरच्या पेक्षा वेगळी लागते rather तीच आवडते.. आता काही जण लगेच म्हणतील नाही बुवा आम्ही की नाही सगळं घरीच करतो... मी सुद्धा बरेचदा वेगवेगळे पदार्थ घरीच करतो, पण काय तुम्ही अजिबातच बाहेर जात नाही की काय??🫣 कधीतरी कंटाळा येतच असेल की.. काहीतरी वेगळ्या चवीच खावसं वाटतच असेल.. आपण कितीही पदार्थ घरी बनवण्याचा प्रयत्न केला तरी तो बाहेरच्या सारखा बनत नाही.. कारण बाहेर सगळे पदार्थ राजेशाही थाटात बनवलेले असतात.. मीठ, मसाले, तेल, बटर, चीज, वगैरे ingredients अगदी सढळ हाताने घातलेले असतात... त्यामुळे पदार्थांची चव completely change होते.. बरं यात जंक फूड हा एक वेगळा प्रकार असतो त्याची गणित निराळीच आहेत... बाहेर कधीच खाऊ नका असं मी सांगणार नाही कारण माझी नोकरी जाईल आणि मला घरी बसायची वेळ येईल हाहाहा😅

मी म्हणेन बाहेर खाण्यावर नियंत्रण मात्र ठेवा.. महाराष्ट्रातच किंवा फक्त शहरांमध्येच नाही तर अख्या भारतभर लोकांना विकेंडला उगीचच रेस्टॉरंट मध्ये जाऊन खायची जी सवय लागली आहे ती मोडायला हवी... सगळे नाहीत निदान जमतील तेवढे पदार्थ घरी बनवून खाता येतील तेवढे खायला हवेत... सतत बाहेर खाण्याचे दुष्परिणाम लगेच दिसून येत नाहीत... जसजसं वय वाढतं हे प्रॉब्लेम्स डोकं वर काढायला लागतात... त्यात तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तर ठीक पण तुमचं काम बसून असेल आणि तुम्ही कुठला व्यायामही करत नसाल तर तुम्हाला लहान वयातच मोठमोठे आजार जडण्याची दाट शक्यता आहे... आता बाहेर खाण्याचे फायदे म्हणाल तर satisfaction इतकाच आहे आणि पोट भरतं... तुम्ही ऑब्झर्व्ह केलंच असेल घरी आपण रोज चार पोळ्या खात असू तर बाहेरच्या दोन पोळ्यांनीच आपलं पोट भरतं.. आता हा फायदा म्हणायचा की तोटा तुम्हीच ठरवा.. आता जरा बाहेर खाण्याचे तोटे बघू... पहिला पैसा, बाहेर एका डिशची जेवढी किंमत असते तेवढ्या पैशात घरी चार माणसं भरपेट जेवू शकतात म्हणजेच waste of money... 

बाहेर जास्त खाल्ल्याने वजन वाढतं पोट दिसायला लागतं आणि नियमित व्यायाम नसल्याने वजन वाढल्यामुळे होणारे आजार हळूहळू मागे लागतात आणि एकदा लागले की ते आयुष्यभर पाठ सोडत नाहीत... जेव्हा तुम्ही घरी शिजवलेलं पौष्टिक अन्न खाता तेव्हा त्यातून शरीराला योग्य प्रमाणात ग्लुकोज चा पुरवठा होतो त्यामुळे शरीरात इन्सुलिनचे प्रमाण योग्य पद्धतीने राखले जाते.. पण हेच बाहेरचे पदार्थ वरचेवर खाल्ल्याने होत नाही, ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो आणि इन्सुलिनचे प्रमाण कमी होऊन डायबेटीस होण्याची शक्यता वाढते... पचनाच्या समस्या उद्भवतात कारण बाहेरच्या जेवणात तेलाचे प्रमाण जास्त असते ज्याने पित्त होतं... फायबरच्या कमतरतेमुळे constipation चा त्रास होऊ शकतो...‌ बाहेरचं जेवण फारसं किंवा घरच्या इतकं पौष्टिक नसतंच त्यामुळे हळूहळू आपल्याला थकवा जाणवायला लागतो.. कारण बॉडीला हवी तेवढी ऊर्जा मिळत नाही... पोषण न मिळाल्याने मूड स्विंग होतात, माणूस चिडचिडा होतो... बाहेरच्या खाण्यात रिफाइंड शुगरचे प्रमाण सुद्धा बरंच असतं... जंक फूड मध्ये आपल्याला जरुरी असलेले carbs, Proteins चे प्रमाण कमी असते त्यामुळे शुगर पटकन low होते... रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयविकार सुद्धा होऊ शकतो... सगळ्यात वाईट म्हणजे पचनसंस्थेचा कर्करोग सुद्धा होण्याची शक्यता असते... 

मी घाबरवत नाहीये, पण हे सगळं खरंच होऊ शकतं त्यामुळे आपल्याला सावध राहायला हवं नियमित व्यायाम नक्की करायला हवा...

BTW आंब्याचा सिझन संपला की एक वेगळाच सीजन सुरू होतो.. अहो कोणता म्हणजे काय चहा आणि कांदा भजीचा... तुमची झाली की नाही भजी, बटाटे वडे करून.. नसेल तर लगेच करायला घ्या आणि हो बाहेरून आणू नका🤭 हाहाहा... 

चला तूर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत आपलं नेहमीच... हेल्दी खा आणि हेल्दी राहा...

©✍🏻Chef Aniruddha Ranade

Food Consultant 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट