बघूया हेही जमतय का

 एक नवीन सुरुवात...


आजपर्यंत मी फूड आणि रिलेटेड आर्टिकल्स लिहीत आलोय.. कधी वेगळ्या विषयावर लिहीन असं वाटलं नव्हतं, पण आता प्रयत्न करायचं ठरवलंय.. बघूया तेही जमतय का?? चुका झाल्या तर तुम्ही आहातच सांभाळून घ्यायला आणि आवडलं तर प्रोत्साहन द्याल याची खात्री आहे म्हणून डेरिंग करतोय...😅


काय मग कसे आहात सगळे?? नवरात्र काय म्हणतीये?? बरे आहात ना?? हो, माहितीये नेहमी माझ्या आर्टिकल ची सुरुवात अशीच होते पण ख्याली खुशाली विचारली की समोरच्याला पण बरं वाटतं.. आपलंसं माणूस बोलतंय असं वाटतं आणि त्यात पुन्हा पावसाचे दिवस आलेत सर्दी, खोकला, ताप थोडक्यात वायरल आणि आता तर डेंग्यूची साथ पण आली आहे बरीच जण आजारी पडतात म्हणून थोडी चौकशी... माझा आर्टिकल वाचून कदाचित थोडीशी तरतरी येईल आणि विचार तर करायला लावेलच...☺️ 


आपल्या आजूबाजूला कित्ती गोतावळा असतो ना, पण आपले विचार मांडायला आपल्या मनातलं शेअर करायला काही थोडी माणसंच आपल्याला जवळची वाटतात आणि गमतीची गोष्ट अशी की त्याच मंडळींसोबत आपले रुसवे फुगवे पण होतात... काही आवडीच्या पदार्थांमध्ये एवढी ताकद असते की तो बनला म्हणजे हे रुसवे फुगवे कुठेच्या कुठे पळून जातात... बघा आहे की नाही फूड सोबत सगळ्यांचं connection... After all खाण्यासाठी जन्म आपुला... अरे बघा पुन्हा ट्रॅक खाण्याकडेच वळतोय😂 

गेल्या वेळेस आर्टिकल मध्ये आपण शेफच्या प्रोफेशन बाबतीत काही बेसिक गोष्टी जाणून घेतल्या होत्या पण माझ्या मते सगळ्यात Difficult Profession कोणतं असेल तर ते म्हणजे HouseWife गृहिणीचं... बाकीचे काय, नोकरी करून आम्ही थकलो म्हणून घरी येऊन आराम करतात पण तेच एका गृहिणीचं काम रात्री झोपेपर्यंत संपत नाही... कधी कधी तर रात्री झोपल्यावर सुद्धा कामं आठवतात... उद्यासाठी कडधान्य, साबुदाणा भिजवायचा राहिला.. दूध तापवायचं राहिलं.. वगैरे वगैरे... सकाळी दाराला लावलेली दुधाची पिशवी काढल्यापासून रात्री जेवणाची पानं आटपेपर्यंत त्यांचं काही ना काही काम सुरूच असतं आणि मग काय दिवस संपतो... परत झोप येईपर्यंत दुसऱ्या दिवशीच Planning सुरू होत... अख्ख घर सांभाळायचं म्हणजे खायचं काम नाही हो.. ते एखादी कंपनी सांभाळण्या इतकच अवघड आहे, म्हणूनच त्यांच्या या Profession ला भरपूर मान द्यायला हवा... Working Women असेल तर त्यांना तर आणखीनच... त्या तर तारेवरची कसरत करत घर आणि दार दोन्ही सांभाळत असतात म्हणूनच घरातल्या प्रत्येकाला सगळी काम यायला हवीत... नसतील येत तर आपणहून शिकायला हवी जेणेकरून आपल्या आईचा, बायकोचा ताण थोडा कमी होईल... 


आता आजचा आर्टिकल पुन्हा प्रश्न होताच वेगळं काय बरं लिहावं?? बरेचदा वाटतं खाण्याच्या बाबतीत सोडून वेगळं काही लिहाव पण मग वाटतं काही चुकलं तर?? तसं चुकांमधूनच शिकतो माणूस तरीही अजून डेरिंग होत नव्हतं... आता आज प्रयत्न केलाय त्यात माझं मराठी म्हणजे धडंकं नाही सगळं मिक्स... तुम्हा सगळ्यांना असं वाचायला आवडतंय याबाबतीत मी जरा लकी आहे🙏🏻🙏🏻 नाहीतर माझ्या आर्टिकल्सच काही खरं नव्हतं... 

