CHEF'S LIFE - एका शेफ ची व्यथा
Hieee🙋🏻♂️ नमस्कार🙏🏻🙏🏻
काय हेल्दी खाताय ना अहो खायलाच हवं.. मस्त हेल्दी खा आणि भरपूर हसा बघा आयुष्य कसं Tension Free जातं ते... मेन विषयाकडे वळण्याआधी चला जरा स्वयंपाक घरात फेरफटका मारून येऊ... हे पुरुष मंडळींसाठी आहे बरं का... हो मला माहितीये स्वयंपाक घर जागेवरच आहे आणि तुम्ही रोज जाता किचनमध्ये, पण तुम्हाला नक्की कुठे काय ठेवलंय ते माहित आहे का?? आपण फक्त मोजक्या कामांसाठीच किचनमध्ये जातो.. अगदी स्वयंपाक जरी केला तरी बहुतेक जणांना किचनमध्ये नक्की कुठे काय ठेवलंय ते माहीत नसतं.. दहा वेळा विचारावं लागतं... बायका याच्याशी कदाचित सहमत होतील.. म्हणून म्हटलं जरा किचनमध्ये कुठे काय ठेवलंय पाहून येऊ... मागच्या एका आर्टिकल नंतर बऱ्याच कमेंट्स आल्या.. त्यातल्या एकावर बोलायचं होतं.. ते म्हणजे बाहेर खायचं नसेल तर स्वतःला कुकिंग येणं, फार फॅन्सी नको पोटापुरतं बेसिक कुकिंग येणं फार गरजेच आहे... कोणाला कधी कुठे जावं लागेल कामानिमित्त, शिक्षणानिमित्त त्याचा काही नेम नाही.. म्हणून मुलांना आणि मुलींना सुद्धा.. हो काही मुली सुद्धा लाडाच्या असतात ज्यांनी किचनमध्ये कधी पाय ठेवलेला नसतो म्हणून त्यांना सुद्धा बेसिक कुकिंग यायलाच हवं... वेळ मिळेल तेव्हा आईला मदत करायला हवी बहुतेकांची मुलं करतात... मी सुद्धा मुलगाच आहे त्यामुळे लगेच कौतुक नको, जे करत नाहीत त्यांच्यासाठी आहे... अहो नाही तर काय कमेंट सेक्शन माझा मुलगा मदत करतो अख्खा स्वयंपाक करतो आमचे हे सुद्धा किचनमध्ये मदत करतात यानेच भरून जातो... माझ्या लेखाचा मेन मुद्दा बाजूलाच राहतो हो...
आता श्रावण महिना सुरू झालाय So घरातल्या सगळ्यांनीच आईला, बायकोला मदत करावी आपण सगळ्या सणांचे पदार्थ तर आवडीने खातो फोटो पोस्ट करतो तेवढ्याच उत्साहाने मदत सुद्धा करायला हवी चला बरेच उपदेश झाले नाही का 😅😂 आता विषयाकडे वळायला हरकत नाही😁😁
तर आजचा आपला विषय आहे "CHEF'S LIFE"...
सगळ्यांनाच आजकाल शेफ च अप्रूप वाटायला लागलय... आता शेफ हे प्रोफेशन सुद्धा डॉक्टर, इंजिनिअर यांच्या रांगेत आलय हल्ली डॉक्टर सुद्धा CHEF च कौतुक करतात म्हणजे तसं मी अनुभवलय😅 कोणालाही सांगताना Proudly सांगायचं प्रोफेशन झालंय, पण दहा-पंधरा वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी होती... मला या इंडस्ट्रीमध्ये १५ वर्षे होतील या 15 वर्षात खूप काही बदललंय... मेन म्हणजे लोकांचा दृष्टिकोन बदललाय... मला आठवतंय पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा मी हॉटेल मॅनेजमेंट करत होतो तेव्हा बहुतेक जणं म्हणायचे काय मग आता टेबलं पुसणार का?? मी म्हणायचो नाही मला CHEF व्हायचंय, त्यावर उत्तर.. अच्छा म्हणजे आचारी होणारेस; मग काय वडापाव ची गाडी टाकणार का?? असे एकंदरीत विचार होते लोकांचे... मी म्हणतो आपल्याला एखाद्या प्रोफेशनची माहिती नसेल तर कशाला आपलं मत द्यावं कमेंट करावी?? अरे वा!! छान म्हणून सोडून द्यावा ना विषय... जाऊदे फार बोलायला नको कारण हल्ली असं कोणी बोलत नाही... खूप रिस्पेक्ट आलाय या प्रोफेशनला...
टीव्हीच्या माध्यमातून शेफ घराघरात पोहोचला आणि शेफ च खरं काम लोकांना rather जगाला कळलं... मास्टरशेफ सारख्या शोमुळे सामान्य माणसाला शेफ सारखं जेवण बनवणं किती कठीण असतं तेही कळलं... अजून एक, जगात असा कोणीही नाही जो सर्वज्ञांनी आहे सगळीच लोक आयुष्यभर काही न काही शिकतंच असतात त्यामुळे "अरे तू शेफ आहेस ना तुला हा पदार्थ येत नाही" हे म्हणणं खूप चुकीचा आहे... अकॅडमिक्स मध्ये काही सगळं शिकवत नाहीत हो... वर्ल्डवाईड असलेले नावाजलेले पदार्थ तेवढे शिकवतात... पातोळ्या, थालीपीठ, चहा, कॉफी असले पदार्थ नाही शिकवत त्यामुळे इतकं शिकून तुला हे येत नाही?? आम्ही काही न शिकता आम्हाला येतं.. अहो पण तुम्हाला कोणीतरी शिकवलं असेलच की आई, आजी किंवा कुठून पाहून तुम्ही शिकला असेल ना..
