बघूया हेही जमतय का
एक नवीन सुरुवात... आजपर्यंत मी फूड आणि रिलेटेड आर्टिकल्स लिहीत आलोय.. कधी वेगळ्या विषयावर लिहीन असं वाटलं नव्हतं, पण आता प्रयत्न करायचं ठरवलंय.. बघूया तेही जमतय का?? चुका झाल्या तर तुम्ही आहातच सांभाळून घ्यायला आणि आवडलं तर प्रोत्साहन द्याल याची खात्री आहे म्हणून डेरिंग करतोय...😅 काय मग कसे आहात सगळे?? नवरात्र काय म्हणतीये?? बरे आहात ना?? हो, माहितीये नेहमी माझ्या आर्टिकल ची सुरुवात अशीच होते पण ख्याली खुशाली विचारली की समोरच्याला पण बरं वाटतं.. आपलंसं माणूस बोलतंय असं वाटतं आणि त्यात पुन्हा पावसाचे दिवस आलेत सर्दी, खोकला, ताप थोडक्यात वायरल आणि आता तर डेंग्यूची साथ पण आली आहे बरीच जण आजारी पडतात म्हणून थोडी चौकशी... माझा आर्टिकल वाचून कदाचित थोडीशी तरतरी येईल आणि विचार तर करायला लावेलच...☺️ आपल्या आजूबाजूला कित्ती गोतावळा असतो ना, पण आपले विचार मांडायला आपल्या मनातलं शेअर करायला काही थोडी माणसंच आपल्याला जवळची वाटतात आणि गमतीची गोष्ट अशी की त्याच मंडळींसोबत आपले रुसवे फुगवे पण होतात... काही आवडीच्या पदार्थांमध्ये एवढी ताकद असते की तो बनला म्हणजे हे रुसवे फुगवे कुठेच्या कुठ...