आता परवाचीच गोष्ट मी एका Facebook Group वर एक प्रश्न विचारला.. सहजच डोक्यात आला माझ्या म्हटलं बघुया तरी लोकांचं काय मत आहे.. मी विचारलं होतं शालेय शिक्षणाचा एक भाग म्हणून कुकिंग हा एक सब्जेक्ट म्हणून मुलांना (मुलगा मुलगी दोघे) शिकवला तर???

अरे बापरे!!! सगळ्यांनी ह्या प्रश्नात तुफान Interest दाखवला... धडाधड Comments, Likes चा नुसता वर्षाव.. माझा मोबाईल पण दमला बिचारा Load करून हेहेहे!!! जवळजवळ ९५% लोकांचे मत हो नक्की शिकवला गेला पाहिजे असं होतं.. तर काही म्हणाले सगळेच शाळेत का शिकवलं जायला हवं.. घरी शिकतील मुलं कुकिंग आईच्या हाताखाली... हेही एक बरोबरच आहे म्हणा.. आता आजपर्यंतचे सगळे आईच्या हाताखालीच शिकलेत की... बरं काही जण सरळ नाहीच म्हणाले... ठोस कारण असं काहीच नाही.. बहुदा सगळे "हो" म्हणतायेत म्हणून आपण "नाही" म्हणून काही वेगळं... असं आपलं मला वाटून गेलं.. पण आपण Judge नाही करू शकत आपल्या गोष्टीला सगळेच सहमत कसे होतील ना??? आजचे आर्टिकल सुद्धा मला जे वाटतं त्यावर लिहितोय... ते किती चूक का बरोबर माहिती नाही.. तुम्हाला पटलं, आवडलं तर ठोका एक लाईक...☺️☺️


"आपली शिक्षण पद्धती" खूप outdated झालीये असं मला वाटतं.. काळ किती बदललाय पण शालेय अभ्यासक्रम अजून तोच... तेच ते सगळे विषय आणि सगळंच कंपल्सरी हा मेन मुद्दा... काही विषय नक्कीच Compulsory असावेत.. Maths, Science, English, Geography, आणि ज्या प्रदेशात राहतो ती प्रादेशिक भाषा बास झाला की एवढा अभ्यास... माझा सगळ्यात नावडता विषय म्हणजे इतिहास... माझ्यासारखी अजूनही मंडळी असतील.. हा विषय का शिकवला गेला माहित नाही... त्याहून हद्द म्हणजे त्या विषयाची परीक्षा आणि मार्क... अहो गरज काय आहे?? आपल्याला आपल्या देशाचा, जगाचा इतिहास माहिती असायलाच हवा अगदीच मान्य आहे पण त्याची जोर जबरदस्ती कशाला म्हणजे मार्क आणि परीक्षेतून हो... मला वाटतं इतिहास मुलांना गोष्टी रुपात सांगितला तर तो चांगला समजेल आणि दीर्घकाळ लक्षातही राहील... आता चिऊ काऊ ची गोष्ट कोणासाठी नवीन नाही.. लहानपणी ऐकलेली गोष्ट अजूनही आपल्याला स्पष्ट लक्षात आहे.. बरं, ती कोणत्या पुस्तकात कोणी वाचली असेल मला तरी शंका आहे... इतिहास शिकवण्याचा नाही तर समजण्याचा विषय आहे असं मला वाटतं... त्याची परीक्षा, मार्क वगैरे कशाला... गोष्टी रुपात एवढेच काय आता तर व्हिडिओ क्लिप्स च्या रूपात इतिहास समजावला तर तो दीर्घकाळ लक्षात राहील आणि त्याची आवडही निर्माण होईल.. इतिहासात एवढी डोके फोड करण्याऐवजी आता नागरिकशास्त्र हा विषय थोडा advanced, जास्त सिरीयसली शिकवायला काय हरकत आहे?? atleast भविष्यात आपल्याला थोडक्यात देशाला चांगलं सुशिक्षित नेतृत्व तरी मिळेल... नव्या पिढीची पॉलिटिक्स मध्ये रुची निर्माण होऊ शकते... नाहीतर धावतायत आपले सगळे डॉक्टर, इंजिनियर्सच्या रेस मध्ये... अर्थशास्त्र हा सुद्धा एक गरजेचा विषय वाटतो... शाळेत शिकवल्या जाणाऱ्या प्रत्येक विषयाला मार्क असतात त्यामुळे हल्ली सगळी मुलं आणि जोडीने पालक हात धुवून कॉम्पिटिशनच्या मागे लागलेले दिसतात... चांगले मार्क पाडायचेत म्हणून अभ्यास करायचा.. त्यामुळे शिकण्यातला इंटरेस्ट शिक्षणाची गोडी फार कमी मुलांमध्ये दिसून येते.. पण ज्या पालकांनाच मुळात शिक्षणाची गोडी आहे, वाचनाची आवड आहे जाण आहे ते आपल्या मुलांवर मार्कांची सक्ती कधीच करत नाहीत...