एक शेफ आयुष्यभर पदार्थ शिकण्यासाठी उत्सुक असतो त्यालाही तुम्ही शिकवावं... हल्ली छोट्या रेस्टॉरंट मध्ये कोणत्याही नावाच्या डिश असतात ज्या पंचतारांकित हॉटेल किंवा ग्रेड वन रेस्टॉरंट, कॅफेस, स्पेशालिटी रेस्टॉरंट जिथे एक प्रोफेशनल शेफ काम करतो तिथे अजिबात बनत नाहीत... व्हेज उजाला व्हेज मराठा वगैरे नॉनव्हेज च्या सुद्धा अशा विचित्र नावांनी असतात आता ते शेफला का माहित असायला हवं... तेव्हाही विचारल जातं, अरे तुला ही डिश माहिती नाहीये🙄 शेफ आहेस ना तू😤
मोस्टली फक्त घरच्यांनाच शेफ च्या कामाची जाणीव असते... त्यांनाच माहीत असतं किती जबाबदारीच आणि कठीण काम असतं.. जबाबदारी यासाठी की चुकीचं खाऊ घातलं किंवा डिश बनवताना स्वच्छतेची काळजी, किचनमध्ये हायजिन मेंटेन केलं नाही, पर्सनल हायजिन मेंटेन केलं नाही तर सगळ्यात घातक गोष्ट होऊ शकते... फूड पॉइझनिंग ज्यात व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो.. आणि कठीण यासाठी की १४- १६ तास गॅस रेंज ओव्हन अशा गरम वातावरणात उभं राहून काम करावं लागतं... जेवताना, बसायला मिळालं तर नशीबच नाहीतर उभ्यानेच जेवावं लागतं... मोस्टली डाल राईस च असतो... बऱ्याच जणांना वाटत असतं शेफला काय खाण्याला मरण नाही... काहीही बनवून खाऊ शकतो तर तसं अजिबात नाहीये... शेफला सुद्धा रेस्ट्रिक्शन्स असतात असं काहीही बनवून नाही खाता येत... फक्त टेस्टिंगची परवानगी असते आणि एखादी आऊट ऑफ द मेन्यू नवीन डिश सगळ्यांना इंट्रोड्यूस केली तर ती खाण्याची परवानगी असते...
बहुतेकांना Saturday Sunday सुट्टी असते तेव्हा शेफला डबल काम असतं.. सोशल लाइफ शून्य... १५ तास काम केल्यावर त्राणच रहात नाही... Family life नशिबावर depend.. सुट्टी मिळाली वेळेवर घरी आलो तरच... हल्ली बारा बारा वाजेपर्यंत ऑलमोस्ट सगळी रेस्टॉरंट उघडी असतात... त्यानंतर अख्ख किचन क्लीन करायचं मग जेवायचं मग घरी जायचं... पोचायला कमीत कमी एक दीड वाजतोच.. त्यापुढे कसली फॅमिली अन् कसलं काय.. झोपायची वेळ होते... सकाळीच काय एक दीड तास मिळतो तेवढाच... सणावाराला सुद्धा हल्ली रेस्टॉरंट फुल असतात त्यामुळे तेव्हाही सुट्टी नाहीच... एकूणच शेफ लाइफ सगळीकडून miserable असते... तरीही शेफ हसतमुख असतो कारण फूड ही त्याची passion असते... आणि लोकांनी त्याचं फूड टेस्ट केल्यावरच्या समाधानातच तो आनंदी असतो आणि हो ग्लॅमर तर आहेच शेवटी एकच म्हणेन तुम्ही सगळे शेफला, त्याच्या कामाला Appreciate करता त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार🙏🏻🙏🏻
लॉकडाऊन दरम्यान दुसरं तिसरं कोणतही काम न निवडता बऱ्याच जणांनी जेवण बनवणं पसंत केलं त्या सगळ्या HomeCooks च अभिनंदन Cook पासून Chef होण्याची जर्नी खूप मोठी आहे.. खडतर आहे... त्यामुळे स्वतःला शेफ म्हणून घेण्याआधी आपण त्या पात्रतेचे आहोत का हे जाणून घ्या... कस आहे तापावर क्रोसिन ची गोळी दिली आणि ताप गेला म्हणजे तो काही लगेच डॉक्टर होत नाही ना.. तसंच आहे हे जेवण बनवता आलं म्हणजे लगेच कोणी काही शेफ होत नाही... आता इथेच थांबतो... अशी होती माझी छोटीशी शेफ ची व्यथा... पुष्कळ बडबड झाली माझी तसा मी फार बोलत नाही लिखाणातूनच बडबडतो😅😅 आणि तुम्ही सहन करता 🤗 बरं...
आठवतंय ना हेल्दी खा हेल्दी रहा... हे मात्र विसरून चालायचं नाही
©Chef Aniruddha Ranade
Food Consultant
ब्लॉगs खूप छान.अतिशय संयत लिखाण.एक गोडवा आहे लिखाणत.
उत्तर द्याहटवा