आता पुन्हा माझा प्रश्न... मुलांना कुकिंग शिकवलं गेलं पाहिजे का?? माझ्या प्रश्नाचा आशय नेमका हाच असा नव्हता... मी chef असल्याने कुकिंगंच सारखं माझं डोक्यात फिरत असतं... फक्त कुकिंग नाही बरं का तर एकंदरीत Skilled Jobs ज्याचा उपयोग आपल्याला लाईफ टाईम होऊ शकेल किंवा पुढे करिअर म्हणून सुद्धा आपण त्याची निवड करू शकू अशा विषयांची गोडी शाळेपासून मुलांना लावली तर वेगळी Aptitude Test घेण्याची गरजच पडणार नाही... वेगवेगळे आर्ट हा सुद्धा शिक्षणाचा महत्वाचा भाग आहे... हस्तकला आणि चित्रकला याच्या पलीकडे सुद्धा आर्ट आहे की हो.. ते मुलांना कसं कळणार... आणि सगळ्यात महत्त्वाचं "खेळ" विसरून कसं चालेल.. यावर्षी किती मेडल्स मिळवली भारताने... स्पोर्ट्स हा विषय फक्त स्पोर्ट्स डे किंवा क्रिकेट, फुटबॉल एवढाच मर्यादित ठेवून चालणार नाही... इतर मैदानी खेळ किंवा बैठे खेळांनाही शाळेने प्रोत्साहन द्यायला हवं... हल्ली टेक्नॉलॉजीचं प्रमाणही प्रचंड वाढलय त्या टेक्नॉलॉजीचा चांगल्यासाठी अभ्यासासाठी नॉलेज वाढवण्यासाठी उपयोग कसा करता येईल हेही जर शाळेत शिकवलं गेलं म्हणजेच मोबाईलचा किंवा कम्प्युटर लॅपटॉपचा शिक्षणासाठी कसा फायदा आणि उपयोग करता येईल हे मुलांना शिकवायला हवं... नाहीतर काय हो हल्ली मुलं क्रिकेट, फुटबॉल पासून चेस, कॅरम पर्यंत सगळे खेळ मोबाईलवरच खेळताना दिसतात... मैदान आपली रिकामी... घरूनही याबाबतीत थोडी सक्ती व्हायला हवी... आजच्या काळात इंटरनॅशनल लँग्वेजेस ला खूप महत्त्व आहे... त्या लहान वयात शिकल्या तर पटकन आत्मसात करता येतील.. थोडक्यात जगभरात बोलल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या लँग्वेजेस शाळेतच शिकवल्या गेल्या आणि त्याला मार्क ठेवले नाहीत तर मुलं आवडीने शिकतील... आपली मातृभाषा आपण लहानपणापासून शिकतो त्याला काय घरी कोणी मार्क देत नाहीत ना... कारण It's Just an another language Not a Knowledge.. सफरचंदाला Apple म्हंटलं काय सेब म्हटलं काय वस्तू तर तीच राहणार आहे ना..


आता प्रश्न उरला ह्या सगळ्या गोष्टी शाळेतच का शिकायच्या घरी सुद्धा शिकवू शकतो आपण मग घरी का नाही?? पहिली गोष्ट म्हणजे शाळेत मुलांना माझ्या सोन्या ग बबडू ग करत Pamper केलं जात नाही... न कळणाऱ्या वयात मुलांना एखादा विषय नावडीचा वाटू शकतो...शाळेत इतर मुलांसोबत ते विषय सक्तीने शिकावे लागतात... पुढे जाऊन ज्या मुलांना इंटरेस्ट निर्माण होईल त्यांना तो विषय ॲडव्हान्स पद्धतीने शिकवता येऊ शकतो... हो आता यात शिक्षकांचा खूप मोठा रोल आहे कारण आधी त्यांनी या सगळ्यात इंटरेस्ट घ्यायला हवा... एक नवीन स्किल्ड आणि नॉलेजेबल पिढी शिक्षकांकडून घडेल हे नक्की फक्त ती मार्कांची कॉम्पिटिशन तेवढी नको...😅

©Aniruddha Ranade

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट